पुजायला आल्या वड, अन रीलमध्ये बिझी झाल्या....
देवा अशा कश्या या सावित्री
धागा दिला सोडून अन मोबाईल घेऊन बसल्या
सासुरवाशिनी पहिल्या, माझ्या बुंध्याशी बसायच्या.....
साचून ठेवलेलं मनात.... भडाभडा बोलायच्या....
आज आल्या या आधुनिक सावित्री.... गोल करुन बसल्या...
अन सामी सामी करत, नुसत्याच मोबाईल फिरवत बसल्या....
अन सामी सामी करत, नुसत्याच मोबाईल फिरवत बसल्या....
या बसा, हसा, खेळा, नाचा.... कुणाला घाबरू नका...
पण पूजेला येऊन असा रीलचा बाजार मांडू नका
वटपौर्णिमा आताशा मला रीलपौर्णिमा वाटते....
पारंबी सुद्धा माझी आता मलाच परकी भासते....
पारंबी सुद्धा माझी आता मलाच परकी भासते....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा