बरसल्या पावसाच्या सरी भाग 8

मनीष आता पुढे काय ठरवल तुम्ही?, तुमच्या घरच्यांशी बोलून घ्या तुम्ही, लग्न लगेच करणार ना, तेच योग्य राहील, इकडे बघितल ना शरद चिडलेला आहे


बरसल्या पावसाच्या सरी भाग 8

©️®️शिल्पा सुतार
........

आई काळजी करत होती,.. " अहो काय होईल आता? जर समजा हा जॉब गेला तर कस करणार आपण? ",..

" होऊ दे जे व्हायचं ते, पण रश्मी सुखी नाही या लग्नात आपण बघतो आहे ना तो शरद कसा वागतो आहे रश्मी सोबत, आता आपल्या समोरच हे असं आहे तर एकदा लग्न झाल्यावर आपल्या हाताबाहेर जाईल ही गोष्ट, आपली एकुलती एक मुलगी आहे ती सुखी राहण जास्त महत्त्वाच आहे ",.. बाबा

" अहो पण कर्जाच काय? पुढचं आयुष्य कसं जाईल",.. आई

" गावाकडचं मोठी जमीन आहे आपली, त्यातल्या एका बाजूचं छोटा तुकडा आपण विकून टाकू, वर्ष दोन वर्ष तर घर चालेल आपलं त्यानं, त्यादरम्यान मी बघतोच आहे दुसरीकडे काम ",.. बाबा

" हो हे योग्य राहील",.. आई

रश्मीने मनीषला मेसेज केला

" बोल रश्मी.. बोलली का तू घरी, काय झालं? ",.. मनीष

" मनीष तुला उद्या संध्याकाळी बाबांनी भेटायला बोलवलं आहे",.. रश्मी

काय??

" हो मी आताच बोलली त्यांच्याशी",.. रश्मी

" काय म्हटले ते चिडले का? ",. मनीष

" नाही काहीच म्हटले नाही, उद्या तुला भेटल्यावर ते ठरवणार आहेत पुढे काय करायच ते",.. रश्मी

" म्हणजे उद्या माझी परिक्षा आहे तर",.. मनीष

" माझी ही",.. रश्मी

" हो आपली, काय विचारतील ते मला? , थोड तरी सांग रश्मी? ",.. मनीष

" काही नाही, बघतील ते कसा आहेस तू, बोलतील तुझ्याशी , माझे आई बाबा छान आहेत, तू घाबरू नकोस ",.. रश्मी

" कसा आहे मी मग",.. मनीष

" तू चांगला आहेस एवढ टेंशन घेवू नकोस ",.. रश्मी

" सासरी यायच म्हणजे घाबराव लागत, काय होईल माझ ",.. मनीष

"एवढ नाटक नको मनीष, चांगल होईल सगळ, मी आहे ",.. रश्मी हसत होती

"हे ठीक आहे, मग तू आहेस ते, मला तुझाच आधार होता जंगलात ",.. मनीष मुद्दाम रश्मीला चिडवत होता

दोघ बराच वेळ बोलत होते

दुसर्‍या दिवशी रश्मी नेहा कॉलेजला गेल्या,.." घरी सांगितल मी मनीष बद्दल, आज बाबांनी मनीषला घरी बोलावलं आहे",

" अरे वाह, चांगल डेअरींग केल, खूप मजा आहे एकीची",.. नेहा

"अग मग आमच्या कडे वेळ कमी आहे ना, मनीष तर येईल भेटायला, आई बाबांना आवडेल हि तो ते माहिती आहे, त्या नंतर काय होईल समजत नाही, शरद प्रचंड चिडेल, तो काहीही करू शकतो",.. रश्मी

"काळजी करू नकोस, आता तुझ्या घरचे मनीष आहेत तुझ्या सोबत आणि कॉलेजला जातांना मी आहे सोबत",.. नेहा

"तू बॉडी बिल्डर आहेस का नेहा? ",.. रश्मी

"हो वेळ आली तर मी छान भांडू शकते, माझ्या वर विश्वास ठेव रश्मी ",.. नेहा

रश्मी फार हसत होती, चल लवकर कॉलेज सुरू होईल,

मनीष आज बिझी होता, तो भेटला नाही, रश्मी ही लवकर घरी आली, तिला आईला मदत करायची होती

संध्याकाळी रश्मी रेडी होती, काय करू काय नको अस झाल होत तिला, आई रश्मी कडे बघत होती, एकदम खुश आणि सुंदर दिसत होती ती, शरद येत होते तेव्हा कधीच रश्मी एवढी खुश असलेली त्यांनी बघितलेली नव्हती , चांगला दिसतो आहे मुलगा,

जरा वेळाने बाबा ऑफिस हुन घरी आले, त्यांनी बघितलं रश्मी एकदम रेडी होती, त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, ते आवरायला आत मध्ये आले, आई मागे आली,

" झाली का तयारी? पाहुणे येणार आहेत",.. बाबा

"हो, झाली आहे तयारी, माझी ही.. रश्मीची ही, केवढी वाट बघते आहे ती",.. दोघ हसत होते,

"मन गुंतल वाटत तीच",.. बाबा

"हो ना छान असेल मुलगा",.. आई

जरा वेळाने मनीष आला, खूपच चांगली वाटत होती त्याची पर्सनॅलिटी, वागण्या बोलण्यात एकदम छान, आल्या आल्या त्याने आई-बाबांच्या पाया पडल्या, अतिशय नम्र छान बोलत होता तो आई-बाबांशी..

"मी प्रोफेसर आहे कॉलेज मध्ये फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये, पण मी आणि रश्मी कॉलेज मध्ये कधी भेटलो नाही, आमची ओळख जंगलात झाली, खूप लागल होत तेव्हा रश्मी ला, थोडक्यात वाचली ती",..

"हो ना तुमची खूप मदत झाली तेव्हा",.. बाबा

"मला रश्मी शी लग्न करायच आहे, आम्ही दोघांनी एकमेकाना पसंत केल आहे ",... मनीष

" आमची काही हरकत नाही",.. बाबा

" मला माहिती आहे आई बाबा रश्मीच दुसरीकडे लग्न जमलं आहे, पण मी आणि रश्मीने सोबत राहायचं ठरवलं आहे, तुम्ही मदत करा आणि कुठल्या गोष्टीची काळजी करू नका, मी आहे, होईल सगळं व्यवस्थित, मला माहिती आहे आई-वडिलांना मुलीच्या सुखाची जास्त काळजी असते, रश्मीला कधीच त्रास होणार नाही आमच्याकडे",.. मनीष

" कोण कोण आहे तुमच्याकडे? ",.. बाबा

" माझी आई, माझा भाऊ वहिनी, त्यांचा एक मुलगा, भाऊ शहरात असतो, इथे आई माझ्याकडे असते, मधून मधून ती भावाकडे जाते",.. मनीष

" त्यांनाही घेऊन या आमच्याकडे",.. बाबा

" मनीषला समजलं यांचा होकार दिसतो आहे ",..

चहा पाणी झालं, ते बोलत असताना शरद आले, त्यांना बहुतेक माहिती पडलं असेल की घरी कोणीतरी आला आहे, रश्मी मनीष जवळ बसलेली होती, आई बाबा समोर बसलेले होते

" कोण आहे हा? ",.. शरद

बाबांनी ओळख करून दिली,.. हे मनीष आहेत

" कोण मनीष? ",.. शरद

" हे रश्मीचे मित्र आहेत ",.. बाबा

शरद रागाने रश्मीकडे बघत होता

रश्मीला आता काही फरक पडत नव्हता, शरदला राग आला तरी , तिच्यासोबत मनीष होता,

"रश्मी उठ इथून आत मध्ये जा",.. शरद

रश्मी उठली नाही

" काय म्हणतो आहे मी? ",.. शरद

तरी रश्मी उठली नाही, शरद रश्मीकडे आला, तो तिचा हात धरणार तेवढ्यात मनीष मध्ये पडला

" कोण आहात तुम्ही? तुमचा काही संबंध नाही, आमच्यामध्ये पडू नका, रश्मी उठ ",.. शरद

"तुम्ही कोण आहात अस रश्मीला नेहमी त्रास देणारे? काही बोलण्याची पद्धत आहे की नाही तुम्हाला, लांब थांबायच रश्मी पासून ",.. मनीष

"मी रश्मीचा नवरा आहे",.. शरद

"होणारा नवरा, लग्न अजून झाल नाही ना ",.. मनीष

शरद बाबांना विचारत होता,.." काय प्रकार आहे हा, का बोलतो हा मुलगा माझ्याशी अस, रश्मी कोणाला घरी बोलवलं? ",.

" रश्मी आणि मनीषने सोबत राहायचं ठरवलं आहे, ते एकमेकांना पसंत करतात ",.. बाबा

शरद प्रचंड चिडला होता, मला माहितीच होतं ही मुलगी असाच प्रकार करणार आहे,जंगलात हाच भेटला होता ना रश्मी ला, तरी दोन दिवस गायब होती ही, याच्या सोबत असेल तेव्हा , मला हे अजिबात चालणार नाही रश्मी , तो रश्मीच्या अंगावर धावून गेला, मनीष मध्ये आला, त्याने शरदला बाजूला ढकलून दिला, शरद उठून उभा राहिला,

"रश्मी.. आई आत मध्ये बसा, या मुलाला अजिबात वागण्याची पद्धत नाही ",.. मनीष

त्या दोघी आत चालल्या गेल्या,

"हे बघा शरद तुम्ही जरा शांतपणे खुर्चीवर बसा",... बाबांनी फोन करून शरदच्या घरच्यांना बोलवून घेतलं, तोपर्यंत मनीष शरद समोर बसलेला होता, मनीष एवढा कॉन्फिडंट होता त्याच्या समोर शरद गप्प बसला होता,

" आई मला खूप भीती वाटते ग शरद ची, उगाच मारामाऱ्या होतील",.. रश्मी

" काही होणार नाही अस, बर झाल ते आत्ताच इथे आले, नाहीतर परत त्यांना जावून सगळ सांगाव लागल असत, आज ठरेल नक्की काय होतय ते, तू काळजी करू नकोस, सगळे आहेत मी तुझे बाबा आणि मेन म्हणजे मनीष आहेत , कोणी तुला काही होवू देणार नाही",.. आई

जरा वेळाने शरदचे आई बाबा आले,

रश्मीचे बाबा त्यांना मनीष आणि रश्मी बद्दल सांगत होते, आमच्या रश्मीचा शरद बरोबर लग्नासाठी मन नाही आणि शरदची वागणूक बरोबर नाही रश्मी सोबत, रोज बोलतात ते तिला, संशय घेतात, अपशब्द वापरतात, हात उचलतात तिच्या वर, आम्हाला चालणार नाही हे, मागे ही मी बोललो होतो तुम्हाला, हे लग्न आता होणार नाही,

"काय केलं आहे मी स्पष्ट सांगा, तुमची मुलगी बाहेर फिरते या मुलासोबत , तुम्ही माझ्या वर नाव घेतात",.. शरद

"शरद तू जरा गप्प बस, आम्ही बोलतो आहोत ना",.. शरदचे बाबा बोलले,

शरद रागारागाने सगळीकडे बघत होता,

"रश्मी कुठे आहे तिला बोलवा",..

रश्मी बाहेर आली, मनीष जवळ बसली,

"काय झाला आहे बेटा? काही अडचण आहे का?, शरद काही बोलला का तुला ? ",.. शरद चे बाबा

" मला मनीष सोबत राहायचं आहे, मला शरद शी लग्न करायचं नाही, आमच पटत नाही, नेहमी दहशत असते शरदची, नीट वागत नाही ते माझ्या शी",.. रश्मी

"मग हे तू आधी सांगायला पाहिजे होतं ना, आता लग्न जमलं, सगळीकडे समजल, त्रास होईल आम्हाला या गोष्टीचा ",..

" पण मला आधी मनीष भेटले नव्हते, आता एवढ्यातच ते भेटले, आमचे मन जुळले, तेव्हा मला समजल चांगले लोक कसे असतात, ते मला समजून घेतात, आम्हाला एकमेकां सोबत राहायचं आहे",.. रश्मी

" काही हरकत नाही",..

" अशी कशी काही हरकत नाही, मला हरकत आहे मला रश्मी सोबतच लग्न करायचं आहे, तस ठरलं होत ना आपल ",.. शरद परत रश्मी कडे येत होता,

" तू अशी तिला बळजबरी नाही करू शकत, ती सज्ञान आहे, ती वाटते त्या मुलासोबत लग्न करू शकते, अजून आपलं काही बोलण झालं नव्हत, साखरपुडा नाही, काही ठरलं नाही, नसेल तिचं मन, जाऊ दे, तू तुझी वागणूक चांगली ठेवायला हवी होती, व्यवस्थित वागला असता रश्मी शी, तीने तुझा सोडून कधी दुसर्‍याचा विचार केला नसता, आता वेळ गेली आहे हातची शरद ",..

हा धक्का शरद साठी खूप मोठा होता, तो राग रागाने चालला गेला,

" चला आम्ही पण येतो",..

"काही चुकलं असेल तर माफ करा ",.. बाबा

" नाही उलट त्या दोघांचं पटत नाही तर सोबत राहण्यात काही अर्थ नाही, अजून लग्न झालं नाही, नंतर मोठा प्रॉब्लेम झाला असता, उद्या तुम्ही या ऑफिसमध्ये मग आपण बोलू",.. शरद चे बाबा

" तुम्हाला चालणार आहे ना मी ऑफिसला आलेलं",.. बाबा

" हो मग काय झालं आहे? तुम्हाला नोकरी सोडायची आहे का?,"...

"नाही पण मला वाटलं रश्मीने लग्न कॅन्सल केलं तर तुम्ही मला नोकरीवर ठेवणार नाही",.. बाबा

" नाही त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तुमच्यामुळे आमच्या कंपनीला खूप फायदा आहे, तुमचं काम प्रमाणिक आहे आणि तुमची पण व्यवसायात भागीदारी आहे त्यामुळे काम काढून घ्यायचं प्रश्नच येत नाही",..

शरदच्या घरचे निघून गेले, रश्मी मनीष रश्मी चे आई बाबा खूप खुश होते, शरद च्या घरचे खूप समजूतदार आहेत,

"मनीष मला भिती वाटते नक्की शरद काही तरी करेल",..रश्मी

" तू घाबरू नकोस रश्मी, काहीही होणार नाही",.. मनीष चा मित्र पोलिस इन्स्पेक्टर होता, त्यांनी थोडे दिवस संरक्षण द्यायच कबुल केल..

" मनीष आता पुढे काय ठरवल तुम्ही?, तुमच्या घरच्यांशी बोलून घ्या तुम्ही, लग्न लगेच करणार ना, तेच योग्य राहील, इकडे बघितल ना शरद चिडलेला आहे " ,.. बाबा

"हो आई दादा वहिनी यांना सांगतो मी, रश्मी म्हणेल तस सोई नुसार तारीख काढू आपण ",.. मनीष

" ठीक आहे, या रविवारी या तुम्ही सगळे आमच्या कडे मग ठरवू पुढे काय करायच ते ",.. बाबा

हो..

" मी निघतो आता ",.. मनीष

" नीट जा मनीष घरी गेल की फोन कर मला शरदची भीती वाटते ",.. रश्मी

" काही करणार नाही तो, मी पुरून उरेल त्याला ",.. मनीष

" चिडका आहे तो, बदला घेतो ",.. रश्मी

"तुझ्या समोर जोर करत होता तो, काही दम नाही त्याच्यात, साध नीट वागता येत नाही त्याला, काय माणूस आहे तो शरद ",.. मनीष

मनीष गेला, व्यवस्थित घरी पोहोचला, रश्मी काळजीत होती, आता तिला बर वाटत होत, आई बाबा खुशीत होते, खूप चांगला मुलगा आहे मनीष, आता त्यांना रश्मी ची काळजी नव्हती...


🎭 Series Post

View all