बरसल्या पावसाच्या सरी भाग 2

एवढ्या पावसात शोधाशोध करणं शक्य नाही उद्या सकाळपासून शोध कार्याला सुरुवात करण्यात येईल",.. रेस्क्यू टीमने सांगितलं



बरसल्या पावसाच्या सरी भाग 2

©️®️शिल्पा सुतार
........

नेहा च्या लक्षात आलं.. रश्मी कुठे आहे?, ती बसली होती तिथे झाडाजवळ, सगळ्या मैत्रिणी रश्मीला शोधत होत्या, नेहा झाडाजवळ गेली, बापरे येथे सरकल्याच्या खुणा आहेत, रश्मी.... रश्मी.......
ती जोरजोरात हाका मारत होती,.. अशी कशी ही मुलगी कुठे गेली? का खरच दरीत पडली,

तोपर्यंत चहा वाले काका तिथे आले होते,

"काका रश्मी खाली पडली वाटतं",.. नेहा

"हो हे काय तिच्या सरकण्याच्या खुणा दिसत आहेत" ..काका

"किती खोल आहे ही दरी ",..नेहा

"खूप खोल आहे ",..काका

नेहा रडायला लागली, सगळीकडे आरडा ओरड झाली, रश्मी दरीत पडली, बऱ्याच मुली रडत होत्या,

घाबरू नका.. सगळ्यांनी चहाच्या टपरीवर काका समजावत होते, पाऊस खूप जोरात सुरू झाला होता, तोपर्यंत चला तुम्ही सगळ्या मुलींनी बसमध्ये बसा, सगळ्या मुली बस मध्ये बसल्या आता ड्रायव्हर काका रश्मीला शोधत होते, काय झालं असेल काय माहिती? हिच्या घरच्यांना कसं सांगणार आहे आता आपण, कुठे गेली ही? अशी कशी पडली

"आतापासून चोवीस तास इथे खूप मुसळधार पाऊस आहे, ही दरी खूप खोल आहे, वरती यायची ही जागा नाही, बाजूच्या गावातून वरती येतं येता, पाऊलवाट निसरडी आहे, जर खरच ती मुलगी इथे पडली असेल तर सापडण्याची शक्यता खूप कमी आहे" ,.. चहा वाल्या काकांनी ड्रायव्हर काकांना सांगितलं

काय करावे काही समजत नव्हतं ,त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला, रश्मीच्या घरी फोन केला, रश्मीचे बाबा होते फोनवर

" इथे रश्मीचा एक्सीडेंट झालेला आहे, तुम्हाला शक्य असेल तर इथे लवकर निघून या ",..

" काय झालं आहे नक्की? लवकर सांगा?",.. बाबा

" हे बघा काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण तुम्हाला सांगाव लागेल, रश्मी इथे पाय घसरून खाली दरीत पडली आहे",..

" कशी आहे रश्मी?",.. बाबा

" अजून सांगता येणार नाही, सापडली नाही ती",..

रश्मीचे बाबा लगेच निघाले, बाजूचा सुरेश होता सोबत, रस्ताभर रश्मीचे वडील रडत होते,

" तुम्ही काळजी करू नका काका, काहीही होणार नाही रश्मीला",.. सुरेश

तिच्या आईला काय झालं आहे याची कल्पना नव्हती, बाजूच्या ताई येऊन बसलेल्या होत्या सोबतीला, मी कामासाठी बाहेर जातो आहे असं रश्मीच्या वडिलांनी सांगितलं होतं,

पोलीस आले ते चौकशी करत होते मुलींची,.. शेवटी कुठे बघितलं तुम्ही रश्मीला? कोण कोण होतं तिच्यासोबत?

तोपर्यंत रश्मीचे बाबा आले, खूप घाबरून गेले होते ते, नेहा त्यांना बघून रडत होती

"कुठे आहे रश्मी,... नेहा काय विचारतो मी?",.. बाबा

"काका आम्ही चहा पीत होतो रश्मी या झाडाखाली एकटी बसली होती, जरा वेळाने बघितलं तर ती नव्हती",.. नेहा

" तुला लक्ष नाही देता आलं का तिच्याकडे?",.. नंतर बाबांना समजलं की नेहाला रागवण्यात काही अर्थ नाही,

"मला माफ करने नेहा मी उगाच चिडतो आहे",.. बाबा

" ठीक आहे काका, मला सुद्धा खूप काळजी वाटते आहे रश्मीची, तुम्ही आधी इथे बसा बरं एका जागी, किती घाम आला आहे तुम्हाला",.. तिने रश्मीच्या बाबांना पाणी दिलं

"काका रश्मी ठीक असेल तुम्ही काळजी करू नका",.. नेहा

"चला मुलींनो आता उशीर होतो आहे",.. बाकीच्या मुलींना घेऊन बस गावाकडे निघून गेली, नेहा जातच नव्हती घरी, रश्मी सापडल्याशिवाय मी येणार नाही असं सुरू होतं तिचं, कसं तरी करून तिला बसमध्ये बसवलं, पूर्ण रस्ता भर नेहा रडत होती,

घरी गेल्यावर सगळीकडे सांगू नका, रश्मीच्या आई ला समजल तर त्या तब्येत खराब करून घेतील, रश्मी सापडायला पाहिजे लवकर,

हळूहळू अंधार पडत होता, पाऊसही खूप वाढला होता, इतर वेळी सुरेख वाटणारा पाऊस आता भयान वाटत होता, डोंगर उतारावरच पाणी जोरात दरीत कोसळत होतं, रश्मीचे बाबा विचार करत होते या दरीत रश्मी पडली तर थोड्यावेळाने ही दरी पाण्याने भरून जाईल, कस होईल माझ्या रश्मीचं? ते देवाच्या धावा करत होते

रेस्क्यू टीम आत्तापर्यंत त्या ठिकाणावर आली होती, रेशमी चे बाबा चहाच्या टपरीवर बसले होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, त्यांनी शरद ला फोन केला.. "रश्मी हरवली आहे",..

" मला खर हे अजिबात आवडल नाही असं पिकनिक वगैरे, पण हे आजकालच्या मुली ऐकतील तर खरं आहे, मूर्ख आहे रश्मी, काय करत होती एवढ्या कडेला",.. शरद प्रचंड चिडला होता

"तुम्ही येतं आहात का इकडे? ",.. बाबा

"नाही मला जमणार नाही, कुठे गेली काय गेली ती रश्मी, बाहेर एवढा पाऊस, सापडली नंतर ती तर सांगा",... त्यांनी फोन ठेवून दिला

बाबांना जाणवल यांना रश्मी विषयी काहीही वाटत नाही, आता अजूनही रश्मीच्या आईला माहिती नाही, काही तिला समजलं तर ती तब्येत खराब करून घेईल आणि रश्मी कशी आहे खाली काय माहिती? , मी अगदी एकटा पडलो आहे, ते देवाच्या धावा करत होते

" एवढ्या पावसात शोधाशोध करणं शक्य नाही उद्या सकाळपासून शोध कार्याला सुरुवात करण्यात येईल",.. रेस्क्यू टीमने सांगितलं

रश्मीचे बाबा खूप रिक्वेस्ट करत होते, दोन-तीन दा ते स्वतः दरीकडे धावले, बाकीच्यांनी त्यांना पकडलं

" यांना घरी घेऊन जा बरं",.. सुरेशने त्यांना बळजबरी गाडीत बसवलं, काका शांत व्हा, उद्या नक्की सापडेल रश्मी,
.........

पाच-दहा मिनिटं झाली रश्मी झाडावर तशीच लटकलेली होती, खाली एका फांदीवर तिने हळूच पाय ठेवला, तिची बॅग तिच्या हातात होती, डायरी तिने हळूच त्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवली, बॅग दोघी बाजूने नीट अडकवली, झाड ठिसूळ तर नाही आहे नाही बघितलं, स्वतःचा पाय हलवून बघितला, पायाला लागलं होतं पण चालता येईल असं वाटत होतं,

वरून खूप पाणी पडत होतं, असं जर पाणी पडत राहिलं तर झाड तुटून जाईल, झाड खूप हलत होतं, काय करू मी? कशी काय पडली मी? माझं मलाच माहिती नाही, हळूहळू तिने फांदीवरून बाजूला जायचा प्रयत्न केला, त्या बाजूने जर तिला झाडाच्या बुंधाशी जाता आलं तर तिकडे एक रस्ता दिसतो आहे, छोटीशी पाऊलवाट होती, तिकडे निदान जाऊन झाडाखाली तरी बसता येईल, पण तोल गेला तर सरळ खाली दरीत जाईल मी,

दरी हळूहळू पाण्याने भरत होती, काय करावं? हळूहळू जावं लागेल, ती पाच मिनिट तशी थांबली, काही दिसत नव्हतं समोर, या दरीत साप किडे असतिल का?.. बापरे, पण मी हार मानणार नाही, इथून बाहेर पडायला हव माझ्या मैत्रिणी खूप काळजीत असतील, आई-बाबांना समजलं तर काही खरं नाही, ती विचार करत होती,

"हॅलो एक्सक्युज मी मॅडम काय करतेस तू इथे? तब्येत तर बरी आहे ना तुझी, दरीत झाडांवर उभी आहेस तू",..

रश्मी दचकली, इथे या दरीत कोण आहे, तिने नीट बघितल एक मुलगा उभा होता झाडा जवळ

"मी काय गंमत करायला आली आहे का इथे एवढ्या पावसात, वरून पडली आहे मी इथे दरीत",.. रश्मी

" कशी काय? ",..

" आता मी इथेच सगळ्या गोष्टी सांगत बसू का? मदत नाही करणार का तू मला",.. रश्मी

" अजिबात हलू नको नको झाड मुळासकट निघत आलेल आहे, तुझ्याकडे ओढणी नाही का",..

"नाही आज आम्ही सगळ्या मुलींनी पॅन्ट घालायचं ठरवलं होतं",.. रश्मी

" बरं झालं ",..

" आता काय करू या ",.. रश्मी

त्या मुलाने त्याचं जॅकेट काढलं,.." मी जॅकेटचा एक टोक धरतो तू एक टोक धर आणि अजिबात घाई न करता हळूहळू इकडे ये, तुझी बॅग फेक इकडे",.

रश्मीने हळूच बॅग काढली त्या मुलाकडे तिकडे फेकली, त्याने जॅकेट फेकलं, रश्मीच्या हाताला एक हात लागला, ते जॅकेट तिने घट्ट धरल, हळूहळू ती त्या बाजूला आली, जवळ येतात त्या मुलाने तिला कमरेला धरलं आणि उचलून दुसऱ्या बाजूला ठेवलं, रश्मी त्याच्या खूप जवळ होती, तो पावसाने पूर्ण भिजलेला होता, त्याच्या असं इतक्या जवळ असल्याने रश्मी घाबरून गेली होती

"काय करत आहेस तू? सोड मला",.. रश्मी

"अरे इथे मी तुझा जीव वाचवला आणि तू मला एटीट्यूड दाखवते आहेस, शांत रहा जरा, नाहीतर आपण दोघं सटकू दरीत, मला काही तुला हात लावण्यात इंटरेस्ट नाही खाली बघ किती माती गळते आहे तू इथे पाय ठेवला असता तर सटकली असती",..

सॉरी..

रश्मीने बघितलं खरंच झाडाचे मूळ सैल झाले होते, खालून पाणी वाहत होत ..." थँक्यू सो मच तू अगदी देवासारखा धावून आलास",

" ठीक आहे पण आता विचार कर इथून निघायचं कसं? किती पाऊस सुरू आहे तू कशी पडली इथे? ",..

" आम्ही मैत्रिणी पावसाळी पिकनिकला आलो होतो, संध्याकाळी परत जाताना बस पंचर झाली, मी या कोपऱ्यावरच्या झाडाखाली बसून सगळीकडे बघत होते, उठताना पाय घसरला, सरळ दरीत आली मी ",.. रश्मी

" तुला माहिती का थोडक्यात वाचली आहेस तू, जरा काळजी घेता येत नाही का तुला? आज मी इथे नसतो तर तू रात्रभर या झाडावर उभी असती, नाहीतर हे झाड तुटून परत एकदा तू दरीत पडली असती",..

" हो ना खूपच डेंजर आहे हे, वरती माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील",.. रश्मी

" एवढं कोणी काठावर बसायला सांगितलं होतं ",..

" मला काय माहिती ती वाट निसरडी होती ",. रश्मी

" तू काय करतो आहे या जंगलात",.. रश्मी

" मला ही पावसाळी पिकनिकची आवड आहे, आम्ही सगळे मुलं इथे पिकनिकला आलो होतो, मी हरवलो, रात्रीच्या अंधारात इथे काही दिसत नाही, सकाळ झाली की रस्ता सापडेल",..

" आता काय करू या ",.. रश्मी

"रात्रभर असंच कुठेतरी थांबावं लागेल, सकाळी रस्ता सापडेल, नाहीतर कुठलीतरी रेस्क्यू टीम आपल्याला घ्यायला येईल चल आता इथून ",..

" काय करणार पण कुठे जाणार किती अंधार आहे, काहीच दिसत नाही",.. रश्मी

"सगळ्या वाटा निसरड्या आहेत, घसरलो तर अजून खोल दरीत जाऊ ",..

" मग इथे बसणार आहोत का आता आपण? ",.. रश्मी

" हो मग काही इलाज नाही",.. दोघं थोडे आतल्या बाजूने गेले, एक मोठ्या झाडाखाली थोडी बसायला जागा होती तिथे ते बसले,

" इथे जंगलात साप किडे असतील का? ",.. रश्मी

" असतील बहुतेक पण इथे जंगली श्वापदे नाहीत अस ऐकल आहे ",..

तेवढ्यात अजून पाऊस सुरू झाला, जोरात पाऊस येत होता, झाडाच्या आडोशाला ते दोघं असुन सुद्धा खूप पाऊस लागत होता, पुर्ण भिजलो आहोत आपण,

"आता काय करू या, मला भिती वाटते आहे इथे",,.. रश्मी

त्याने जॅकेट डोक्यावर घेतलं,... इकडे ये, तो रश्मीला बोलवत होता

रश्मी अवघडली..

"लवकर ये इकडे, डोक्यावर हे जॅकेट धरू आपण",.

त्याच्या एवढ्या जवळ जाऊन बसायचं म्हणजे कसतरी वाटत होत, पण आता काही इलाज नव्हता, ती हळूच त्याच्या बाजूला सरकली, चांगला वाटतो आहे हा जॅकेट मुळे डोक्याचे रक्षण होत होतं,

" माझी छत्री गाडीतच राहिली ",.. रश्मी

" माझी पण छत्री बस मध्ये राहिली",..

"पाऊस खूप जोरात आहे काय करू या",.. रश्मी

"शांत बस इथे पाच मिनिट ठरवू काय करता येईल ",..

आ.. बापरे

"काय झालं ",..

"माझा पाय खूप दुखतो आहे",.. रश्मी

"जास्त लागला आहे का",..

" माहिती नाही ",.. रश्मी

"गारवा लागला असेल पायाला, अजून लागल का कुठे ",..

हो हाताला..

" तू बघतो का आजूबाजूने किती पाणी वाहत आहे, आता काय करू या मग आपण? फोन आहे का तुझ्याकडे ",..रश्मी

" आहे पण इथे रेंज नाही ",..

मोठा आवाज झाला..... वरून झाडाची मोठी फांदी एकदम रश्मीच्या जवळ येवून पडली, ती खूप घाबरून त्याच्या जवळ सरकली,

त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, सॉरी... मी पण घाबरलो होतो

" बापरे काही खरं नाही इथे, धोका आहे आपल्याला" ,.. रश्मी

" निघू आपण इथून ",...

"मला चालता येईल की नाही माहिती नाही ",.. रश्मी

थोड्या वेळाने पाऊस कमी झाला समोरच थोडं तरी दिसत होतं

दोघ पूर्ण भिजलेले होते, एका जॅकेट तेवढं होतं त्यांच्याजवळ , थंडी वाजत होती...

🎭 Series Post

View all