Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग १०)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग १०)


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… अव्यक्त रहस्य

भाग : १०

-©®शुभांगी मस्के…

"अरे कोण आहात तुम्ही, हिम्मत असेल तर या सामोर.
सृष्टी पण राघवच्या मागोमाग बाहेर आली"..

"म्हणत होते ना!! सांगत होते तुला, हा झोपाळा, ही आराम खुर्ची काढून फेक".. सृष्टी रडायला लागली..

"अरे, कुणाचं काय वाईट केलंय आम्ही, म्हणून असा त्रास देताय"...

"अनेकदा आलं माझ्या मनात पण अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा, माझ्या, मताला ते पटत नाही, म्हणून. पण आत्ता नको".

आणि खुर्चीला जोरात लाथ मारून तो झोपाळा काढण्यासाठी राघव पुढे सरकला.

आणि थंड हवेची झुळूक आली!! अगदी नेहमीसारखी

"घाबरु नका रे बाळांनो!"

"आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा मुळीच हेतू नाही"...


"तुम्ही तर पृथ्वीवरचे देवदूत रे!" , "तुम्हाला त्रास देण्याचा विचार आम्ही करू शकत नाही रे बाळांनो".

"आणि आम्ही काय कुणाला त्रास देणार.. त्रास काय असतो? गेलोय आम्ही त्या त्रासातून"...

कधीच न बघितलेल्या दोन धूसर प्रतिमा, सृष्टीने राघवच्या हाताला घट्ट आवळून घेतलं...

तीची छाती धड धड करत होती... पायाखालची जमीन सरकतेय असच झालं होतं"..

"अरे कोण आहेत हे!! आतापर्यंत धीर गंभीर सृष्टी खूप घाबरली, दांदरली.

"घाबरु नको ग बाळा"

"तू तुझ्या आजीला माई म्हणतेस ना.. मी पण तुझ्या माई सारखीच"… सृष्टीला आश्चर्याचा धक्का बसला होता.


राघवने, सृष्टीला प्यायला पाणी दिलं... सृष्टीने लांब श्वास घेतला.

"राघव, चल इथून पटकन... एक क्षण ही थांबायचं नाही मला इथे, पाणीच काय श्वास ही गुदमरतोय माझा आता या घरात"...

"अपवित्र, शापित आहे ही वास्तू!".

"वास्तूदोष आहे या घरात!! सृष्टी थरथरत्या आवाजात बोलत होती"..

सृष्टी घाबरलेला पाहून या दोन्ही धूसर प्रतिमा गायब झाल्या.

"कसं काय शक्य आहे हे!","कशावर विश्वास ठेवायचा.. डोळ्यांवर की आपल्या अभ्यासावर जे आपल्याला सांगत. हा सगळा प्रकार अस्तित्वात नाही. सृष्टीला अक्षरशः बोलता बोलता कंप सुटला होता".

"तू थांब,सृष्टी".. राघवने तिला आश्वस्त केलं.

"कुठे चाललात तुम्ही. तुम्ही थांबा, काय हवय तुम्हाला ते कळू द्या आम्हाला एकदा"....


आणि धूसर प्रतिमा पुन्हा बोलू लागल्या..


"मी तारा, आणि माझे यजमान श्रीयुत चंद्रप्रकाश"

"आम्ही सरदेसाई"..

"छान सोन्यासारखा संसार होता आमचा"

"एकुलता एक मुलगा आम्हाला, रोहन".

"खूप शिकवलं त्यांला मोठ केलं".

"त्यांच्या पंखात बळ दिलं".

"रोहन हुशार होता, मोठ होण्याची स्वप्न बघायचा..
आम्ही त्यांची स्वप्न सत्यात उतरावित म्हणून निरंतर प्रयत्न करायचो"…

"रोहन मोठा इंजिनियर झाला". आणि एक दिवस गेला ना उडून, आमचं घर सून करून. आम्हाला एकटं सोडून..त्याच्या आनंदात आम्ही आमचा आनंद शोधला.


"डोक्यावर हक्काचं छप्पर असावं, म्हणून खूप काटकसर करून, पै पै गोळा करून, एवढा मोठा प्रशस्त बंगला खरेदी केला".

"एक एक वस्तू खूप आवडीने जमवली"..

"हा झोपाळा आणि ही आराम खुर्ची… आमच्या रोहनला खूप आवडायची".

"लांब लांब झोके घ्यायचा तो या झोपाळ्यावर, त्याचे मित्र आणि तो, काय उधम करायचे बाप रे बाप, त्यांची मस्ती बघून हे अनेकदा चिडायचे".

तारा आजीची धूसर प्रतिमा, बोलत होती...

"आमची ही ठार देवभोळ"... म्हणायची घर कसं, वास्तुशास्त्राप्रमाणे असावं. आपलं निभवलं लेकराला त्याचा दोष नको. त्यांचं सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडावं.

"या घराचा कोपरा अन् कोपरा... वास्तूशास्त्राप्रमाणे बनवून घेतला होता आम्ही. धूसर प्रतिमा आजोबांची पुढे बोलू लागली".

"आमचा रोहन, उच्च शिक्षणासाठी फॉरेनमध्ये गेला..
खूप आनंद झाला होता आम्हाला.
आमच्या कुटुंबात तोच एकटा सातासमुद्रापार गेला.
खूप अभिमान वाटायचा आम्हाला".

"लेकराच्या सुखात सुख शोधलं.
एक दिवस कळलं..
मुलगा मोठा झाला, प्रेमात पडला…
आता आयुष्यात ज्या एका गोष्टीची कमतरता राहून गेली होती ती लेकीच्या रुपात सून येऊन भरून काढेल".

"घराचं गोकुळ होईल लवकर..
एक आस असतेच मनात.
आम्ही स्वप्न बघायला लागलो".

"आपण लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होऊ दे, प्रत्येकाला वाटत. आम्ही कोणी वेगळं नव्हतो".

"एक दिवस कळलं, मुलाला लग्न न करता, लिव्हिंगमध्ये राहायचं होतं. पहिल्यांदाच ऐकलं होतं... हे सगळं".

"लग्न करून, एकमेकांच होऊन जगण्याच्या पिढीतले आम्ही, आमच्यावर संस्कार ही तसेच झाले".

"आमचा कट्टर विरोध!"

"आमचा विरोध… आमच्यावर एव्हढा भारी पडेन वाटलं नव्हत कधी".

"पोटच्या लेकाने आईवडिलांनाच नाकारलं"…

"ज्याला हे जग दाखवलं त्याच्या जगात आम्हाला जागाच उरली नाही".

"त्याच आमचं जग एकमेकांपासून वेगळं झाल".

"मुलं आईवडिलांना विसरु शकतात".

"आई वडिलांनी मुलांना कसं विसरायचं".

"आधुनिक पिढीचे आधुनिक विचार, स्वीकारायला आम्हाला वेळ नाही का लागणार. आम्हाला ते कठीण जात असल तरी पोटच्या पोराला सुखी बघण्याचा एकच अट्टाहास होता मनात".

"विसरु पाहत होतो आम्ही".

"कॉल केला तरी, आता त्याला आमच्यासाठी वेळ नव्हता". "

आमच्या विरोधासमोर प्रेम फिक पडलं होतं".

"एकदा गेला तो गेलाच पुन्हा फिरकून कधी त्याने बघितलंच नाही".

"आईवडील जिवंत आहेत की नाही याची सुद्धा मुलांनी दखल घेऊ नये, यापेक्षा मोठ दुर्दैव ते काय?"

"आपल्या पोटच्या लेकराला, नजरभर बघण्यासाठी आम्ही मात्र दिवसरात्र झुरलो". आणि निघून गेलो त्याला न भेटला.

"होतोच मी खडूस!\"…

"पण जीने नऊ महिने उदरात वाढवलं, जपलं, ही दुनिया दाखवली.. तिला ही विसराव या मुलाने. या सगळ्यात हीचा रे काय दोष!".

"कोरोना आला आणि सगळी दुनिया थांबून गेली.
सुरवातीला सुगंधा यायची, हवं नको ते बघायची".

"चिटपाखरू ही दिसत नव्हत रस्त्यावर.
घरासमोरचा मोकळा रस्ता खायला लागला.
अवतीभोवतीची स्मशान शांतता भयाण वाटू".

"तब्बेतीच्या कुरबुरी वाढल्या".

"मरणाची भीती नव्हती मात्र एकटेपणाची भीती वाटायला लागली".

"घरात पडून मरून राहू तर...
कुणी फिरकून ही बघणार नाही", अस वाटायचं.. अनेकदा…

कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही.
-©®शुभांगी मस्के…


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//