बरसल्या पावसाच्या सरी भाग 3

जाव तर लागेल अस इथे किती वेळ बसणार झाडाच्या फांद्या पडता आहेत, लागेल आपल्याला, या बाजूला जावू या",..


बरसल्या पावसाच्या सरी भाग 3

©️®️शिल्पा सुतार
........

रश्मीच्या पाय आता खूप दुखत होता, पण ति आता गप्प होती, थोडा पाय हलवून ती बघत होती, मला तर असं वाटत आहे मला इथून उठता येणार नाही, कसं होणार आहे माझं?

"तू किती वेळ पासुन फिरत आहे जंगलात",.. रश्मी

" मी या बाजूने आलो एक दोन तास झाला फिरतो आहे मी",..

"पावसाचा आवाज किती जास्त येतो ना आता",.. रश्मी

"हो इथे काही नाही फक्त निसर्ग पाऊस आणि आपण आता दोघ ",...

बराच पाऊस कमी झाला होता, तो उठून उभा राहिला, इकडे तिकडे बघत होता तो,

" चल उठ ",..

" कुठे जायच",.. रश्मी

" रस्ता शोधू नाहीतर कुठे बसायला चांगली जागा आहे का ते बघू ",..

" मला चालता येत नाही",.. रश्मी

"जाव तर लागेल अस इथे किती वेळ बसणार झाडाच्या फांद्या पडता आहेत, लागेल आपल्याला, या बाजूला जावू या",..

"नको तिकडे इकडे थोड वरती जावू ",.. रश्मी

"काय आता हे अस ",..

"अरे तू इकडून आला ना आता, काही नाही ना तिकडे? मग कशाला त्या बाजूला ",.. रश्मी

" ठीक आहे बाई तू म्हणशील तस, मी बघतो एक मिनिट",..

" कुठे चाललास तू थांब ",.. रश्मी

" इथेच आहे मी, कुठे नाही जात, ही माझी बॅग आहे ना इथे, एक मिनिट दे, सुरक्षित स्थळी जायला हव, बघतो जरा ",..

तो थोड पुढे जावून बघून आला दूर कुठेतरी त्याला थोडासा उजेड दिसला,..." ते बघ तिकडे काय आहे, उजेड दिसतो आहे, घर असेल का कोणाचं तिकडे उतारावर? ",

" माहिती नाही",.. रश्मी

" जाऊन बघूया का आपण",..

" कोण असेल एवढ्या दरीत? ",.. रश्मी

"जंगलातल्या वाटा समजत नाही, जाणार कसं? समजा त्या घरापर्यंत जाण्याआधी खाली एक खोल दरी असेल तर शक्य नाही आपल्याला, मग वापस येवू ",..

" ती झोपडी जरा लांब वाटते आहे, चालता येईल का मला ",.. रश्मी

"ठीक आहे करू हिम्मत, जावंच लागेल आपल्याला , इथे अशा या पावसात किती वेळ बसणार चल उठ माझं जॅकेट तू घाल",..

" नको मला खूप मोठ होत आहे तुझ जॅकेट, ते तूच घाल, मी माझी बॅग धरते ",.. रश्मी

त्याने हात पुढे केला, ती त्याच्याकडे बघत होती

" बघतेस काय अशी? हात धर माझा, इथून जर पडली तर डायरेक्ट जीवानिशी जाशील",..

" पण हात धरून दोघ सटकलो तर ",.. रश्मी

" हो ना तूझ्या मुळे मी निसटलो तर आपण दोघं पडू ",..

" तू एकट कसा फिरत होतास ",.. रश्मी

"मी झाडांना धरून धरून चालत होतो, आता ही तस जाणार आहोत आपण, तुझ्या आधी हरवलो आहे मी या जंगलात, मला तेवढा अनुभव आहे समजलं का",..

बरं ठीक आहे.... रश्मीने त्याच्या हातात हात दिला, त्याने तिचा हात घट्ट धरला, कशी तरी रश्मी उभी राहिली

" काय होतय पाय खूप दुखतो आहे का? ",..

हो....

" मी बघु का एकदा ,पायाला हात लावू का ",..

रश्मी हो बोलली

" त्याने तिच्या पाय थोडा मोडल्यासारखा करून दिला, आता इझी आहे का थोडा पाय हलवायला",..

"थोडासा बरा आहे",.. रश्मी

"जरा दम धर त्या समोरच्या घरापर्यंत आपल्याला जायला मिळाल तर बरं होईल, पाऊस खूप आहे आपण पूर्ण भिजलो आहोत, असं जर एक-दोन दिवस राहिलो तर काही खरं नाही ",..

" एक दोन दिवस का? आपल्याला शोधायला लोक येतील ना ",.. रश्मी

" हा पाऊस कधी थांबेल हे माहिती आहे का आपल्याला? अजून किती दिवस असं सोबत फिरायचं आहे काय माहिती",..

एक दोन झाडांना धरत धरत ते थोडेसे पुढे गेले, वरून खूप वेगाने पाणी येत होतं, एका जागी थांबून परत पुढे कुठे वाट आहे ते बघितलं त्यांनी

समोरची झोपडी आता बरीच दृष्टीपथात येत होती, कोणाचं घर असेल एवढ्या दरीत, मदत मिळायला हवी

थोडं चालल्यानंतर रश्मीचा पाय खूप दुखत होता, एक तर ती दरीत पडल्यामुळे पायाला लागलं होतं हातालाही थोडं खरचटलं होतं कपाळालाही लागलं होतं आणि पावसाने पाय खूप जड झाले होते

"मला नाही चालता येत, आता माझे खूप पाय दुखत आहे",.. रश्मी

"आता ही काही नखरे करायची वेळ आहे का? असं मध्येच थांबता येणार नाही",..

"नखरे..... नखरे म्हणजे काय? तुला काय वाटत आहे मी खोटं खोटं सांगते आहे का की माझा पाय दुखतो आहे, अरे माझ्या पायाला जोरात लागलं, मी वरून पडली तर" ,.. रश्मी

" सॉरी... म्हणजे थोडा धीर धर अस म्हणायच होत मला, अजून फक्त दहा-पंधरा मिनिटं आपण पोहोचूच लगेच तिकडे, हळूहळू चाल काही इलाज नाही ",..

ठीक आहे... रश्मी त्याच्या कडे रागाने बघत होती

" माझ्याकडे स्प्रे आहे आपण तिकडे गेलो की तुझ्या पायाला लावून देईल, तुझी बॅग दे ",..

" अरे पण तुझ्या कडे तुझी बॅग आहे एवढ्या दोन दोन बॅग ",.. रश्मी

असू दे..

रश्मीने बॅग दिली, अजिबात चालत येत नव्हत तिला,

हे बघ समोर आहे घर, फक्त दहा मिनिट, रश्मी पूर्ण त्याच्या आधारावर हळूहळू चालत होती, ते दोघं झोपडीच्या जवळ गेले, थोड बाकी होत, त्याने दोघी बॅग एका बाजूला धरल्या, तिला उचलून घेतल

" सोड मला खाली",.. रश्मी घाबरली

"गप्प रहा, चालता येत का तुला? अस हळू हळू कधी पोहोचू आपण , परत पाऊस सुरू झाला तर पाणी येईल वरून पाच मिनिट थांब जरा",..

रश्मी त्याच्या कडे बघत होती, कोण आहे हा? , असा कसा अचानक भेटला मला इथे जंगलात? , काय नाव असेल याच? शरद सोबत अस छान कधीच वाटल नाही मला, हा किती काळजी घेतो माझी, खूप छान आहे हा, अरे मी काय विचार करते आहे? , हा मुलगा माझी मदत करतो फक्त, लग्न ठरलं एवढ लक्ष्यात ठेवायला हव मी

"काय आहे?",..

"कुठे काय??",.. रश्मी

"तू डोळे मिटून घे बर",..

"काय झालं आता?",.. रश्मी

"माझ्या कडे बघु नको मला कसतरी होत",...

रश्मी हसत होती,.. "अरे मग मला खाली सोड",

"नाही आलो आता आपण" ,.. दोघ झोपडी जवळ आले त्याने तिला हळूच खाली उतरवल

झोपडी बंद होती कोणी नव्हत आत थोड्या वेळा पूर्वी इथे लाइट होता ना, दोघ बाहेर थांबले, तिथे कट्ट्यावर रश्मी नी बसून घेतलं,

एक आजोबा आले डोक्यावर पोत पांघरल होत,.." काय करता आहात पोरांनो तुम्ही इथे मुसळधार पावसात",.

"तुमच घर आहे का हे आजोबा",..

हो..

"एवढ्या दरीत",..

"हो मी जडी बुटी जमा करतो इथे, वरती गावत रहातो या आत, तुम्ही काय करता आहात इथे घरातून पळून आले का",.. बाबा

"आम्ही सोबत नाही, मी पिकनिकला आलो होतो, संध्याकाळी रस्ता चुकलो, ही वरून पडली खाली आत्ताच थोड्या वेळापूर्वी",..

वरुन?

हो..

लागल का?

" हो पाय खूप दुखतो आहे माझा",.. रश्मी

" चला आत भिजले आहात तुम्ही खूप",.. बाबा

दोघ आत गेले, चूल पेटलेली होती, कंदील सुरू होता, पहिल्यांदा तो तिला बघत होता, खूप छान दिसते ही, निरागस अगदी, बोलके डोळे, केस लांब, अतिशय सुंदर साधी मुलगी, खूप भिजली आहे ही,

ती खाली बसली, चेहर्‍यावर वेदना होत्या तिच्या, चेहर्‍यावर ही खरचटले होत, पाय सुजला होता, हळूहळू तिने शूज काढले

" तुम्ही दोघं खूप भिजले आहेत कपडे आहेत का तुमच्याकडे?",.. बाबा

हो आहेत

" बदलून घ्या मग",.. बाबा

त्याने त्याचे बॅग मधुनं ड्रेस काढला तो थोड्या मागच्या बाजूला ड्रेस बदलायला गेला, बाबांनी त्याला एक टॉवेल दिलं डोकं पुसून घे आधी, रश्मीलाही एक टॉवेल दिला

"ड्रेस आहे का तुझ्या कडे ",.. बाबा

" हो एक आणला आहे बदलते आता कपडे",.. रश्मी

तो आणि आजोबा बाहेर जावुन बसले, रश्मीने दार लावून घेतलं, पाऊस वाढला होता आता ,

"इथे धोका नाही ना काही बाबा चोर जंगली प्राणी वगैरे",..

"नाही थोड अर्धा तास चढ आहे, मग रस्ता लागतो, मी दाखवतो उद्या तुम्हाला रस्ता, पाऊस थांबला तरच जाता येईल पण, खूप निसरडी वाट आहे",.. बाबा

आत मध्ये रश्मीने कसतरी कपडे बदलले, पाय चांगलाच दुखत होता, बर झाल ड्रेस आणला होता कधी कधी धबधबा वर खेळल तर कपडे ओले होतात म्हणून घेतला होता ड्रेस , कपडे वाळत टाकले तिने बाजूला, हळूच दार उघडलं ती हाक मारत होती.. बाबा.. बाबा

दोघ आत आले, रश्मी केश पुसत होती, गुलाबी रंगाच्या कुर्ता मध्ये ती खूप छान दिसत होती, तो तिच्याकडे बघत होता, बाबांनी आवरायला घेतलं

"काही औषध आहे का तुझ्या कडे बेटा",.. बाबा

नाही...

"बघू तुझा पाय खूप दुखत आहे का?",.. बाबा

" हो खूप त्रास होतो आहे",.. रश्मी

"माझ्या कडे आहेत औषध चालतील का तुला? मला आयुर्वेद माहिती आहे" ,... त्यांनी पाय दाबला, खूप दुखत होता, रश्मीच्या डोळ्यात पाणी आल, तो तिच्या बाजूला बसुन काळजीने तिच्या कडे बघत होता,

" पाय ठीक वाटतो आहे, पण क्रॅक असण्याची शक्यता आहे, सुजला ही आहे थोडा" ,.. ते बाबा लेप तयार करत होते, मी भाताची पेज केली होती माझ्या पुरती, ती हिला दे थोडी खायला, मग औषध देता येईल, आपण परत करून घेऊ दुसरी पेज,

त्याने एका वाटीत गरम पेज आणली, रश्मीने ती हळू हळू पिली, हात ही दुखत होता,.." आपली ओळख झाली नाही अजून",

" काय नाव तुझ? ",..

रश्मी..

तुझ??

मी मनीष..

"कुठे राहतोस तू",.. रश्मी

"बाजूच्या गावत.. या जागे पासुन त्या बाजूला गाव आहे, कॉलेज ला आहेस का तू",.. मनीष

"हो लास्ट इयर कॉमर्स",.. रश्मी

"तू ही कॉलेज ला आहेस का?",.. रश्मी

"हो पण प्रोफेसर म्हणून ",.. मनीष

" बापरे कोणत कॉलेज ",.. रश्मी

"त्याने नाव सांगितल",.. मनीष

"ते माझ कॉलेज आहे, तुला सॉरी तुम्हाला बघितल नाही तिथे कधी ",.. रश्मी

" मी फिजीक्स डिपार्टमेंट मध्ये आहे",.. मनीष

" किती बोर फिजिक्स विषय, आपल्याला काय... सायन्स ची वेळ वेगळी असते, त्यांची वेगळी बिल्डिंग आहे त्या बाजूला , म्हणून बघितल नसेल ",.. रश्मी

" मी आत्ताच जॉईन झालो सहा महिने झाले",.. मनीष

बाबा लेप करुन घेऊन आले,.. "तुम्ही खरच ओळखत नाही तर एकमेकांना, मला वाटला होत तुम्ही दोघ खोट बोलता आहात , तू तिला उचलून घेवून आला होता ना ",.

" हो तिला लागल आहे, चालता येत नव्हत ",.. मनीष

" चांगला मुलगा आहेस तू",.. बाबा

" हा घे लेप लावून दे हिला, दोन तीन पट्ट्या आणल्या त्यांनी, ही पट्टी वरून बांध नंतर थोडा शेक देवू ",..

" मी लावते लेप",.. रश्मीने तिच्याकडे वाटी घेतली

" शांत रहा रश्मी मी लावतो, पुढे तरी वाकता येत आहे का तुला, लागलं किती आहे ते बघ, आरामात बस ",.. मनीष ने पायाला लेप लावला, थोडा सुकू दे मग पट्टी बांधू, हात बघू हाताला लेप लावला, दोघी कडे पट्टी लावली,

रश्मी मनीष कडे बघत होती, किती छान आहे हा, काळजी करणारा, प्रेमळ अगदी, असे ही लोक आहेत या जगात, बाबांना का दिसला नाही हा आधी? तो शरद किती रागीट, तो माझी जरा सुधा काळजी करत नाही, उलट दर वेळी दोन शब्द ऐकवतो,

चेहर्‍याला थोड लागल होत तिच्या, बाबांनी काही तरी दुसरा लेप दिला लावायला , चूर्ण सारख औषध आणल ते पिल पाण्यातून,

"झोप आता बेटा, थोड त्या बाजूला सरकून म्हणजे आम्हाला जागा राहील",.. बाबा

"बाबा खूप धन्यवाद मनीष थँक्यू",.. रश्मी

"झोप आता अजून हवी का पेज",.. मनीष

नको... रश्मी मोठ्या कष्टाने बाजूला सरकली

"बापरे ही उद्या कशी चालणार आहे हिला उचलून न्याव लागेल",.. मनीष

मुसळधार पावसामुळे शोध कार्य पूर्ण पणे थांबल होत, रश्मीचे बाबा घरी गेले होते, आता पर्यंत रश्मी च्या घरी माहिती झाल होत रश्मी पडली ते, बाबांना बघून आई उठून आली,.. "कुठे आहे रश्मी? , काय झालं तिला? , मला आत्ता च्या आत्ता रश्मी हवी ",..

" सांभाळा स्वतःला, त्रास करून नको घेवू शोधता आहेत लोक तिला, सुरक्षित असेल ती मला विश्वास आहे",.. बाबा

" शरद रावांना सांगितल का",.. आई

हो

"मग ते नाही आले तुमच्या सोबत",.. आई

"हो ना त्या विषयी बोलू आपण नंतर" ,..बाबा

" नेहाला फोन लावा ना",.. आई

"नेहा तुझ्या सोबत होती ना रश्मी? काय झालं नेमक तिकडे? सांग ना बेटा ",..

" काकू बस पंक्चर झाली त्या मुळे गडबड झाली, रश्मी कधी त्या झाडाजवळ जावून बसली तेच समजल नाही अचानक ती घसरली",.. नेहा

" आता काय होईल नेहा? . मला रश्मी हवी आहे, किती खोल आहे ती दरी? काय म्हटले पोलिस? तुझे काका मला अजिबात काही सांगत नाही",... आई

" उद्या सापडेल रश्मी काकू, काळजी करू नका",.. नेहा

" अग पाऊस किती मुसळधार आहे, माझा जीव घाबरतो आहे",.. आई

" देवाच नाव घ्या काकू, काहीही होणार नाही, मी येवू का तिकडे ",.. नेहा

" नको उद्या सकाळी ये ",.. आई
..........

🎭 Series Post

View all