बरसल्या पावसाच्या सरी भाग 6

चांगल आहे कोणी आवडत असेल तर, बघु तिला बोलू दे समोरून, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ती सुखी रहावी हीच इच्छा आहे आपली


बरसल्या पावसाच्या सरी भाग 6

©️®️शिल्पा सुतार
........

रश्मीचे आई-बाबा हॉस्पिटल कडे यायला निघाले, एक दोन तासाने आई-बाबा हॉस्पिटलला आले, रश्मी झोपलेली होती, त्या पेक्षा ती दुःखी होती, मनीष आज अजिबात बोलला नाही माझ्याशी, मला त्याच्या सोबत रहायच आहे, काय करू मी, एक एक अडचण आहे, काय गमावल मी माझ मला माहिती, मला माफ़ कर मनीष,

हॉस्पिटल मध्ये तिची लगेच ट्रीटमेंट सुरू झाली होती, एक्स-रे मध्ये हेअर लाईन फ्रॅक्चर सापडला होता, पायाला प्लॅस्टर केलं होतं, आई बाबा आले तसे रश्मी उठून बसली, आई-बाबांच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, आईने पुढे होऊन रश्मीला जवळ घेतलं,.. "कशी आहेस बेटा" ,..

रश्मी रडत होती,

थोड्या वेळाने डॉक्टरांनी रश्मीला घरी सोडल, बाकी तपासणी झाली होती, ठीक होती ती, दहा बारा दिवसांनी येवून दाखवा परत, औषध लिहून दिले,

ते घरी आले, थोडे दिवस विश्रांती होती रश्मीला, तिच्या मैत्रिणी, शेजारी सगळे भेटायला येत होते, काय झालं कस झाल सगळे विचारत होते, रश्मी खूप गप्प होती, मनीषचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता, परत कधी भेटेल मला मनीष? की कधीच नाही भेटणार , कस काय मी जगणार आहे त्याच्या शिवाय, कोणी तरी मदत करायला हवी मला,
.....

मनीष घरी आला, त्यांची आई वाट बघत होती,.. "तू जंगलात हरवला हे सांगितल तुझ्या मित्रांनी मनीष, काही लागल नाही ना तुला, जातोस कश्या ठिकाणी फिरायला",

"नाही आई मी ठीक आहे" ,.. मनीष

"आटोप जा आंघोळ करून ये, जेवण कर, झोप, थकलेला दिसतो आहेस तू",..

मनीष आवरत होता, रश्मी कडे आज मी बघितल ही नाही, किती वाईट वागलो तिच्याशी, तिच्या डोळ्यात पाणी होत, तिने हात पुढे केला होता माझ्या साठी आणि मी कसा वागलो, साध हॉस्पिटल पर्यंत सुध्दा गेलो नाही मी तिच्या सोबत, एवढ काय काम होत घरी, कधी कधी अश्या चुका करतो मी, का एवढा राग आला मला, मूर्ख पणा झाला, आता बघू का जावून, कुठे असेल पण रश्मी? , कशी असेल ती?,

तिने मला का नकार दिला असेल? , नाही होत हिम्मत मुलींची, लग्न जमलेल आहे तीच, अस कस अचानक ती घरच्यांना सांगेन की हा शरद नाही मनीष आवडतो मला , पण ती एकदा ही हो बोलली नाही मला, मी माझ्या मनाने बोलतो आहे हे, ती माझ्या आयुष्यात नसेल तर कोणत्याही गोष्टीला काही अर्थ नाही, पण तिच्या डोळ्यात दिसत होत मला माझ्या विषयी प्रेम , मला राग आलेला तिला सहन होत नव्हता, मी अस वागलो आता तर ती अजिबात बोलणार नाही माझ्याशी, काय करू मी, मनीष बैचैन झाला होता
.....

रश्मी झोपलेली होती, शरद आले तिला भेटायला , आईने रश्मीला उठवल, तिला कुठल्याही गोष्टीत इंट्रेस्ट वाटत नव्हता , शरद बाजूला येवून बसले, अजिबात बोलावसं वाटत नव्हत तिला त्यांच्याशी, बाकीचे बाहेर बसले होते

रश्मी उठून बसली

"कुठे होती दोन दिवस तू? , ते पाया कडे बघत होते, चांगल वाढवा करून घेतला आहेस , ऐकायच नाही ना तुला कोणाच, काय करणार, मी जे सांगतो ते बरोबर असत नेहमी , ठीक आहे आता बस घरात, काय झालं होत नेमक तिकडे जंगलात? कोणा कडे होती तू",.. शरद

" मी दरीत पाय घसरून पडली, तिकडे जंगलात एका बाबा होते त्यांच्या सोबत होती मी , पाऊस थांबल्या वर हॉस्पिटल मध्ये आली मी ",.. रश्मी

" ते सगळ्यांना सांगायला खरं काय झालं होतं? ",.. शरद

रश्मी गप्प बसली...

" बोल काय झालं होत? कोण होत सोबत? ",.. शरद

रश्मी दचकली,.. " कोणी नव्हती सोबत, मी आणि बाबा होते, खरंच मी पडली होती दरीत",.. रश्मी पायाकडे बघत होती

मनीष बद्दल सांगितलं तर माझ काही खर नाही, एक तर तो आमच्याच कॉलेजचा आहे, तो तिथे पहिल्यांदा भेटला अस सांगितल असत तरी ऐकल नसत शरद ने, यांचा संशय वाढला असता, किती फरक आहे मनीष मध्ये आणी शरद मध्ये, मनीष किती काळजी करत होता माझी , पण मला नको होत त्याच काळजी करण, मी नकार दिल एवढ्या चांगल्या मुलाला, आणि हे असे बोलणे खात बसली आहे इथे शरदचे, मला ही असच पाहिजे, मी मनीषच मन दुखावल ,

" हे जे तू पिकनिकला गेली होती आणि दोन दिवस गायब होतीस हे मला अजिबात आवडलेलं नाही रश्मी, तुला लागल म्हणून सोडल आज , यापुढे तुला कॉलेजलाही जाता येणार नाही, फक्त परीक्षेला जायचं आणि नंतर लग्नाला तयार व्हायचं आणि तिकडे जंगलात काय झालं याचा मी शोध लावूनच राहील",.. शरद रागाने निघून गेला, एकदा ही त्याने चौकशी केली नाही की कसं वाटतं आहे तुला रश्मी,

रश्मी नुसतीच बसलेली होती, काय करू सांगू का आई बाबांना की मला शरदशी लग्न नाही करायचं, मनीष शी लग्न करायचं आहे, पण जावू दे काही अर्थ नाही आता या गोष्टीला, मनीष ही रागावलेला आहे माझ्या वर, बाबांचा जॉब जाईल, बदनामी होईल,

जेवण झाल, कोणी काही बोलल नाही, चेहरा उतरलेला होता रश्मीचा, ती गोळ्या घेवून झोपली,

आई काळजीत बसलेली होती,.. "अहो आज शरद राव खूप चिडले होते रश्मी वर",..

"तुला कस माहिती",.. बाबा

"मी चहा द्यायला येत होती, तेव्हा ऐकल, काय कराव हो, मला अजिबात आवडल नाही हे, आपण आपल्या पोरीला कधी बोलत नाही ते मात्र दर वेळी बोलतात ",.. आई

"मी तोच विचार करतो आहे, काय कराव द्यावा का नकार, पण आता लगेच आपण आपल्या बाजूने नकार दिला तर ते आपल्या मुलीच्या चारित्र्य वर शिंतोडे उडवतील की ही गायब होती जंगलात कोणा तरी सोबत म्हणून लग्न मोडल, त्यांचा खराब स्वभाव झाकला जाईल",.. बाबा

" तुमच काम आहे त्यांच्या ऑफिस मधे",. आई

"हो बघु काय करायच ते ",.. बाबा

" किती कर्ज बाकी आहे दुसर काही नाही का करता येणार तुम्हाला काही ",.. आई

" हो सुरू आहे विचार ",.. बाबा

" आपण दोघ बोलू उद्या रश्मी शी, आधी तिची तब्येत ठीक नाही हा माणूस त्रास देतो, चुकी झाली स्थळ बघण्यात ",.. आई

दुसर्‍या दिवशी रश्मी उठली, आई बाबा विचारात होते काय झालं शरद काही बोलले का? ती काही बोलले नाही, जावू दे मला कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टीचा, जे आहे ते आहे आता , मला कधी बर वाटेल आई? परीक्षा जवळ आल्या आहेत, कॉलेज ला जायचा आहे, अभ्यास करावा लागेल

" डॉक्टरांनी बोलवलं आठ दहा दिवसांनी तेव्हा समजेल",.. आई

"आई माझी बॅग दे ना" ,.. रश्मी

रश्मीने डायरी बाहेर काढली, त्यात मनीष साठी तिने लिहिलेल्या ओळी होत्या काही , आई नव्हती आजूबाजूला, काय करू वाचू का, तिची हिम्मत झाली नाही, कोणी आल तर काय करू? , तिने डायरी नीट ठेवून दिली, ती झोपली..
.......

मनीष ला झोप येत नव्हती, तो विचार करत होता कोण करेल मला मदत, तिची कोणी मैत्रीण असेल ना कॉलेज मध्ये , त्या दिवशी काही बोलण झाल नाही अस, काय करू वर्गात जावून बघु का तिच्या
....

नेहा कॉलेज मध्ये आली, वर्गात एक सर रश्मी बद्द्ल विचारत होते, कोणी ओळखत का रश्मी ला?

"माझी मैत्रीण आहे रश्मी, काय झालं सर? ",.. नेहा

"एक मिनिट बाहेर येता का तुम्ही, मला बोलायच होत थोड",.. मनीष

नेहा बाहेर आली

"मी मनीष, मी त्या दिवशी रश्मी सोबत जंगलात होतो, त्याने तिला दोन दिवस काय काय झालं ते सांगीतल, तुम्ही मला मदत करणार का? मला माहिती आहे रश्मी ला माझ्या सोबत राहायच आहे, पण ती का नकार देते आहे काय माहिती, मला काही सुचत नाही",.. मनीष

"माझ्या मैत्रिणीच चांगल होणार असेल तर मी करेन मदत तुम्हाला, तिचा होणारा नवरा खूप डेंजर आहे, चिडका आहे, खूप ओरडतो तो तिला ",... नेहा

" बापरे, तरी मग का रश्मी मला होकार देत नव्हती",.. मनीष

" आहेत तिचे काही कारण ती सांगेन तुम्हाला",.. नेहा

" तुम्ही विचारा तिला तिचा काय विचार आहे माझ्या बद्दल? , तिला मला फोन करायला सांगा, मी खूप बैचैन आहे कधी पासुन ",.. मनीष

नेहा रश्मीच्या घरी आली दुपारी,

" कॉलेज मध्ये काय काय शिकवलं ते रोज नोट्स देत जा मला नेहा" ,.. रश्मी

" हो त्या साठी आली ना मी",.. नेहा

आई बसलेली होती बाजूला, नेहा आई उठायची वाट बघत होती,

" आई चहा कर ना नेहा साठी ",.. रश्मी

आई किचन मधे गेली

" रश्मी ऐक ना आज कॉलेज मध्ये मनीष सर भेटले होते",..नेहा

रश्मी आश्चर्याने बघत होती,.. "काय बोलतेस नेहा, तो बोलला तुझ्याशी?, आपल्या वर्गात आला होता तो? ",..

"सर आहेत ते फिजिक्स चे",.. नेहा

"हो माहिती आहे मला, माझा मित्र आहे, हाच मला जंगलात भेटला होता",.. रश्मी

" मला आधी का नाही सांगितल मग ",.. नेहा

"अग काय सांगणार, कॉलेज ला गेली की बोलणार होती मी ",.. रश्मी

" मग काय विचार आहे तुझा मनीष बद्दल?, तुला पसंत आहेत का ते? ",.. नेहा

"काय उपयोग आता नेहा, मला नाही बोलायच जावू दे मनीष बद्दल, वाईट वाटत मला ",.. रश्मी

" काही झालं नाही अजून रश्मी? लग्न ठरलं ना? शरद पेक्षा खूप चांगले आहेत मनीष, तुझी किती काळजी करत होते ते",.. नेहा

"हो अगदी चांगला आहे मनीष मला महिती आहे",.. रश्मी

"मग तू तुझ बघ ना, चांगल्या लोकांसोबत रहा",.. नेहा

"अग पण बाबांच काय?, त्यांच्या जॉब आहे तिकडे शरद कडे आहे, मागच्या वर्षी तू बघितल ना किती प्रॉब्लेम होता घरी, त्या काकानी हेल्प केली, आता त्यांना वाटत माझ लग्न शरद शी व्हायला हव तर मी नाही म्हणू शकत नाही ",... रश्मी

" पण मग या साठी तुझ आयुष्य तू पणाला लावणार का
घरी सांगून तरी बघ",.. नेहा

" मला भिती वाटते शरद ला समजल तर, तुला माहिती नाही माझ काय होईल, या वेळी किती ओरडले ते मला ",.. रश्मी

" अस घाबरत जगणार का की स्वतःच चांगल करणार",.. नेहा

" मला वेळ हवा विचार करायला",.. रश्मी

" तोच नाही रश्मी अटोप ",.. नेहा

" आई बाबांशी बोलायला हव",.. रश्मी

" मनीष सरांनी फोन नंबर दिला हा घे ",.. नेहा

रश्मी नुसती बघत होती, नेहा ने तो नंबर तिच्या फोन मध्ये सेव केला,.. हाय पाठवून दिल

" काय करते मूर्ख नेहा ",.. रश्मी

" गप ग बरोबर करते मी ",.. नेहा

" रश्मी कशी आहेस तु? ",.. मनीष चा मेसेज आला

"नेहा मेसेज आला",.. रश्मी

" वाच ना",.. नेहा

" कोणी आल तर ",. रश्मी

" मी आहे ",.. नेहा

"कशी आहेस विचारतो आहे मनीष",.. रश्मी

"किती बोर... काही लिहिल नाही का.. लव यू वगैरे",.. नेहा

" काय अस नेहा गप्प बस जरा ",.. रश्मी हसत होती

" आता पुढे काय ठरवल तू, शरद बोर आहे नकार दे त्याला, छान सुखी आयुष सुरू कर, कर हिम्मत",.. नेहा

नेहा गेली, रश्मी खूप खुश होती मनीष चा मेसेज वाचून,

"कधी येणार कॉलेज ला, माझा राग गेला का ",.. मनीष

" हो गेला, बर वाटल की येईल ",.. रश्मी

"मला भेटायचा आहे तुला रश्मी, खूप बोलायच आहे तुझ्याशी ",.. मनीष

रश्मी खुश होती तिने रिप्लाय दिला नाही...

आई आली रश्मी ने फोन ठेवून दिला, आई बाबांना सांगून बघु का स्पष्ट पण ते नाही बोलले तर,

रश्मीच्या आईला थोड समजल होत नेहा काय म्हणते ते, त्यांनी बाबांना सांगितल,.." अहो रश्मी पसंत करते एका मुलाला ",

" चांगल आहे कोणी आवडत असेल तर, बघु तिला बोलू दे समोरून, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ती सुखी रहावी हीच इच्छा आहे आपली",.. बाबा

"हो ना.. ती नाही काही बोलली तर",.. आई

"तर आपण विचारून बघू नंतर तिला, तू काळजी करू नकोस, मी आहे रश्मी साठी ",.. बाबा

आई च्या चेहर्‍यावर समाधान होत...

🎭 Series Post

View all