बावरे मन...भाग-22

बावरे मन..भाग 22 (दोघे डान्स करताना एकमेकांच्या डोळयांत हरवुन गेलेले असतात......म्युझिक संपत तरी त?

बावरे मन..भाग 22

(दोघे डान्स करताना एकमेकांच्या डोळयांत हरवुन गेलेले असतात......म्युझिक संपत तरी त्यांना त्याच भान नसत......म्युझिक संपल्यानंतर सगळे टाळया वाजवु लागतात तेव्हा ते दोघे भानावर येतात.......आणि एकमेकापासुन थोडे बाजुला होतात...........

वा रेवा मस्तच डान्स केलास........आणि सर डान्स येत नाही म्हणत होता किती मस्त डान्स करत होतात...........स्नेहा

थॅक्स.........सुजय रेवा.......)

आता पुढे.....

ए आता आपण सगळे डान्स करुया.........डिजे वर........चालेल ना........स्नेहा

होओओओओ..............सगळे जल्लोषात ओरडतात.......

म्युझिक चालु होत.........तसे सगळे डान्स करु लागतात.....

हे, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली
आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली

आरं, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली
आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आनं तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया
आनं, उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया

झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

सगळे खुप बिनधास्त डान्स करत होते.....सुजयही त्याच्या सोबत डान्स करत होता.....तो त्यांच्याकडेच बघत होता किती बिनधास्त डान्स करतायत सगळे...डान्स कुठला ओ.....वरातीच्या समोर कस नाचतात तस सगळे नाचत होते वाकडे तिकडे होत......

सुजयने असा डान्स कधी केलाच नव्हता......त्यामुळे त्याला थोड वेगळच वाटत होत....रेवा व स्नेहा सुध्दा बिनधास्त डान्स करत होत्या.....स्टफ मधील मुल सुजयचा हात धरुन सांगत होती सर अस करा.....मग सुजय तसा डान्स करण्याचा प्रयत्न करत होता....डान्स करुन झाल्यावर सगळे दमतात....आणि शेकाटीच्या साईडने येवुन बसतात.......खुप वेळ सगळे गप्पा मारत बसलेले असतात........नंतर कशी झोप येईल तशी एकएक करुन झोपायला जाऊ लागले.......शेवटी स्नेहा रेवा सुजय व मालगावे मॅडम हेच बाकी राहीले होते.......

ये रेवा चल आता झोपुया.......झोप आली आहे आता........स्नेहा

हो ग तु हो पुढे मी आलेच.........रेवा

चल ना यार अजुन किती वेळ बसणार आहेस......स्नेहा

अग थोडाच वेळ खुप छान वाटत आहे ग.....किती मस्त थंडी पडली आहे बग ना......तु हो पुढे मी आलेच.......रेवा

बर......स्नेहा

रेवा मी पण जाते ग झोपायला....मालगावे मॅडम......

हो चालेल.....मी आलेच थोडयावेळात...रेवा

आता फक्त रेवा व सुजयच बाहेर बसले होते.......थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही.......

छान डान्स करता तुम्ही........सुजय

थॅक्स सर.....तुम्ही पण छान केलात सर डान्स.......रेवा

थॅक्स......पण तुमच्या इतका जमत नाही.....सुजय

अस काही नाही सर छान केलात तुम्ही डान्स.....रेवा

हा........खुप छान मॅनेज केलाय पिकनीकच...मस्त वाटल मला....सुजय

थॅक्स सर............सरांना ते शायरीच विचारु का....?.....पण सर काही बोलणार नाहीत ना.....विचारतेच......सर ते मगाशी ती शायरी........रेवा अडखळत कशी बशी बोलली......

सुजयला काय बोलाव कळेनाच.......अहो ते सगळे मराठी शायरी म्हणा म्हणत होते....मग आज छान पाऊस पडत होता तर त्यावरुन म्हणालो.....काही तरी उडाउडवीची उत्तर देत सुजय बोलतो....

रेवाच त्या बोलण्याने समाधान झालेल नसत पण ती सोडून देते.........

सर..........रेवा पुढे काही बोलणार इतक्यात सुजय........मिस देसाई आपले बाबा एकमेकांचे मित्र आहेत......मग आपण पण चांगले मित्र होऊ शकतोच ना.......

सुजयच बोलन ऐकल्यावर रेवाला थोडा वेळ ब्लॅकच होते....दोन मिनिट काहीच बोलत नाही.......मग नंतर.......हो...... का नाही सर नक्कीच होऊ शकतो.....रेवा

सुजय रेवाकडे हात करत.....फ्रेन्ड्स......

हो फ्रेन्ड्स......रेवाही त्याच्या हातात हात देते......

थोडा वेळ अशाच गप्पा मारत असतात........रेवा सर म्हणुन काही तरी बोलणार इतक्यात सुजय......तुमच्यात फ्रेन्ड्स ना सर म्हणतात का.......

आ.......रेवाला दोन मिनिट काहीच सुचत नाही........तस नाही सर......पण मी तुमच नाव कशी घेवू तुम्ही माझे सिनियर आहात.......रेवा

अहो पण मी बॅकेत तुमचा सिनियर आहे....बाहेर तर तुम्ही मला नावाने बोलवु शकता ना.........सुजय

बर मी ट्राय करेन......पण तुम्ही पण मला मिस देसाई नाही म्हणायच.........रेवा

ओके.......नाही म्हणणार......सुजय

ओके सर.......रेवा

परत सर..........सुजय

सॉरी......सुजय.......थोडा वेळ लागेल पण होईल सवय....रेवा

हो...चालेल....सुजय

बर आता झोपायला जाऊया का उदया परत लवकर उठायच आहे.....रेवा

हो हो जाऊया.......सुजय

रेवा उठुन रुमकडे जात असते तेवढयात सुजय हाक मारतो......रेवा.........

रेवा मागे वळुन बघते........तुम्ही बोलवलत सर..........रेवा

परत सर..........सुजय

ओ सॉरी...... सुजय......रेवा

हो.....‍थॅक्स.......म्हणायच होत.......सुजय

कशासाठी..........रेवा

असच बोलू वाटल.......सुजय

बर चला झोपुया......रेवा

दुसऱ्या दिवशी सगळे लवकर आवरतात......सुजय आवरुन बसजवळ येवुन थांबतो.....सगळे

एकएक करत बसमध्ये जात होते.......

सर बसा ना बस मध्ये.......मालगावे मॅडम....

हो आलोच एक फोन करायचा आहे........सुजय

फोनच तर नुसत कारण होत.....त्याची नजर तर रेवालाच शोधत होती....तोपर्यत रेवा व स्नेहा समोरुन येत असतात.......त्याची नजर रेवाकडे जाते........

किती सुंदर दिसतेय ही........रेवाने यलो कलरचा लॉन्ग कटचा टॉप घातला होता त्यावर पिंक कलरची ‍लेगीन्स... वन साईड ओढणी घेतली होती....केस मोकळे सोडुन एका साईडला घेतले होते......कानात झुमके घातलेले...चेहऱ्यावर हलकासा मेकअप....पिंक कलरचीच लिप्स्टिक लावलेली...डोळयात बारीक ओढलेली काजळ......आणखीन सुंदर दिसत होती.......खुप छान दिसत होती रेवा.....

सुजय तिच्याकडे एकटक बघत असतो.......

रेवा व स्नेहा बस जवळ येतात.......

सर.........सर......स्नेहा सुजय समोर चुटकी वाजवत बोलवते.....तसा तो भानावर येतो....

काय म्हणत होता मिस स्नेहा......सुजय

चला जाऊया सगळे बसमध्ये जावुन बसलेत....स्नेहा

हो आलोच......सुजय

रेवा बस मध्ये जात असते तितक्यात तिचा मोबाईल खाली पडतो.....ते घेण्यासाठी ती खाली उतरते....तोपर्यत सुजय तो उचलुन तिच्या हातात देतो.......

थॅक्स.......निघुया.......रेवा

हो.............रेवा.......सुजय रेवाला बोलवतो.....

काय......रेवा

हा ड्रेस तुला छान दिसतोय....आणि तु पण.......सुजय पटकण बोलुन जोतो.....

सुजय अस बोलल्यावर रेवा एकदम त्याच्या कडे बघते.......रेवा अस बघितल्यावर सुजयच्या लक्षात येत आपण माती खाल्ली.....

म्हणजे ते ड्रेस.......ते......म्हणजे.......सुजयला काय बोलाव कळेनाच........तुझा ड्रेस छान आहे अस म्हणुन पटकन बस मध्ये जातो.........सुजयची अशी अवस्था बघुन रेवा हसु लागली.......

ये रेवा चल पटकन वेळ होतोय.......स्नेहा

हो आलेच........रेवा

सगळे बस मध्ये बसतात........स्नेहा परत एकदा चेक करते सगळे आलेत का.......बर निघायच

का..............स्नेहा

हो निघुया.........बस सुरु होते.......मॅडम.....बोला ना गणपती बाप्पा मोरया......रेवा मॅडमांना हळु आवाजात सांगते........

मालगावे मॅडम.........गणपती बाप्पा........मोठयाने ओरडतात......

तसे सगळेच..........मोरया......म्हणतात........गणपतीच नाव घेवुन प्रवासाला सुरुवात केली तर एक छान उत्साह येतो

बस मध्ये दंगा मस्ती करत होते......सुजयला सकाळी बोललेल आठवत असत......आपण अस कस बोललो........वेडया सारखा वागतोय मी........काय वाटत असेल तिला........सुजय आपल्याच विचारात असतो......

थोडयावेळातच...दंगा मस्ती करत पुढच्या पॉईन्टवर पोहचतात.......ऐका.... किल्ल्यावर जाण्यासाठी होडीतुन जाव लागेल......चला जाऊया........दोन होडीत थोडे थोडे बसतात व किल्ल्यावर जायला निघतात........

किती सुंदर वाटत आहे ना ग समुद्रातुन जाताना.....स्नेहा

हो ग खुप छान वाटत आहे......आजुबाजुचा परिसर तर बग ना किती ‍मस्त वाटत आहे........अथांग पसरलेला समुद्र आणि त्याचा खळखळणारा आवाज मस्त वाटत आहे...

सुजयच लक्ष रेवाच्या बोलण्याकडे होत.....कसली भारी आहे यार ही........प्रत्येक गोष्टीत किती आनंद घेत असते....

थोडयावेळात सगळे किल्ल्यावर पोहचतात.......सगळे किल्ल्याला बघत असतात.....हे किती छान आहे........हे कस केल असेल नाही.......अशी बडबड चालु असते.......

ए रेवा आपण नुसत किल्ला पहायचा आहे का ग...त्याची थोडी फार माहिती नको का ग.....स्नेहा

हो ग.....थांब तिथे एक काका बसलेत त्यांना विचारुया........रेवा त्या काकाना किल्ल्याची महिती विचारते..........मग ते काका त्यांना जी थोडीफार माहीत आहे ती सांगतात.....

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र ला लागून मुरुड नावाचे एक गाव आहे. मुरुडपासून सुमारे चार पाच किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. या गावाच्या पश्चिमेला समुद्रातील एका बेटावर मुरुड-जंजिरा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी राजापुरीहून शिडाच्या होड्या सुटतात. अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसलेला हा मुरुड-जंजिरा किल्ला अभेद्य मानला जातो.

मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. जंजिर्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. त्याच्या आतील बाजूला एका वाघाने चारही पायात एक एक हत्ती पकडला आहे, तसेच शेपटीत व तोंडातही हत्ती पकडून ठेवले आहेत. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच दरवाजावरील नगारखाना दिसतो. तिथे संगमरवरी दगडांवर अरबी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. पुढे पीर पंचायतन हे एक धार्मिक स्थळ आहे. किल्ल्याला सागराच्या दिशेनेही एक दरवाजा आहे. एकूण एकोणीस बुरूज किल्ल्याला आहेत आणि दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षाही जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पायर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीतील प्रत्येक कमानी मध्ये तोफा ठेवलेल्या आहेत.  किल्ल्याच्या मध्यभागी पाच माजली भव्य वाडा आहे जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत पसरलेला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीचा मनोरम्य प्रदेश दिसतो.

किती मस्त ना.........छान वाटत आहे खुप...........स्नेहा........

काका खुप छान माहीती सांगितली तुम्ही........थॅक्यु काका......रेवा

बर निघुया का आता...........मालगावे मॅडम........

बराच वेळ किल्याची माहीत घेवुन झाल्यावर सगळे मुरुडच्या किनाऱ्यावर जायला निघतात.........परत होडीत सगळे बसुन जायला निघतात......

मुरुड-जंजिरा बद्दल व बाकीच्या पॉईन्ट बद्दल थोडी फार माहीती देण्याचा प्रयत्न केले आहे......त्या माहीतीत काही कमी जास्त वाटत असेल तर कथेचा भाग म्हणुन समजुन घ्या.....

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all