बावरे मन...भाग-43

बावरे मन..भाग 43 (हो मग तुला बोलले होते ना होईल म्हणुन......आणि तु नसतास तर थोड अजुन लवकर झाल असत.....रेव

बावरे मन..भाग 43

(हो मग तुला बोलले होते ना होईल म्हणुन......आणि तु नसतास तर थोड अजुन लवकर झाल असत.....रेवा सुजयला चिडवत बोलते......

तसा सुजय गाल फुगवुन.....बर मग मी जातो बाहेर........उगाच माझी अडचन......अस म्हणत किचनच्या बाहेर जात असतो..... )

आता पुढे......

ये नौटंकी बास........मस्करी करत होते.......तु मदतीला होतास म्हणुन लवकर झाल......वेडा कुठला.......रेवा

रेवा अस बोलल्यावर सुजयचा आनंद गगनात मावेना......खरच रेवा......सुजय

हो रे...........बर चला सगळयांना जेवायला बोलवुया.....गरम आहे तोपर्यत सगळयांना वाढुन घेवु.......ओके.......रेवा

हो चालेल.......मी आणतो सगळयांना बोलावुन तु तोपर्यत जेवण बाहेर मांडुन घेशील.......सुजय

हो घेते........रेवा

सुजय सगळयांना बोलायवायला जातो.....व रेवा सगळे जेवण डायनिंगटेबलवर आणुन ठेवत होती......राधिका तिथेच हॉलमध्ये बसली होती........रेवाला जेवण ठेवताना पाहुन ती तिथे येते.........

रेवा मी मदत करु का तुला.....राधिका

अग कशाला बसली आहेस ना तु.....ठेवेन की मी.........रेवा

बसुन कंटाळा आलाय ग........करते ना तुला मदत.........राधिका.......

बर चालेल.........चल तु पण जेवणाची भांडी बाहेर आणायची आहेत ते घेवुन ये चल......राधिका व रेवा जेवण आणुन ठेवुन जेवणाच्या प्लेट्स वगेरे मांडत होत्या.......

****

आध्या चल जेवायला........सुजय

एवढयात जेवण तयार पण झाल........आध्या आश्चर्याने विचारते....

हो........तुझ्या वहिनीने केलय म्हटल्यावर काय.......होणारच ना.........सुजय आध्याला डोळा मारत रेवाच कौतुक करत असतो......

हो का........अजुन बायको झाली नाहीये तर एवढ कौतुक बायकोच........लग्नानंतर तर काय बघायलाच नको......आध्या जारा खोटा खोटा तोरा दाखवत बोलते......

मग बायको असणार आहे ती माझी मग कौतुक करायला नको का.......सुजय आध्याचे गाल ओढत बोलतो........

ये दादया तुझ्या बायकोच कौतुक करण्याच्या नादात तु माझे गाल लाल करुन ठेवशील.........आध्या स्वत:चे गाल सोडवत बोलते.......

हो का...........बर चला जाऊया.........मी अजुन बाकिच्यांना बोलवणार आहे........सुजय

तु हो पुढे.....येते मी.........आध्या

लवकर जा वहिनीला तुझ्या मदत कर जा थोङ.........सुजय बाहेर जात बोलतो......

ये दादया.... दादया थांब......इकडे बग पाहु.......आध्या सुजयला आपल्या बाजुला वळवत बोलते........

अग काय झाल........सुजय

हे काय आहे.........आध्या सुजयच्या गालावर हात फिरवत  बोलते........

कुठे काय आहे.........सुजय

नेमक तु वहिनीला मदतच करत होतास ना........आध्या सुजयला चिडवत बोलते......

ये गप्प.......खुप आगाव होत आहेस हा तु........सुजय

हो का..........मग हे पिठ कस लागल तुझ्या चेहऱ्यावर........आणि कपडयांवर पण आहे थोङ......आध्या सुजच्या चेहऱ्यावरील पिठ पुसुन त्याला दाखवत बोलत असते.......

आध्याच्या हातावर पिठ पाहुन सुजयला आश्चर्यच वाटत............अरे रेवाने तर पिठ पुसल होत मग परत कस काय लागल...........बहुतेक पुसतानाच थोड राहील असेल......सुजय मनातल्या मनात बोलतो....

ओय.........वहिनीच्या विचारात हरवलास की काय.........आध्या त्याच्या समोर चुटकी वाजवत बोलते.....

ये नाही.......उगाच काही पण काय......सुजय

हो का मग हे पिठ कस लागल तुझ्या चेहऱ्याला.......आध्या

अग काय झाल रेवाच्या हाताच्या धक्याने पाण्याचा ग्लास खाली पडला........आणि पाणी खाली सांडल........आणि रेवा जात होती आणि तिचा पाय घसरला ती पडेल म्हणुन मी पकडलो व तीचा पिठाचा हात लागला...........सुजय

हो का.........मी पाहीजे होते रे तिथे......कसली भारी सिन होती........आध्या सुजयला चिडवत बोलते........

तु मार खाशील आता..जा रेवाला मदत कर जा.......मी बाकिच्यांना बोलवतो

हो.....पण ते पिठ पुसुन जा नाहीतर बाकिचे काय विचार करतील बग..........आध्या रुमच्या बाहेर जात बोलते......

सुजय लागलेल पिठ आरशात पाहुन पुसुन घेतो.......व बाकिच्यांना बोलवायला जातो.........

***

रेवा सगळ जेवण आणुन झाल......प्लेट पण मांडुन झाले आहेत.......जेवण प्लेटमध्ये वाढुन ठेवुया का.......राधिका...

अग नको येवुपर्यत परत जेवण गार होईल आल्यानंतरच वाढुया.......रेवा

अग येतील एवढयात सुजय बोलवायला गेलाच आहे ना.......आले की मग लगेच त्यांना जेवायला सुरवात करता येईल.....मी वाढते थांब........रेवाच न ऐकाताच राधिका जेवण वाढायला सुरवात करते........

आध्या त्यांच हे संभाषण लांबुनच ऐकत होती.......

सगळयांच्या प्लेटमध्ये जेवण वाढुन पाच दहा मिनिट होतात......मग सगळे बाहेर येतात.......

अरे तुम्ही सर्व्ह पण केलात......सुजय

हो..........राधिका

किती खंमग वास येतोय.........मग जेवण किती चविष्ट असेल.......माधवीताई

अस बोलल्यावर रेवा त्यांच्याकडे बघुन हसते.........

सगळे जेवायला सुरवात करतात.......फक्त एक घास खाल्ला असेल सगळयांनी...........सगळयांना जेवण ‍थंड लागत........अग रेवा सगळयांना थंड जेवण वाढली आहेस..........गरम करायच नव्हत तर मला सांगायच होत ना मी केल असत...........अस थंड जेवण वाढतात का.......एवढ पण कळत नाही का ग तुला.....मालतीताई रेवावर ओरडत बोलल्या......

अरे यार रेवा बरोबर बोलत होती.........उगीच अगावपणा केला आपण माझ्यामुळे बिचारी ओरडा खातेय....राधिका मानातल्या मनातच बोलली

रेवाला राधिकाच नाव पण घेता येईना.........ती राधिकाकडे पाहते........राधिकाही हळुच सॉरी बोलते.....पण आता सॉरी बोलुन काही उपयोग नव्हता ना.......आई सॉरी.........रेवा एवढस तोंड करुन बोलते

अहो मालतीताई काही होत नाही एवढयाने.......एवढ सगळे केलेय की तिने......एवढयाशा गोष्टीने काही नाही होणार.......राहील असेल चुकुन....

रेवाच्या डोळयात पाणी आलेल असत........ती हळुच पाणी पुसते.........मी दोन मिनिटात जेवण गरम करुन आणते थांबा.........रेवा सगळ जेवण घेवुन परत गरम करायला जाते.......

काकु तुम्ही रेवाला का ओरडताय..........तिची काहीच चुक नाहीये....रेवा तुम्ही आल्यावर जेवण वाढुया म्हणत होती......पण राधिका दी ने जेवण वाढुन ठेवल........आणि दी तु तर सांगायचस ना की रेवाने काही केल नाही म्हणुन.....उगाच ओरडा खाल्ली ना रेवा...........आध्या

सॉरी......ते तुम्ही सगळे बोलताना माझ धाडसच झाल नाही सांगायच.........राधिका

अग बाळ..........अस नाही करायच....रेवाने उगाच ओरडा खाल्ला ना......तुला हया कामाची सवय नाहीये ग त्यामुळे तु पहिला सगळ शिकुन घे.........मग कर ना सगळ.........चालेल ना.........माधवीताई

हो आत्तु.....परत नाही होणार अस.......राधिका.......

सुजयने रेवाच्या डोळयात पाणी पाहील होत........त्याला कस तर वाटत होत........आई

मी रेवाला मदत करुन येतो......अस म्हणत सुजय किचनमध्ये जातो..........

रेवा जेवण गरम करत होती......पण डोळयात पाणीही होत.......तिला आईने ओरडलेल वाईट वाटल होत....

रेवा.........सुजयने हाक मारल्यावर रेवाने गडबडीने डोळयातील पाणी त्याने पाहु नये म्हणुन पुसते....व त्याच्याकडे पाहते.........

अरे तु का आलास झालच आहे जेवण गरम करुन मी येतच होते घेवुन..........रेवा सुजयची नजर चोरत बोलते......

रेवा तु कितीही डोळयातील पाणी लपवत असलीस तरी ते दिसतच आहे.........आणि बाहेरच तुझ्या डोळयात पाणी पाहील होत.........

सुजय अस बोलल्यावर इतका वेळ लपुन ठेवलेल्या अश्रुंना वाट मोकळी झाली आणि ती रडु लागली........

सॉरी सुजय मी मुद्दाम नाही रे केल......काय विचार करत असतील सगळे.......मी त्यांना अस थंड जेवण दयायला नको होत........सॉरी......रेवा रडत रडतच सुजयशी बोलत होती........

सुजय रेवाच्या जवळ जातो.........आणि तिच्या ओठांवर आपला बोट ठेवुन....शुश्श्श्श्श......काही बोलु नकोस......शांत हो........सुजय तिच्या डोळयातील पाणी पुसत बोलतो......सुजच्या अशा अचानक जवळ येण्याने.......आणि त्याच्या बोटांचा ओठांना होणाऱ्या स्पर्शाने रेवाच रडु कुठल्या कुठे पळुन जात......ती सुजच्या डोळयात हरवुन जाते........किती तर वेळ दोघे तसेच उभे होते.......

आध्या हयांना एवढा का वेळ लागतोय हे पहायला येते........रेवा झाल की नाही.......अस बोलतच ती किचनमध्ये येत असते........तिच्या आवाजाने दोघे भानावर येतात व एकमेकांपासुन लांब होतात......त्या दोघोचे कावरे बावरे झालेले चेहरे पाहुन आध्याला थोडाफार अंदाज येतो.....पण ती काहीच बोलत नाही.......नंतर दाद्याला चिडवायला चान्स मिळाला.....एवढच मनातल्या मनात बोलते.........आणि हसते

झाल का जेवण गरम करुन वाट पाहत आहेत सगळे........आध्या रेवाकडे पाहत बोलत असते.....तिला रेवाच्या डोळयात पाणी दिसत.........ये रेवा तु रडतेयस का.......वेडी आहेस का.....तु जी चुक केली नाहीस त्याच्यासाठी का रडतेयस...........

म्हणजे.......रेवा

म्हणजे मी पाहील होत की राधिका दी ने जेवण प्लेटमध्ये वाढुन ठेवल होत........त्यामुळे थंड झाल जेवण.......आणि मी सांगितल सगळयांना तुझी काहीच चुक नाहीये.......तु नको रडु........आध्या

अग का सांगितलीस तु राधिकाला वाईट वाटल असेल ना.....रेवा

काही वाईट वाटलेल नाहीये.....चुक आहे तर मान्य करायची ना मग........बर चला जेवण बाहेर घेवुन जाऊया वाट पाहत आहेत सगळे.........आध्या

बर.........रेवा

जेवण बाहेर आणुन सगळयांना वाढतात......रेवा जेवण मस्तच झाल आहे.......माधवीताई

हो रेवा खरच मस्त झाल आहे जेवण.........आमच्या आध्याला पण शिकव थोङ....आनंदराव

काका काय हो.....आध्या पण छान करते की जेवण........रेवा

ये रेवा मला आवडेल हा.......तुझ्याकडुन शिकायला........आध्या

हो ग नक्की शिकवेन..........रेवा

हे बर आहे.......मी पण मदत केली आहे रेवाला......पण कौतुक मात्र फक्त तिचच होय..........सुजय उगाच नौटंकी करत बोलतो.......

काही मदत वगेरे केली नसशील उलट तिच कामच वाढवुन ठेवला असशील.....आध्या

अग नाही आध्या त्याने खुप मदत केलीय.....म्हणुन तर एवढया लवकर स्वयंपाक तयार झाला......रेवा

बर बर........मदम केलीय म्हणायची........आध्या हसत बोलते..........

सुजय नजरेनेच तुला नंतर बघतो बोलतो........

राधिका तु पण बस जेवायला मी वाढते तुला........रेवा

अग नको मी थांबते की तुमच्यासोबत.........राधिका.....

अग कशाला बस तु पण...........रेवा जेवणाची प्लेट तयार करत बोलते........

रेवा सॉरी माझ्यामुळे तुला ओरडा खावा लागला..........राधिका

अग इट्स ओके.......मला काही नाही वाटल.......तु जेव....नको विचार करु........रेवा

थोडावेळ गप्पा गोष्टी करत रेवाच कौतुक करत सगळयांच जेवण होत........दादया तु आणि रेवा बसा आता जेवायला मी तुम्हाला वाढते........आध्या

***

क्रमश:

पुढचा भाग 20/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all