बावरे मन...भाग-3

बावरे मन..भाग 3 (ए स्नेहा एवढ कशाला घाबरतेस..बग जा काय म्हणतायत....बर रेवा...जाऊन येते....हमममम..बेस्ट ल?

बावरे मन..भाग 3

(ए स्नेहा एवढ कशाला घाबरतेस..बग जा काय म्हणतायत....बर रेवा...जाऊन येते....हमममम..बेस्ट लक....हा..जाते...

मे आय कमिंग सर..........एस कमिंग....)..आता पुढे....

एस कमिंग मिस स्नेहा....

सर तुम्ही बोलवत......

हो......अकाउन्ट डिपार्टमेन्टमध्ये  कोण कोण आहे......

सर मालगावे मॅडम.....आणि मी

ओके....मालगावे मॅडमांना पाठवून दया..आणि अकाउन्ट डिपार्टमेंन्टचा रिर्पोट पण घेवून या....

आके सर..दोन मिनिटात घेवुन आले..

ओके...सुजय

थोडयावेळाने स्नेहा बाहेर येते....रेवाच लक्ष तिकडेच होत..... स्नेहा बाहेर कधी येते....स्नेहा बाहेर आल्यावर रेवा तीला सिरियस होऊन विचारते तिला वाटत असत की हीला पण ओरडा बसला आहे की काय....

काय झाल ग काय म्हणाले सर.... अगं काही नाही...अकाउन्ट डिपार्टमेंन्टचा रिपोर्ट हवा आहे....मला आणि मालगावे मॅडमांना बोलावल आहे.......बाकीच नंतर सांगते आधी रिपोर्ट देवुन येते.......ओके चालेल..

मालगावे मॅडम.........स्नेहा

काय ग स्नेहा......मालगावे मॅडम

सरांनी केबीनमध्ये बोलावल आहे....आपल्याला

का काही प्रॉबलेम झाला आहे काय......

अहो नाही ते डिपार्टमेंन्टचा रिपोर्ट हवा आहे....

ओके थांब मी रिपोर्ट घेते.......हा चल आता स्नेहा......

मे आय कमिंग सर.....स्नेहा व मालगावे मॅडम...

एस कमिंग......

सर हा अकाउन्ट डिपार्टमेंन्टचा रिपोर्ट.....मालगावे मॅडम...

मालगावे मॅडम....तुम्ही अकाउन्ट डिपार्टमेंन्टच्या हेड आहेत ना.....

हो सर...

मी सिस्टीमला चेक केला रिपोर्ट चांगला आहे....काम बऱ्यापैकी पुर्ण आहे.....

थॅक्स सर......

मिस स्नेहा तुमच पण रिपोर्ट चांगला आहे......

थॅक्स सर........

हार्ड कॉपीज तर चांगल्या आहेत....आता सॉफ्ट कॉफीज एकदा चेक करुन तुम्हाला बोलवेन...ओके......

ओके सर.......

आता या तुम्ही.......सुजय

स्नेहा व मालगावे मॅडम बाहेर येतात स्नेहा रेवाजवळ येते....हा बोल रेवा काय म्हणत होतीस तु..अग तेच की सरांनी का बोलावल होत.....

हा तेच होय.......तु बाहेर येवुन लगेच गेलीस ना मला वाटल तुला पण ओरडा बसतोय की काय...अग नाही ओरडले...रिपोर्ट चांगला आहे म्हणाले.....

तुम्ही लकी आहात की....पुर्ण बॅकेत तु आणि मालगावे मॅडम ओरडा खल्ला नाहीत

हो ग...मी पण घाबरलेच होते...आता माझा नंबर आहे की काय..पण अस काहीच झाल नाही….बर चल आता काम करते...नाहीतर खरच ओरडा बसेल.... हो ग जा..मी पण माझ काम करते.....

आज बॅकेतील वातावरण थोड शांत आणि सिरियस होत...थोड्यावेळाने कामकाजाची वेळ संपल्यावर सगळे जाण्याची तयारी करु लागले...मग सुजय ही टायमिंग झाल्यावर घरी गेला...आणि बाकीचे पण आवरुण घरी गेले...

रेवा घरी आल्यानंतर डायरेक्ट तिच्या बेडरुमध्ये गेली...रोज बॅकेतुन आल्यानंतर दंगा मस्ती करणारी रेवा आज शांतच होती...तीला सरांनी ओरडलेल जीवाला लागलेल...

थोडया वेळाने रेवाच्या बाबानी तिच्या आईला विचारले...रेवाची तब्बेत बरी नाहीये का..आज आल्यापासुन शांतच आहे...आज काही दंगा मस्ती नाही... काही नाही...

अहो मला पण आल होत लक्षात ते..पण वाटल दमली असेल..म्हणून काही बोलले नाही....चहा झाला की बोलवते तिला मग बोलू तिच्याशी....

हो चालेल तु चहा कर मग बोलू आपण...

थोडयावेळाने चहा झाल्यानंतर मालतीताई तीला बोलवतात...रेवा चहा घे ये......

हो आई आले....

सगळे चहा घेत हॉल मध्ये बसतात...रेवा काय झालय...तब्बेत बरी आहे ना ग तुझी...रमाकांत राव तिला विचारतात..

तस लगेच मालतीताई पण....हो ग... आज शांत आहेस काही झालय का....अस विचारल्यावर रेवाच्या डोळ्यात पाणी आल..

रेवा काय झाल का रडतेयस..काय झालय.......मालतीताई तिचे डोळे पुसत विचारतात....

आज नविन मॅनेजर आलेत ना........हा मग......त्याच काय..........रमाकांत विचारतात.....

ते मला आज बॅकेत जायला 10 मिनिट उशिर झाला....म्हणून सर मला ओरडले....अस सांगुन ती परत रडू लागली.........

अग रेवा ऐवढयाशा गोष्टीसाठी कोण रडत का ग.....शांत हो बर.......रमाकांत तिची समजूत काढत म्हणाले......

फक्त तुलाच ओरडले का...?मालतीताई म्हणाल्या...........

नाही बॅकेतील सगळयांना ओरडतच होते आज..कोणाला उशिर झाला म्हणून तर कोणाच काम पुर्ण नाही म्हणून.......आज सगळ्या स्टाफचा मुड ऑफच होता...नविन मॅनेजर खडुसच आहे.......

अगं त्याच कामच आहे ते......तुम्हाला वेळेत जायला नको..मग ओरडा बसणारच की........अस म्हणत मालतीताई तिचे डोळे पूसतात......तेवढयात आकाश तिथे येतो..

काय झाल रेवा रडतेयस का तु..........रेवा रडतेली बघुन आकाश थोडा अस्वस्थ् झाला.......

काही नाही सर ओरडले तिला वेळ झाला म्हणून........मालतीताई

तस आकाश रेवाची समुजत काढतो.......अग रेवा....एवढयाश्या कारणावरुन कोणी रडत का ग.......ऑफिस म्हटल की चालायच अस......

मला पण माझा बॉस ओरडत नाही होय..पण मी काय रडत बसतो का......

बर..नाही रडत.....मला थोड वाईट वाटलेल म्हणून रडायला आल........आता नाही रडणार

नक्की ना.......हो रे दादा

बर चल मी फ्रेश होवून येतो......पण रडु नको आता...

हमममम...रेवा

आकाश रेवाला समजावुन फ्रेश होण्यासाठी जातो...

मालतीताई: हे बर आहे मी आणि बाबा तुला सांगत होतो तेव्हा रडतच होतीस आणि तुझ्या दादाने सांगितल तर लगेच हासायला लागलीस.......

रेवा: हा मग काय.....तु त्या खडुसची बाजु घेत होतीस पण दादा मला समजुन सांगत होता.....

हो का पण वेळ तुला झाला होताच ना रेवा...सकाळी केव्हा पासुन उठवत होते तर उठली नाहीस.....मग त्याचीच बाजु घेणार ना......

हममममममम......रेवा

सासरी पण असच करणार आहेस होय.....मालतीताई

आता आई लवकर उठण्यावर ऐकवेल...आणि ते सासरच पुराण ऐकाव लागेल  म्हणुन रेवा आई मी आलेच म्हणुन तिच्या रुममध्ये जाते...

रेवा जाताना रमाकांतराव हसायला लागले........कारण त्याच्या लक्षात आल होत की रेवा का जात आहे.....

सुजय घरी पोहचतो....घरी आल्यावर तो आईला हाक मारतो.....आई...मी आलो ग...

🎭 Series Post

View all