बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग १२) अंतिम

आमच्या सारख्या.. आयुष्याच्या उत्तार्धात, नवी उमेद देणारं हे प्रोजेक्ट… या आमच्या मानस पुत्राने आमच्यासाठी तयार केलंय.. मिहिर चे बाबा आनंदात होते."आमच्यासाठी जीवावर उदार झाला रे हा पोरगा! म्हणाला तुमच्या आनंदासाठी सगळं काही"."क्लब हाऊस मधून निघाली अंबुलन्स", विथ परमिशन डायरेक्ट त्याच्या फॉर्म हाऊसवर… घेऊन आला रे तो आम्हाला".


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… अव्यक्त रहस्य

भाग : १२. (अंतिम)

-©®शुभांगी मस्के…


ट्रंक मध्ये एक डायरी सापडली होती.

आणि एक पत्र पण

प्रिय मिहिर,

"बेटा, खूप मोठा झालास तू, दूर गेलास
दूर.. फक्त शरीराने नाही मनाने सुद्धा..
आनंदी असशील अशीच आशा करतो
सुखी राहा हाच आशीर्वाद"...

बरेच वर्ष झाले, भेटलोच नाही ना आपण..
आता तर हा कोरोना.. या अवस्थेत ज्याने जिथे आहे तिथे सुरक्षित रहाणच अपेक्षित आहे. त्यामुळे काहीच तक्रार नाही.

"इतर वेळी, घरावरून विमान जरी उडाल ना तरी.. दुनिया बहोत छोटी हैं! अस वाटायचं!"
आणि आता!! घरातल्या घरात ही क्वारंटाईन राहावं लागत तेव्हा.. सगळचं दूर वाटतं.

भारत अमेरिका.. "काही तासांचा प्रवास रे फक्त!"

"या कोरोना मुळे, सगळं थांबलं थांबलं वाटतंय!"

"आम्ही म्हातारी मानसं… घरात एकटी!"

"कंटाळलोय खूप!"

" एक एक क्षण वर्षा वर्षा सारखा वाटतोय".

"काय काय बघतोय, सगळचं अनपेक्षित!"…

"काय काय बघायचं आहे अजून कुणास ठाऊक!"

"टीव्ही मालिका अचानक बंद झाल्या.. आमचा विरंगुळा होतं तो.. आणि अचानक मालिका वाल्यांनी डोकं लावलं रे".

"मालिकेचा प्लॉटच बदलवून टाकला त्यांनी"

" बंद असलेल्या मालिका…परत चालू झाल्या.. सेट बदलवला होता फक्त"… कथेला नवीन वळण! मिळालं होतं.

आम्ही मात्र पुढच्या क्षणी काय? मनात भीती घेऊन जगत होतो.

आणि एक दिवस, सर्दि, खोकला, ताप, कोरोना सस्पेक्टेड…

"सर्दी खोकला झाला कर टेस्ट..
अँटीजेनने समाधान झालं नाही तर आरटीपीसीआर करा" हा काढा, तो काढा, प्रीकॉशन घेऊन मनात धाकधूक होतीच. सॅनीटायझर ने अंघोळ तेवढी करायची बाकी होती. क्वारंनटाईन व्हावं लागलं.


"वाटायचं खूप दूर कुठे तरी, जावं निघून!"

"जिथे मोकळा श्वास घेता येईल..
कोरोनाच भय नसेल"..

"उद्याचा दिवस कुणी होता पहिला".."पण तो दिवस येण्यापूर्वी एक दिवस छान आनंदात मात्र जगायचं होतं".

तुला, सांगायचं राहूनच गेलं. कारण तू सतत बिझी.. बऱ्याच दिवसात बोलणं झालं नव्हतं आपलं. तुला ही असतात ना रे तुझे व्याप.. तू तुझ्याच व्यापात…

"आणि.. निघलो, एक दिवस!!
सगळेच!" एकमताचे!!
मोकळा श्वास घ्यायला

अलिबागच्या फॉर्म हाऊसचा फोन नंबर होता खाली लिहिलेला!

पत्र वाचून, सृष्टी आणि राघवच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.. राघवने मिहिरला कॉल करून बोलावून घेतलं…

काहीतरी उमेद जागली होती मनात!

आज घराला, कुलूप लावताना, राघवचे हात मात्र थरथरत होते.!!

राघव, सृष्टीने थोडा प्लॅनमध्ये बदल केला.
आणि ते दोघे निघाले मिहिरला सोबत घेऊन अलिबागसाठी.

आणि बघतात तर काय?

दूर एकांतात, गर्दी पासून दूर..
कुठल्याही रासायनिक कीटक नाशक औषधे न वापरता केलेली.. ऑरगॅनिक पद्धतीची खूप मोठी शेती…आणि मोठ्ठं फॉर्म हाऊस..

मिहिरचे आईबाबा आणि शेजारी सुद्धा!!

समोर आई बाबांना बघून, मिहिरला भरून आलं.

मिहिरने बाबांना नमस्कार केला… आईला घट्ट कवटाळून घेतलं आणि तो खूप रडला..

"मिहिर बाळा, माफ कर".
"आमचा उद्देश तुला दुखवण्याचा नव्हता".
"आपल्या माणसाला गमावण्याच दुःख जेव्हा होत तेव्हा वेळ हातून निघून गेलेली असते".

"तू सतत तूझ्या व्यापात.. पण हा पोरगा, जणू संजीवनी घेऊन आला आमच्या आयुष्यात"..

"फक्त हवापालट म्हणून आलेलो आम्ही, इथेच रुळलो.. गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जिथे… आम्ही आम्हाला नव्याने भेटलो".

"तू कधीतरी येशील, माहिती होतं!\"

ह्या घे किल्ल्या, तुझ्यासाठी अरिहंतच्या दुसऱ्या नव्या प्रोजेक्ट मध्ये अपार्टमेंट बुक केलाय आम्ही.. हे त्याचे पेपर्स.. मिहिरचा बाबांनी पेपर्स मिहिरच्या हाती सोपवले.

"आम्हाला आता, काहीच नको.. आम्ही आमचा राहता बंगला बिल्डर च्या नावाने करून, लाईफ टाईम मेंबर झालोय या फॉर्म हाऊसचे".

"इथे आनंदात आहोत आम्ही"…
या आमच्या
"वसुंधरा एक नवी सुरवात!". "old age club!!" मध्ये…

मिहिरला रडू आवरेनास झालं होतं…

आमच्या सारख्या.. आयुष्याच्या उत्तार्धात, नवी उमेद देणारं हे प्रोजेक्ट… या आमच्या मानस पुत्राने आमच्यासाठी तयार केलंय.. मिहिर चे बाबा आनंदात होते.

"आमच्यासाठी जीवावर उदार झाला रे हा पोरगा!
म्हणाला तुमच्या आनंदासाठी सगळं काही".

"क्लब हाऊस मधून निघाली अंबुलन्स", विथ परमिशन डायरेक्ट त्याच्या फॉर्म हाऊसवर… घेऊन आला रे तो आम्हाला".

"आहाहा!! काय त्या आंब्याच्या बागा.. काय तो समुद्र..
अथांग!"

जबाबदाऱ्या, कर्तव्य निभावताना जगायचं राहूनच गेलं होतं की काय, अस वाटलं इथे आल्यावर. आणि रमलो रे तिथेच!!

अथांग आनंद देऊन गेला!!
हा समुद्र!!
"अलिबागचा!!"

तेवढ्यात, मिहीरच्या मोबाइलवर एक कॉल आला..
भेटले का तुमचे आई वडील…

"प्रॉपर्टीच काय झालं?" उलगडल का सत्य!
"धोकाधाडी, फसवणूक, अन्याय.. याची चार वेळा येऊन ज्याप्रमाणे चौकशी केली ना तशी दूर देशातून कधी तरी एक कॉल करून आईवडिलांची चौकशी करत जा!"

"घर, दार, प्रॉपर्टी मिळवता येते पण, आईवडील नाही हो मिळवता येत".

पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर, फक्तच उडवाउडवीची उत्तरं देऊन प्रश्न विचारून भंडावून सोडणारे इन्स्पेक्टर… समोरून बोलत होते.

नात्यांना एक नवी दिशा देणारा, जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी …जाणूनबुजून रचलेला सापळा!! होता जणू!!..

मिहिर आला तसा….आपले ही मुलं आपला शोध घेत घेत कधीतरी येतील.. या आशेने, शेजारी उभे असलेले काही जण.. रस्त्याकडे आपल्या लेकरांना नजर भरून बघण्यासाठी आतुर दिसत होते.…वातावरण भारावलं होतं.

तत्क्षणी, सगळ्यांचे डोळे पाणावले…

मिहिरने, व्हिडिओ कॉल करून.. सगळे सुखरूप असल्याची माहिती दिली… बऱ्याच दिवसानंतर, वेळात वेळ काढून सगळे.. एका स्क्रीनवर होते. एकमेकांची चौकशी करत होते.

विमान सेवा सुरू झालीय, कदाचित तू याच काळात आलास तर.. उगाच चुकामुक नको, म्हणून एक छोटंसं पत्र.. मिहिरसाठी, तारा आजीना देऊन आल्याचं मिहिरच्या आईने सांगितलं.

मिहिर, दोन दिवस थांबून.. अमेरिकेला जाणार होता..

सृष्टी आणि राघव अलिबाग वरून सरळ गावीच गेले.

राहत असलेल्या, बंगल्यातल्या आजी आजोबांची माई आप्पाला आणि आई बाबांना सगळी हकीकत सांगितली.. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

"वसुंधरा, एक नवी सुरुवात" च्या निमित्ताने एकटेपणावर शोधून काढलेला एक सुंदर उपाय डोळ्यात हसू देऊन गेला.

"बाळांनो, आयुष्य हे क्षणभंगुर आहे… शरीराला मरण आत्मा तर अमर आहे"..

"शरीर सोडून गेल्यावर, आत्म्याची शांती होण गरजेचं!! माई आप्पाचे अनुभवाचे बोल होते.

प्रयत्न करून... राघव ने तारा आजी आणि आजोबांच्या मुलाचा म्हणजे रोहन सरदेसाईचा नंबर मिळवला.. आणि त्याला सगळी हकीकत सांगितली...

दूरदेशी, असलेला रोहन सगळ ऐकून स्तंभित झाला होता...


राघव आणि सृष्टी, बंगल्यात परतल्यावर…त्यांनी आज एक छोटीशी पूजा ठेवली होती…

बऱ्याच वर्षानंतर रोहन आज सहपरिवार पहिल्यांदाच भारतात परतला होता..

पूजा पाठ तर फक्तच एक सोपस्कार उरला होता... कारण भरल्या डोळ्यांनी आणि तृप्त मनाने तारा आजी आजोबा कधीचेच निघून गेले होते.. बहुतेक परतून कधीच न येण्यासाठी..


कथेचा वास्तविकतेशी काहीच संबंध नाही. कथा पुरंत: काल्पनिक आहे.. राघव आणि सृष्टीच्या दृष्टीने एकत्र कुटुंब त्यातून मिळणारं समाधान म्हणजे सगळं काही. तर अनेक वर्षात साधं फिरकुन ही न बघणारा मिहिर.. आई वडीलांच्या दूर जाण्याने दु:खी होतो. आपल्या आई वडिलांना बिल्डरने फसवलय, सहन न झालेला मिहिर त्यांच्यावर झालेला अन्याय बघू शकत नाही, सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलीस केस करतो.. तेवढ्यासाठी वारंवार येतो…
तर दुसरीकडे, डोळ्यात तेल टाकून मिहिर आला तसा, आपल ही लेकरू, कधी ना कधी परतून येईल म्हणून आस लावून बसलेले आईवडील..

"सोळा संस्कारात एक मानला गेलेला", मरणोपरांत संस्कार न झाल्याने.. मुक्तीसाठी आसुसलेले बंगल्यातले आजी आजोबा! जे आईवडील बोट धरून चालायला शिकवतात त्यांच्या थकल्या शरीराचा, आधार होता न येणं याहून मोठ दुःख ते काय असणार..
कर्तव्ये, जबाबदाऱ्या असतातच त्यांना नाकारता येत नाही..
घरातले वयोवृद्ध, ते सुरकुतलेले हात आपल्याच लेकराबाळांच्या एका स्पर्शा साठी त्यांच्या दोन प्रेमळ शब्दांसाठी आसुसलेले राहतात बरेचदा.

(ही कथा, पूर्णपणे काल्पनिक आणि, वस्तविकतेशी काहीही संबंध नाही. पात्रांची नाव सुद्धा काल्पनिक आहेत. प्रेमाने ओतप्रोत सुखी, त्याच प्रेमासाठी आसुसलेल्या अनेक कुटुंबाची कहाणी कथा रुपात लिहिण्याचा प्रयत्न केलाय.. रहस्य कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया लाखमोलाच्या असतील, ज्या लिखाणाला प्रेरणा देतील. धन्यवाद.

समाप्त

-©® शुभांगी मस्के…

🎭 Series Post

View all