Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग२)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग२)


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… एक अव्यक्त रहस्य 

भाग २

-©®शुभांगी मस्के…


बंगल्याचा दरवाजा उघडला आणि बघतात काय? समोरच मोठ्ठा प्रशस्त हॉल, हॉलमधून वर जाणाऱ्या स्टेअर्स. दोन बेड रूम हॉल किचन, किचन ही बरच मोठं, अडगळीच्या वस्तूंची एक रूम, छोटसं कोठीघर. एक हॉल आणि बेडरूम वरती पण आहे, ब्रोकरने सांगितलं.

राघव ब्रोकर सोबतवर जाऊन संपूर्ण घर पाहून आला,

"छानच आहे", सृष्टीने घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरून नजर फिरवली.

घर आवडल्याच आणि वेळ न दवडता, लागल्या हाती अग्रीमेंट करून टाकण्याचा इशारा केला.

"अरे ही बंगई किती छान आहे !" सृष्टी बोलली.

"हो ग!! मस्तच आहे हा झोपाळा!" "आणि ही आराम खुर्ची!"....

पोर्चमध्ये एका साईडला उभा करून ठेवलेल्या लाकडी झोपाळ्यावर आणि आराम खुर्चीवर दोघांची नजर स्थिरावली..

खुर्ची थोडी जुन्या स्टाईलची, फार पूर्वीची असल्यासारखी वाटत होती. नाजूक नक्षीकाम कोरलं होतं खुर्चीवर, सृष्टी निरखून बघायला लागली.

"माझ्या आजोळी होता असा झोपाळा, आम्ही बंगई म्हणत असू. आम्ही बच्चे कंपनी मज्जा करायचो त्यावर. उंचच उंच झोके घ्यायचो.सृष्टी उत्साहात बोलत होती".

" मॅडम,आता हो कुठे झोपाळे वगैरे लावतात हॉलमध्ये. जुनी झाली ती फॅशन. बाकी घरातलं सगळं सामान विकून टाकलंय. हे सामान, काही कामाचं नसावं भंगारवाला सुद्धा घेऊन गेला नाही, तसचं टाकून दिलय वाटतं. कुणीच वाली नाही या सामानाचा"..

एखाद्या माणसाला बोलवून, तोडफोड करून लगेच विल्हेवाट लावायला सांगतो, म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही". ब्रोकर बोलला..

"नको, नको!" अगदीच कामाचं नसेल तर आम्हाला आवडेल, हॉलमध्ये लावायला हा झोपाळा आणि ही आराम खुर्ची पण ठेऊ या का? एखाद्या कोपऱ्यात.. सृष्टीने बोलता बोलता राघवला विचारलं.

"चालेल ना", सृष्टीच्या बोलण्याच राघवने समर्थन केलं..

अंगणात फुलांनी डवरलेल्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता.

"आहाहा!! काय सुंदर... किती प्रसन्न वाटतंय".

सृष्टी लंगडत लंगडत चाफ्याच्या झाडाखाली गेली..

जमिनीवर चाफ्याचा सडा पडला होता, सृष्टीने ओंजळभर फुल वेचून घेतली..

ओंजळीतल्या फुलांचा सुगंध, दीर्घ श्वासत भरून घेतला.
खूप वेळ ती तिथेच घुटमळत राहिली. स्वप्नात ही आज सोनचाफा दिसला होता तिला.. ती मंद मंद हसली

ठेच लागली असल्याने, पूर्ण गार्डन तिला फिरताच आल नव्हतं. तिने गार्डनवरून, वरवर नजर फिरवली.

गार्डनमध्ये वेगेवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं होती. काही झाडं फुलांचा बहर येऊन, तरी छान हिरवीगार होती..

अग्रीमेंट करून पुढच्या आठवड्यात सामान शिफ्ट करायचं ठरलं. ब्रोकरने स्टॅम्प पेपर्स काढले.. राघव ते वाचून साईन करणार तोच पुन्हा थंड हवेची झुळूक आली आणि पेपर्स फडफड उडायला लागले.

पेपर्सचा तो फडफड आवाज... पेपर्स साईन करण्यापूर्वी वाचून काढ हे सांगण्या साठीच फडफडले असावे, असं  वाटलं.. त्याने एक नजर संपूर्ण पेपर्स वरून फिरवली.. अकरा महिन्याचे अग्रीमेंट असलेले पेपर्स राघवने साईन केले…

घराचं टेन्शन दूर झालं होत. हॉस्पिटलमधलं थोडं काम आवरून दोघांनाही गावाला निघायच होते .

मि अँड मिसेस देवधर, नवरा बायको आहात सर तुम्ही, ब्रोकरने फॉर्मवर नजर फिरवत म्हंटल. राघवने हलकेच मान डोलावली.

कॉलेज स्टुडंट्स वाटता, ब्रोकर बोलला.

तेवढ्यातच, राघवच्या मोबाईलवर कॉल आला..

\"एक्सक्युज मी", म्हणत त्याने बाजूला जाऊन कॉल घेतला.

"हो! मिळालंय घर", अग्रीमेन्ट सुद्धा साईन केलंय..

"जातोच आहे हॉस्पिटलला, कन्फर्म करतो मी आणि सांगतो".

योगायोगाने, क्लब हाऊस समोरचच घर मिळालंय.. बंगला आहे छान.. राघव बोलला..

राघव : " हो रे, बाबा अरिहंत सोसायटी" तच..
लवकरच पुढच्या आठवड्यात शिफ्ट होतोय. उगाच कशाला वेळ दवडायचा नाही का?

"अरे तो तर, रोहनचा बंगला!! खूप खेळायचो आम्ही.. खूप सणकु होते त्याचे बाबा.. बघ बाबा, भूत बनून डोक्यावर नाचेल तो माणूस.. सडू होता पक्का. ऐकून राघवला हसूच आलं".

शेजारचे काका काकू, कंपाऊंड वॉलच्या पलीकडून डोकावून बघत होते. सृष्टीने त्यांना हलकसं स्माईल दिलं.

सृष्टी दिसायला सुंदर, नाजूक बांध्याची. गव्हाळ रंग पण नाकी डोळी तेज होती. केसांची वेणी छान कमरेपर्यंत रुळायची. परिस्थितीने जेमतेम पण स्वबळावर तिने इथपर्यंतची मजल मारली होती.

राघव आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. घरी शेतीवाडी बऱ्यापैकी सुबत्ता होती. त्याला खूप शिकून चांगला डॉक्टर व्हायचं होतं. त्या दृष्टीने त्याची पावलं योग्य दिशेनं मार्गस्थ झालेली होती.

सृष्टी आणि राघव, दोघेही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात असतानाच ओळख झाली

राघवला पहिल्या दृष्टीतच सृष्टी आवडली. त्याचा मनमिळाऊ स्वभाव, साधं, शांत, अभ्यासू, जिज्ञासू, तडफदार व्यक्तिमत्त्वाचा राघव सृष्टीला खूप भावला.

मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, ही जाणीव झाली इनटर्नशिप दरम्यान एकमेकांच होऊन जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. घरच्यांच्या सहमतीने सृष्टी आणि राघवच लग्न थाटामाटात पार पडलं.

लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली असली तरी, दोघानाही आपलं ध्येय साध्य करायचं होतं. लग्नानंतरचे नव्या नवलाईचे सोनेरी दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात एकमेकांच होऊन जाण्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात.
या सगळ्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होवू शकतो. ध्येयापासून लक्ष विचलित होऊ शकत. उगाच अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून लग्न झाल्यावर ही त्यांनी आपापल्या हॉस्टेलवर राहून पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

विरहातली अधीरता, एकमेकांच्या भेटीची आतुरता, ती ओढ, अधिकाधिक प्रेमात पाडणारी होती. पण करिअरच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला होता.

दोघांच्या ही नावासमोर आता, एमडी पदवी होती. दोघांनी एकाच हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवली. खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू होणार होता. आता एक चांगल घर बघायचं होत. त्याआधी गावी जाऊन यायचं ठरलं. त्यामुळे दोघेही खूप खूश होते.

वादळ यावं आणि सर्व निस्तणाबुत व्हावं. त्याप्रमाणे कोरोनाच आगमन झालं. सृष्टी आणि राघवने या कोरोना काळात, रुग्णसेवेत स्वतःला पूर्णत: वाहून दिलं होत.

अनेकदा जीवावर उदार होऊन आपला जीव धोक्यात टाकून उपचार करावे लागत होते.पण रुग्णसेवेच व्रत राघव प्रामाणिकपणे पाळत होता. एक बायको म्हणून तिला राघवची खूप काळजी वाटत होती.

कोरोनाच सावट, आता हळुहळू दूर होऊ लागलं. त्यांनी घर घ्यायचं ठरवलं. आज दोघे ते घरचं बघायला आले होते.

राघवच्या घरी त्याचे आईवडील, आजी आजोबा त्यांना घरातले सगळे माई आप्पा म्हणत अशा दोन पिढ्यांचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबात राघव लहानाचा मोठा झाला. लग्न करून सृष्टी सासरी आली आणि या कुटुंबाचा महत्वपूर्ण हिस्सा झाली. सगळे सृष्टीवर मुलीप्रमाणे प्रेम करीत, जीव लावत.

आजवर राघव आणि सृष्टी यांना वेळ मिळेल तेव्हा, ती दोघे आपआपल्या परीने घरी जावून येत. परंतु घर म्हणजे तेच जिथे त्यांच्या आधीच्या दोन पिढ्या एकाच छताखाली गुण्या गोविंदाने राहत. त्यामुळे पुढे मागे ते गावातच हॉस्पिटल टाकणार होते. आप्पांच जणू हे स्वप्नच होत.

मागच्या दोन पिढ्यांचा एकमेकाप्रती आदरभाव आणि माई आणि सासूबाईमधलं नातं विभक्त कुटुंबात राहिलेल्या सृष्टीसाठी नवीन होत.

राघव आणि सृष्टीच लग्न झाल्यापासून, एक नवी उमेद घेऊन माई आप्पा जगत होते.

"आता पतवंडाच तोंड दाखव रे बाबा लवकर म्हणजे आम्ही दोघे म्हातारे डोळे मिटायला मोकळे, " माई आप्पा सृष्टी आणि राघवसमोर मनातली इच्छा बोलून दाखवत.

"माय स्वीट लिटिल गर्ल फ्रेंड"... इतने जलदी थोडी ना तुम्हे हम जाने देंगे. जाते जाते तुम्हारा हात थामैं रखेंगे.. देवानंद स्टाईलने राघव माईंची गंमत करायचा.

आतापर्यंत शिक्षणाच्या निमित्ताने आता नोकरीच्या निमित्ताने, भरल्या घरातून, बाहेर निघून आपला आपला वेगळा संसार थाटायचा होता. अस एकट वेगळं राहाणं, एक प्रकारची शिक्षाच होती पण राहावं लागणारं होतं.

आणि आज तर घराचं अग्रीमेन्ट साईन झालं होतं. दोघेही बंगल्यातून बाहेर पडले आणि हॉस्पिटलमध्ये गेले, तिथलं काम आटोपलं, दुपारचं जेवण त्यांनी हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्येच केलं.

"मी आलोच थोड्या वेळात". सृष्टीला कॅन्टीनमध्ये बसवून, राघव लॅबोरेटरीमध्ये गेला. लॅबोरेटरी असिस्टंट सुजितशी त्याला भेटायचं होत.

"डॉक्टर ही फाईल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तुम्ही सांगितलेल्या तारखांमध्ये झालेल्या सगळ्या ब्लड टेस्टचे हे रिपोर्ट्स!" थॅन्क्स सुजित! राघवने ती फाईल कलेक्ट केली.

आज त्याने सुट्टी घेतली होती, तरी एक राऊंड केलाच पेशंटला भेटलाच. आता पुढचे चार दिवस तो नसणार होता हॉस्पिटलमध्ये. दोघेही गावाकडे जायला निघाले.

रिपोर्ट्स कशाचे असतील?काय असतील रिपोर्ट्स? राघवला आलेला कॉल कुणाचा असेल? जाणून घेण्यासाठी, कथेचे पुढचे भाग नक्की फॉलो करा. कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया लिखाणाचा उत्साह वाढविण्यासाठी महत्वाच्या ठरतात. धन्यवाद.
-©शुभांगी मस्के…

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//