बरसल्या पावसाच्या सरी भाग 10 अंतिम

पहिल्यांदा एखाद्या मुली सोबत होतो मी अस, हात धरून फिरलो, खूप छान वाटत होत, तेव्हा ठरवल होत मी हिच्या सोबत राहीन मी कायम


बरसल्या पावसाच्या सरी भाग 10 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
........

लग्नासाठी जवळचा हॉल घेतलेला होता, लग्नाच्या दिवशी सकाळी सगळे लवकर तिकडे गेले, घरातून निघतांना रश्मी रडत होती, आई बाबा तिला समजावत होते

जरा वेळाने मनीषच्या घरचे आले, त्यांचे स्वागत झाल, सगळीकडे आनंदाच वातावरण होतं, आत मध्ये रश्मी तयार होत होती, मनात खूप धाक धूक होती, इतके दिवस आई बाबां सोबत होती मी, अचानक नवीन घर, नवीन लोक, कस काय होणार आहे समजत नाही, पण मनीष चांगला असल्यामुळे टेंशन कमी वाटत होत ,

मनीष तयार होऊन वरातीला गेला, सकाळ पासून रश्मी दिसली नाही, कुठे आहे ही? , तयार होत असेल ती, पण तरी एकदा येवून भेटाव ना तिने मला, कधी बघु अस झाल आहे तिला

लाल रंगाच्या शालू मध्ये रश्मी खूप छान दिसत होती, सुंदर दागिने घालून तयार होती ती, वरात आली देवळात जाऊन, रश्मीला खाली बोलवलं, ती जावून स्टेज वर उभी राहिली अंतरपाटच्या त्या बाजूला मनीष होता, सगळ अगदी स्वप्नं वत सुरू होत,

मंगलाष्टक झाले, अंतरपाट दूर झाला, दोघांनी एकमेकांना हार घातले, खूप सुंदर दिसते आहे रश्मी, मनीष तिच्या कडे बघत होता, लाजली होती ती खूप, खाली बघत होती, आजूबाजूला लोक आहेत याचा विसर पडला होता मनीषला, तो फक्त रश्मी कडे लक्ष देत होता, ती सोबत आहे अजून काय हवय खूप एन्जॉय करत होता तो,

खूप भारावून गेले होते घरचे, पुढचे पूजा विधी लगेच सुरु झाले, मनीष रश्मी एकदम एकमेकात रमले होते, लग्न एन्जॉय करत होते, रश्मी वारंवार देवाचे आभार मानत होती,

जंगलातले बाबा आजी दोघे आले होते लग्नाला, खूप खुश होते ते,.. "तेव्हा तर अनोळखी होते ना तुम्ही दोघ? मग एकदम लग्न कस झाल?",

"प्रेम प्रकरण आहे हे बाबा, सांगू तुम्हाला नंतर, आम्ही येणार आहोत तुमच्या कडे" ,.. मनीष

काय हे मनीष,... रश्मी हसत होती

बाबा आजी हसत होते या जरूर या आमच्या कडे ,

खूप कॉलेजचे मुल मुली आलेले होते, धमाल सुरु होती त्यांची, रश्मीच्या मैत्रिणी मनीषच्या मागे होत्या बूट चोरायला, मनीषचे मित्र थांग पत्ता लागु देत नव्हते कुठे ठेवले बूट ते,

आई बाबा, मनीषच्या आई लग्न सोहळा छान बसुन बघत होते, मोजके लोक होते त्या मुळे धावपळ थोडी कमी होती, हे अस बर आहे शांत पणे आयुष्यातील महत्वाचा गोष्टी कडे लक्ष देता येत,

पूजा झाली, मनीष रश्मी उठले, मित्रांनी बूट आणून दिले मनीषने ते घालण्या आधी मुलीनी ते पळवले, खूप गोंधळ झाला

बूट वापस करा

"नाही आम्हाला द्या आधी काहीतरी",.. नेहा

"नेहा दे बूट",.. रश्मी

"चूप ग तू रश्मी.. पार्टी बदलू",.. नेहा

"हो नाही करता करता 5001 देवून बूट सोडवले",..

सगळे जेवायला बसले, तिथे मुली मनीष रश्मीच्या सोबत होत्या, एकमेकाला घास खाऊ घाला,

" मनीष भाऊजी तयार आहेत, नुसता घास काय पूर्ण जेवण भरवतील ते रश्मीला, हो ना भाऊजी" ,.. वहिनी छान नाव घेत होती दोघांच, सगळे हसत होते

सगळे कार्यक्रम झाले होते, पाठवणीची वेळ झाली, आई बाबा गप्प बसले होते, शरदाच्या आई आजूबाजूला होत्या, सगळ्या पूजा झाल्या होत्या, रश्मी रडवेली झाली होती, बाहेर गाडीत सगळ सामान भरल जात होत,

" चला आम्हाला निघावे लागेल, तुम्ही रश्मीची काळजी करू नका, जेव्हा भेटावस वाटल तेव्हा जरूर या, उद्या ही या तिकडे पूजा आहे",..

हो येवू आम्ही..

रश्मी येवून आई बाबांना भेटली,.. "बाबा आई मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय, मला नाही जायच तिकडे",

"अस करता का बेटा मनीष सारखा समजूतदार मुलगा तुला जोडीदार म्हणून मिळाला, जा बेटा सुखी रहा खूप",.. मनीष आले ते आई बाबांना समजवत होते,

" नेहा आई बाबा कडे लक्ष दे" ,... रश्मी

रडू नका यार तुम्ही नेहा रश्मी, कॉलेज मध्ये भेट होईल तुमची, दोघी हसल्या,

" तिकडे काय होत ते सांग नंतर",.. नेहा हळूच रश्मी च्या कानात बोलली,

" गप्प ग",.. रश्मी हसत होती आता

सगळे निघाले, बस केली होती त्यांनी, रश्मी मनीष बस मध्ये येवून बसले, रश्मी खूप शांत होती, वहिनी मनीष बाकीचे तिची समजूत काढत होते, जास्त पाहुणे नव्हते सोबत बरेचसे आजुबाजुला राहणारे होते, ते घरी गेले, वहिनीने रश्मी मनीषच स्वागत केल,

खूप छान घर होत त्यांच बंगला होता, खाली किचन एक बेडरूम हॉल होता, वरती दोन बेडरूम होते, प्रसन्न वाटत होत, दोघांनी आत जावून देव पूजा केली, रश्मीला सुचत नव्हत काही ती एका बाजूला बसलेली होती, मनीष पुढे हॉल मध्ये बसला होता, जेवण झाल ती वहिनी सोबत होती, सोनू छान होता छोटासा,

सकाळी पूजा होती, रश्मी तयार होती छान हिरवी साडी नेसून मस्त दिसत होती, घरातले सगळे रश्मी कडे बघत होते, या दोघांची नजर काढा आधी,

रश्मी चे आई बाबा आले होते पूजा झाली त्या नंतर देवाला जावून आले ते, लगेच रश्मी माहेरी आली,

"आपल्या घरी किती छान वाटतं आहे ना आई, मला तिकडे नाही करमत",.. रश्मी

"असंच होतं बेटा सुरुवातीला जरा जड दुसरीकडे, नाही करमत, नंतर तुला इकडे करमणार नाही, तुझ्याच घरी आवडेल, काळजी करायची नाही बेटा, मनापासून रहा तिकडे, देवाच्या कृपेने चांगले माणसे मिळाले आहेत",..

रश्मीने ठरवलं मी खूप व्यवस्थित राहीन तिकडे, मनीष आणि मनीष च्या घरच्यांची काळजी घेईन

दुपारून रश्मीच्या मैत्रिणी आल्या होत्या भेटायला, खूप चिडवा चिडवी सुरू होती,.. काय झालं रश्मी तिकडे सांग ना

" अरे अजून एकच दिवस गेली होती मी सासरी, लगेच काय सांगणार",.. रश्मी

"हो ग ती पुढच्यावेळी आल्यावर विचारा तिला",.. नेहा चिडवत होती, रश्मी लाजली

आई-बाबांबरोबर तिने खूप छान आरामात वेळ घालवला, दुसऱ्या दिवशी सकाळी दादा वहिनी तिला घ्यायला आले होते, त्यांचा चहा नाश्ता झाला, रश्मीने राहिलेलं सामान घेतलं, आई-बाबांचा निरोप घेतला, डोळ्यात तिच्या पाणी होतं, गाडीत सोनू तिच्या जवळच होता, त्याच्याशी बोलल्यामुळे बराच वेळ गेला,

ते घरी आले, मनीष तिची वाट बघत होता, मनीष कडे बघून तिला पहिल्यांदा धडधड झालं, रश्मी जिकडे जाईल तिकडे मनीष मागे मागे होता

"काय भाऊजी आता बरं वाटत आहे ना तुम्हाला? तुमची बायको आली घरी, कालपासून नीट जेवले नव्हते हे, आता बघा बरोबर किचन मध्ये आले रश्मी च्या मागे , भूक लागली आहे का?",..

" असं काही नाही आहे वहिनी",.. मनीष खूप हसत होता, तो बाहेर जाऊन बसला

रश्मी घरात मदत करत होती, स्वयंपाक झाला होता, सगळ्यांना वाढवून दिला तिने, दादा आणि वहिनीने गिफ्ट म्हणून हनिमून पॅकेज दिल,

"फिरायला निघा आता उद्याच, जर लग्न झाल्यावर लगेच फिरायला गेलं नाही तर नंतर काही जमत नाही, छान सोबत वेळ घालवा मस्त",.. वहिनी

मनीष रश्मी लाजले होते

रात्री वहिनींनी रश्मीला आत रूम मध्ये नेल, खूप सुंदर रूम सजवली होती त्यांची, रश्मीला सुचत नव्हत काय करू,

"बस इथे रश्मी, काळजी करू नकोस, छान नवीन आयुष्याला सुरुवात कर, तुझ्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार मिळाला आहे तुला",.. वहिनी

मनीष आत आला, सजवलेली रूम बघून तो आश्चर्यचकित झाला, वहिनी रश्मी बोलत होत्या, "भाऊजी तुम्ही वाट बघत होते ना कधी आत जावू अस" ,

"वहिनी अहो मी माझ्या रूम मध्ये आलो होतो हे सगळ कोणी केल, मला माहिती नव्हत ",.. मनीष

" किती नाटकं मनातून खूप आनंद झाला असेल तुम्हाला" ,... वहिनी

"चला मी निघते, छान रहा सोबत तुम्ही, माझी बाजूची रूम आहे काही लागल तर सांग रश्मी",.. वहिनी बाहेर गेल्या,

रश्मी उभी होती, मनीष तिच्या कडे बघत होता, त्याने जावून दार बंद केल, तो रश्मी जवळ आला, रश्मीला मिठीत घेतल, आजचा दिवस आपल्या आयुष्यात येईल अस वाटल नव्हत मला, जंगलात तू जेव्हा नकार दिला तेव्हा काय झालं होत माझ, आज तू माझ्या सोबत आहेस रश्मी, माझ खूप प्रेम आहे तुझ्या वर, काय झाल गप्प का इतकी तू, घाबरलीस का? , मोकळ रहा, बोल छान माझ्याशी, दोन दिवस शेजारी झोपलो आहोत आपण तिकडे बाबांकडे, जंटलमन आहे मी,

"हो माहिती आहे मला तू किती चांगला आहेस ते, काही प्रश्न नाही, मला काही सुचत नाही इकडे तुमच्या कडे आल्या पासून, गडबड होते माझी, कस काय अॅडजेस्ट होणार आहे मी समजत नाही" ,.. रश्मी

"बरं कॉलेजला सुट्टी आहे तोपर्यंत तू रमशील घरात, नंतर परत कॉलेज सुरू झालं की धावपळ होणार ",.. मनीष

" तुलाही सुट्ट्या आहेत का कॉलेजला ",.. रश्मी

" आम्हाला कसल्या आल्या सुट्ट्या, लग्नासाठी घेतल्या आहेत मी सुट्ट्या आपण उद्या जाऊ दोघेजण फिरायला चार दिवस फिरून येऊ मस्त ",.. मनीष

" हो चालेल",..

दोघ छान बोलत बसले होते,

" माझ्या जवळ येतेस का रश्मी?" ,.. मनीष

रश्मी लाजली,

" अरे अस कस चालेल, ये इकडे काय झालं सांग",.. मनीष

" काही नाही, मला सुचत नाही काही",.. रश्मी

" माझ्या वर सोपवून दे सगळ तू टेंशन घेऊ नको",.. मनीष

दुसर्‍या दिवशी सकाळी ते लवकर निघाले, छान जवळच ठिकाण होत फिरायच, हॉटेल वर पोहोचले, दोघ असल्याने रश्मी जरा मोकळी रहात होती, सुरेख वातावरण होत दुपारी आराम करून ते फिरायला निघाले,

" किती सुंदर आहे ना हा निसर्ग या ठिकाणी",.. रश्मी

" हो ना, तुला आवडत ना अस ठिकाण, शांत वातावरण ",.. मनीष

" हो खूप, गारवा हवाहवासा आहे हा" ,.. रश्मी

"आपण नेहमी येवू अस फिरायला",.. मनीष

"हो एकदा जंगलात जावू बाबां कडे",.. रश्मी

"हो त्या जंगलाचे आभार तिकडे भेटलो आपण",.. मनीष

"हो ना, तू जर त्या रात्री भेटला नसता तर काय केल असत मी दरीत ",.. रश्मी

"हो ना तुला चालता येत नव्हत, उचलून घेवून गेलो होतो तुला मी तेव्हा ",.. मनीष

" हो ना माझी खूप काळजी घेतली तू तेव्हा, काय विचार होता तुझ्या मनात माझ्या बद्दल ",.. रश्मी

" पहिल्यांदा एखाद्या मुली सोबत होतो मी अस, हात धरून फिरलो, खूप छान वाटत होत, तेव्हा ठरवल होत मी हिच्या सोबत राहीन मी कायम ",.. मनीष

" इच्छा शक्ती छान आहे तुझी आज आपण सोबत आहोत",.. रश्मी

" हो ती गोड मुलगी आज माझी बायको आहे, तू खुश आहेस ना रश्मी",.. मनीष

"हो... तु मनीष खुश आहेस ना ",.. रश्मी

"माझ खुश होण तुझ्या वर अवलंबून आहे रश्मी ",.. मनीष तिच्या कडे बघत होता

रश्मीला समजल मनीष काय म्हणतोय ते, ती त्याच्या मागे पळत होती,

" रश्मी आज येणार ना माझ्या जवळ? , अरे मारतेस काय, नवरा आहे मी तुझा, सोडणार नाही मी तुला ",.... मनीष

तू आणि मी आणि हा हवाहवासा एकांत
प्रेमाच्या गोष्टी करू घेवून हातात हात
खूप प्रिय मला तुझी साथ
तुझ्या शिवाय आता माझे अस्तित्व न उरले
बाकी काही नको आता तुझ्या शिवाय

🎭 Series Post

View all