बरखा .... बेधुंदपणाची एक लहर

Unconditional Love That Will Take You In Different

\"बेजान दिल को तेरे  इश्क ने जिंदा किया फिर तेरे इश्क ने ही  इस दिल को तबाह किया। तड़प तड़प के इस दिल से  आह निकलती रही है मुझको सजा दी प्यार की  ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए। हाँ लुट गए तो लुट गए हम तेरी मोहब्बत मे\"..
बरखा ने डोळे बंद केले.बंद डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी तिच्या आयुष्यातला त्याच्या आठवणीचा एक भाग ही ओघळला कदाचित..बसलेल्या बरखाने अश्रू पुसले आणि मेक अप ठीक केला.


"बेदर्द ओ था की ए आंसू हैं
उसने भुला दिया वो भी दर्द हैं
ये आसू उसके यादमे झलकते हैं..
ये भी एक दर्द है.."

बरखा एक बार डान्सर.बेताच्या परस्थितीमुळे तिला हे काम करावं लागायचं.बिघडलेल्या वातावरणात ही
स्वतःला वासनेने भरलेल्या नजरेतून वाचवले होते.बारबाला असतानाही तिने फक्त नाच विकला होता शरीर नाही.
बेलगाम आणि बेधुंद वातावरणात ती कशी आणि किती दिवस वाचणार होती? बंद दरवाज्याच्या मागे बसून ती आपला दुःख गाळत होती.बाहेर मुसळधार पाऊस येत होता आणि बारमध्ये तरुणाईचा जल्लोष आणि पैशाचा नशेचा पाऊस होता.\" बाहेर निघा..बाहेर निघा..पळा \" असा एकच गोंधळ झाला.बाहेर जाण्यासाठी सर्व पळत होते कारण पोलिसाची रेड पडली होती.बरखा व तिच्यासोबत नाचणाऱ्या  मुली मागच्या रस्त्याने निघणार तेवढ्यात समोरून एकदम रुबाबदार ,देखणा पोलिस ऑफिसर आला.बेड्या घालून महिला पोलीसांनी त्या सर्वांना अटक करण्यास सांगितले.बघता बघता सर्व बार रिकामा झाला.बरेच जण पाळले,बरेच हातात आले.बारचा मालक गया वया करत होता.बरखाला मात्र टेन्शन वेगळच होत.बरखाचा अर्धा चेहरा मास्क मध्ये होता.बरखाची नजर राहून राहून त्या पोलिसवाल्याकडे जात होती. \" बादल..एवढाच अस्पष्ट तिच्या तोंडातून निघालं.

\" बेहिसाब जलवे दिखाती हैं जिंदगी..
सूनाता हमने..
बादल को तुफान की तरह सामने देखा..
तो यकिन भी हो गया..\"

" बाप रे ! किती हँडसम दिसायला लागला आहे आणि पोलिस पण झाला. " बरखा मनात म्हणाली . बारची तपासणी करता करता इन्स्पेक्टरने सर्वांना पोलिस चौकीत नेण्यासाठी सांगितले.बघता बघता सर्व चौकीवर आले. बार मालकासोबत बादल चौकशी करत होता.बेल वाजवून त्याने सर्व मुलींना आणण्यास सांगितले.बरखा मात्र आता मनातून  घाबरली. बिचारीच्या मनात एकच, बादल ला कळलं की बरखा बारबाला आहे तर..

बेइज्जत होकर तो तेरे मोहल्लेसे कब के
रुकसत हो गए थे हम..
बस अपने गली में अपने जज्बातों की नीलामी
नही चाहते थे हम,..
बेशक सबके नजर में आज भी वही मासूम है हम।।

विचार करता करता बरखा भूतकाळात गेली.
बादल आणि बरखा शाळेचे मित्र अन कालांतराने प्रेमी. त्यांच्यात असे काही झाले होते त्यामुळे दोघेही वेगळे झाले.
बरखा नकळत भूतकाळात गेली.बरखा, बादल अगदी जिवलग मित्र मैत्रीण.बंधन कोणतंच नव्हत.बिनधास्त ते दोघे शाळा , ट्युशन सोबतच जायचे.बाहेर तर जाऊ द्या पण घर शेजारी शेजारी असल्याने खूप मैत्री होती दोघांची.

बेपनाह मुहब्बत की जब दास्ता होगी
बादल और बरखा दोनो साथ होगी
बदलेगा मौसम धूप का
बरसात मोहोबत की जरूर होगी

बहुतेक दृष्टच लागली त्यांच्या नात्याला. बादल ने बरखाला प्रपोज केलेलं. बरखाने नाकारण्याचा काही प्रश्न नव्हता पण बादलच्या वडिलांना बरखाच्या आर्थिक परस्थिती मुळे त्यांची जवळीक नाही आवडायची.

बादल नेहमी बरखा ला म्हणायचां," बरखा मला ना पोलिस व्हायचं आहे आणि बाबांना प्राउड करायचं आहे." बरखा हसत म्हणायची ,"बादल तू बन पोलिस आणि मी वकील होणार..म्हणजे तू गुन्हेगारांना पकड आणि मी त्यांना सजा मिळून देणार."


बनाए सपनो के कितने घरोंदे हम ने
बस मकाम देना बाकी था
बेमालून थे तकदीर के खेल से
बस बर्बादी का भी जश्न होने वाला था

बघितलेल्या स्वप्नांना नेहमीच प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळतेच असं नाही. बादल आणि बरखाच्या बाबतीत तसच झाल.\"बिन बुलाये मेहमान\" बनून त्याच्या आयुष्यात संकटे येत गेली.बरखा आणि बादलच्या परिवारमध्ये त्यांच्या नात्याची सुगावा लागला . बादलच्या वडिलांनी खूप आरोप प्रत्यारोप करून बरखा आणि तिच्या वडिलांना ते शहर सोडून जाण्यास भाग पाडले . बादलला याबाबतीत काहीच माहीत नव्हते.बरखाच्या घरी जाण्या अगोदर बादलला त्याचा वडिलांनी खूप काही भलते सलते सांगून बरखा आणि तिचे वडील कसे वाईट आहेत हे सांगितले.बाबाच्या आंधळ्या प्रेमाने खऱ्या प्रेमाला हरवलं..आणि बरखा आल्यावरही बादल ना तिच्या समोर आला ना त्याने झालेला तिचा आणि तिच्या बाबांचा अपमान न होवू द्यायचा प्रयत्न केला.
बरखाने खूप प्रयत्न केला बादल पर्यंत पोहचण्याचा पण सर्व व्यर्थ.काही न सांगता बोलता बरखाला सर्व सोडून जावं लागलं.

बिना कुछ कहे सुने
कोई कभी दूर जाता है क्या
बुनियाद सच में कच्ची थी इतनी
की अलविदा ना कह सके

संकटे एवढ्यावर कुठून थांबणार होती तिची. बरखाच्या वडिलांनी मुंबईला जायचे ठरवले.बरखा तिचे बाबा तिचा लहान भाऊ..आई तर नव्हती तिला..सगळे मुंबईला गेले.बदलत्या त्या जागेत तिच्या बाबांना वेगळीच संगत लागली आणि आयुष्याचे समीकरण बिघडत गेले.बरखाचे शिक्षण अर्धेच झाले आणि तिला बारबाला बनावं लागलं.
"बोला मॅडम.." या आवाजाने बरखाची तंद्री भंग पावली. बादल सर्वांची चौकशी करत करत तिच्या समोर कधी आला कळलच नाही. " बोलत का नाही , तुम्ही तो मास्क काढा . चुकीचं काम करताना लाज नाही वाटत आता तोंड लपवून काय फायदा.." . बादलचे एक एक वाक्य तिच्या काळजावर वार करत होते.बराच वेळ रोखलेले अश्रू ओघळले.बरखाने तिचा मास्क काढला..आणि बोलली ,"साहेब सगळ्याच्या नशिबात पैसे असणे गरजेचे नाही."बादल वळून काही बोलणार त्याची नजर बरखा वर पडली


"बरखा..तू. ",बास्स एवढाच निघालं त्याच्या तोंडातून.बरखाला त्याच्या नजरेत अगणित प्रश्न अन् अगतिकता दिसत होती.बोलणार होती ती पण परत तिच्या भूतकाळा ने आणि वर्तमानकालीन परीस्थिती ने अडवले.बाहेर नजर करत तिने एक अनोळखी भाव तोंडावर आणले.

बहते मेरे आंसू शायद तुम तक ना पोंचेंगे
बेरुखी से रिशता कबका सुख गया।
बंजर की तरह दिल हो गया है
बस दूरतक तन्हाई का आलम छाया ।

बादल मात्र पुरता शॉक होता. बरखाला या परीस्थिती मध्ये पाहून त्याला त्याचीच घृणा वाटत होती कारण त्याच्या बाबांनी मरण्या आधी सर्व सत्य सांगितलं होत.बैचेन होवून तो ही तिला एक वर्षापासून शोधत होता.

"बरखा ..बरखा किती..किती शोधलं मी तुला.पण मला सॉरी बोलायचं होत तुला. बघ मी नव्हता विश्वास ठेवला तुझ्यावर पण मला अजून एक संधी हवी आहे . बरखा..मला एक संधी दे." बरखाला मिठी मारत तो बोलला.बरखाने त्याची मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि बोलली, " बादल सोड मला.. इन्स्पेक्टर साहेब काय करताय आपण ? बघा आधी कोठे आहात तुम्ही ?बारबालाच्या गळ्यात पडणं तुमच्यासारख्या प्रतिष्ठित आणि पैसेवाला लोकांना शोभत नाही.भेटायचंय आहे तर बार मध्ये या पैसे घेवून बोलुत मग."


" बस बरखा बस एक शब्द नको बोलू तू.नक्कीच माझा गुन्हा माफ करण्या सारखा नाही नको ही करू मला माफ पण स्वत ला नको त्रास देवू.बरखा मला एक संधी दे सगळं ठीक करण्याची..प्लिज मला आजही तू आवडतेस पण पछताप म्हणून नाही तर प्रामाणिकपणे सांगतोय आय लव यू.."


बेबस था मैं हालत के हाथ में
बेशक गुनहागर हूं तेरा
बेवजह नही नाराजगी तेरी
बस तुझे खुश करनेका देेदे मौका।।

बरखा चे एक मन त्याला माफ करण्यास सांगत होते आणि दूसरे इतके दिवसाचा अपमान ते आयुष्य त्या यातना..रोज रोज मारून कुढत जगणे तिला नको म्हणत होत. बुध्दी आणि मनाच्या खेळात कोण जिंकणार तिलाही नव्हते माहित.बंद केले तिने डोळे त्याचा चेहरा त्याचे डोळे त्याचा प्रामाणिक पणा तिला दिसत होता..आणि दुसऱ्या क्षणी बार मधली तिची अवहेलना..बस..बस.. बस.. काय करू मी बादल.. बादल.. बदला की बदल काय हवं मला नक्कीच बदल हवा . बरखाच्या मनात युद्ध चालू होत.बस नाही आता विचार करणार आता निर्णय झाला माझा.

बद्सलुखी वक्त की हस कर सेहली हमने
बेपाक हैं तेरी मोहोबत्त
बेशक तेरी मोहोबत जितीही हैं आज
बेदखल करदी सारी रुसवायिया बाकी है सिर्फ मोहबत


बरखा ने दीर्घ श्वास घेतला अन् बोलू लागली," बादल मी खूप सोसलं आयुष्यात खूप काही सोसलं.बदलणारी नाती बदलणारे दृष्टीकोन..पैसा नसतानाची होणारी होरपळ.बदललं  रे माझा आयुष्य तुझ्या वडिलांच्या एका चुकीने. बेगड्या दुनियेचे खूप भयानक रूप पाहिले मी रोज रोज तीळ तीळ मरत होते..पण तुला कधी बद दुवा नाही दिली मी कारण तुझ्यावर खूप प्रेम करत होते तुझ्यावर..आजही करते पण तेंव्हा वेगळी गोष्ट होती आणि आता वेगळी.बार बालांच्या आयुष्यातली प्रत्येक रात्र कसोटीची असते आणि आपल्या अब्रुला वाचवून ठेवण्याच्या पराकाष्ठेची.बेलगाम भावना कधी त्यांच्यावर तुटून पडतील माहित नसतं त्यांना अन् त्याच्यातून प्रत्येक जण स्वतःला वाचवूच शकतो असं नाही रे.बेताल लोकांची ती घाणेरडी नजर रोज झेलायचे मी , वाटायचं यापेक्षा मरण बरे.बदलायच आहे रे ते सगळं मला..बहुतेक तू मला स्वीकारशील ही माझ्या जीवनात सगळं छान ही होईल पण त्या मुलींचे कसे होणार ज्या या दलदलीत फसल्या आहेत.बघता बघता वेश्याव्यसायात जावून आयुष्याशी राख रांगोळी होत आहे. बर मला एक सांग..तू मला स्वीकारलं कारण माझा भूतकाळ तुझ्या कडे आहे..आणि माझ्या वर्तमान ला नकळत तूही जबाबदार आहेस..ते जर नसतं तर तू मला स्वीकारलं असतं का?बदलला असता का तुझा दृष्टिकोन मला बघण्याचा ?बोल ना स्वीकारेल का समाज या बाकी मुलींनाही..?माझी खूप इच्छा आहे या सर्वांना बाहेर काढण्याची.बुरसटलेल्या समाजात त्यांना जागा निर्माण करून देण्याची..बादल देशील का साथ मला ?माझ्या आयुष्यात तुझं असं जेवढं महत्वाच असेल ते तेवढेच महत्वाचे यांचे पुनर्वसन असेल..बादल बरखा सोबत असतील पण मी लग्न आताच नाही करू शकणार. कदाचित या कामात मी तुझ्या नात्याला वेळी देवू नाही शकणार .पण मला तुझी साथ मात्र हवी..बादल सांग या बरखाचा सखा बनशील का?"

बादल मात्र पुरता वेडा झाला तिच्या विचाराने बस नाही मी सोडणार तुला बरखा एकदा चूक केली मी आता नाही..बादल म्हणला," बरखा तुझा हा मित्र सखा प्रत्येक पावला सोबत तुझ्यासाठी हजर असेल..बस तू माझी साथ नको सोडू.
Because i love you and. I respect you.."
बघ्याची भूमिका घेणाऱ्या तिथल्या प्रत्येकाने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.बरखा बादल एकत्र आले एक वेगळा बहर बनून बरसण्यासाठी..

बरखा ओर बादल बंध गये अनोखे बंधन मे
बेगानी थी राह जो चूनी थी साथ मे..
बेपाक इश्क की अनोखी हैं दांस्ता
जो इंसानियत की मिसाल हो गई जिंदगिमे