फेरी तिसरी (रहस्य कथा)
बंगला… अव्यक्त रहस्य
भाग : ११
-©®शुभांगी मस्के…
"अरिहंत\" सोसायटीच.. सेकंड फेजच काम सुरू झालं होतं. वय झालं होतं आता बिल्डरच. बिल्डरने सारा कारभार आपल्या मुलाकडे सोपवला, आता हे नवं प्रोजेक्ट त्याचा मुलगा सांभाळायचा".
"पूर्वीपासूनच तो वडिलांसोबत यायचा, जायचा, मदत करायचा. सोसायटीच्या प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं त्याने".
"कोरोनाचा फटका त्याच्या ही बिझनेसला बसला.
काम बंद झालं त्याच".
काम बंद झालं त्याच".
"मी पूर्वी पासूनच परखड".
"मुळात कुणावर विश्वास ठेवावा एव्हढा विश्वासच उरला नव्हता".
"कोरोना दरम्यान, बिल्डरचा मुलगा सगळ्यांना काय हवं नको ते बघायचा, चौकशी करायचा. मला त्याचं वागणं खटकायच".
"धोकाधाडी, अफरातफरी फसवणूक समाजात होणाऱ्या या गोष्टी बघत होतोच त्यामुळे म्हातारपणाचा फायदा घेऊन आपल्याला तो फसवतो की काय असच वाटायचं".
"आमची ही, मला नेहमी म्हणायची, मेलेल्यांचे आकडे बघत बसता, न्यूजपेपर मध्ये कोणी कोणाला फसवल, मारलं हे वाचत बसण्यापेक्षा.. आजूबाजूच्या चार चांगल्या गोष्टींकडे बघा. कुणास ठाऊक आपण जो विचार करतो, तसच वागतो, मी माझ्याच तोऱ्यात राहायचो.".
"रिकाम्या बंगल्यात, पीजी तत्वावर मुलांना ठेवलं आणि मी या गोष्टीचा कडाडून विरोध केला,वाद वाढवला. मला वाटायचं कॉलेज च्या मुलांना घेऊन हा काहीतरी अनैतिक काम करेल, आजकाल काय काय वाचत होतो ना मी पेपरमध्ये".
"तुम्ही डॉक्टर म्हणून जसे दवाखान्यात आपलं कर्तव्य बजावत होतात ना तसे तुमच्या आमच्यातले, बिल्डर सारखे अनेक हात मदतीला धाऊन आले होते. पण मानसातला चांगुलपणा ओळखायला तशी नजर लागते जी माझ्याकडे नव्हती".
"आयुष्याच्या सारीपाठावर घडलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना काही क्षणात राघवच्या डोळ्यासमोर उभ्या झाल्या होत्या".
"एक दिवस, झोपाळ्यावर पेपर वाचत बसलो होतो.
ही इथे आराम खुर्चीत बसली"..
ही इथे आराम खुर्चीत बसली"..
"चार दिवस अंगात खूप ताप होता हिच्या".
\"डॉक्टरला मी कॉल केला".
"डॉक्टर घरी तपासायला आले".
"सगळ्या तपासण्या झाल्या".
\"डॉक्टरला मी कॉल केला".
"डॉक्टर घरी तपासायला आले".
"सगळ्या तपासण्या झाल्या".
"औषधाला गुण आला".
"हिला थोडं बर वाटत होतं"..
"पाच दिवसानंतर, छान फ्रेश होवून ही हॉलमध्ये या खुर्चीत येऊन बसली"...
"हिला थोडं बर वाटत होतं"..
"पाच दिवसानंतर, छान फ्रेश होवून ही हॉलमध्ये या खुर्चीत येऊन बसली"...
"हिला किचनमध्ये पसारा नकोच असतो".
"ओट्यावरचा पसारा पाहून ही चिडली".
"मी आहे म्हणून बरं, माझ्यानंतर कस होणार तुमचं". "बोलताना हिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले"...
"ओट्यावरचा पसारा पाहून ही चिडली".
"मी आहे म्हणून बरं, माझ्यानंतर कस होणार तुमचं". "बोलताना हिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले"...
"ए वेडे त्यालाच सर्वांची काळजी.
तो करेन सगळं नीट…बोलताना तिचा श्वास चढला होता. ओठ सुकले आणि मी जवळचा पाण्याचा ग्लास तीच्या हाती दिला".
तो करेन सगळं नीट…बोलताना तिचा श्वास चढला होता. ओठ सुकले आणि मी जवळचा पाण्याचा ग्लास तीच्या हाती दिला".
"मी झोपाळ्यावर पेपर वाचत बसलो"
"अचानक तिच्या हातून ग्लास निसटला".
"ग्लास गलंडत गलंडत लांब गेला".
"आणि बसल्या बसल्या... तिची मान खाली झुकली"..
"मी ताडकन उठलो"..
तिच्या आराम खुर्ची जवळ बसलो".
"तारा तारा... काय झालं ग?"
"ये... तारा...काय झालं ग!"..
काय झालं!! माझे शब्द तोंडातल्या तोंडात विरघळले.
"संपलं होतं सगळं".
"मी तिथेच तिच्याजवळ बसून राहिलो"..
"अखेरचा, आमचा प्रवास सोबत सुरू झाला होता".
"त्या भगवंतालाच आमची काळजी"
"एकमेकांशिवाय ठेवलं नाही त्याने आम्हाला".
"एकमेकांशिवाय ठेवलं नाही त्याने आम्हाला".
शब्दातला केविलवाणा भाव.. हृदय पिळवटून टाकणारा होता…..
"आमची ही, एकटी आहे, जाऊ द्या घरी मला!!
मला जाऊ द्या"..
दवाखान्याचा एक बेड नका माझ्यासाठी गुंतवून ठेऊ. त्यापेक्षा एखाद्या गरजुला द्या त्याला खरचं गरज आहे…
\"आजोबांना अडमिट करून न घेता, मी तेव्हा दुसऱ्या एका पेशंटला अडमिट करून घेतलं\".
आजवर, guilt घेऊन जगत होतो. तत्क्षणी, राघवला हॉस्पिटलमध्ये घडलेला तो प्रकार आठवला..
आजवर, guilt घेऊन जगत होतो. तत्क्षणी, राघवला हॉस्पिटलमध्ये घडलेला तो प्रकार आठवला..
\"तेच होते हे आजोबा"....
\"हॉस्पिटलच्या नियमाविरुद्ध जाऊन घेतलेल्या निर्णयाने.. वाट्याला आलेला संताप… मिळालेला मेमो आणि काय काय.. झालेला मनस्ताप.. दोषारोपण.. आजोबांना डिस्चार्ज दिल्याचं guilt जे आजवर मी ओझ घेऊन बसलो होतो ते आज उरलं नव्हत.
आजोबांनी च कदाचित मला.. या बांगल्यासाठी निवडलं होत.
आजीची धूसर प्रतिमा.. गहिवरून म्हणली..
"बेटा, तुला घरात पाहिलं..
आणि वाटलं माझा रोहन घरी परतला".
आणि वाटलं माझा रोहन घरी परतला".
"आणि हिच्या रुपात.. सून मिळाली".
"पहिल्यांदा, जग सोडून जाण्याचं दुःख वाटलं"..
"आणि मोह आवरला नाही!! इथे थांबण्याचा"…
"घरात, दोन्ही ठाव जेवण शिजत.. आंबट गोड पदार्थांचा दरवळ घरभर पसरतो".
"तुमच्या दोघांमधल प्रेम, एकमेकांप्रती आदरभाव.. घरातल्या मोठ्यांप्रती तुमच्या मनात असलेला सन्मान, भरून पावलो"
"बाळांनो असेच राहा!".
"राहा तुम्ही.. अगदी खुशाल राहा! या घरात"..
"काही त्रास होणार नाही तुम्हाला आमचा!!
आणि धूसर प्रतिमा क्षणात दिसेनाशा झाल्या!"
सृष्टी आणि राजासचे डोळे भरून आले होते…
"काही त्रास होणार नाही तुम्हाला आमचा!!
आणि धूसर प्रतिमा क्षणात दिसेनाशा झाल्या!"
सृष्टी आणि राजासचे डोळे भरून आले होते…
आरामखुर्ची आणि झोपाळा, मंद हवेचा झोका यावा आणि धक्का द्यावा तशीच हलत राहिली…
खूप काही घडून गेलं होत काही तासात..
दुसऱ्या दिवशी... गावाला जायचं होतं!! मनात काहूर माजलं होतं...
बॅग भरायची होती.
वर सज्जावरून.. बॅग काढण्यासाठी राघव स्टूल वर चढला.
"सृष्टी.. मागे, एक काळी ट्रंक!".
आता कशाचीच भीती नव्हती…
राघवने वर चढून ती ट्रंक खाली उतरवली..
लहानपणापासून जपून ठेवलेले अनेक खेळणे आणि काय काय!! होतं त्या ट्रंक मध्ये.
"आणि एक डायरी!! बरीच मोठी!!
आणि त्यात होती!! एक कथा!!
बंगला!! एक अव्यक्त रहस्य…
जी कथा वाचायला पुरेसा वेळ नव्हता सृष्टी आणि राघव जवळ..
आणि त्यात होती!! एक कथा!!
बंगला!! एक अव्यक्त रहस्य…
जी कथा वाचायला पुरेसा वेळ नव्हता सृष्टी आणि राघव जवळ..
आणि एक पत्र सापडलं!!
शीर्षक होत!
"शेवटचा प्रवास सुखद व्हावा म्हणून?"
काय लिहिलं होतं पत्रात!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा