बावरे मन...भाग-20

बावरे मन..भाग 20 (थॅक्स सर, थॅक्स मॅडम........स्नेहा व रेवा बर चला जेवायला सुरवात करायची का.......रेवा.... ह?

बावरे मन..भाग 20

(थॅक्स सर, थॅक्स मॅडम........स्नेहा व रेवा

बर चला जेवायला सुरवात करायची का.......रेवा....

हो हो करुया सगळे एकदम बोलतात..........

ए थांब थांबा.........मालगावे मॅडम

काय झाल मॅडम..........रेवा)

आता पुढे.......

अग अस परत परत योग येणार आहे का एकत्र जेवणाचा........तर मग आपण श्लोक म्हणुया ना......मालगावे मॅडम

ओ मॅडम आता कोण म्हणत अस श्लोक वगेरे.......स्टाफमधी एकचजण बोलतो.......

कोण म्हणत नाही म्हणुन आपण म्हणायच नाही का......आपण आपली संस्कृती जपायला हवी ना.....आणि एकदा म्हणुन बग किती छान वाटत......मालगावे मॅडम

हो मॅडम तुमच बरोबर आहे......आपण आपली संस्कृती जपायला हवी......आपण जपली तर आपल्या पुढच्या पिढीला हया गोष्टी पहायला मिळणार ना........सुजय

हो.....मग चला म्हणुया श्लोक........स्नेहा

सगळे हात जोडतात........डोळे मिटतात व श्लोक म्हणायला सुरवात करतात.......ज्यांना येत होत ते म्हणत होते व ज्यांना येत नव्हत ते शांत डोळे मिटुन ऐकत होते......

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे।

हरिचिंतने अन्न सेवित जावे।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।

जयजय रघुवीर समर्थ।

श्लोक झाल्यावर सगळे डोळे उघडतात......सगळयांनाच खुप छान वाटत.....चला करुया आता सुरुवात......मालगावे मॅडम.......

सकाळपासुन आपण काय काय केलो हे सांगत किती सुंदर दिवस होता अस बोलत जेवत असतात......... रेवा स्नेहा खुपच छान ॲरेजमेन्ट केला अहात.....हॉटेलमध्ये अशी धमाल आलीच नसती....खरच खुपच मस्त.....मालगावे मॅडम.

थॅक्स मॅडम........रेवा, स्नेहा

सगळयांचे जेवण झाले.....बर ऐका सगळे रेवा सगळयांना शांत करत बोलते.....आपण एक गेम खेळायचा आहे......हे साईडला  तुम्ही पाहील असेल हया शेकोटी भोवती आपण सर्वानी बसायच....आणि कुशन आहे ती एकएक करत पास करायची....कुशन पास करत असताना म्युझिक वाजत असेल...ज्यावेळी म्युझिक बंद होईल आणि हे कुशन ज्याच्या हातात असेल त्याला काही तरी करायला सांगितल जाईल.....म्हणजे एखाद गाण म्हणायच असेल कोणती तर कविता किंवा अस बरच काही तरी करायला सांगितल जाईल.........ओके....रेवा

मग करायची ना सुरवात..........स्नेहा

सगळयांनाच ही कल्पना आवडली......सगळे जण जल्लोषात हो म्हणाले.......बर चला मग सगळे जाऊन बसुया तिथे........रेवा

सगळे जाऊन बसतात.......बर करायची का सुरवात......हो..........सगळे ओरडतात.......म्युझिक चालु होत तस सगळे कुशन पास करत होते.........दोन मिनिटांनी म्युझिक बंद झाल व मालगावे मॅडमांच्या हातात कुशन थांबली.......

ए मॅडम आऊट.....सगळे ओरडायला लागले........

बर बर आता काय करायच मी........मालगावे मॅडम...

काय सांगायच मॅडमांना........स्नेहा

गाण म्हणा..कोणीतरी ओरडत......ए मला गाण वेगेरे म्हणता येत नाही......मालगावे मॅडम

मॅडम खुप छान गाण म्हणता तुम्ही मी ऐकल आहे......रेवा

अग हो रेवा पण मला जुणी गाणी येतात आत्ताची तुम्हाला आवडतात तशी गाणी येत नाहीत ग मला.....मालगावे मॅडम......

मॅडम अस काही नाही......तुम्ही म्हणाल तर आवडेल आम्हाला ऐकायला.....आम्ही तर कधी ऐकणार आधीची गाणी.........सुजय

हो हो मॅडम तुम्ही गाणच म्हणा......रेवा

बर म्हणते.......आवडत का ते बघा.......मालगावे मॅडम....

हा.......स्नेहा

फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे

प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे

वा मॅडम मस्तच..........रेवा टाळया वाजवत म्हणते......तसे सगळे टाळया वाजवु लागतात.....

खरच मॅडम मस्तच......खुप छान म्हणालात........खुप सुंदर आवाज आहे तुमचा.....सुजय.....

बर पुढे सुरु करुया का......स्नेहा

हो चला........परत म्युझिक सुरु झाल.....कुशन एकएक करत पास करु लागले.......स्टाफ मधील बाकिचे एकएक करत आऊट होत गेले......आत्ता स्नेहा रेवा व सुजय तिघेच राहतात.....

आत्ता तिघेच राहीला तुम्ही बघु कोण जिंकत........मालगावे मॅडम

मॅडम मिच जिंकते बघा की........स्नेहा हसत म्हणाली

हो हो......करुया का सुरुवात.......मालगावे मॅडम......

हो करुया..........परत म्युझिक सुरु झाल स्नेहा रेवाकडे रेवा सुजयकडे सुजय परत स्नेहाकडे अस करत कुशन पास करत होते........अस दोन मिनिट चालु असत सुजय स्नेहाकडे कुशन पास करतो आणि म्युझिक थांबत........

ये स्नेहा आऊट सगळे ओरडायला लागले.......शट यार.....स्नेहा कुशन खाली टाकत म्हणाली.......

बर सांगा मी काय करु............स्नेहा

तुझी आणि रेवाची खुप चांगली मैत्री आहे ना.......मालगावे मॅडम...

हो आहेच...खुप खास आहे..........स्नेहा

मग तुमच्या मैत्रीसाठी एखादी कविता ऐकव मग........मालगावे मॅडम.

हो नक्कीच.......स्नेहा......

स्नेहा रेवाचा हात हातात घेते..........रेवा हे खास तुझ्यासाठी......

आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

कधी हसणारी, कधी रुसणारी, कधी भांडणारी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

कधी चुकले तर हक्काने रागवणारी

कधी रुसले तर हसुन बोलणारी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

मैत्रिच्या नात्याने साथ दयावी

आपुलकीच्या नात्याने हाक दयावी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

प्रेमाने टिकावी विश्वासाने जपावी

हे मैत्रिचे नाते कायम बहरावी

पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी

आयुष्यात अशी एक मैत्रिण हवी

जी कायम सोबत रहावी

पण आयुष्याच्या वाटेवर ‍मैत्रिची साथ हवी

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all