बरसल्या पावसाच्या सरी भाग 4

काळजी करू नको बेटा, औषध दिल आहे, थोडा वेळ लागेल, वाटेल बर, शेकून देवू का पाय थोडा" ,.. त्यांनी तवा गरम केला, मनीष तिचा पाय शेकून दे,


बरसल्या पावसाच्या सरी भाग 4

©️®️शिल्पा सुतार
........

खूप पाय दुखत होता, रश्मीला झोप येत नव्हती,.. "बाबा खूप पाय दुखतो आहे, काही औषध आहे का?",

बाबा जवळ आले,.. "काळजी करू नको बेटा, औषध दिल आहे, थोडा वेळ लागेल, वाटेल बर, शेकून देवू का पाय थोडा" ,.. त्यांनी तवा गरम केला, मनीष तिचा पाय शेकून दे,

" रश्मी काय होतय? जास्त होत का त्रास? आपण उद्या इथून डायरेक्ट डॉक्टर कडे जावू, आजच्या रात्र धीर धर, खूप पाऊस सुरू आहे",.. मनीष

"हो नशीब हा आसरा तरी मिळाला नाही तर झाडा खाली काय झाल असत",.. रश्मी

मनीष तिचा पाय शेकून देत होता

"तू खूप चांगला आहेस",.. रश्मी

" पुरे काळजी घे वाटेल बर ",.. मनीष

" झोप बेटा आता ",.. बाबा

रश्मी झोपली, बाबानी तिला चादर दिली पायाला थंड लागत असेल, रात्री परत एकदा पाय शेकावा लागेल,

" हो मी आहे बाबा ",.. मनीष

बाबानी कंदिलाच्या ज्योत कमी केली, ते स्वतः झोपले मनीष बसुन होता,

"झोप मनीष ",.. रश्मी

" कुठे?, जागा नाहिये मी ठीक आहे, तू कर आराम",... मनीष

बाबा आणि रश्मीच्या मध्ये जागा होती

"ही काय इथे जागा आहे, झोप जरा",.. रश्मी

"चालेल ना तुला ",.. मनीष

" मग काय झालं आराम कर",.. रश्मी

मनीष बाबां कडे तोंड करून झोपला.

रश्मीला थोड बर वाटत होत, तिला झोप लागली, पहाटे बाबानी तवा गरम केला, मनीषला उठवल, हिचा पाय शेकून दे,

रश्मी शांत पणे झोपली होती, कस काय हात लावणार हिला, काय करू? ,.. मनीष विचार करत होता

" रश्मी पाय शेकायचा ना, रश्मी",.. मनीष

"मला उठता येत नाही मनीष",.. रश्मी

" तू पडून रहा मी शकतो पाय" ,... मनीष

बाबानी थोड औषध अजून दिल तिला,

मनीष तिची काळजी घेत होता ,

थँक्स..

झोप आता, शेकल्याने पायाला ऊब मिळाली, रश्मी झोपली, मनीष जरा वेळ झोपला, तो उठला तर बाबा नव्हते, बारीक पाऊस येत होता, रश्मी झोपली होती, तो उठून बसला, त्याने फोन बघितला अजिबात रेंज नव्हती, बाबा कुठे गेले? , त्यांना रस्ता माहिती असेल पण रश्मीला चालता येणार नाही, शांत झोपली आहे ही, थोडा तरी आराम पडला की नाही हिला, की त्रास अजून वाढला ती उठल्यावर समजेल,

जरा वेळाने बाबा आले,

" कुठे गेले होते तुम्ही" ,.. मनीष

"थोड रस्ता पर्यंत गेलो होतो निरोप दिला.. काल खाली पडलेली मुलगी आहे इथे, पाऊस खूप आहे म्हणून आज रेस्क्यू टीम येणार नाही उद्या येतील ते, थोड खाण्याचे सामान औषध आणले",.. बाबा

"इथून जवळ आहे का रस्ता",.. मनीष

"नाही अर्धा तासावर आहे आम्हाला, तुम्हाला एक तास लागेल, पाऊस आहे पाणी वाहत आहे, सटकायची भीती आहे",.. बाबा
........

पोलिसांनी रश्मीच्या घरी फोन केला बाबा होते फोन वर, रश्मी सुखरूप आहे आज खूप पाऊस आहे उद्या तिला दरीतून काढता येईल, काळजी करू नका, लागल आहे थोड तिला,

" खूप आभार तुमचे मी आता येत होतो तिकडे, कुठे आहे ती तिकडे ",.. बाबा

" नका येवू आज होणार नाही काम, एक आजोबा निरोप घेवून आले, त्यांच्या घरी आहे ",.. पोलिस

"लता अग रश्मी सुखरुप आहे, उद्या तिला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट करतील थोड लागल आहे, आता फोन आला होता ",.. बाबा

लता ताईंनी नेहाला बातमी दिली, सगळे खूप आनंदी होते, आता बर वाटत होत त्यांना

बाबानी शरदला फोन केला ,... "कुठे होती रश्मी, मुद्दाम राहिली का तिकडे मुक्कामी ती, कोण आहे तिच्या सोबत? तिचा मित्र असेल कोणी ",..

"काय बोलताय तुम्ही? आम्ही इथे किती टेंशन मध्ये आहोत काल पासुन, तुम्ही आले नाहीत, वरून रश्मी वर आरोप करताय, किती घाण विचार आहेत तुमचे",.. बाबा

"या साठी गेली होती ती कॉलेज पिकनिकला, मला माहिती आहे ",.. शरद

" तुमच्या शी बोलण्यात काही अर्थ नाही",... बाबा

" सत्य नेहमी अवघड असत ",.. शरद

" ठेवा तुम्ही फोन, आता मी बोलण्याचा मनस्थितीत नाही",.... बाबा विचार करत होते काय होणार रश्मीच? , यांच अस वागण असेल तर, आपण घाई तर नाही ना करत आहोत या लग्नाची, रश्मी घरी आली की विचार करू या स्थळाचा,

शरदचे वडील, रश्मी चे बाबा बिझनेस पार्टनर होते, आधी वेगवेगळे बिझनेस होते त्यांचे, पण मागच्या वर्षी रश्मी च्या बाबांना खूप तोटा झाला बिझनेस मध्ये, तेव्हा शरद च्या वडलांनी खूप मदत केली होती, आता त्यांच्या सोबत ते काम करत होते, शरद च्या वडलांचा बिझनेस छान चालत होता, त्यांचा जास्त वाटा होता,

रश्मी च्या बाबावर खूप कर्ज बाकी होत, ते ही पैसे या पगारातून जात होते त्या मुळे लगेच निर्णय घेता येत नव्हता, त्यामुळे त्यांना शरदच बोलण ऐकुन घ्याव लागत होत,

एक तर ते श्रीमंत लोक त्यात मदत केली त्यांनी अडचणीत, शरदने स्वतः च्या हुशारीवर सरकारी ऑफिसरच पद मिळवल होत, त्याला फार गर्व होता त्याच्या हुशारीचा, त्याला आधी पासून रश्मी आवडत होती, त्या लोकांनी समोरून मागणी घेतली होती त्या मुळे आता सगळ्या बाजूने नाईलाज झाला होता, रश्मी ला तो शरद सरळ सरळ त्रास देत होता, अतिशय संशयी, काय होणार आहे, काय कराव असा प्रश्‍न रश्मीच्या बाबांना पडला होता, हे लग्न मोडल तर काम बंद होईल, काय कराव
...

रश्मी अजून झोपली होती मनीष, तिच्या कडे लक्ष देवून होता,.." बाबा ही उठत का नाही ",

" उठेल औषध दिल आहे ना, हे घे चहा, कोरा आहे दूध मिळाल नाही, हा त्या पोरीचा चहा उठली की गरम करून दे" ,... बाबा

"तुम्ही कुठे जाता आहात? ",.. मनीष

" मी इथे आहे येतो एक दोन तासात काम आहे",..

"एवढ्या पावसात",.. मनीष

"पाऊस तर नेहमीचा आहे आमच्या साठी",..

बाबा गेले मनीष बाजूला बसला होता, करणार तरी काय? रश्मी कडे बघत होता तो, छान आहे ही, कुठे रहात असेल? कोण कोण असेल हिच्या घरी? खूप लागल आहे हिला, या आधी कोणत्याही मुलीशी मी अस संपर्कात आलो नाही, ही पहिली, आणि हीच शेवटची, ही हवी मला, मला हिच्या सोबत रहायच आहे, गोड आहे एकदम, मला आवडली ही, बोलून बघू का हिच्याशी,

रश्मी उठली,

"कस वाटत आहे आता?",.. मनीष

"ठीक आहे मी, फोन ला रेंज आहे का घरी खूप काळजीत असतिल",.. रश्मी

"दिला आहे घरी निरोप",.. मनीष

कोणी?

"बाबा गेले होते सकाळी",.. मनीष

"जवळ आहे का इथून, आपण जायचं का",.. रश्मी

"नाही एक तास चढ आहे, पाय कसा आहे? पाऊस सुरू आहे, तुला चालता येईल का?, मलाच उचलून न्याव लागेल ",.. मनीष

रश्मी हसत होती, तिने बाजूला पडलेला रुमाल मनीष ला फेकून मारला

"मला वाटत इथून जावू नये हिच्या सोबत इथेच रहाव अस छान ",.. मनीष विचार करत होता

"पाय दुखतोय, पण काल पेक्षा बरा आहे",.. रश्मी आवरत होती, तिचे केस ती नीट बांधत होती, फ्रेश दिसत होती आता जरा, मनीष तिच्या कडे बघत होता, हिचे केस किती सरळ आहेत, किती सावरते ती तरी नीट होत नाही, ते चेहर्‍यावर आले की अजून सुंदर दिसत होती रश्मी,.. मनीष हसत होता,

" राहू दे ना केस" ,..

काय??

" आवरायच राहू दे, मी घालतो घड्या, तू आरामात रहा",..रश्मी

ठीक आहे

"तुझ्या साठी औषध आणलाय बाबांनी, खाऊन घे थोड",.. मनीष

" बाथरूम आहे का इथे ",.. रश्मी

"हो मागे आहे ",.. मनीष

" मी आलेच फ्रेश होवुन",.. रश्मी

"सावकाश जरा पाऊस आहे",.. मनीष

रश्मीने उठायचा प्रयत्न केला, उठता येत नव्हत,.. "पट्टी काढु का जरा वेळ, पाय सरळ झाला आहे",.

"हो काढ नंतर मी लेप लावून देईन नंतर ",.. मनीष

रश्मी हळूच उठली,

मनीष उठून आला,.." मी आधार देवू का तू हो म्हणशील तर ",

हो..

तिने त्याच्या हात धरला,

" चालता येत का? " ,.. मनीष

"एवढ नाही" ,.. हळू हळू ते मागे गेले

"मी आहे बाहेर आवाज दे ",.. मनीष

हो

रश्मी फ्रेश होवुन आली, मनीष ने तिला चहा दिला,.." काही खातेस का तू, काही दिसत नाही इथे" ,

"माझ्या बॅग मध्ये दोन तीन पोळ्या आहेत ते देणार का, चहा पोळी खाते",.. रश्मी

मनीष ने तिची बॅग उघडली, त्यात डायरी होती, एका बाजूला डबा होता त्याने डबा बाहेर काढला, रश्मी ने चहा पोळी खाऊन गोळी घेतली, लेप थोडा कोमट करुन मनीष ने तिला दिला,

" मी लावू का लेप ",.. मनीष

" नाही मी ठीक आहे आज ",.. रश्मीने लेप लावला, पट्टी बांधली पाय शेकला

"पाऊस खूप आहे",..

"हो ना थांबलाच नाही काल पासुन, तू लेखिका आहेस का",.. मनीष

"नाही पण मला आवडत थोडसं लिहायला अश्या वातावरणात",.. रश्मी

"हो असच होत आभाळ भरून आल की मनातल्या भावना अश्या उमलून येतात, वाटत कुठे तरी एकट बसव निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा",.. मनीष

" हो मला पण अस वाटत, म्हणून त्या झाडा खाली बसली होती मी, आपले विचार किती जुळतात ना ",.. रश्मी

हो..

" मला दाखव काय लिहिल ते ",.. मनीष

"नाही एवढ खास नाही ",.. रश्मी

" तुला कस माहिती, मी ठरवणार ते छान लिहिल की वाईट ",.. मनीष

" मी लिहिते ते मला माहीत आहे, साध आहे अगदी ",.. रश्मी

बघु ना प्लीज,... मनीष ऐकत नव्हता

हो बघ

मनीष वाचत होता काय लिहिल ते,.." अतिशय सुरेख लिहिल आहेस तू, तुझ्या मनातील भावना अगदी तंतोतंत मांडल्या आहेत ",

" नाही रे साधच आहे, पण मना पासून लिहिल आहे ",.. रश्मी

"तेच महत्वाचे आहे,... नंतर घरी गेलो की मी तुला माझी डायरी दाखवेन" ,..मनीष

"म्हणजे आपण भेटणार आहोत का नंतर",.. रश्मी

" एका कॉलेजला आहोत आपण मॅडम",.. मनीष खुश होता

"तू कुठे राहतोस घरी कोण कोण आहे",.. रश्मी

" मी आणि माझी आई असतो घरी, मोठा भाऊ वहिनी शहरात राहतात, आई जाते तिकडे ही कधी कधी ",.. मनीष

" तुमच्या कडे कोण आहे?" ,..

"मी आई बाबा",.. रश्मी

"काळजी करत असतिल ते",.. मनीष

"हो ना बर झालं पण आज निरोप दिला त्यांना ",..रश्मी

" तुझ लास्ट इयर ना, पुढे शिकणार आहेस का ",.. मनीष

" माहिती नाही ",.. रश्मी

म्हणजे?..

" माझ लग्न जमल आहे, माझा नवरा काय म्हणतो ते बघायला हव ",.. रश्मी

मनीष दोन मिनीट तिच्या कडे बघत बसला, तो अचानक शांत बसला, त्याला हे आवडल नव्हत त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत,.." अभिनंदन तुझ... पण लग्न झालं म्हणजे जिवनात काय करायच ते तू ठरवणार नाही का आता",

याला आता काय सांगणार शरद विषयी, जे आहे ते ठीक आहे, किती चिडका आहे, तो म्हणेल तेच कराव लागत मला आणि आई बाबांना, बाबा त्यांच्या ऑफिस मध्ये आहेत कामाला, म्हणायला पार्टनर पण खरं तर नौकरी करतात ते तिकडे,

"काय म्हणतोय मी?, किती ऐकणार दुसर्‍याच, तुला तुझे मत आहेत की नाहीत",.. मनीषचा आवाज वाढला, उगीच चीड चीड करत होता तो,

"नाही अस नाही, मी घेवू शकते निर्णय, पण अजून आमच तस नीट बोलण झाल नाही, एवढय़ात ठरलं लग्न, समजेल हळू हळू स्वभाव",.. रश्मी

"लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?",.. मनीष

" माझ्या वडिलांचा मित्राचा मुलगा आहे तो, पण आधी कधी बोलली नव्हती मी त्याच्याशी ",.. रश्मी

"अश्या अनोळखी माणसावर चांगलाच विश्वास आहे तुझा",.. मनीष

"आई बाबा म्हणतील ते करेन मी ",.. रश्मी

" हो का त्यांना विचारून पडली का दरीत ",.. मनीष

" काय झालं? तू चीड चीड का करतो आहेस, काही चुकलं का माझ ",.. रश्मी

हीच लग्न जमल आहे हे ऐकुन डोक फिरल माझ, काय करू मी आता? कस इम्प्रेस करु हिला, आताच लग्न जमल म्हणते म्हणजे अजून विशेष बोलली नसेल ती त्याच्याशी, काही तरी करायला हव, ऐकेल का ती, अति साधी वाटते आहे, मला करायच हिच्याशी लग्न, माझी आहे ही, उगीच चिडलो मी,

थोड्या वेळ कोणी काही बोलल नाही, तिला ही शरद पसंत नव्हता, किती चिडका होता तो आणि त्याला मी लिहिते कविता करते तर वेळ वाया घालवते अस वाटत, साध प्रेमाने बोलत नाही तो, तिला मनीष आवडत होता पण काय करणार आई बाबांच काही नाही ,पण शरद किती गोंधळ घालेल, काय करेल तो, माझ्या वर हात उचलला तर, मागे एक मुलगा माझ्या मागे येत होता तर किती चिडला होता शरद, त्या मुलाला तर मारल होत त्याने, मलाही किती बोलला होता तेव्हा , बाबांना बोलेल तो, एक तर त्याला मी पिकनिक ला आली ते आवडलं नव्हत,

काय करू नकार देवू का शरद ला लग्नाला, बाबांना सांगू का तस, पण मग कोणा सोबत राहायच मला? मनीष सोबत , बापरे मी काय हा विचार करते आहे, पण हा का चिडला माझ लग्न ठरलं हे ऐकुन,

तिला हसू आल

🎭 Series Post

View all