बावरे मन...भाग-45

बावरे मन..भाग 45 (माझ्या होणाऱ्या बायकोचा..........सुजय थोड लाजत गालातल्या गालात हसत बोलतो....... ओ हो..........

बावरे मन..भाग 45

(माझ्या होणाऱ्या बायकोचा..........सुजय थोड लाजत गालातल्या गालात हसत बोलतो.......

ओ हो..........बायको का.........आल ना तोंडातुन........आध्या

मग माझी बायको आहेच सुंदर पाहत रहावी अशी............सुजय फोटोकडे पाहत बोलत असतो..........आय लव्ह...................सुजय पुढे काय बोलणार इतक्यात रेवा तिथे येते..........)

आता पुढे....

आय लव्ह..........काय म्हणत होतास.......म्हणजे कोणाला म्हणत होतास............रेवा आत येत बोलते

रेवा आलेली पाहुन सुजय त्याच्या हातातील मोबाईल मागे लपवतो......अग कोणाला बोलणार आमच्या वेडाबाईलाच की सुजय आध्याकडे बघत बोलतो........

आर्श्चयाने त्याच्याकडे मला म्हणत होतास काय.......बर......या आविरभावात बघते...

सुजय प्लीज समजुन घे.......असा चेहरा करत बघत असतो.......

अरे काय झाल काय चाललच तुमच्या दोघांच काय खाणाखुना करताय........काही महत्वाच बोलत होता का.......मग मी नंतरच येते......अस म्हणत रेवा बाहेर जात असते.......

अग ये........काय ग तु पण........महत्वाच बोलत नव्हतो आम्ही........ये तु........आध्या

खरच ना ग........म्हणजे सुजय एकदमच शांत झाला ना म्हणुन मला तस वाटल.....रेवा

हो ग......तु हयाच्याकडे लक्ष नको देवु......वेडा आहे हा......आध्या मुद्दाम सुजयला चिडवत बोलते......

हो का.....मी वेडा आहे होय......थांब तुला बघतो.....अस म्हणत सुजय आध्याला मारायला पाठीमागे लागतो.....तशी आध्या इकडे तिकडे पळु लागली........पळत पळत ती रेवाच्या मागे जाते.......रेवाला पकडुन ती इकडे तिकडे करत असते.........अग आध्या पडशील सावकाश......नाही ग पडत.....तु मला आता पकडुच शकत नाहीस......रेवा आहे ना तुझ्या आणि माझ्यामध्ये........आता कसा पकडणार.....आध्या त्याला चिडवत होती.......हो का थांब आता कस पकडतो बग......अस म्हणत सुजय आध्याला पकडु लागतो......तो ही रेवाच्या भोवती इकडे तिकडे करु लागतो......सुजय काय करतोयस तु.......लागेल तिला.....सोड ना काय तु पण काय लहान मुलांसारखा करतोयस.....रेवा त्याला समजावत असते पण हयांची पकडा पकडी सुरुच असते.......सुजय एकदम आध्याला पकडायला जातो........पण आध्या त्याला चुकवते व बाजुला होते........आणि सुजय  रेवाला पकडतो........सुजयच्या आशा अचानक पकडण्याने रेवा भांबावुन जाते.......आणि ती सुजयकडे पाहु लागते........सुजयही त्याच्या नकळत तिला पकडल्याने......आणि रेवाच्या इतक्या जवळ असण्याने सुन्नच होतो.......एकटक रेवाकडे पाहत राहतो......आध्याला परत चान्स भेटतो व ती त्यांचा फोटो काढते........

ओय दादया मला पकडत होतास रेवाला नाही.........आध्या सुजयला भानावर आणण्यासाठी बोलते.......

तसे दोघे भानावर येतात......आणि एकमेकांपासुन बाजुला होतात.........ये दादया आता आम्हाला झोपायच आहे तु जा तुझ्या रुममध्ये......आध्या त्याला बोलत खुणवुन सांगते.....

बर झोपा तुम्ही......मला पण झोप आलेय....उदया आणि बॅकेत जायच आहे.....रेवा माझ्यासोबतच येणार ना तु........

हो तुझ्यासोबतच की......रेवा

बर चालेल......गुड नाईट.....सुजय

गुड नाईट.....रेवा

गुड नाईट.......दादया.......आणि हो......स्विट ड्रिम.......हा......आध्या परत सुजयला चिडवत बोलते....

तुला मी उदया बघतो.......आता झोप तु.........सुजय अस बोलत त्याच्या रुममध्ये जातो....

रेवा व आध्या पण थोडा वेळ गप्पा मारुन झोपत असतात...तेवढयात आध्याला सुजयचा मेसेज येतो....तो फोटो मला सेन्ड कर.....

ये दादया तुला काय उदया दिला तर चालला नसता काय.....आध्या

नाही आता सेन्ड कर........मला पहायचा आहे......सुजय

बर बाबा करते......आध्या सुजयला फोटो सेन्ड करते व मोबाईमध्ये काही तर बघत बसते......

रेवा झोपायचा प्रयत्न करत असते पण तिला सकाळपासुन सुजय आणि तिच्यामध्ये जे काय अचानक पणे घडुन आलेले  क्षण आठवत होते.....काय होतय यार मला.....सुजय जवळ आल्यावर मला काय होतय काही कळतच नाही.....जेवण बनवताना त्याने चेहऱ्यावर हात फिरवला तेव्हाही वेगळीच फिंलिंग आली.......नंतर जेवताना तर.....अस बोलुन रेवा थांबते.....आणि तो क्षण तिच्या नजरेसमोरुन जातो........आणि तिच्या अंगावर शहारे येतात......पण स्वत:ला सावरते.........रेवा तु ना आता वेडयासारखा विचार करतेयस.....गप्प झोप आता.......रेवा स्वत:लाच ओरडते व सुजयच्या विचारात झोपेच्या अधीन होते

***

सुजय आध्याने पाठवलेला फोटो पाहत बसलेला असतो.........किती सुंदर दिसत होती ना रेवा आज......तिला पाहतच रहाव अस वाटत होत.......आणि हा फोटो किती मस्त वाटतोय.....आम्ही दोघे एकत्र......सुजय त्या फोटोकडे पाहत बोलत असतो.....इतक्यात परत आध्या काही तरी पाठवते....सुजय ते ओपन करुन पाहतो तर......मघाशी दोघे जवळ आले होते तो  फोटो होता......ते पाहुन तर.....तो वेडाच होतो......दोघाचा खुप जवळ असलेला फोटो होता तो........रेवाचा फोटो पाहत पाहत सुजय झोपी जातो...

***

रेवा आवरल का तुझ......सुजय बोलत बोलत आध्याच्या रुममध्ये येतो.........वॉव किती सुंदर दिसतेय ही.......दिवसेनदिवस जास्तच सुंदर दिसु लागलेय....सुजय

अरे झालच आहे ही काय तयारच आहे बग....रेवा सुजच्या समोर येवुन बोलते....सुजय भान हरपुन तिच्याकडे पाहत असतो........

दादया कुठे लक्ष आहे......रेवा काही तरी सांगतेय तुला........तसा सुजय भानावर येतो....

हा काय म्हणत होतीस..........सुजय

अरे मी तयार आहे निघायच का......रेवा

हो हो निघुया ना.......सुजय

जायच म्हणुन रेवा पुढे जाते......रेवा पुढे गेल्यावर सुजय आध्यापाशी येतो........

ये वेडाबाई.....‍थॅक्स..........सुजय

थॅक्स कशासाठी.......आध्या थोडा विचार करत बोलते......

ते होय......माझे आणि रेवाचे सुंदर क्षण फोटोमध्ये कॅप्चर करण्यासाठी......सुजय

दादया काय तु पण..........गप्प थॅक्स म्हणे......आणि लग्नातले खरेदीचे वगेरे तुम्ही एकत्र असलेले फोटो काढणारच आहे मी......कळल का...........आध्या

मी तुला हे सांगणारच होतो......तुला कस कळत ग मला काय सांगायच असत ते.......सुजय

प्रेम असल की सगळ कळत.......जा आता आमची वहिनी वाट पाहत आहे खाली........वहिनी बोल्यावर सुजय गालातल्या गालात हसतो.........आणि खाली जातो........

सगळे हॉलमध्ये बसलेले असतात.......रेवा निघायच का.....सुजय रेवाला विचारत हॉलमध्ये येतो.....

हो झालच आहे माझ.......निघुया....रेवा

रेवा आम्ही पण निघतो घरी......मालतीताई

हो आई चालेल.......रेवा

रेवा व सुजय जात असतात.....इतक्यात राधिका येते.......

सुजय मी पण येते सोबत तुझ्या......राधिका......

अग पण तु येवुन काय करणार मी कामात असणार.....तु कंटाळशील.....आणि तुला बॅकेत जास्त वेळ बसता पण  येणार नाही.....सुजय

थोडा वेळ बसेन आणि येईन की मी........राधिका.....

अग पण तु एकटी कशी येणार तुला इथल जास्त काही माहीतच नाहीये....सुजय

ते मला काही माहीत नाही.....मी येणार आहे.....तु कस मॅनेज करतोस बग.....राधिका

अग पण....सुजय

सुजय तु ड्रायव्हर काकांना सोबत घेवुन जा.....तिला परत ते घरी सोडतील....माधवीताई

बर.....सुजय

चला....निघुया.....सुजय

सुजय रेवा गेल्यानंतर मालतीताई व रमाकांतरावही त्यांच्या घरी जातात.........

सुजय ड्राव्हर काकांच्या शेजारी बसत होता......सुजय पुढे नको मागेच बस माझ्यासोबत.....राधिका

अग नको उगाच गर्दी होईल..तु आणि रेवा बसा निवांत.....सुजय

नाही तु मागेच बस....मला तुझ्या सोबत बसायच आहे........राधिका त्याचा हात पकडुन त्याला मागे बसवते.......

राधिका सुजयचा हात पकडल्यावर रेवाला राधिकाचा खुप राग येतो.........गाडीत पण ती सुजच्या जवळ त्याचा हात पकडुनच बसली होती........तिला कधी एकदा बॅक येते अस झाल होत......

थोडयावेळात बॅक येते तिघे गाडीतुन खाली उतरतात.......सुजय रेवाला काहीतरी सांगत असतो....पण रेवा त्याच्यावरही चिडुन सरळ आत निघुन येते......

अशी काय ही......न बोलताच गेली........सुजय

रेवा तणतणतच आत येवुन आपल्या डेस्कवर बसते....

आता हीला काय झाल सकाळी सकाळी.....स्नेहा स्वत:शीच बोलत रेवा जवळ येते.....

ओय मॅडम काय झाल......एवढ का चिडलाय.......स्नेहा

मी.......?....मी कुठे चिडलेय....आहे की ठिक......रेवा स्नेहाकडे न पाहताच बोलत होती....

काय झालय हीला....चिडलेय तर पण चिडलो नाही अस दाखवत आहे....सुजयला विचारायला हव......स्नेहा मनातल्या मनात बोलत होती......इतक्यात मागुन राधिका येते.......

हाय वहिनी कशी आहेस.......राधिका

राधिका.......तु इथे कशी काय.......स्नेहा

अग मी सुजय सोबत आलेय.......राधिका

सुजय कुठे आहे पण.....स्नेहा

येत आहे........हा बग आला.....अस म्हणत परत सुजयचा हात पकडते.....ते पाहुन रेवा जास्तच चिडते......सुजयलाही आत ऑक्वड वाटत.....

राधिका आपण बॅकेत आहोत अस म्हणत सुजय राधिकाचा हात बाजुला करतो.....

कशाला राहुदे ना......रेवा हळु आवाजात बोलते पण ते स्नेहाला ऐकु जात.......ओ.....हे कारण आहे तर मॅडमांच्या चिडण्याच......स्नेहा गालातल्या गालात हसत मनातल्या मनात बोलते......व सुजला ‍ खुणवुन सांगते.......पण सुजयच्या लक्षातच येत नाही.....

रेवा लोनचे डॉक्युमेन घेवुन ये केबिनमध्ये.......सुजय

हममम.....शरद कडुन पाठवते.......सररररर......रेवा रागावुन बोलते.....

अग मला माहीती पण हवी आहे........सुजय

बर मग राकेशला पाठवते.......रेवा

अशी काय करतेय ही काही कळतच नाही.......सुजय मनातल्या मनात बोलतो...........

बर चालेल मी आहे माझ्या केबिनमध्ये......सुजय

सुजय आत जातो त्याच्या पाठमागे राधिकाही जाते...........

चिपकु कुठली...........राधिका गेल्यावर रेवा बडबडत असते....

अग तिने काय केल आता.......स्नेहा

बग ना यार कायम चिपकलेलीच असते.....आपण बॅकेत आहोत ही साधी गोष्ट तीला कळत नाही......आणि सुजयला पण कळत नाही का.......कस वाटत ते... सगळे कसे बघत होते त्यांच्याकडे.....रेवा

***

क्रमश:

पुढचा भाग 24/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all