बावरे मन...भाग-33

बावरे मन..भाग 33 (पण तुझ मत काय........तुला पसंत आहे ना.......रेवा अस बोलल्यावर स्नेहा थोडी लाजते......ओहो को?

बावरे मन..भाग 33

(पण तुझ मत काय........तुला पसंत आहे ना.......रेवा

अस बोलल्यावर स्नेहा थोडी लाजते......ओहो कोणी तरी लाजतय.........रेवा स्नेहाला चिडवत होती....

गप्प ग रेवा...........स्नेहा

मी आले पाच मिनिटात.........रेवा)

आता पुढे...

अग पण कुठे जातेयस.......स्नेहा

आले थांब ग.........रेवा

रेवा स्नेहाच्या आई बाबाच्या रुममध्ये जाते..........

काका काकु येवु का.....रेवा

अग रेवा विचारतेयस काय ये ना..........रेखाताई

बस बाळ.........सुधिरराव

हो काका.........काका काकु मी स्नेहाला विचारले....तिला मुलगा पसंत आहे......रेवा

खरच.......रेखाताई आनंदात विचारतात.......

हो काकु..........रेवा

मुद्दामच तुला विचार म्हणुन सांगितल ग.......आमच्याशी एवढ मनमोकळे पणाने तिला बोलता आल नसत ना.......ती काही लपवत नाही कधी.. सांगते सगळ.......पण अशा गोष्टी मैत्रिणीशी कस मनमोकळे पणाने बोलता येतात ग..........रेखाताई

हो काकु मला आल होत ते लक्षात म्हणुनच मी विचारते म्हटल.........रेवा

आता मुलांकडच्याचा निरोप काय येतोय पाहु की........रेखाताई

त्याच्या वागण्या बोलण्यातुन तर त्यांना स्नेहा पसंत आहे अस वाटत होत......बघु आता गुरुजी सांगतील काय ते.........सुधिरराव

बर चला मी पण जाते घरी.........आई वाट बघत असेल.........रेवा

बर चालेल..........रेखाताई

रेवा स्नेहाला सांगुन घरी जाते.........

रेवा घरी येते आणि आल्या आल्या किचनमध्ये आईला सांगायला जाते......ये आई ऐक ना.......

आलीस का..... गेले का पाहुणे पाहुन स्नेहाला.......मालतीताई

हो गेले ग....... तेच तर सांगतेय ऐक तर.......रेवा

हा बोल......मालतीताई

अग स्नेहाला कोण पहायला आलेल माहीतेय........रेवा

कोण....मालताई

अग आशुतोष दादा......रेवा

कोण आशुतोष.........मालतीताई थोडा विचार करत विचारतात....

अग आशुतोष दादा ग आनंदकाकाचा मुलगा......बाबाचे मित्र ग आई...रेवा

आपला आशुतोष......मालतीताई

हो.....रेवा

चांगल झाल आहे की.....दोघेही सुखी होतील लग्न झाल तर.........मालतीताई

बघु आता त्यांचा निरोप काय येतो ते........रेवा

आवडेल बग त्यांना स्नेहा......एवढी गुणाची सुन कोणाला नको आहे होय....हव तर मी बोलते त्यांच्याशी.....मालतीताई

बर काही तरी करा तुम्ही....मी जाते.....आवरते जाते.......रेवा

****

सुजय व त्यांची फॅमिली घरी पोहचतात......

छान आहे ना मुलगी....किती सुंदर आहे आणि बोलायला पण छान वाटली....पहिल्यांदाच भेटलो पण किती हसत  बोलत होती.....मालतीताई

हो ग आई मस्तच आहे......आणि सगळयांत महत्वाच म्हणजे ती रेवाची मैत्रीण आहे...........आध्या सुजयकडे बघत बोलते......

हो ग..... रेवाला तिथे पाहील्यावर दोन मिनिट मलाही कळेनाच ही इथे कशी काय........पण दोघी मैत्रीणी छान आहेत.....मला रेवाला भेटल्यापासुन वाटतच होत की रेवा सारखी सुन मिळावी....मालतीताई

अस बोलल्यावर सुजय पाणी पित होता त्याला ठसकाच लागला......

अरे सावकाश..........आनंदराव

दादया काय झाल अचानक कसा काय ठसका लागला......आध्याला लक्षात आल होत पण ती मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी विचारत होती.......

काही नाही तु गप्प बस जरा......सुजय डोळे मोठे करुन बोलतो.....

तशी आध्या हसायला लागते.....ए आई मला तर वहिनी पसंत आहे......आध्या खुप आनंदात बोलते....

अग पण ज्याला लग्न करायच आहे त्याला पसंत आहे का.......मालतीताई आशुतोषकडे बघत बोलतात....

काय रे आशु आहे का तुला पसंत मुलगी........आनंदराव

आशुला लाजल्यासारख झाल अस एकदम कस बोलाव त्याला कळेना....आई बाबा तुम्ही जस म्हणाल तस......अस म्हणुन तो मोकळा झाला.......

अरे अस कस.....तुला लग्न करायच आहे......तुला पसंत असायला हवी ना.....मालतीताई

का ग आई तु...........त्याला पसंत आहे मुलगी.....म्हणुन तर बोलला ना....तुम्ही ठरवाल तस......आध्या

तुला काय माहीत ग आज्जीबाई......सुजय तिचे कान ओढत विचारतो.....

दादया दुखतय ना... कान सोड माझे.......आणि हो मी आज्जीबाई नाहीये कळल......आध्या

हो का.....मग तुला कस माहीत सांग......सुजय

दादुकडे कोणाचच लक्ष नव्हत ना तिथे पण माझ होत........किती एकटक तिला पहात होता माहीतेय.....आध्या आशुला चिडवत सगळयांना सांगते..........

आशुला आता काय बोलाव कळेना.......ए गप्प बस काहीही काय सांगतेस......आई ही खुप अगाव होत चालली आहे हा.........आशुतोष खोट खोट चिडण्याच नाटक करतो.....

बग चोरी पकडली म्हणुन लगेच माझ्यावर चिडतोय......आध्या

बास आता तुमची भांडण...गुरुजींना निरोप कळवायचा आहे......काय सांगायच सांग आशु..........मालतीताई थोड गंभीर होत विचारतात......

तसे सगळे शांत होतात.....आशु बोल काय सांगायच गुरुजींना........मालतीताई

आशुला काय बोलाव कळेनाच......आता डायरेक्ट बोलल्याशिवाय आई काय मला सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आल........मग तो सांगुन मोकळा झाला......आई मला पसंत आहे मुलगी.........

बग मी बोलले होते ना दादुला पसंत आहे मुलगी........आध्या आपल्या ड्रेसला नसलेली कॉलर उचलत आपलच बरोबर होत हया तोऱ्यात बोलली.....

हो ग आज्जीबाई तुझच खर.......सुजय

ये आई बग ना ग हा दादया........आध्या

तेवढयात मालतीताईचा फोन येतो.......ये गप्प बसा जरा......अहो मालतीताईचा फोन आहे.......थांबा बघते काय म्हणतायत....

हॅलो हा मालतीताई बोला...... खुप दिवसांनी फोन केलात.....माधवीताई

काही नाही असच केला......रेवाने सांगितल तुम्ही स्नेहाला पहायला गेला होता ते......मग त्यासाठीच फोन केला होता........मालतीताई

हो का.......बोला ना ........माधवीताई

अहो काही नाही.....मुलगी चांगली आहे खुप गुणी आहे अशी मुलगी तुम्हाला शोधुन सापडणार नाही.......एवढे दिवस बघतेय ना मी.....खरच तुमच्या घरी आली तर चांगला संसार करेल आशुचा......आणि तुमच्यात येवुन तुमचीच होऊन जाईल.....मालतीताई

आम्ही पण आत्ता तेच बोलत होतो.......आम्हा सगळयांना स्नेहा पसंत आहे......बर झाल तुम्ही पण सांगितलात........माधवीताई

आपल्या मुलाला एवढ चांगली मुलगी मिळणार असेल तर तेवढ तर मी करुच शकते....मालतीताई

हो हो का नाही तो ही तुमचा मुलगाच आहे.....माधवीताई

बर मी ठेवते फोन काय काय होत कळवा......मालतीताई

हो नक्की कळवते..........माधवीताई

काय म्हणत होत्या रेवाच्या आई.....आनंदराव

स्नेहा बद्दल सांगत होत्या..चांगली मुलगी आहे.....आणि बरच काही सांगत होत्या......माधवीताई

हो का.....मग गुरुजींना कळवु मग.....आनंदराव

हो कळवुया...आत्ताच फोन करते....माधवीताई

हो कर चालेल.......आनंदराव

हॅलो गुरुजी...माधवी बोलतेय........

हा बोला माधवीताई......गुरजी

निरोप देण्यासाठी फोन केला आहे.......म्हणजे आम्हाला मुलगी पसंत आहे...माधवीताई

काय सांगता.......खरच चांगली गोष्ट आहे...मी लगेच मुलीकडच्यांना फोन करुन कळवतो व तुम्हाला त्यांचा निरोप सांगतो......गुरुजी

हो हो चालेल गुरुजी..माधवीताई

****

हॅलो सुधिरराव.........गुरुजी

बोला गुरुजी....सुधिरराव.....

मुलांकडच्यांचा निरोप देण्यासाठी फोन केलेला...त्यांना आपली स्नेहा पसंत आहे.........गुरुजी

काय सांगताय गुरुजी ही तर आनंदाची गोष्ट आहे.....सुधिराव आनंदात बोलत आहे.....

अहो काय झाल काय म्हणतायत गुरुजी.....रेखताई व स्नेहा तिथेच बाजुला बसलेल्या होत्या.....

आपली स्नेहा त्यांना पसंत आहे म्हणे.......

अग बाई हो का.......रेखाताई

सुधिरराव तुमचा निरोप काय आहे.......त्यांनाही कळवायला हवा ना....गुरुजी.....

स्नेहा गुरुजी आपला निरोप विचारत आहेत काय सांगायच.....सुधिरराव

स्नेहाला अस विचारताच ती लाजुन आत जाते.......अग बाई लाजली वाटत........रेखाताई हसत म्हणाल्या......

गुरुजी आम्हाला पण मुलगा पसंत आहे......आमचा होकार कळवा त्यांना....सुधिरराव

बर बर लगेच कळतो त्यांना.....गुरुजी......

****

माधवी गुरुजीचा फोन आला.....हा गुरुजी बोला..........आनंदराव

आनंदराव लग्नाच्या तयारीला लागा.........मुलीकडच्यांचा होकार आहे........गुरुजी

हो का.........तुमच्याशिवाय कशी तयारी होणार गुरुजी....तुम्ही हवेच की इथे......

हो हो येणार येणार..........गुरुजी.......

बर मग एक दिवस बसुन सगळ ठरवुया चालेल ना.........आनंदराव

हो ठरवुया की..बर ठेवतो आता फोन.....गुरुजी

माधवी त्यांचा होकार आहे.......सगळे तिथेच हॉलमध्ये बसले होत......

खरच बाबा.........आध्या

हो ग बाळा........आनंदराव......

अहो आता तयारीला लागायला हव सगळ कस करायच.....रेवाच्या आईला बोलवुन घेते मदतीला.....चालेल ना.......माधवीताई उत्साहाने सगळ बोलत होत्या......

अग थांब जरा अजुन सगळ ठरवायच आहे......आनंदराव

अहो सगळ ठरवुन व्हायला किती वेळ लागतो.......असे दिवस जातात.....माधवीताई

बघा बघा इकडे कोणी तरी लाजतय..........आध्या आशुला चिडवत बोलते

ये गप्प कोण लाजतय मी काही लाजत वगेरे नाहीये हा.....आशु

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all