बावरे मन...भाग-55

बावरे मन..भाग 55 (स्नेहा रेवा व सुजयला हळद कशी लावता येईल हयाचा विचार करत असते पण तिला काहीच सुचत ?

बावरे मन..भाग 55

(स्नेहा रेवा व सुजयला हळद कशी लावता येईल हयाचा विचार करत असते पण तिला काहीच सुचत नाही.....ये आध्या इकडे ये ना.....स्नेहा आध्याला बोलावते.......

काय ग वहिनी........आध्या

ऐक ना.......ते सुजयला ना रेवाला हळद लावायची आहे.....पण मला काहीच सुचत नाहीये.....स्नेहा)

आता पुढे...

एवढच ना....मी ते मॅनेज करते....तु नको टेन्शन घेवुस.....ओके.......आणि तु दादुला हळद लावलीस का...आध्या

आ.....ते.....नाही.....स्नेहा

का......आध्या

सगळयांच्या समोर कशी लावु.......स्नेहा

हो ते पण आहेच.......बर मी आलेच हा.....आध्या काही तरी विचार करत बोलते......

आध्या रेवा जवळ जाते.......रेवा ऐक ना.....आध्या

हो बोल ना काय झाल........रेवा

अग वहिनीला आणि दादुला एकमेकांना हळद लावायची आहे..पण सगळयांसमोर लावायला लाजतायत....आध्या

मग आपण काही तरी करुया ना.....रेवा

पण काय करायच.....आध्या थोडा विचार करत बोलते.....

माझ्याकडे एक आयडिया आहे........रेवा

कोणती.....आध्या

रेवा आध्याला कानात तिची आयडिया सांगते.....

हा हे बेस्ट आहे......ओके मग मी कामाला लागते.....आध्या

ओके.......रेवा

आध्या सुजयला जाऊन हा प्लॅन सांगते........आणि सुजय पण तयार होतो.......बर जा आता वहिनीला सांग जा......सुजय

आध्या स्नेहाजवळ येते......ये वहिनी ऐक ना..........रेवाने तुला हॉलच्या मागच्या बाजुला बोलावल आहे.......आध्या

मागच्या बाजुला.......पण का.......स्नेहा

ते काही माहीत नाही ग तिने पाठवुन दे म्हणुन सांगितली फक्त....आध्या

बर मी बघते.....अस म्हणुन स्नेहा हॉलच्या मागच्या बाजुला जाऊ लागते......

इकडे रेवा स्नेहा गेल्यावर आशुजवळ येते........दादु तुला सुजयने हॉलच्या मागच्या बाजुला बोलावल आहे....रेवा

मागच्या बाजुला आत्ता का.......आशु

ते काही बोलला नाही फक्त पाठवुन दे म्हणुन सांगितल त्याने....रेवा

बर मी बघतो जातो.....आशु

आशु व स्नेहा गेल्यावर सुजय रेवा व आध्या......एका ठिकाणी येतात.....फायनली झाल यार.....आध्या

अग पण त्याच्यांकडे हळद नको का लावायला.....रेवा

अग  रेवा मी ना.....मघाशी वहिनीच्या हातात हळदीचा बाऊल दिला होता.....आणि ती तशीच गेलेय सोबत घेवुन......आध्या

बर.....झाला ना तुमचा प्लॅन सक्सेफुल........सुजय

हो मग काय.......रेवा आपल्याला आई बोलवत आहे चल जाऊया..... आध्या

****

रेवा.......रेवा.........स्नेहा रेवाला आवाज देत होती........अरे कुठे आहे ही ये बोलली आणि स्वत:च गायब झाली आहे....स्नेहा रेवाला शोधत असते तेवढयात मागुन आशु सुजयला शोधत येतो....

शोधत शोधत दोघे एकमेंकासमोर येतात........तुम्ही........तु.......दोघे एकदमच बोलतात.....

रेवाने मला इथे बोलवल होत........म्हणुन आले होते......पण तुम्ही काय करताय इथे....स्नेहा

अग मला ते सुजयने बोलवल होत........पण केव्हाचा शोधतोय त्याला...कुठे दिसत नाहीये......आशु

थांबा मी रेवालाच फोन करते......स्नेहा

हो चालेल.....आशु

स्नेहा फोन स्पिकर वर ठेवते.......हॅलो........हॅलो रेवा....अग कुठे आहेस तु केव्हाची वाट पाहतेय मी.....स्नेहा

माझी कशाला वाट पाहतेयस.......दादु आहे ना सोबत.......रेवा

अग ते आहेत......पण तुझ काही तरी काम होत ना......ए तुला कस कळल आशुतोश इथे आहेत ते....स्नेहा

ये बुध्दु.........तुम्हा दोघांना थोडा वेळ मिळावा म्हणुन आम्ही हा प्लॅन केलाय......कळल का.......आणि तुला दादु ला हळद लावायची होती ना.....आता एकमेकांना हळद लावा आणि या पटकण कोणाला कळायच्या आत.....ओके बाय.......अस म्हणुन रेवा फोन ठेवते.....

मला हळद लावायची होती तुला......आशु स्नेहाच्या जवळ येत बोलतो.....

आशुजवळ येताना......स्नेहा लाजत बाजुला जात असते......स्नेहा बाजुला जाताना आशु तिचा हात पकडुन तिला आपल्याकडे खेचतो.....त्या खेचण्याच्या नादात स्नेहाच्या हातातुन तिचा मोबाईल खाली पडतो...स्नेहाच्या हातातील बाऊलमधील हळद घेवुन आशु स्नेहाच्या गालाला लावतो.......तशी स्नेहा लाजुन मान खाली घालते......मला लावणार नाहीयेस हळद..आशु स्नेहाच्या गालाला हात लावत बोलतो....स्नेहा आणखीन लाजते.....तिला आता आशुकडे पाहताना लाजायला व्हायला लागल......स्नेहा लाजताना आशु स्नेहाच्या हनुवटीला पकडुन तिचा चेहरा वर करतो.....आशुने चेहरा वर केल्यावर स्नेहा लाजुन डोळ बंद करते.....आशु आपले गाल स्नेहाच्या गालावर हळुवार फिरवतो..आणि स्नेहाच्या कानाजवळ जाऊन बोलतो....मी माझी हळद लावुन घेतली.....आशुच्या त्या कानावजवळ हळु बोलण्याने त्याच्या त्या उष्ण श्वासाने स्नेहा मोहरुन जाते.....ती लाजुन मागे वळते...व आशुकडे पाठ करुन उभी राहते......आशु मागुन जाऊन स्नेहाला मिठी मारतो....सगळे वाट पाहत असतील........स्नेहा हळु आवजात बोलते.....असुदे कोणी नाही वाट पाहत.....कोणी तरी येईल........कोणी नाही येत.....आशु स्नेहाच्या कानाजवळ येवुन बोलत असतो.....त्याच्या त्या श्वासामुळे स्नेहा जास्तच मोहरुन जात होती..ती तशीच लाजत आशुकडे पाहते......आशु जास्तच जवळ येताना पाहुन स्नेहा तेथुन पळुन जाते.....स्नेहा पळुन जाताना आशु हसु लागतो व तिच्या मागुन तो ही लॉन वर येतो......कोणाच ही लक्ष नाही हे पाहुन दोघे सगळयांच्यामध्ये येवुन मिक्स होतात....

स्नेहा येताना पाहुन रेवा तिच्याजवळ येते....मग काय मॅडम झाली का स्पेशलवाली हळद....

गप्प ग......स्नेहा लाजुन बोलते.....

बर मी आलेच......अस म्हणुन रेवा तेथुन जाते......थोडावेळ गेल्यानंतर स्नेहाच्या लक्षात येत की तिचा मोबाईल मिळत नाहीये.....तिला एकदम आठवत की मोबाईल मघाशी हॉलच्या मागे गेलो होतो तिथे पडला आहे.....ती रेवाला बोलावते......रेवा ऐक ना माझा मोबाईल हॉलच्या मागच्या बाजुला पडला आहे तो आणुन देशील का.....

हळद लावण्यात इतके मग्न होता होय मोबाईल पडला आहे हे पण कळल नाही तुम्हाला.....रेवा स्नेहाला चिडवत बोलते...

गप्प ना यार....जा आण जा पहिला....स्नेहा

अग हो आणते थांब......रेवा

आध्याने स्नेहाने रेवाला सांगितलेल ऐकलेल असत......आणि आता तिला चान्स भेटतो...सुजयला रेवाला हळद लावता येईल......रेवा गेल्यानंतर आध्या सुजयजवळ येते.......

दादया ऐक ना.......वहिनीचा मोबाईल ना मागच्या बाजुला पडला आहे.....तो घेवुन येशील का....आध्या

बर थांब मी आणतो.......सुजय

रेवा मोबाईल शोधत असते पण तिला मिळतच नसतो........

काय शोधत आहेस तु......सुजय मागुन येत बोलतो.........

ते मोबाईल शोधतेय स्नेहाचा......पण तु इथे काय करतोयस.......रेवा

मी पण मोबाईल शोधायला आलो आहे.....मला आध्याने सांगितल मोबाईल शोधायला....सुजय

ओ....तिला माहित नसेल मी शोधायला आलेय ते.......रेवा

तसच झाल असेल....मिळाला का तुला मोबाईल...सुजय

अरे नाही ना.....केव्हाची शोधतेय......रेवा

अग मग कॉल कर ना.....सुजय

मी माझा मोबाइल विसरुन आलेय.....रेवा

बर थांब मी करतो.......सुजय स्नेहाच्या फोन वर फोन करतो.......रिंग झाल्यावर स्नेहाचा फोन रेवाला दिसतो......अरे तो बग तिथे आहे....अस म्हणत रेवा मोबाईल घेवुन येते.......चला जाऊया....मिळाला फोन.....रेवा

हो चला....सुजय

रेवा पुढे जात असते पण लेहग्यामंध्ये तिचा पाय अडकतो व तिचा तोल जातो.....ती पडताना पाहुन सुजय तीला पकडतो....आणि पकडण्याच्या नादात रेवाचा गाल सुजच्या गालाला लागतात....व नकळत का होईना एकमेकांना हळद लागते......सुजयचे हात हळदीचे असतात......त्यामुळे रेवाला पकडताना तिच्या कंबरेला हळद लागते......दोघेही एकमेकांना पाहत तसेच राहिलेले असतात....इतक्यात सुजयचा फोन वाजतो.....फोनच्या आवाजाने दोघे भानावर येतात......व एकमेकापासुन बाजुला होतात....

आध्याचा फोन आहे.......हा बोल आध्या....सुजय

दादया मोबाईल मिळाला का........आध्या

हो मिळाला.......सुजय

आणि हळद लावलास ना माझ्या भावी वहिनीला...आध्या हसत बोलते.....

म्हणजे तु........सुजय काही बोलणार पण रेवा समोर आहे म्हणुन गप्प बसतो....मोबाईल मिळालाय घेवुन येतो अस म्हणुन फोन ठेवतो....

फोन मिळला का विचारायला फोन केली होती का......रेवा

हो......निघुया.......सुजय

हो....रेवा पुढे जात असते..........आणि सुजय आध्या बोललेल आठवुन हसत असतो....हळद लावायची इच्छा तर काही न करताच पुर्ण झाली.......अस मनातल्या मनात बोलत हसत तो रेवासोबत हॉलवर येतो....

स्नेहा हा घे तुझा मोबाईल......रेवा

थॅक्स यार......स्नेहा

थॅक्स काय ग......तु पण ना....रेवा

ये वहिनी रेवा इथे काय करताय तुम्ही....चला ना सगळे तिथे किती धमा करत आहेत.....आध्या

अग हो आम्ही येतच होतो......रेवा

बर चला पटकण.........आध्या दोघींचा हात पकडुन घेवुन जाते.......

सगळे एकमेकांना हळद लावत असतात.......फोटोग्राफर स्नेहा व आशुचे कपलफोटो काढत असतो......त्यांचे फोटा काढुन झाल्यावर फॅमिली फोटो काढतात......आशु व स्नेहाचे फ्रेन्ड आलेले असतात त्यांच्यासोबत फोटो काढतात.....फोटो काढुन झाल्यावर स्नेहा व आशुचे फ्रेन्ड त्यांना घेवुन जातात व म्युझिक लावुन हळद खेळु लागतात......

आसमा में जैसे बादल हो रहे हेँ
हम धीरे धीरे धीरे पागल हो रहे है

आसमा में जैसे बादल हो रहे हेँ
हम धीरे धीरे धीरे पागल हो रहे हेँ
में तो मार्जन हाई वो न जो मिल्ने आए
में तो मार्जन हाई वो न जो मिल्ने आए
सान्से मेरी हेँ उनके हातो में

याद पिया कि, मेरे पीया कि आने लागि
हाय भीगे भीगे रातो में
याद पिया कि आने लागि
हाय भीगे भीगे रातो में

सॉन्ग वर सगळे धमाल करत असतात......सुजयही धमाल करण्याच्या मुडमध्ये येतो....तो हळद घेवुन स्नेहा व आध्याला लावतो........आता रेवाला लावणार इतक्यात राधिका तिथे येते....

ओय मला लावणार नाहीयेस हळद..........राधिका

हो लावायच की.....थांब हा लावतो......पण सुजयला आधी रेवाला हळद लावयची होती....अग राधिका आई तुला बोलवत आहे बग.........सुजय काही तरी कारण सांगतो.....

म्युझिकच्या आवाजाने राधिकाला ऐकायला येत नाही........काय म्हणालास.....

अग तुला आई बोलवत आहे.....सुजय

तु हळद लाव ना मी जाते....राधिका......

तु ये जाऊन काय म्हणत आहे बग जा पहिला.....आल्यावर लावतो तुला.......सुजय

बर मी आलेच जाऊन.....राधिका.

तेरे बिन क्या हाल हेँ अपना
क्या तुम्को बातलाए रे
छूडिय मेरी रोए मेरी
चुण्नरी रोए जये रे

हो टेरेन क्या हाल हेँ अपना क्या तुम्को बातलाए रे
छूडिय मेरी रोए मेरी चुण्नरी रोए जये रे
बिन तेरे सब सज़ हेँ, बिन तेरे कहा माज़ा हेँ?
बिन तेरे सब सज़ हेँ, बिन तेरे कहा माज़ा हेँ?
बिन तेरे कहा माज़ा हेँ यादो में

याद पिया कि, मेरे पीया कि आने लागि
हाय भीगे भीगे
याद पिया कि आने लागि
हाय भीगे भीगे रातो में

राधिका गेल्यावर सुजय रेवा जवळ येतो.....

रेवा..... वहिनी बोलावत आहे बग.......सुजय

स्नेहा बोलवत आहे म्हटल्यावर रेवा स्नेहाकडे पाहते.....रेवा तिकडे पाहिल्यावर सुजय रेवाला हळद लावतो....

तु ना आता.......रेवाही हळद घेवुन सुजयच्या मागे लागते......त्याची पकडा पकडी सुरु असते.....सुजय पळत पळत आध्याच्या मागे येतो........

अरे काय करताय.......आध्या

सुजय थांब हळद लावुन घे.......रेवा त्याच्यापाठी लागत बोलत असते..... आध्या सांग ना ग तु....मला लावुन आलाय आणि आता हा माझ्याकडुन लावुन घेत नाहीये......

दादया.......काय हे.....लहान आहेस का आता.......आध्या नौटंकी करत बोलते....

मग आध्या रेवाला डोळा मारते.......आणि जा तु......मी जातेच.....रेवा जायच नाटक करते.......रेवा जाताना सुजय आध्याजवळ येवुन थांबतो.......सुटलो...यार.......अस म्हणुन पुढे जात असतो तेवढयात आध्या त्याला पकडुन ठेवते.........रेवा ये पटकण........आध्याचा आवाल आल्या आल्या रेवा पळत येवुन सुजयला हळद लावते.......एवढी की विचारायलाच नको.......

ओय पार्टी चेंन्ज का.......बर बर......नंतर बघतो तुला........सुजय चेहऱ्यावरची हळद पुसत बोलतो...

सुजयचा अवतार बघुन रेवा व आध्या हसायला लागतात.....

ये रेवा हे काय.........तुझ्या कंबरेला कशी काय हळद लागली....आध्या

रेवाला दोन मिनिट काहीच कळेना......तिथे कशी काय हळद लागली असेल.....

आध्या अस बोलल्यावर सुजयला लक्षात येत की मघाशी आपण हिला पकडलेलो तेव्हा हळद लागलेय....तो रेवाकडे पाहतच राहतो.........

सुजयला अस पाहताना रेवाच्या लक्षात येत.......की मघाशी मी पडताना सुजयने मला पकडल होता...तेव्हाच लागली असेल हळद.......पण आता रेवाला काय सांगायच कळेना.......

अग काय विचारतेय......कशी काय लागली......की कोणी लावली......आध्या सुजयकडे पाहत बोलते....

तसा सुजय डोळे मोठे करुन गप्प बस म्हणुन सांगतो...

अग कोणी कशाला लावेल....हळद खेळताना लागली असेच चुकुन......रेवा काही तरी उडवा उडवीची उत्तरे देत बोलते......

अरे काय रे हे.........काय करुन घेतलायस...राधिका तिथे येत बोलते...आणि ती पण हसायला लागते......

तुम्ही ना आता मार खाता.......अस म्हणुन सुजय रेवा व आध्याच्या मागे जात असतो.सुजय आता मारेल म्हणुन त्या दोघी पळुन जातात.....

सुजय त्याच्यां मागे जात असतो....पण तो जाताना राधिका त्याचा हात पकडते..ओय लाव ना हळद.......

अरे हो विसरोलच की.......हे घे.........सुजय राधिका हळद लावत बोलतो....

कब वो दिन आएग जब हाम भि मेहनडी लगवएंगे
न जाने कब आएंगे ओर डोली में ले जयंगे
हूओ, कब वो दिन आएग जब हाम भि मेहनडी लगवएंगे
न जाने कब आएंगे ओर डोली में ले जयंगे
बारी न आए हुमरी, बारते देखि सारी
बारी न आए हुमरी, बारते देखि सारी
नाछे हाम सबकि बारातो में

याद पिया कि, मेरे पीया कि आने लागि
हाय भीगे भीगे रातो में
हो याद पिया कि आने लागि

हाय भीगे भीगि रातो में.

सुजय रेवा स्नेहा आशु आध्या राधिका.......सगळया मोंठयांना घेवुन डान्स करतात.....किती तर वेळ ही दंगा मस्ती सुरु असते.....मोठे लोक सुध्दा लहान होवुन हळदीचा मनसोक्त आनंद लुटत होते.....

म्युझिक संपल्यावर.......आनंदराव सगळयांना.........मुलांनो...चला आवरा आता परत संगिताची तयारी करायची आहे ना.......नाही तर परत वेळ होईल पुढच्या कार्यक्रमाला.... आनंदरांवानी सांगितल्यावर सगळे पटपट आवरायला जातात....

***

क्रमश:

पुढचा भाग 14/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

कशी वाटली हळद......धमाल्ल केली ना हळदीला.....मी तर खुप धमाल केले....अहो आता तर ही सुरवात आहे....आता कुठे मेंहदी व हळदी झाली.....अजुन धमालवाला कार्यक्रम बाकी आहे......तुमच्या लक्षात आलच असेल......हो ना.....नाही का आल........अहो संगीत.......संगीतला धमाल करायची आहे ना........मग पाहुया पुढील भागात......कशी धमाल करतात संगीतला....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all