बावरे मन...भाग-14

बावरे मन..भाग 14 (थोडयावेळात मुलीचे फोटो व बायोडाटा पाठवतो बोलले आहेत....त्यातील बघुन सांगा म्हणा

बावरे मन..भाग 14

(थोडयावेळात मुलीचे फोटो व बायोडाटा पाठवतो बोलले आहेत....त्यातील बघुन सांगा म्हणालेत......माधवीताई

सगळे चहा घेत बोलत असतात.....तेवढयात माधवीताईच्या फोनवर गुरुजीनी पाठवलेले बायोडाटा व फोटो येतात......)

आता पुढे......

पाठवले बघा गुरुजींनी बायोडाटा व फोटो.........माधवीताई

हो बघु बघु........आध्या

हीची खुप गडबङ.....आनंदराव

मग असणारच......‍वहीनी शोधायची आहे........आध्या

सगळेजण फोटो बघत असतात.......ही असुदे का, ही नको....हे अस सगळ चालु असत.....त्यात आध्याची ही नको मला वहिनी..ही असुदे.....हे चालुच असत......

सुजय व आशुतोष त्याच्याकडे नुसत बघत बसलेले असतात......

ज्याच लग्न आहे त्याला तर फोटो दाखव की तुझ बघत आहेस सुजय आध्याला चिडवत म्हणला.....

ये गप्प रे दादया....दाखवते थांब की आधी मला तर बघु दे......आध्या

अस बोलल्यावर सगळे हसायला लागतात

आशु हे बग सगळे फोटो व बायोडाटा कोण चांगली वाटते बग तुला......माधवीताई

अग आई तु बग ठरव मला काहीच प्रॉब्लेम नाहीये......आशुतोष

अस कस तुला लग्न करायच आहे हे बग आणि सांग त्याच्या हातात मोबाईल देत माधवीताई

आशुतोष सगळे फोटो बघतो त्याला एक मुलगी आवडते...आई हा बायोडाटा बघ ही चांगली आहे ना मुलगी.....आशुतोष

बघु........मस्त आहे रे ही.....माधवीताई

ए आई मला ही दाखव ना.......आध्या

उदया गुरुजींना सांगुया ही मुलगी आपल्याला आवडली आहे त्याच्या घरी विचारुन सांगा....

सगळ झाल्यावर आध्या आशुला चिडवु लागते....

गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.....आध्या

आता ही जास्तच चिडवेल म्हणुन आशु उठुन त्याच्या रुममध्ये जातो

ए दादु तु लाजलास की काय.......तसे सगळे हासायला लागले....

सुजय तु बघितलाच नाहीस....हे धर... बघ....माधवीताई

सुजय बघणार तोपर्यत सुजयचा फोन वाजतो......आई नंतर बघतो मी...सरांचा फोन आहे..

बर उदया जायच आहे माझ्या मित्राच्या घरी लक्षात आहे ना.......आनंदराव..

हो हो आहे लक्षात बाबा.......आध्या

दुसऱ्या दिवशी रेवा लवकर उठते........सगळी साफ सफाई करते....हॉल मस्त आवरुन ठेवते..व त्यानंतर आईला स्वंयपाक करायला मदत करते.....

सुजयच्या घरचे ही सगळे जायची तयारी करत असतात........

अहो आवरल की नाही अजुन.....आध्या सुजय आशु झाल की नाही अजुन....माधवीताई

हो हो आवरल आमच.......अस म्हणत सगळे हॉलमध्ये येतात

काल आणलेली मिठाई घेतलीस ना.....आनंदराव

हो हो सगळ घेतलेय....निघायच का........माधवीताई

हो चला निघुया.......आनंदराव

रेवा आवरल की नाही आजुन... ते केव्हा पण येतील.....रमाकांतराव

हो बाबा  आवरल आमच....रेवा व मालतीताई आवरुन बाहेर येतात.......

सगळे त्यांचीच वाट बघत असतात.....

थोडयावेळात सुजय व त्याची फॅमिली येते.... सुजय आजुबाजुला बघतो......अरे आपण तर इथे आलोय आधी.......हे मिस देसाईंच घर आहे.......म्हणजे तिचे बाबा व माझे बाबा फ्रेन्ड आहेत........?

सुजय मनातच विचार करत गाडी पार्क करण्यासाठी जातो......तेवढयात बाकिचे सगळे आत जातात....

ये आनंद या वहिनी...या बाळानो.......रमाकांतराव त्याच स्वागत करतात......

मालतीताई व रेवा सगळयांसाठी पाणी घेवुन येतात...

रमाकांतराव मालतीताई रेवा व आकाशची ओळख करुन देतात.......

आनंदरावही सगळयांची ओळख करुन देतात......अरे आनंद तु तर बोलला होतास की तुला दोन मुले आहेत व एक मुलगी....मग दुसरा मुलगा आला नाही का....

अरे आलाय गाडी पार्क करत आहे........हा बग आलाच.....हा माझा लहान मुलगा......तसे सगळे मागे बघतात....

तुम्ही.........? रेवा शॉक होवुनच बघत राहते........

रेवा काय झाल बाळ....तु ओळखतेस काय सुजय ला........आनंदराव..

हो काका हे माझे सर आहेत.......रेवा

म्हणजे तुम्ही एकत्र काम करता.....रमाकांत राव

हो बाबा....रेवा

मालतीताई रेवाच्या शेजारीच उभ्या असतात....त्या हळुच हाच का तो खडुस.....हासत विचारतात.....

रेवा हाळु आवाजात.....गप्प ग आई....

रेवाला काहीच सुचत नसत.....हा बाबाच्या मित्राचा मुलगा आहे ह्याचा विश्वास बसत नव्हता.....

सुजय आत येतो......आनंदराव त्याला सगळ्याशी ओळख करुन देतात.....

थोडावेळ अशाच गप्पा चालु राहतात.......रेवाच लक्ष सुजयकडेच होत....सुजय ही रेवाच्या नकळत तिच्याकडे बघत होता....

आता जेवुया का...जेवत जेवत गप्पा मारुया......मालतीताई

हो हो चालेल तुम्ही जेवणाची तयारी करा.....रमाकांतराव मालतीताई व रेवाला सांगतात..

रेवा व मालतीताई सगळयांना जेवायला वाढतात...सगळे जेवण करायला बसतात.....रेवा खुप आपुलकीने सगळयांना काय हव नको ते बघत होती...

थोडावेळात सगळयांची जेवणं आटपतात.....रमाकांतराव सगळयांना‍ घर दाखवतात....बघता बघता कधी वेळ जातो कळतच नाही.......संध्याकाळी सगळे घरी जायला निघातात.....निघताना आनंदराव व माधवीताई तुम्ही ही आमच्या घरी या म्हणुन सांगुन जातात......

घरी पोहचल्यावर माधवीताई त्याच्या विषयच बोलत असतात....छान माणस आहेत....वगेरे.....

सुजय तु काही बोलला नाहीस....की रेवा तुझ्यासोबत काम करते.....माधवीताई

अग आई मला तर कुठे माहीत होत..तिथे गेल्यावर कळल मला.....सूजय..

पण छान आहे ना मुलगी.....कीती छान बोलत होती....सगळयांना हव नको बघत होती.....माधवीताई

हो ना....आनंदराव

हो ग आई तशी ती चांगली आहे........सुजय

हो का दादया....मला ही आवडली रेवा...किती छान बोलत होती माझ्याशी.....आध्या

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे दोघे ही बॅकेत येतात.........

रेवा आल्यावर पहिला स्नेहा जवळ जाते......

काय ग आज आल्या आल्या माझ्याकडे.......स्नेहा.

अग ऐक तर......रेवा

हा बोल......स्नेहा

तुला काल मी बोललेले होते बग बाबाचे मित्र व त्यांची फॅमिली येणार आहे म्हणुन....ते दुसर कोण नसुन सरांचे बाबा होते......रेवा

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all