बावरे मन...भाग-42

बावरे मन..भाग 42 (आनंदराव रमाकांतराव चला निघतो आम्ही बाकीच पुढच कस ठरवायच ते फोनवर बोलुन ठरवु कध?

बावरे मन..भाग 42

(आनंदराव रमाकांतराव चला निघतो आम्ही बाकीच पुढच कस ठरवायच ते फोनवर बोलुन ठरवु कधी भेटायच.......सुधिरराव

हो हो चालेल........आनंदराव........

स्नेहा सगळयांना नमस्कार करते.........आशु सुध्दा स्नेहाच्या आई बाबांना नमस्कार करतो.....व सगळे जायला निघतात........)

आता पुढे...

छान झाला ना साखरपुडा...........मला ना टेन्शनच आल होत कस होतय हे सगळ काय माहीत.........अस वाटत होत...........मालतीताई तुम्ही आलात म्हणुन हे सगळ होऊ शकल हा........मला एकटीला काय हे झाल नसत........माधवीताई

अहो एवढ काय त्यात..........मी आपल....मला जस जमेल तस करत होते.........मालतीताई

सगळ काम आवरल्यानंतर सर्वजण थोडावेळ हॉलमध्येच गप्पा मारत बसले होते.........

आई काकु तुम्ही सगळे खुप दमला असाल ना........सकाळपासुन खुप धावपळ झालेय तुमची.......थोडा वेळ आराम करा..........आणि हो आई.......आज स्वंयपाक वगेरे काही नका करु मी बाहेरुन जेवण मागवतो आज........सुजय

अरे नको.......किती वेळ लागतो जेवण बनवायला........होऊन जाईल.........आणि तसही घरच्या जेवणासारखी चव येणार आहे का त्या जेवणाला........माधवीताई

हो सुजय आम्ही दोघी मिळुन करु म्हणजे लवकर आवरेल..........मालतीताई

अहो काकु पण सकाळपासुन किती धावपळ झालेय तुम्हा दोघींची.......एक दिवस खाऊया ना बाहेरच........सुजय

एक एक मिनिट..............रेवा सगळयांना शांत करत बोलते......

काय झाल ग.........मालतीताई

आई काकु......तुम्हाला बाहेर जेवण नकोय ना.........रेवा

हो नकोय.........घरच जेवणच बर वाटत......माधवीताई, मालतीताई

सुजय तुला हयांना त्रास नको म्हणुन बाहेरच जेवण मागवायच आहे ना........रेवा

हो.........सुजय

मग एक काम करु........जेवण मी बनवते.......म्हणजे घरच जेवणही मिळेल आणि त्याना त्रासही होणार नाही.............चालेल ना..........रेवा

अग काही त्रास नाही होत.......करेन मी.........तु आराम कर......तुझी पण धावपळ झालेय ना........माधवीताई

काही धावपळ झाली नाहीये माझी.....मी बनवते जेवण.........रेवा

अग पण.........माधवीताई

काकु अहो बनवते मी नका काळजी करु.......रेवा

बर......माधवीताई

सुजय तुला चालेल ना.........रेवा

ओके चालेल पण माझी एक अट आहे.........रेवा

अट...?.........कोणती.....रेवा थोड विचार करत बोलते......

जेवण करायला मी मदत करणार तुला....सुजय

काय.......? नको........मी करेन......उगाच माझ काम वाढवुन ठेवशील.......रेवा त्याला चिडवत बोलते.......

मी काही काम वाढवुन ठेवत नाही.......ओके......हव तर आईला विचार मी कधीतरी आईला मदत करतो.......सुजय

हो ग रेवा करतो तो मला मदत........माधवीताई

बर.....पण करेन मी........तु पण दमलायस सकाळ पासुन........रेवा

बर माझी अट मान्य नसेल तर मी बाहेरुनच जेवण मागवतो.......सुजय खोट खोट चिडण्याच नाटक करत बोलतो......

बर बाबा कर मदत..........रेवा

ये हुई ना बात.......सुजय आनंदात बोलतो........

राधिका हयांच सगळ बोलण फक्त ऐकत होती............सुजय मदत करणार म्हटल्यावर......ये सुजय मी पण तुला मदत करते..........अस म्हणत सुजयचा हात पकडत ती सुजय जवळ थांबते......

राधिकाला परत सुजयच्या जवळ पाहुन रेवाचा चेहरा पडतो........सुजयच लक्ष रेवाकडे जात...........आता हिचा मुड ऑफ होईल म्हणुन.........तो राधिकाला समजावतो.......

अग नको राधिका कशाला मी आणि रेवा आहे ना करतो आम्ही.........आणि तु आजच आली आहेस......प्रवासात तुझी दगदग झाली असेल ना......तु आराम कर........सुजय

नाही काही दगदग झाली नाहीये माझी..........मी तुला मदत करणार........ये आत्तु तु सांग ना ग याला........राधिका......

बाळा सुजय बरोबर बोलतोय ग........आज राहुदे तु परत कधी तर कर ना..........ते दोघे बनवतील.......माधवीताई

काय ग आत्तु पण हयाच्या सारखच बोलतेयस........बर ठिक आहे करेन मी परत कधी तर.........राधिका........

राधिका नाही बोलल्यावर रेवाचा चेहरा खुलला........सुजय रेवाकडे पाहत असतो........राधिका नाही बोलल्यावर हीची रिॲक्शन काय असेल हे पाहण्यासाठी...........

म्हणजे वहिनी म्हणत होती ते खर आहे तर.........राधिका माझ्या जवळ आली की हीचा मुड ऑफ होतो.......तर.......पण अस एकाच गोष्टी वरुन ठरवुन उपयोग नाही.....एकदा दोनदा परत बघितल पाहीजे......त्याशिवाय कळणार नाही.........सुजय मनातल्या मनात विचार करत असतो.......

सुजय कुठे हरवलास.......मला काय काय साहित्य आहे दाखव चल.......नाहीतर सामान आणाव लागेल......रेवा

हो हो चल दाखवतो.........बर चला तुम्ही सगळे आराम करा...आम्ही बघतो जेवणाच.......सुजय

सुजय रेवाला किचन मध्ये काय काय आहे ते दाखवतो...........

सुजय बऱ्यापैकी सामान आहे.......एखाद दुसर काही नाहीये.......पण आपण करु मॅनेज..एका दुसऱ्या गोष्टीसाठी परत मार्केटला जायला नको.......रेवा

नक्की चालेल ना......नाही तर मी जाऊन आणेन पटकण.....सुजय

अरे नको होईल मॅनेज.......रेवा

बर......मग करुया का सुरुवात........सुजय

एवढया लवकर........रेवा

हो वेळ लागेल ना.....तुला पण सवय नसेल ना एवढया लोकांच जेवण बनवायची.......सुजय

सवय नाहीये पण होईल........येवढा पण वेळ नाही लागणार.....आधी फ्रेश तर होऊन येवुया......रेवा

बर चालेल......सुजय

थोडयावेळात आवरुन दोघेजण किचनमध्ये येतात.......

बर सांग काय काय करु........सुजय

अरे थांब ना.....माझ्यापेक्षा तुलाच गडबड झाली आहे......जेवण बनवण्याची......रेवा

अरे हो मग काय.........करणारच ना......किती वेळ लागेल काय माहीत.........सुजय

काही वेळ लागत नाही........मी सगळयांसाठी चहा करतेय.....तुला पण देवु की कॉफी हवी आहे.........रेवा

खर तर सुजयला कॉफी हवी होती पण रेवाला डायरेक्ट कॉफी कर म्हणुन कस सांगणार ना.......सगळयांना चहा करतेयस ना मग चालेल मला......चेहरा थोडा येवढासा करत बोलतो....

बर पाच मिनिटात देते.......हे जरा सगळयांना बाहेर देवुन येते.........रेवा

अग थांब मी येतो देवुन......सुजय रेवाच्या हातातील चहाचा ट्रे घेत बोलतो...........

बर ये तोपर्यत मी चहा गरम करते तुझ्यासाठी.........रेवा

हो आलोच देवुन.......सुजय

चला चहा घ्या सगळेजण..........सुजय सगळयांना चहा देत बोलतो........

 वा मस्त झालाय चहा.........चहा छान करायला जमलाय की तुला आता......माधवीताई

अग आई मी नाही केला रेवाने केलाय मी फक्त दयायच काम करतोय.......सुजय

हो का......मस्त केलाय चहा रेवाने...........आनंदराव

बर तुम्ही चहा घ्या मी आलोच.......सुजय

सुजय किचन मध्ये येतो........आलास देवुन........रेवा

हो आलो.........सुजय

हा घे तुझा चहा.........रेवा

सुजय बोलत बोलतच चहाचा एक घोट घेतो...........पण चहा घेतल्यानंतर त्याला वेगळीच टेस्ट लागली........अरे ही तर कॉफी आहे.......तु चहा केली होतीस ना........सुजय

हो चहा केले होते......पण बाकीच्यांसाठी.......तुला कॉफी हवी होती ना.........रेवा

मी तर बोललो पण नाही की मला कॉफी हवी आहे......मग तुला कस कळल......रेवा

चहा घेणार काय विचारल्यावर तु जसा चेहरा केला होतास ना त्यावरुन कळल.....की तुला चहा नकोय......काय रे तु पण सांगायच ना...कॉफी हवी आहे म्हणुन मी काय नाही बोलले असते का...........रेवा

अग तस नाही पण अस करच म्हणुन कस बोलणार ना.........सुजय

वेडाच आहेस.......चला आता स्वयंपाक करुया......रेवा

हो वेडाच आहे......तुझ्यासाठी..........सुजय हळु आवाजात पुटपुटला.........

काय बोलालस का तु.......रेवा

आ........काही नाही.......मला सांग ना मी काय करु........सुजय

रेवा सुजयला हे कर तु... ते कर अस सांगत असते........सुजयला सांगत सांगतच रेवा चपातीसाठी पिठ मळत असते........पिठ मळताना तिच्या चेहऱ्यावर तिचे पुढचे केस सारखे येत होते.......त्यामुळे तिला ते केस पिठ मळताना डिर्स्टब करत होते सुजय काही तरी सामान ओटयावर ठेवायला म्हणुन जातो तर......रेवा तिचे केस मागे सारण्याचे व्यर्थ प्रयत्न करत होती........हाताला पिठ लागल्यामुळे तिला ते व्यवस्थित मागे करता येत नव्हते........

मी काही मदत करु का.........सुजय

अरे नको मी करेन मॅनेज.........अस म्हणत रेवा परत आपले केस मागे करायचा प्रयत्न करु लागली.....पण तीला व्यवस्थित करताच येईना........

सुजय परत तिला विचारतो.......मी मदत करु का.........आता त्याची मदत घेतल्याशिवाय काहीच ऑप्शन नव्हता.....रेवा सुजयकडे वळते.....आणि फक्त हममम.....एवढच बोलते.......तिला सुजयला केस मागे सार म्हणायला ऑक्वड वाटत होत........म्हणुन ती त्याच्या बाजुला वळुन फक्त हममम एवढच बोलली.......

रेवाने हो बोलल्यावर सुजय तिचे केस मागे करु लागतो......त्याच्या त्या हळुवार होणाऱ्या स्पर्शाने रेवा मोहरुन गेली तिने नकळत डोळ बंद केले.......रेवाने डोळे बंद केल्यामुळे सुजयचा तिला पाहण्याचा आयता चान्सच भेटला.......रेवाने डोळे बंद केले होते........व सुजय तिला न्याहळत तिचे केस हळुवार मागे सारत होता..........केस मागे करताना त्याचा हात तिच्या गालावरुन हलकाच स्पर्शुन गेला.......तसे रेवाने डोळे उघडले........आणि ती सुजयकडे पाहु लागली......दोघेही नकळत एकमेकांकडे पाहत होते........सुजयच्या स्पर्शाने रेवाच्या अंगावर शहारे आले तसे तिने आपले हात ओटयावर टेकवले....आणि तिथेच बाजुला असलेल्या ग्लासमधील पाणी तिच्या हाताच्या धक्याने खाली पडले........तसे दोघे भानावर आले......

अरे यार हे काय.........सुजय आपली नजर रेवापासुन चोरत ग्लासकडे पाहतो.........बहुतेक माझा धक्का लागला त्याला.....थांब मी साफ करते..........अस म्हणत रेवा जात असते.........पण पाणी फरशीवर सांडलेले असते तिचा पाय त्यात पडतो व तिचा तोल जातो.......ती खाली पडणार इतक्यात सुजय तिला पकडतो......‍रेवा आपण खाली पडु या भितीने सुजला पकडायला जाते व सुजयच्या कपडयाला व चेहऱ्याला पिठ लागत.........सुजयने सावरल्यानंतर ती त्याच्यापासुन बाजुला होत असते........पण परत तिचा पाय घसरतो........ती पडेल म्हणुन सुजय त्याची असलेली पकड आणखीण घट्ट करतो.........आणि त्यामुळे रेवा सुजयच्या खुप जवळ येते......सुजयच्या त्या पकडण्यामुळे तिला होण्याऱ्या स्पर्शाने तिच्या अंगारव काटे आल्यासारखे झाले......ती तिच्याही नकळत सुजयकडे पाहतच राहते.......

रेवा तु ठिक आहेस ना.........सुजय तिला पकडतच बोलतो........तशी ती भानावर येते.......आणि सुजयपासुन बाजुला होते......तिला सुजय समोर थांबताना थोड ऑक्वड वाटत असत म्हणुन ती हात धुण्याच्या बहान्याने ती बेसिन जवळ जाते.....ती हात धुवु पर्यत सुजयही खाली सांडलेल पाणी पुसुन घेतो.....रेवा हात धुवुन पुढच्या तयारीसाठी येते.......तर तिच लक्ष सुजयकडे जात व ती हसते.......

काय झाल हसायला.........सुजय

अरे तुझ्या चेहऱ्याला पिठ लागल आहे......रेवा

कुठे.........सुजय चेहऱ्यावर हात इकडे तिकडे लावत विचार असतो.......

अरे इथे नाही थोड साईडला........रेवा त्याला नेमक कुठे लागलय हे सांगत असते पण सुजय इकडे तिकडे असच करत असतो..........शेवटी रेवा वैतागते..........

थांब मीच पुसते ते.........अस म्हणुन पुसु लागते.......पीठ पुसताना रेवाच्या हाताच्या स्पर्शाने सुजय भान हरवुन तिला पाहत असतो.......रेवा पुसुन बाजुला होते तरी सुजय तिच्या त्या स्पर्शाच्या विचारात असतो.....

सुजय.... सुजय.........कुठे लक्ष असत रे तुझ केव्हाची बोलवतेय..........रेवा

सुजय भानावर येत.....काय म्हणत होतीस........रेवा कपाळावर हात मारत.......अरे झाल पुसुन अस म्हणत होते......रेवा

तासा दिड तासात जेवण तयार होत............अरे झाल पण जेवण बनवुन एवढयात.......सुजय

हो मग तुला बोलले होते ना होईल म्हणुन......आणि तु नसतास तर थोड अजुन लवकर झाल असत.....रेवा सुजयला चिडवत बोलते......

तसा सुजय गाल फुगवुन.....बर मग मी जातो बाहेर........उगाच माझी अडचन......अस म्हणत किचनच्या बाहेर जात असतो.....

***

क्रमश:

पुढचा भाग 18/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all