बावरे मन...भाग-44

बावरे मन..भाग 44 (अग इट्स ओके.......मला काही नाही वाटल.......तु जेव....नको विचार करु........रेवा थोडावेळ गप्पा ग

बावरे मन..भाग 44

(अग इट्स ओके.......मला काही नाही वाटल.......तु जेव....नको विचार करु........रेवा

थोडावेळ गप्पा गोष्टी करत रेवाच कौतुक करत सगळयांच जेवण होत........दादया तु आणि रेवा बसा आता जेवायला मी तुम्हाला वाढते........आध्या)

आता पुढे....

अग कशाला आम्ही घेवु तु आराम कर जा.......रेवा

नक्की ना........आध्या

हो ग जा तु...........रेवा

बर........राधिका दी चल ना आपण गप्पा मारत बसुया......आध्या

अग नको मी थांबते ना हयांच्याशी बोलत.....राधिका.....

आता राधिका थांबणार म्हटल्यावर सुजय लगेच आध्याला खुणवुन नको घेवुन जा तिला सांगतो.....आध्या थोडी हसत बर म्हणते.......

अग दी चल ना हे जेवणार आहेत तुझ्याशी गप्पा कसे मारतील.....जेवण झाल्यावर बोलु ना आपण सगळे.......चल चल आध्या राधिकाचा हात धरत तीला घेवुन जाते........

राधिका गेल्यावर सुजय खुप खुश होतो.....आता थोडा एकांत मिळेल.....रेवा सोबत वेळ घालवता येईल......सुजय हळु आवाजात बोलत असतो......

काही म्हणालास का.......?......रेवा

आ...........काही नाही........चल सुरुवात करुया.....सुजय काही बोललोच नाही अस दाखवत जेवायला सुरुवात करतो.......

वा.......खरच मस्त झालय जेवण रेवा.........सुजय

खरच आवडल तुला............रेवा

हो..........आवडल........खुप आवडलय.......मला माहीत नव्हत हा....तुला एवढा चांगला स्वंयपाक बनवता येतो.....सुजय

थॅक्स.......अरे आवडत मला जेवण बनवायला.......रेवा

दोघे गप्पा मारत जेवत असतात तेवढयात सुजयचा फोन वाजतो.......

वहिनीचा फोन आहे...........हॅलो बोल वहिनी.........सुजय

मग काय काय देवरजी...........तुमच्या मॅडम काय म्हणतायत.......तिलाच बघत बसला असशील ना.....स्नेहा त्याला चिडवत बोलते..........

वहिनी तु पण ना........तुझ जेवण झाल का........सुजय विषय बदलत बोलतो......

हो माझ झाल.........तुझ.........स्नेहा

हे काय मी आणि रेवा जेवत आहोत..........सुजय

ओ............समोरच आहेत होय........मॅडम........स्नेहा

हो.........देवु का तिच्याकडे.........सुजय

हो दे ना.........स्नेहा

रेवा हे घे वहिनी आहे............सुजय

हॅलो हा बोल स्नेहा.........रेवा

मग कस वाटतय सासरवाडीत............स्नेहा

काय....?........काय म्हणालीस......रेवा

अग माझ्या सासरवाडीत कस वाटतय अस म्हणाले ग......तुला काय

वाटल..........स्नेहा

आ.........काही नाही........बोल ना.........रेवा

तुला मी तुझी सासरवाडी म्हणाले अस वाटल का......स्नेहा मुद्दाम तिच्याकडुन काय उत्तर येत हे पाहण्यासाठी बोलते.........

काहीही असत तुझ स्नेहा..........माझी कशी असेल.......वेडीच आहेस......रेवा

अग मस्करी केले...........स्नेहा

बर.......रेवा

रेवा जेवत जेवत स्नेहा सोबत गप्पा मारत असते........आणि सुजय त्याच बोलण फक्त ऐकत बसलेला.......म्हणजे स्नेहा काय बोलत असेल हे रेवाच्या उत्तरावरुन अंदाज बांधत होता.....

रेवा भाताचा एक घास खात स्नेहाशी बोलुन फोन ठेवते.....भात खाताना भाताचा एक शित तिच्या ओठांना लागतो......सुजयच लक्ष त्याच्याकडे जाते....तो तिला खुणवुन सांगत असतो...पण रेवाला कुठे लागल आहे ते कळत नसत.......अरे कुठे तुच साफ कर.......रेवा

बर थांब.........सुजय रेवाच्या ओठांना लागलेला भाताचा शित हळुवार काढत असतो........सुजच्या हाताच्या स्पर्शाने रेवा मोहरते........नकळत तिचे डोळे मिटले जातात....रेवाच्या अशा मोहरण्याने ती खुप निरागस वाटत होती.......सुजय तिच्याकडे एकटक पाहत राहतो......आणि त्याच्याही नकळत तो रेवाच्या ओठांवरुन हळुवारपणे बोट फिरवतो.........त्याच्या अशा स्पर्शाने रेवा बावरली........तिने हळुच डोळे उघडले...आणि सुजयच्या डोळयात हरवुन गेली.......किती तर वेळ दोघे एकमेकांच्या डोळयात हरवुन गेले.........ओय झाल की नाही तुमच जेवण........आध्या त्यांना भानावर आणत बोलते...तसे दोघे भानावर येतात........सुजय रेवाच्या ओठांवरचा बोट काढतो.......

काय विचारतेय मी......झाल का......की आणखनी काही हवय......आध्या काही न पाहील्यासारखत दाखवत बोलते........

दोघेही स्वत:ला सावरत........हो एकदमच बोलतात..........

रेवा तुला भात वाढु का.......आध्या

अग नको झालच आहे माझ.......आध्या

दादया तुला........आध्या

नको मला पण झालय माझ........सुजय

बर आवरा पटपट......मी आलेच.....आध्या

आध्या गेल्यावर दोघांना काय बोलाव कळेनाच......पण सुजयला वाईट वाटत आपण अस कस केलो.....अजुन आमच नात सुरु पण झाल नाहीये........मग अस वागण बरोबर वाटत का.......

रेवा सॉरी मी ते चुकुन.........सुजय

सुजयच वाक्य पुर्ण न करताच.......अरे इट्स ओके........म्हणत ती किचनमध्ये जाते........

सगळ आवरुन झोपायची तयारी करत असतात..........

रेवा तु आध्याच्या रुममध्ये झोप.....चालेल ना तुला.........माधवीताई

हो काकु... काहीच हरकत नाही........तेवढयाच आमच्या गप्पा होतील........रेवा

बर......माधवीताई

सगळे हॉलमध्येच गप्पा मारत बसले होते......

ये दादया तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे......आध्या

सरप्राईज........?......सुजय

हो मी जाते रुममध्ये तु ये मागुन सगळे आहेत इथे.....आध्या

म्हणजे कशाबद्दल.....रेवाच तर काही नाहीये ना......सुजय

तु ये तर ना.........मी जाते बग........अस म्हणत आध्या उठुन तिच्या रुममध्ये जाते.......

पाच मिनिट इकडे तिकडे करत सुजय मी आलोच म्हणुन आध्याच्या रुममध्ये जातो.....

मालतीताई रमाकांत भाऊजी आज तुम्ही थांबलात खुप छान वाटतय.....किती छान दिवस गेला आज......मस्त वाटल.......माधवीताई

आम्हाला पण खुप छान वाटल.......किती छान झाल ना आज सगळ.......कार्यक्रम पण मस्त झाला......मालतीताई

हो ना.......माधवीताई

बर लग्नाच्या बाकीच्या खरेदीच कस काय करायच ते आत्ता पासुन बघायला हव नाहीतर नंतर धावपळ होईल..........आनंदराव....

हो आत्ता पासुन एकएक गोष्टी करुया म्हणजे त्यावेळी धावपळ होणार नाही........माधवीताई

हो आनंद सुधिरांवाशी बोलुन पुढच सगळ ठरवुन घ्या.........रमांकातराव

हो दोन दिवस जाऊदेत मग ठरवु सगळे.... वाटल तर सगळे एकत्र भेटुनच बोलुया........आनंदराव

हो चालेल.......तुम्ही मी मालतीताई रमाकांत भाऊजी...सुधिरराव व रेखाताई आणि मुली पण आहेतच खरेदीला मदत करायला......माधवीताई

हो काकु आम्ही आहोतच की......रेवा

बर चला झोपुया खुप वेळ झालाय........माधवीताई

सगळे झोपायला जातात.......

****

ये आध्या सांग ना काय सरप्रारईज आहे.........किती वेळ झाल विचारतोय........केवढा भाव खातेयस......सुजय वैतागत बोलतो

ये दादया.....किती घाई रे......थांब ना दाखवते.......अस म्हणत आध्या आपल्या मोबाईल दाखते हे बग..........सरप्राईज.........

ये.......तु केव्हा काढलीस फोटो...........आध्याने त्या दोघांचा सकाळी फोटा काढला होता त्यांच्या नकळत..

मस्तच आलाय ग........माझ्याकडे आमच्या दोघांचा एक पण फोटो नव्हता....थॅक्स वेडाबाई

ये दादया थॅक्स काय......तुझ्यासाठी एवढ पण करु शकत नाही होय.......आध्या

अग तस नाही.......पण  खरच खुप सुंदर गिफ्ट आहे.......थॅक्यु सो मच अस म्हणत सुजय आध्याला मिठी मारतो.....

सुजय त्या दोघांचा फोटो एकटक पाहत असतो......दादया बास की आता किती पाहशील फोटो.........

किती सुंदर दिसतेय ना रेवा...........सुजय फोटोकडे पाहत बोलुन जातो........

ओ............हो का...........सुंदर दिसतेय का.........आध्या

ये गप्प ग........दिसतेय तर दिसतेय ना.........आणि डान्स तर कसला भारी करते यार ही.....मी तर पाहतच राहीलो होतो तिच्याकडे........सुजय

मग काय माझी वहिनी आहेच मस्त.........आध्या सुजयला चिडवत बालते

ओ......तुझी वहिनी का.......मग माझी कोणीच नाहीये का ती..........सुजय आध्याला डोळा मारत बोलतो...

तुला माहीत नाहीये का तुझी कोण आहे ती.........आध्या......सुजयचे गाल ओढत बोलते.......

ये गप्प ग.........सुजय थोड लाजत बोलतो..........

दादया तु लाजतोयस..........आध्या त्याला चिडवत बोलते............

जरा शांत बस मला फोटो पाहु दे........सुजय

कोणाचा........आध्या

माझ्या होणाऱ्या बायकोचा..........सुजय थोड लाजत गालातल्या गालात हसत बोलतो.......

ओ हो..........बायको का.........आल ना तोंडातुन........आध्या

मग माझी बायको आहेच सुंदर पाहत रहावी अशी............सुजय फोटोकडे पाहत बोलत असतो..........आय लव्ह...................सुजय पुढे काय बोलणार इतक्यात रेवा तिथे येते..........

***

क्रमश:

पुढचा भाग 22/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all