बावरे मन...भाग-30

बावरे मन..भाग 30 (थोडयावेळाने सुजयला रेवाला बघायची खुप इच्छा होते पण डायरेक्ट पाहु पण शकत नव्हत??

बावरे मन..भाग 30

(थोडयावेळाने सुजयला रेवाला बघायची खुप इच्छा होते पण डायरेक्ट पाहु पण शकत नव्हता ना.......विन्डोजवळ जाऊन हळुच पडदा बाजुला करुन तो रेवाला पाहु लागला........यार किती सुंदर दिसतेय ही.......आणि दिवसेनदिवस जास्तच सुंदर दिसतेय......असच हीला पहात रहावस वाटतय.........पण अस किती वेळ इथे थांबु ना.....कोणी पाहील तर अवघड होईल.........काय करु..........काही सुचत पण नाहीये.........थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या डोक्यात काही तरी विचार येतो...........व तो शरदला हाक मारतो.......)

आता पुढे......

हा सर बोलवलात......शरद

हो रेवाला पाठवुन दे........सुजय

हो सर.......शरद

शरद रेवाजवळ येतो.......रेवा मॅडम सरांनी तुम्हाला बोलावल आहे.....

ओके शरद........रेवा

मे आय कम इन सर........रेवा

एस कम इन........सुजय

रेवा ते खेडे गावातील एका कस्टमरच्या डॉक्युमेंन्ट मध्ये काही तरी क्युरी आहे..........ती जरा व्यवस्थित बघुन घेतेस का.......सुजय

हो सर बघते आणि सांगते तुम्हाला लगेच.......रेवा

ओके चालेल......नाहीतर एक काम कर ना........प्रत्येकवेळी मी काही तरी क्युरी काढणार तु सारखी आतबाहेर करत राहणार तुझा सगळा वेळ हयातच जाईल...त्यापेक्षा तु इथे बसुनच काम कर ना........सुजय

रेवाला थोड ऑक्वड वाटत पण सुजयच बोलणही पटत तीला.......ओके सर........मी फाईल्स घेवुन येते......रेवा

ओके..........सुजय........रेवा बाहेर गेल्यावर सुजय......एस प्लॅन सक्सेसफुल झाला.......आता तिला दिवसभर पाहता येईल.........क्युरी काहीच नव्हती सुजय उगाच त्याला रेवाला पाहता येईल म्हणुन क्युरीच कारण सांगितल होत......

रेवा आपल्या डेस्कवरुन फाईल्स शरदला सुजच्या केबिनमध्ये ठेवायला सांगत होती......रेवाची गडबड बघुन स्नेहा तिच्या जवळ येते......

काय ग काय करतेयस हे.......स्नेहा

अग ते लोन ॲप्रुवलच काम अजुन बाकी आहे ना....मग सर केबिनमध्येच बसुन कर म्हणत आहेत......त्यांना काही तरी क्युरी आहेत म्हणे.......रेवा

ओके.....स्नेहा.....

बर नंतर बोलु आपण दोन दिवसात हे काम संपवायच आहे.......रेवा

हो चालेल....स्नेहा

रेवा सुजयच्या केबिनमध्ये येते व काम करु लागते.......सुजय त्याला काही क्युरी असतील ते तिला विचारत होता..........क्युरी कुठल्या हो......तिच्याशी बोलण्यासाठी क्युरी निघत होत्या......तो काम करत करत रेवाकडे बघायचा.......ती बघतेय हे जाणवल की परत कम्प्युटरमध्ये बघायचा.........त्याचा हा नजरेचा खेळ सुरु असतो......थोडयावेळात लंच ब्रेक होतो.......

सर मी लंच करुन येवुन बाकीच काम करते.....रेवा

इथेच कर ना मग लंच मला ही आज कंपनी मिळेल..........सुजय

रेवाला हयावर काय बोलाव कळेनाच........नाही म्हणाव तर अवघड आणि हो म्हणाव तर अवघड अशी परिस्थिती झाली..........पण सर ते माझा टिफीन बाहेर आहे.......मी जेवते ना बाहेरच.....रेवा

एवढच ना थांब मी शरदला सांगतो आणायला.....सुजय

नाही नको सर मीच घेवुन येते.........रेवा

ओके.......सुजय

रेवा बाहेर येवुन आपला टिफीन बॅगेतुन काढत असते.......तोपर्यत तिथे स्नेहा येते.....झाल का तुझ चल जेवायला..........

अग ऐक ना.....सर मला केबिनमध्येच जेव म्हणत आहेत...........रेवा

काय.......सर तुला केबिनमध्ये जेव म्हणत आहेत.........काय सांगतेस........काही विशेष आहे का.......स्नेहा रेवाला चिडवत म्हणाली.........

झाल का तुझ परत सुरु..........रेवा

बर बाई जा जेव जा.........स्नेहा

हमममम..रेवा

दोघेजण मिळुन जेवत असतात.......सुजय रेवाच लक्ष नसताना तिच्याकडे बघन सुरुच असत........रेवा मात्र शांत जेवत होती काहीच बोलत नव्हती..........

रेवा आता आपण फ्रेन्ड आहोत ना मग अशी शांत शांत असतेस....जास्त बोलत नाहीस....आणि नेहमी घाबरल्यासारखी का बोलतेस........सुजय

नाही सर तस काही नाही...........रेवा

परत सर..........सुजय

बॅकेत आहोत ना नावाने कस बोलवु........रेवा

हो......पण आता आजुबाजुला कोणी आहे का...........कोण नसेल तर नावाने बोलवु शकतेस......आणि सगळयांच्या समोर जरी बोलवलीस तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये.......सुजय

रेवाला हयावर काय बोलाव कळेनाच.....ओके ........म्हणुन शांत बसली.........सर........

परत.........सॉरी.....सुजय माझा टिफिन शेअर करु शकतोस.......रेवा

हो... का नाही... आवडेल मला............सासुबाईच्या हातच जेवायला.......मनातल्या मनात बोलतो.....आणि नकळत हसतो........

तु पण माझा टिफिन शेअर करु शकतेस........सुजय रेवाकडे त्याचा टिफीन देत बोलतो.....

छान गप्पा मारत दोघेजण जेवतात......आता रेवाचा ऑक्वडनेस थोडा कमी आलेला आता ती सुजयशी मनमोकळेपणाने बोलत होती......

जेवण आवरुन दोघे परत काम करु लागतात.......

****

बघता बघता दोन दिवस कधी झाले कळलेच नाही.........आज डॉक्युमेन्ट अपलोड करायचा लास्ट दिवस होता......सुजय व रेवा त्याच गडबडीत होते..........

दोन दिवस दोघे एकत्र बसुनच काम करत होते लंच करत होते........त्यामुळे रेवा आता छान फ्रेन्डली बोलत होती सुजयशी...

शट् यार........सुजय एकदमच ओरडतो..........

काय झाल सुजय.......का ओरडतोयस........रेवा

अरे यार बग ना......हया सर्व्हरला पण आत्ताच बंद पडायच होत..........सुजय

होईल सुरु एवढा पॅनिक नको होवुस........रेवा

कसा पॅनिक नको होवु........घडयाळ पाहीलेस का.....सहा वाजलेत........बॅकेच टायमिंग पण संपल......सुजय

अरे हो की माझ्या लक्षातच आल नाही........मग आता कस करायच.......रेवा

थांब सरांना एकदा कॉल करतो काय म्हणतायत बघू.......सुजय

ओके.......चालेल........रेवा

हॅलो सर............सर ते लोनचे डॉक्यमेंन्ट सिस्टिमला सेट केले आहेत फक्त अपलोड करत होतो तर सर्व्हर डाऊन झाल............सुजय

ओके..........मी फक्त रात्री दहा पर्यत तुम्हाला वेळ वाढवुन देवु शकतो.........एढच ‍करु शकतो मी....कारण उदया मला पुढे रिर्पोट पाठवायचा आहे.......एरिआ मॅनेजर

ओके सर मी रात्री पर्यत करेन ......सुजय

ओके.....एरिआ मॅनेजर

काय झाल काय म्हणाले सर........रेवा

रात्री दहा पर्यत टायमिंग वाढवुन दिले आहेत....सुजय

रात्री पर्यत होईल का मग.......रेवा

बकीच तर सगळ झालच आहे...फक्त अपलोड करायच बाकी आहे........होऊन जाईल.......सुजय

बर..........रेवा

चला निघुया... वेळ झालाय खुप.... सगळा स्टाफ गेला असेल........सुजय

हो गेलाय वाटत........मी पण निघते मग......रेवा

एकटी कुठे जातेस मी सोडतो थांब.....मिस स्नेहा पण गेल्या असतील......सुजय

नाही नको सुजय......स्नेहा थांबली असेल बाहेर........रेवा

सगळे गेलेत मग मिस स्नेहा कशा थांबतील........सुजय

नाही थांबली असेल आम्ही एकमेकींना बाय केल्याशिवाय कधी जात नाही.......आणि एखादया वेळेस लवकर जायच असेल तर आधीच सांगतो.....रेवा

ओ.......मस्त आहे की.....चालेल मग मी निघतो.......सुजय

अग किती वेळ....केव्हाची वाट बघतेय......स्नेहा

अग ते सर्व्हर डाऊन झाल त्यामुळे डॉक्युमेंन्ट अपलोड झालेच नाहीत.........रात्री पर्यत अपलोड करायला सांगितले आहेत.........त्याच गडबडीत तुला सांगायच राहुन गेल ग.....सॉरी..

ये सॉरी काय......गप्प.......चला निघुया का.........स्नेहा

हो निघुया..........रेवा

बर उदया तु माझ्या घरी येणार आहेस लक्षात आहे ना........स्नेहा

हो ग स्नेहा येते मी लवकर.........चला निघुया.....रेवा

****

हो बोला गुरुजी........मी आत्ता तुम्हालाच फोन करणार होते.......तेवढयात तुमचा फोन आला......माधवताई

हो का..........तुम्ही उदया किती वाजता येणार हे विचारायला फोन केला आहे.......गुरुजी

11 वाजता चालेल का.......माधवीताई

हो हो चालेल........मी मुलीकडच्यांना सांगतो मग तस.....या मग उदया तुम्ही...ठेवु का फोन...गुरजी

हो येतो आम्ही.......चालेल ठेवा.....माधवीताई

झाल का फायनल तुमच सगळ......आनंदराव..........

हो झाल उदया 11 वाजता निघायच आहे सगळयांनी लवकर आवरा......माधवीताई

हो आम्ही सगळे आवरतो.....पण तुझा लाडका मुलगा कुठे आहे तो अजुन आलाच नाहीये त्याला सांग आधी......आध्या

येईल आत्ता एवढयात.........हा बग आलाच..........काय रे एवढा का वेळ......माधवीताई

अग आज लोनचे डॉक्युमेंन्ट अपलोड करायचा लास्ट दिवस होता ना......म्हणुन वेळ झाला......सुजय

बर बर.....उदया आपल्याला मुलगी पहायला जायच आहे लक्षात आहे ना.......माधवीताई

अरे हो ते लक्षातच नाहीये हया कामाच्या गडबडीत......पण मी उदया फ्री आहे येईन....पण आत्ता जातो आजच्या आज डॉक्युमेन्ट अपलोड करायचे आहेत........10 पर्यत व्हायला हव सगळ.......आणि आई मी जेवायला खाली नाही येत माझ जेवण वरच दे माझ्या रुममध्ये.......सुजय

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all