बरसल्या पावसाच्या सरी भाग 7

बाबा तुम्ही शरद च्या बाबांशी बोलून बघा ना, त्यांना सांगून बघा की रश्मीचं मन नाही या लग्नात, ते काका चांगले आहेत,


बरसल्या पावसाच्या सरी भाग 7

©️®️शिल्पा सुतार
........

दोन तीन दिवस झाले, आता जरा बर वाटत होत रश्मीला, औषधा मुळे पायही बऱ्यापैकी बरा होता, तिने जंगलात भेटलेल्या बाबांना फोन केला.. बाबांशी तिने बोलून घेतलं, रश्मीच्या बाबांनी ही त्या बाबांशी बोलून त्यांचे आभार मानले

मनीष रोज कॉलेजला येत होता, रश्मीच्या पायाला अजून प्लास्टर होत, ती घरी होती, नेहा रोज भेटत होती त्याला ,

"समजवून सांग रश्मी ला नेहा",.. मनीष

"हो रोज तेच करते मी तिला ही करायच आहे लग्न तुमच्याशी, पण बोलेल ती घरी मग सांगेन",.. नेहा

त्याला रश्मीची खूप आठवण येत होती, तिकडे जंगलात माझ्याशी किती व्यवस्थित बोलत होती रश्मी, माझं मन खूप सांभाळत होती ती, किती खुश होतो आम्ही, होईल ना ठीक सगळ?, काळजी वाटते आहे , एकदा रश्मी कॉलेजला आली की समजेल नीट काय सुरु आहे ते , बोलेन मी तिच्याशी

"उद्या रश्मी ला घेवून हॉस्पिटल मध्ये जायच आहे",.. आई

"हो जावू आपण",.. बाबा

आई बाबा रश्मी हॉस्पिटलला गेले, तिकडे तिचं प्लास्टर खोलून एक्स-रे केला, पाय व्यवस्थित होता,

पायावर खूप जोर देऊ नका, खूप वेळ उभ राहू नका, व्यवस्थित पाय सांभाळा,.. अस डॉक्टरांनी सांगितलं, बरेच दिवसांनी प्लास्टर मधला पाय मोकळा झाल्यामुळे रश्मीला आता खूप बरं वाटत होतं

" बाबा मी उद्यापासून कॉलेजला जाऊ का? ",.. रश्मी

" हो जाना बेटा, काय प्रॉब्लेम आहे",.. बाबा

"आई बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही पण त्या दिवशी शरद नाही म्हटले मला कॉलेजला जायला, पण मी ऐकणार नाही, मला कॉलेजला जायचं आहे",.. रश्मी

"तू बिंदास जा कॉलेजला, काय होतं ते बघू आपण, टेन्शन नको घेऊ ",.. बाबा

" घरी आल्यावर रश्मीने लगेच नेहाला फोन केला की मी उद्या कॉलेजला येत आहे मला बोलवायला ये ",..

नेहाला खूप आनंद झाला,

रश्मीने मनीषला मेसेज केला उद्या भेटू आपण, खूप खुशीत होती ती , बर्‍याच दिवसांनी कॉलेजला जाणार होती ती, त्यात मनीष भेटणार,

सगळे जेवायला बसले,

" बाबा मला तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची आहे, जर तुमचं हे काम नसलं तर तुम्ही कुठलं काम कराल",.. रश्मी

"काय झालं बेटा? असं का विचारते आहेस तू?",.. बाबा

"नाही बाबा जर तुमचं हे काम गेल केलं तर तुम्ही काय कराल? , कितपत त्रास होईल आपल्याला? ",... रश्मी

" काही त्रास नाही होणार बेटा, दुसरा जॉब बघेल मी काही प्रॉब्लेम नाही, काही झाल आहे का? ",.. बाबा

" नाही अस सहज विचारल ",.. रश्मी

रात्री शरदचा फोन आला,.." काढल का प्लास्टर? कसा आहे पाय? ",.

"ठीक आहे आता",.. रश्मी

" मी उद्या कॉलेज ला जाते आहे",..

शरद काही म्हटला नाही

रश्मी सकाळी लवकर तयार झाली, चहा सुद्धा नीट घेतला नाही तिने

" अग हो काय घाई आहे एवढी रश्मी? काय मुलगी आहे ही? , खूप वेळ उभ राहू नकोस, रिक्षा ने जा आणि ये",.. आई खूप सूचना देत होती,.. नेहा हिच्या कडे लक्ष दे ग

हो काकू..नेहा हसत होती

दोघी कॉलेज मध्ये आल्या, गेट मधुन रश्मी बघत होती सायन्स ची बिल्डिंग कुठे आहे? ,

"काय झालं आहे रश्मी? तू आतच जाते का सायन्स बिल्डींग मध्ये मनीष ला भेटायला ",.. नेहा

" नाही चल आत तू खूप बोलते नेहा ",.. रश्मी

" तुला काय वाटतं तुझे आई बाबा काय म्हणतील मनीष साठी होकार देतील का ?",.. नेहा

" नाही माहिती पण बाबांच्या कामाचं काय होईल असं सारखा मला विचार येतो, म्हणून मी पाऊल मागे घेत होते, पण बाबा बोलले ते दुसर काम बघतील ",.. रश्मी

" म्हणजे ग्रीन सिग्नल आहे तर घरच्यांचा",.. नेहा

पुरे नेहा..

लेक्चर झाल, मनीष कुठे असेल? काय करू जाऊन बघू का थोडं सायन्स बिल्डिंग मध्ये, नको पण मनीष ला मेसेज केला होता मी आज येते आहे, मग का नाही दिसला सकाळ पासून, किती बोर होतय अस, जावू दे इथे तो प्रोफेसर आहे त्याचे स्टुडन्ट ओळखत असतील त्याला, तो बिझी असेल, तिने तिचा फोन बघितला त्यावर हाय आलेलं होतं, हा तर मनीष चा मेसेज होता, रश्मी खुश होती

"तू कॉलेजला आली आहेस का आज? ",.. मनीष

हो.. रश्मीने पाठवलं

" मला भेटायला ये दहा मिनिट कॅन्टीन मध्ये",.. मनीष

" नेहा मनीष चा मेसेज आलेला आहे, कॅन्टीन मध्ये बोलवतो आहे तो, जाऊ का मी काय करू" ,.. रश्मी

"जा ना, चांगल्या लोकांसोबत राहत जा, आनंदी राहणं तुझा हक्क आहे, प्रॉब्लेम तर काय नेहमीच येत राहतात, होईल जसं व्हायचं आहे तसं, तुझ्या बाबांच्या नोकरीचा प्रश्न होता, ते बोलले आहे ना कि ते दुसरी नोकरी शोधतील, जा रश्मी जिले अपनी जिंदगी ",.. नेहा

" ठीक आहे मी आलीच दहा मिनिटात",.. रश्मी कॅन्टीन मध्ये गेली, कोपऱ्यातल्या टेबलवर मनीष बसलेला होता, व्हाइट शर्ट ब्लॅक पॅन्ट, एकदम वेगळा दिसत होता तो, सिरियस लूक, हुशार वाटत होता, रश्मी गेल्यावर तो उठून उभा राहिला, रश्मी नेहमीप्रमाणे खूप छान दिसत होती चुडीदार घातला होता तिने , दोघ गप्प होते, एकमेकांना बघत होते

" रश्मी कशी आहे तब्येत? पाय ठीक आहे का आता? डॉक्टर काय म्हटले? ",.. मनीष

रश्मी सगळं सांगत होती, तिला मनीष शी बोलताना खरच खूप छान वाटत होत,

"मला माफ कर रश्मी, मी तुला त्या दिवशी तसा सोडून गेलो, तुला माहिती नाही नंतर मला किती त्रास झाला या गोष्टीचा, मी येणार होतो तुला भेटायला, पण वाटल नको आधी बोलून बघु तुझ्याशी ",.. मनीष

" काही प्रॉब्लेम नाही, मला माहिती होत तुला त्या दिवशी अस वागताना त्रास झाला असेल, चांगले लोक असे असतात, आता भेटलो ना, काळजी करू नकोस, तुला कोणी बघितल तर अस माझ्याशी बोलतांना तर , तू प्रोफेसर आहेस ना इथे ",.. रश्मी

" प्रोफेसर ला ही मन असत, तो ही एक माणूस आहे, बघितल तर बघितल मला काही फरक पडत नाही ",.. मनीष

रश्मी हसत होती, छान दिसते आहे आज ही, पण मोकळ बोलत नाही काही

" काय चाललं आहे मग अजून रश्मी? माझा फोन नंबर मिळाला होता ना तुला ? तू मला नंतर मेसेज केला नाहीस, तुला माझ्याबद्दल काय वाटतं अजून सांगितलं नाही, मी समजायचं तरी काय? तुला माहिती आहे का मी किती विचार करतो आहे तुझा, मला तुझ्या सोबत राहायचं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नीट सांग मला",.. मनीष

" घरातून जास्त फोन वापरता येत नाही, घरी सांगितल नाही तुझ्या बद्दल",... रश्मी

" तुझा काय प्रोब्लेम आहे, नीट सांग ",.. मनीष

रश्मी शरद बद्दल सांगत होती,.." कस त्याच्या घरच्यांनी मदत केली, तिचे बाबा त्यांच्याकडे नोकरीला आहेत, कर्ज आहे डोक्यावर, त्यामुळे त्या लोकांनी रश्मीला मागणी घातल्यावर ते नाही म्हणू शकले नाही, आता जर लग्न मोडलं तर बाबांची नोकरी जाईल पुढे काय होईल त्यामुळे मला काही सुचत नाही त्यामुळे मी घरी ही काही सांगितले नाही",

" प्रश्न मोठा आहे हा, पण हे काय असं बिजनेस आणि नातं वेगळं ठेवायला पाहिजे होतं, इथे हे लोक इमोशनली ब्लेकमेल करता आहेत",.. मनीष

" शरद चिडका आहे, त्याच्या घरचे चांगले आहेत" ,.. रश्मी

"मग तू तुझ्या वडिलांना सांग ना की शरदच्या वडिलांशी बोलायला",.. मनीष

"काय बोलायला सांगू",.. रश्मी

" अरे हो तू मला अजून काही होकार दिला नाही, इथे आपलच फिक्स नाही तर काय बोलणार ना, सांग ना, रश्मी माझ्या सोबत लग्न करणार का, मी चांगला मुलगा आहे, मला स्वयंपाक येतो, तुझी सेवा करता येते, तुला उचलून फिरू शकतो मी, कविता करतो, लेखक आहे, तुला पावसाळी पिकनिक ला नेवू शकतो ",.. मनीष

रश्मी हसत होती, मनीष तिच्या कडे बघत होता, ती एकदम लाजली,

"माझ प्रेम आहे तुझ्या वर परत एकदा सांगतो, तुला राहायचं आहे का माझ्यासोबत",.. मनीष

" हो मला राहायचं आहे तुझ्यासोबत मनीष, पण मला घरच्यांनाही त्रास व्हायला नको आहे ",..रश्मी

मनीष हसत होता,..." तू म्हणशील तस होईल, तुझ्या बाबांना सांग की शरद च्या घरी सांगा रश्मीला दुसरा मुलगा पसंत आहे, तुम्हाला काही अडचण आहे का, त्यांना वाटलं तर ते ठेवतील तुझ्या बाबांना नोकरीवर, नाहीतर मला काही तुझे आई वडील जड नाही, करू आपण काहीतरी",

रश्मी मनीष कडे बघत होती, तिला खरच वाटत नव्हत, खरच आई बाबा राहू शकतात आपल्या सोबत, तिला मनीष विषयी खूप प्रेम आणि कौतुक वाटत होतं, एकदा फक्त ती शरद ला बोलली होती आई बाबा एकटे कसे राहतील पुढे तर केवढा चिडला होता तो, ते त्यांच त्यांच बघतील, आपली जबाबदारी नाही, अस बोलला होता तो,

" हो न, तुझे आई बाबा राहतील आपल्या सोबत त्यात न चालायला काय झालं, नाहीतरी तू तुझ्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे पुढे भविष्यात सांभाळणारच आहोत ना आपण त्यांना , मग आत्ता सांभाळलं तर कुठे बिघडल, करू आपण दोघं मिळून काहीतरी, सध्या तरी आपण दोघं सोबत असण महत्त्वाच आहे",... मनीष

चांगला मार्ग सापडला होता, त्यामुळे रश्मी आता खुश होती, मी आता घरी जाऊन आई बाबांशी आपल्याबद्दल बोलते, खूपच बरं वाटत होतं तिला आज

रस्ता भर नेहा सारख विचारत होती,.." काय बोलणं झालं मनीष सोबत सांग ना रश्मी ",

" मला मनीष सोबतच राहायचं आहे नेहा, आधी व्यवस्थित घरच्यांशी शी बोलावं लागेल" ,.. रश्मी

" शरद त्यांचं काय करणार आहे",.. नेहा

"तोच मोठा प्रश्न आहे, बघू आता आई बाबा काय म्हणता आहेत त्यांना अजून एकदाही मनीष बद्दल सांगितलं नाही त्यामुळे मला पण धडधड होते आहे, आज बोलणार आहे पण मी आई-बाबांशी",..

" हो बोलून घे त्यांना व्यवस्थित सांगितलेलं बरं",.. नेहा

रश्मी घरी आली आज ती खूपच खुश होती,.. "आई बाबा केव्हा येणार आहेत ऑफिसहुन",

" संध्याकाळी येतील ते काही काम होतं का? ",.. आई

" हो मला तुझ्या आणि बाबांशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे",.. रश्मी

" काय झालं आहे",.. आई

" नाही असं तुला एकटीला नाही तुम्हाला दोघांना मिळून सांगणार आहे",.. रश्मी

संध्याकाळी बाबा आले, आईने चहा ठेवला, रश्मी बाबां जवळ येऊन बसली,.." बाबा मला तुम्हाला आणि आईला काहीतरी सांगायचं आहे",..

" सांग ना बेटा ",.. बाबा

" आई इकडे ये, तुम्ही दोघ प्लीज शांततेत ऐकुन घ्या मी काय म्हणते ते , जंगलात मी जेव्हा दरीत पडली होती तेव्हा मला तिथे मनीष भेटला, त्याने खूप मदत केली मला दोन दिवस, खूपच काळजी घेतली माझी आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे, मला शरद शी लग्न करायचं नाही",.. रश्मी ने एका दमात सांगून टाकल

आई बाबा एकमेकांकडे बघत होते

"माझं आणि शरदचे अजिबात मत जुळत नाही, नेहमी नुसत बोलतात ते मला, जेवढा छान मला मनीष सोबत वाटत होतं तेवढं मला कधीच शरद सोबत कधीच वाटलं नाही, पण मला आता खूप काळजी वाटते आहे बाबा तुमची तुमचा जॉब शरदच्या बाबांसोबत आहे, काय करूया? मला सुचत नाही काही",.. रश्मी

" काय करतात मनीष? कुठे राहतात तू कधीपासून ओळखते त्यांना ",.. बाबा

" आत्ता जंगलातच ओळख झाली आमची, तो आमच्याच कॉलेजला फिजिक्सचा प्रोफेसर आहे, स्वभावाने खूप छान आहे, त्याच्या घरी आई आहे, मला त्याच्यासारखा जोडीदार हवा होता",.. रश्मी

" ठीक आहे तुझ्या मनाप्रमाणेच होईल सगळं ",.. बाबा

" पण बाबा तुमच्या जॉबच काय? ",.. रश्मी

" माहिती नाही मला काय होईल ते, शरदाच्या च्या घरी हे सांगावं लागेल त्याआधी मला एकदा मनीष ला भेटायचं आहे, मग आपण पुढचं बोलू, तर तू उद्या संध्याकाळी मनीष ला आपल्या घरी बोलवुन घे",.. बाबा

" हो चालेल बाबा, आई तुला काही अडचण नाही ना नाही",.. रश्मी

" बेटा तुझं सुख मला महत्त्वाचा आहे, त्यांच्या सोबत तुला राहायचं आहे तर आमची काही हरकत नाही ",.. आई

" बाबा तुम्ही शरद च्या बाबांशी बोलून बघा ना, त्यांना सांगून बघा की रश्मीचं मन नाही या लग्नात, ते काका चांगले आहेत, शरद सारखे चिडके नाहीत ते नक्कीच मदत करतील आपल्याला, त्यांना नाही राग येणार मला खात्री आहे ",.. रश्मी

रश्मीचे बाबा विचार करत होते,.. "मी उद्या मनीष शी बोलतो आणि त्यानंतरच आपण ठरवू काय करायचं आहे ते",

" पण तू आता हे कोणाशी बोलू नको उद्या रात्री ठरवू आपण काय करायचं ते आणि माझ्या जॉब ची काळजी करू नको होईल जसं व्हायचं तसं ",.. बाबा

" आई बाबा तुम्ही नाराज नाही ना",.. रश्मी

"नाही बेटा ठीक आहे, तू खुश रहायला हव एवढ वाटत आम्हाला",.. बाबा

रश्मी आत मध्ये अभ्यासाला चालली गेली..

🎭 Series Post

View all