बावरे मन...भाग-40

बावरे मन..भाग 40 (दादु सुजय चला ना मला आत्तुला भेटायच आहे....आणि मम्माला पण तुम्हाला भेटायच आहे.......र

बावरे मन..भाग 40

(दादु सुजय चला ना मला आत्तुला भेटायच आहे....आणि मम्माला पण तुम्हाला भेटायच आहे.......राधिका....

स्नेहा रेवा आम्ही आलोच हा.....आशु....

हो चालेल.......छान आहे ना ग राधिका.....स्नेहा)

आता पुढे.....

हमम.......आहे छान पण एवढ चिकटायची काहीच गरज नव्हती ना...रेवा हळु आवजात बोलते...पण स्नेहाला ते ऐकु जात......पण त्यावेळी ती काहीच बोलत नाही....

राधिका सुजय व आशु सगळयांना भेटुन परत स्नेहा व रेवाजवळ येतात....तेवढयात आध्या तिथे येते.....

राधिका दी तु केव्हा आलीस..........आध्या बोलत बोलत तिला मिठी मारते...........

अग ही काय आत्ताच येतेय......सुजयशी आणि दादुशी बोलत होते........

मग राधिका मॅडम किती दिवस सुट्टी घेतलाय.....सुजय

सुजयने अस विचारल्यावर परत राधिका त्याचा हात पकडते व.....आनंदात सांगते.....लग्नापर्यत सुट्टी काढलेय......

खरच दी....मग आता लग्नाच्या खरेदीला धमाल येणार हो ना........आध्या आनंदात बोलते......

हो ग खुप धम्माल करायची आपण.......राधिका.....

हयांच बोलण चालुच असत........

मुलांनो झाल का तुमच गुरुजी वाट पाहत आहेत अजुन बाकीचे विधी करायचे आहेत......माधवीताई त्यांना बोलवत होत्या.......

हो आई झालय.....सुजय

रेवा तु स्नेहाला घेवुन तिथ बस जा....गुरुजींनी बोलवल की तिला घेवुन ये....माधवीताई

हो काकु..... येईन मी घेवुन........रेवा

गुरुजींनी विधीची मांडणी करुन झाल्यावर साखरपुडयाच्या विधीला सुरवात करतात...

वराच्या व वधुच्या आई वडीलांनी विधीसाठी पाटावर येवुन बसा....गुरुजी

माधवीताई...... रेखाताई.... चला गुरुजी बोलवत आहेत.........मालतीताई

आनंद......सुधिरराव... उठा गरुजी बोलवत आहेत.......रमाकांतराव

स्नेहाचे व आशुचे आई वडिल पाटावर विधीसाठी येवुन बसतात....

आनंदराव मुलाला व मुलीला बोलवा.......गुरुजी

गुरुजी मी बोलावते त्यांना.....मालतीताई

हो  हो बोलवा....गुरुजी

रेवा स्नेहाला घेवुन जा.......सुजय तु आशुला घेवुन जा....मालतीताई

हो आई..........रेवा

हो काकु........सुजय

रेवा व सुजय स्नेहा व आशुला विधीसाठी घेवुन जातात.....स्नेहा रेखाताई व सुधिररांच्या बाजुला जाऊन पाटावर बसते.......व आशु माधवीताई व आनंदरावांच्या साईडला जाऊन पाटावर बसतो......

गुरुजी विधीला सुरु करतात.......सुरवातीला गणपती पुजन केले जाते......आता गणेश पुजन झाल्यावर कलश पुजन करायचे आहे........मुलीच्या आई वडिलांनी व मुलाच्या आई वडिलांनी.....तांब्याचा कलश पाण्याने भरुन घ्या......त्यावर हळदी कुंकुची पाच बोटे ओढा.....कलशावर आंब्याची पाने ठेवा त्यावर नारळ ठेवा........नंतर त्यावर अक्षता अर्पण करुन कुलदैवताचे स्मरण करा...........आता ते कलश आपल्या माथी लावुन नंतर आपल्या अर्धागिनीच्या माथ्याला लावा व नंतर आपल्या मुलाच्या व मुलीच्या माथ्याला लावा.......गुरुजीं सांगतील त्याप्रमाणे सगळया विधी करत होते...आता हया विधी झाल्या....आता मुलाकडच्या पाच महिलांनी मुलीची ओटी भरा.......

माधवीताई मालतीताई व आणिखीन पाहुण आले होते त्याच्यातील तीन महीला अश्या पाच महिला स्नेहाची ओटी भरतात......

आता ओठी भरुन झाली...आता अंगठी घालण्याचा कार्यक्रम करु बाकीच्या विधी झाल्या आहेत......गुरुजी.

हो गुरुजी...........आध्या अंगठी घेवुन ये......माधवीताई

हो आई आले........आध्या

रेवा अंगठी घेवुन ये बाळ......रेखाताई

रेवा व आध्या सजवलेल्या ताटात अंगठी घेवुन येतात......

पहिला मुलाला हार घाला व नंतर मुलीला हार घाला........गुरुजी.

मालतीताई....रमाकांत भाऊजी तुम्ही घाला जावा हात त्या दोघांना.....माधवीताई

आशुला व स्नेहाला हार घातले जातात.....आता अंगठी घाला एकमेकांना...गुरुजी

रेवा स्नेहाला अंगठी देते......आशु हात पुढे करतो व स्नेहा त्याच्या बोटामध्ये अंगठी घालते.....अंगठी घातल्यावर सगळे टाळया वाजवु लागतात........नंतर आध्या आशुला अंगठी देते......आशु स्नेहाच्या बोटात अंगठी घालतो व सगळे टाळया वाजवु लागतात........अंगठी घातल्यावर त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळयांचा वर्षाव होवु लागला.......

आता दोघांनी एकमेकांना पेढा भरवा...गुरुजी

स्नेहा व आशु एकमेकांना पेढा भरवतात......

साखरपुडा संपन्न झाला.......बाकीच्या पाहुणे व मित्रमंडळींनी मुलाला व मुलीला पेढा भरवुन आपला आर्शिवाद व शुभेच्छा दयावे......गुरुजी

परत सगळे टाळया वाजवु लागले......व एकएक पाहुणे व मित्र मंडळी त्यांना भेटायला येवु लागले.....

एकएक पाहुणे भेटुन जात होते.......आशुच्या ऑफिसमधील व स्नेहाच्या बॅकेतील सर्व फ्रेन्ड्सही त्यांना भेटुन गेले.....आता सगळे फॅमिली फोटो काढणार होते......पण सगळे कुठे ना कुठे बिजी होते......आध्या सगळयांना बोलवुन आणत होती......थोडयावेळात सगळे एकत्र स्टेजवर येतात......सगळेजण आशु व स्नेहा सोबत फोटो काढत होते......चला ना फॅमिली फोटो काढुया.....आध्या सगळयांना सांगते.....

मग सगळे एकत्र फोटो काढत असतात......पण रेवा बाजुलाच ‍थांबली होती.......तिचे आई बाबा पण त्यांच्या कामातच होते......

माधवीताईच लक्ष रेवाकडे जात........अग रेवा तु का तिथे उभी आहेस ये ना........माधवीताई

अहो काकु नको नंतर काढेन की मी......आत्ता फॅमिली फोटो काढताय ना.....रेवा

अग हो पण तु पण आमच्या फॅमिलीतलीच आहेस......आणि रमाकांत भाऊजी व मालतीताई कुठे आहेत.....थांब मी पाहते कुठे आहेत.....माधवीताई

माधवीताई रेवाच्या आई बाबांना बोलावुन आणतात..........व आध्या रेवाला स्टेजवर घेवुन येते....

काका काकु तुम्ही इथे थांबा.......आध्या माधवीताई व आनंदरावांच्या बाजुला उभा करत बोलते.....रेवा तु इथे उभी रहा......आध्या मुद्दाम रेवाला सुजयच्या बाजुला उभा करते.....

रेवाला साईडला पाहुन सुजय खुश होतो........पण रेवा थोड अंतर ठेवुन थांबली होती....अग रेवा तु एवढ अंतर ठेवलीस तर मी कशी येईन फोटोमध्ये.....थोड सरक तिकडे.....अस म्हणत आध्या रेवाला हळुच धक्का देते....आणि रेवा त्या धक्यामुळे सुजयच्या जवळ जाते....दोघेही एवढया जवळ आल्यावर एकमेकांकडे पाहतात.......आणि क्षणभर एकमेकांच्या डोळयात हरवुन जातात.....सुजय तर रेवाचे पाणीदार डोळे पाहुन....घ्यायाळ झाला होता........तिच्या त्या स्पर्शाने क्षणभर त्याला तो गाडीत सिटबेल्टचा क्षण आठवला.......तिच्या श्वासाची तीच उब त्याला जाणवत होती.......तेवढयात फोटोग्राफर रेडी अस मोठयाने ओरडतो तस ते दोघे भानावर येतात........पण आध्याने त्या दोघांना बाजुला होता येईल एवढी पण जागा शिल्लक ठेवली नव्हती...

सगळे रेडी म्हणुन ओरडतात.....आणि फोटोग्राफर सगळयांचा फोटो काढतो.....फोटो ग्राफरने एखाद दुसरा  फोटो काढला असेल.....तेवढयात राधिका तिथे येते..........ओय मला सोडुन फोटो काढताय.......थोडा रागिट लुक देत ती सगळयांच्याकडे पाहु लागते..

अग तु बाहेर गेली होतीस ना म्हणुन आम्ही तोपर्यत काही फोटो काढत होतो.....बर चल ये लवकर... आध्या

हो आले.....राधिका सुजय जवळ जाते........रेवा थोड बाजुला होतेस.......रेवाला कळेनाच ही का बाजुला हो म्हणतेय........पण राधिकाने तिला बाजुला करुन सुजयचा हात पकडुन त्याच्या जवळ थांबली........ते पाहुन रेवाला वाईट वाटत......नकळत तिच्या डोळयात पाणी येत......आध्यालाही राधिकाचा राग येतो........एवढया मेहनतीने तिने त्या दोघांना जवळ उभ केल होत आणि मध्ये जाऊन थांबली........

राधिका दी माझ्याजवळ थांब ये ना इथे........आध्या मुद्दाम तिला तिच्या जवळ बोलवत होती.......

अग राहुदे मी थांबते सुजय जवळच......राधिका सुजयला आणखीन घट्ट पकडत बोलते......

आता आध्याला काय बोलाव कळेनाच ती काही न बोलता शांतच बसते.......सुजयलाही तिचा राग आला होता पण तो डायरेक्ट काही बोलत नाही....गप्पच राहतो......फोटोग्राफर परत तयार आहात का विचारतो....व परत तो फोटो काढु लागतो.......पण रेवाला खुप वाईट वाटलेल असत....... पण तिला तिथुन जाताही येत नव्हत..........पण तिला तिथे थांबायच नव्हत........आध्या मी आलेच जाऊन........अस म्हणुन ती आध्या काही बोलायच्या आतच तिथुन निघुन जाते........रेवा अचानक जाताना सुजय व आध्याच्याही लक्षात येत की रेवाला वाईट वाटल आहे.......दोघेही एकमेकांकडे बघतात..........आध्या मी आहे ना मी बघते अस खुणवुन सांगते.........

थोडा वेळ फोटो काढल्यानंतर सुजय रेवा कुठे आहे पहायला जातो...........बाकीचे पण सगळे फोटो काढल्यानंतर आपल्या आपल्या कामाला लागतात.........स्नेहा व आशु तिथेच स्टेजवर बोलत बसतात.....

स्नेहा बसायला जात असते....अरे हा तर सुजयचा मोबाईल आहे....बहुतेक फोटो काढायच्या नादात इथेच विसरुन गेला वाटत.......परत आला की देईन त्याला.......अस म्हणुन ती आशुसोबत बोलत बसली......

सुजय रेवा कुठे आहे ते पाहत होता.........घरात सगळीकडे पाहतो पण रेवा कुठेच दिसत नाही.......मग तो मागे बागेत जाऊन बघतो...........तर रेवा त्याला झोपाळयावर बसलेली दिसते....आणि आध्या तिच्याशी बोलत होती.......

अरे तुम्ही दोघी इथे काय करताय.......सुजय रेवाच्या मुडचा अंदाज घेत आध्याला खुणवत विचारतो.........

अरे दादया काही नाही आम्ही असच गप्पा मारत बसलो होतो.....आध्याही मग काही तरी बोलत त्याला खुणवुन सांगते आता ठिक आहे ती.......

थोडावेळ दोघीच बोलत बसतात व सुजय त्यांच बोलण ऐकत होता........अचानक आध्याला फोटोच सुचत.......रेवा आपण फोटो काढुया का.....आपले फोटो काढलेच नाहीत आपण...एकत्र फोटोच नाहीयेत आपल्या दोघींचे............आध्या

अग नको परत कधी तर काढुया ना.....रेवा

रेवा प्लीज ना माझ्यासाठी.......आध्या

बर ठिक आहे......अग पण आपले फोटो काढणार कोण....मग आपल्याला सेल्फीच काढावी लागेल.......रेवा

अग दादया आहे की......तो काढेल.........दादया आमचे फोटो काढ.......आध्या त्याला ऑर्डर दिल्यासारखी बोलते.......हो का तुला नंतर बघतो.......असा लुक देत तो आध्याकडे पाहतो......फोटो काढण्यासाठी सुजय फोन पाहत असतो तर त्याचा फोन त्यांच्या जवळ नाही हे त्याच्या लक्षात येत......

आध्या बहुतेक मी माझा फोन आतच विसरुन आलोय.......थांब आणतो......

ये नको थांब माझ्या फोन मध्ये काढ.......नंतर जाऊन बघ कुठे आहे ते........आध्या

सुजय......रेवाचे व आध्याचे फोटो काढत असतो......ये दादया तु पण ये ना आपण सेल्फी काढुया.......आध्या सुजयला मुद्दाम बोलवते.....

सुजयलाही तेवढाच चान्स भेटला......मग तिघे सेल्फी काढत असतात.....ये दादया तु एक काम कर अस थांब आणि फोटा काढ म्हणत ती मुद्दाम रेवाच्या पुढे त्याला उभ करते......सुजय फोटो काढत असतो.......

अरे मी तर सेल्फीमध्ये येतच नाहीये......अस म्हणत आध्या परत रेवाला धक्का देते व  रेवा सुजयच्या जवळ जाते......आध्याने अचानक केल्यामुळे सुजय मागे वळुन पाहतो व दोघे एकमेकांकडे पाहतात.......आध्या त्यांच्या नकळत सुजयच्या हातातुन मोबाईल घेते आणि सुजयला ते कळत सुध्दा नाही........व ती त्या दोघांचे फोटो काढते.......

इतक्यात परत तिथे राधिका येते.........ती आल्यावर रेवाचा मुड परत ऑफ होतो तिला थोडयावेळ्यापुर्वीचा  प्रकार आठवतो........

ती आल्यावर रेवा........आध्या मी आलेच स्नेहा माझी वाट पाहत असेल......अस म्हणत तिथुन निघुन जाते.......

आता तर सुजयला राधिकाचा खुप राग येत होता......त्यालाही तिथे थांबायची इच्छा नसते......

आध्या मी आलोच माझा फोन कुठे आहे ते पाहुन येतो........अस म्हणुन सुजय तिथुन निघुन जातो......आणि जाताना त्याला काही तरी आठवत........अरे यार मी मोबाईल असा कसा विसरलो........कोणी तरी पाहील तर प्रॉब्लेम होईल.........आणि तो गडबडीने मोबाईल कुठे आहे ते पहायला जातो...

हा असा काय.....मी हा इथे आहे म्हणुन आलेय आणि हा निघुन गेला....राधिका थोड वैतागत बोलली.......

अग त्याचा मोबाईल मिळत नाहीये तो शोधायला गेलाय तो......चल आपण पण जाऊ.....आध्या

****

आशु व स्नेहा बोलत बसलेले असतात.....आशुच्या ओळखीच कोण तर आलेल म्हणुन तो त्याच्याशी बोलत होता.......स्नेहा बाजुलाच बसुन फक्त ऐकत होती....अचानक सुजयच्या मोबाईलवर मेसेज येतो व त्याचा मोबाईलची स्क्रिन फ्लॅश होते........आणि स्नेहाची नजर त्याच्या मोबाईलकडे जाते...आणि मोबाइलकडे पाहुन तिला आश्चर्यच वाटत.....ती फोन हातात घेते.......रेवाचा फोटो सुजयच्या स्क्रीन वर......तिचा फोटो सुजयने स्क्रिनला का ठेवला असेल......सुजयला रेवा आवडत तर नसेल..........?....असच असाव......हया दिवसात त्याच रेवा बरोबरच्या वागण्यात फरक तर पडला आहेच......पण रेवाला सुजय आवडत असेल का...........?.....उगाच तर्क वितर्क लावायला नको आधी सुजयशी बोलुन हे सगळ क्लीयर करुन घेते......स्नेहा

स्नेहाने सुजयच्या स्क्रिनवर रेवाचा फोटो पाहील्यावर तिची पुढची रिॲक्शन काय असेल...... आणि सुजय स्नेहाला सांगेल का की रेवा त्याला आवडते.....पाहु पुढच्या भागात.....

कथेमध्ये साखरपुडयाचे विधी मांडण्याचा प्रयत्न केला आहे....काही विधी मागे पुढे झाले असतील...किंवा काही राहुन गेल्या असतील तर कथेचा भाग म्हणुन समजुन घ्या.....

***

क्रमश:

पुढचा भाग 14/9/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all