Feb 26, 2024
वैचारिक

बाप...न समजणारा

Read Later
बाप...न समजणारा

आईवर सगळेच लिहितात, म्हटलं आज बापावर लिहूया.

होत बाप... बाबा म्हणण्यापेक्षा तो जबाबदारीत जखडलेला बाप असतो

जो आपल्याला कधीच

होऊ देत नाही ताप

तो असतो बाप...


लिहायच्या नादात एक लेखच लिहून टाकला...प्रत्येकाला बाप असतो पण तो प्रत्येकाला कळत नाही. आई समजून घेण्यासाठी ह्रदय लागते आणि बाप समजण्यासाठी बुद्धी लागते.
कारण एक भावनेत आणि एक विचारात असतो.

मुळात बाप कुणालाच कळत नाही. कारण आई जे करते ते तिचे प्रेम असते आणि बाप जे करतो ते त्याचे कर्तव्य असं सगळ्यांना वाटतं.

इथेच सगळी गफलत होते.

आई म्हणजे सगळ्यांचा जीव पण बाबा बिचारे यात साईडला असतात. मूलं नेहमी आईच्या अवतीभवती असतात.बाबांना कधी वेळच नसतो.
पण कुणाला कळत बाप बिचारा आयुष्यभर मुलांसाठी झटतो.

त्यालाही वाटत मुलांसोबत राहावे त्यांच्या प्रत्येक क्षणाला जगावे.त्याचं पाहिलं बोलणं , टाकलेले पाहिलं पाऊल,पण बाबांना वेळच नसतो. का?बिचारा झटत राहतो मुलावर संकट येवू नये म्हणून.

कधी काही छोटासं लागल तर पहिले तोंडातून निघत आई ग!...

तेच जेव्हा मोठ्या संकटात सापडतो तेव्हा आपसूकच बापरे! निघत ना तोंडातून? इथेच बापाची व्हॅल्यू समजून येते.


बाप फक्त मुलाचीच काळजी घेतो असे नाही,तो मुलाच्या आईचीही काळजी घेतो पण

'उपकार करत नाही', असे उद्धटपणे बोलून आपण मोकळे होतो.


बाप आईपेक्षा कठोर वाटतो.चुकांबद्दल बोलतो,शिक्षा करतो. आई गोंजारते,आपल्या पदराने अश्रु पुसते म्हणून ती मायाळू वाटते.
आई घरातल्या घरात स्वयंपाक करते पण प्रत्येक
वस्तू बाप पुरवतो.

दिवसभराचे काम आटोपून घराकडे जातांना आपल्या लेकरांसाठी खाऊ
घेऊन जातो.
आजारी पत्नी,मुले यांचा उपचार
करवितो.रात्री जागून काढतो.

बाहेर अपमानाचे लाख 
घाव सोसतो.आपल्या कुंटुबाला सुरक्षित ठेवतो.


बापच असतो जो आपल्या मुलीसाठी वर शोधतो. हुंड्यासाठी पैसे जोडतो आणि मुलीला सासरी पाठवतांना ढसाढसा रडतो.

मुलाच्या शिक्षणासाठी अमाप खर्च करतो. डोनेशन भरतो. मुलाच्या सुखाचे स्वप्न बघतो तो बाप कधी कुणाला कळतंच नाही कारण तो कधी आईसारखं बोलून दाखवतंच नाही.

कधीतरी मुलांना  याची जाणीव व्हावयास हवी.
आपल्यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या,कुणी त्याग केला,कुणी अश्रु वाहिले हे जर मुलांना कळत नसेल तर असले शिक्षण तरी काय कामाचे...फक्त स्वार्थ आणि स्वार्थ शिकवणारे शिक्षण आणि शिकणारे विद्यार्थी कुचकामी आहे.

आईचे प्रेम जन्मदात्री म्हणून स्वाभाविक आहे, सर्व प्राण्यांत हे प्रेम असते पण बापाचे प्रेम अदभूत ,अलौकिक आहे इतर कुठल्याही प्राण्यात बापाचे प्रेम लाभत नाही.

प्रत्येकाच्या जडणघडणीत बापाचा सिंहाचा वाटा असतो. सगळे कवी आईच्या प्रेमाची महती गातात. कटु पण सत्य आहे ,आईशिवाय मुले बापाने सांभाळली पण बापाशिवाय कशी वाताहत होते याची अनेक उदाहरणे आहेत.

ऊन,वारा,पाऊस बाप अनुभवतो. बापाला आईसारखे सारखे रडता येत नाही कारण तो अश्रु गाळणारा नाही अश्रू पुसणारा असतो.
सगळी कामे बापाला करावी लागतात.पत्नीचे मन सांभाळावे लागते. बायकोसारखं आराम करायला त्याला कधी माहेरी
जाता येत नाही. तारेवरची कसरत असते त्याची आयुष्यभर.

मुलांना बापाच्या कष्टाची जाणीव होणे गरजेचे आहे. लग्न झालेली, स्वावलंबी मुले पंचवीस वर्षे सांभाळ करणाऱ्या बापाला विसरतात.

हा नतभ्रष्टपणा नाहीय का?


बाप कधीच मुलांना काही मागत नाही. फक्त. तु सुखी रहा एवढेच म्हणतो. तरीही तो उपेक्षित...त्यांचे साधे बोलणे नकोसे होते तेव्हा मुलांचे असे वर्तन निश्चितच बापाला आतून खचवित असेल.

कधीतरी बापाच्या आवडीचे कपडे आणा,खायला आणा.

जवळ बसा,गप्पा करा, विचारपूस करा.बायकोला सांगा ,तुझ्या बापासारखे माझेही माझ्या बापावर प्रेम आहे.

सुनेला मुलीप्रमाणे वागवणारा बाप पाहिजे तसे सासऱ्याला बापाप्रमाणे समजणारी सूनही हवी. शेवटी काय समजून घेण्याचा विषय आहे. आपले अश्रु ज्याने कायम पूसले एकदा तरी त्याचे अश्रु पूसून बघा .तेव्हाच कळेल बाप काय असतो.
     बाप सेवा निवृत्त झाला की सगळी सत्ता आईकडे येते, त्याच फक्त पेन्शन सगळ्यांना हवं असत.

आधीही बाप बाहेर वनवणं करतो म्हणून सगळीकडे सत्ता आईकडेच असते. म्हातारपणी बाप एक कोपऱ्यात पडून असतो अडगळीसारखा.

तो गेल्यावर त्याची तत्व कुणीच पळत नाही, त्याची बायकोसुद्धा आपलं म्हातारपण कुठे चांगलं जाईल याच विचारात असते...
खर बघितलं तर मूल झाल्यावर पुरुषाला घरात त्याची बायकोही विचारत नाही ,घरी फक्त तो एक एटीएम असतो, जे हवं ते देणारा...

आयुष्याच्या शेवटी ती मूल, नातवंड यातच खुश राहते, तो बिचारा एकटाच फक्त झटत राहतो...लढत राहतो,जगापुढे खंबीर बनून...

...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//