बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ९)

किती ही निर्भिड, धीट असल तरी.. अनभिज्ञ माणसांसाठी अशी अनपेक्षित परिस्थितीशी हाताळणं थोड कठीण होऊन जातं. तसच राघवच झाल.
अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… एक अव्यक्त रहस्य

भाग : ९

-©®शुभांगी मस्के…


आजोबांकडून फार काही माहिती मिळाली नव्हती.
राघवने आता सुगंधा ताईशी बोलायचं ठरवलं.

"सुगंधा ताई, या घरात राहणाऱ्या आजी आजोबांविषयी थोड सांगा बर!. खूपदा अस वाटतं, काहीतरी गूढ लपलय या घरात. प्रत्यक्षात सांगता येणार काय? पण आहे"…

सुगंधा, घाबरली!!

"घाबरु नका… राघवने आश्वस्त केलं".

सुगंधा बोलायला लागली.

"तारा आजी…शांत होत्या, सर्वांशी मिळून मिसळून रहायच्या. देखण्या होत्या अगदी… सोनचाफा असो की चाफा… छान दोन फुलं केसात माळायच्या. लेक म्हणजे जीव की प्राण. माझ्या सारख्या गरीब घरकाम करणाऱ्या बाईला ही त्यांचा आधार वाटत होता.

आजोबा, थोडे कडक होते स्वभावाला. तापट असले तरी आजीविषयी आदर होता त्यांच्या मनात. थोडे हेकेखोर होते, असतस पटायचं नाही त्यांना. कुणी त्यांच्यात फार लुडबुड केलेली आवडायची नाही त्यांना. "मेरी मुर्गी की एक टांग" अस होत आजोबांचं..

आपल्यातच असायचे, कामाशी काम. रिटायर्डमेन्टनंतर आपल्या बागेतच रमायचे. पोटच्या लेकराप्रमाने जपायचे बगीचा. फुलांना कुणी हात लावलेला आवडायचा नाही त्यांना. सोन चाफ्याची चार फुलं मात्र नेहमी आजीला केसात माळायला आणून द्यायचे.

त्याचा कोणावर पटकन विश्वास बसायचा नाही. म्हणायचे स्वार्थी झालंय जग, "केसांनी गळा कापतात" . "संधीसाधू लोकांची कमी नाही" जगात, भरवसा नव्हता त्यांचा फार कुणावर.

बऱ्याच बंगल्यात, एकटेपणाला कंटाळून. अनेकांनी सोबत म्हणून कॉलेजच्या मुलांना भाड्याने घर दिलं होतं. पीजी का काय ते?पण आजोबांना नव्हतं पटत ते.

कॉलेजची मुलं येत जात राहायची, सतत वरदळ असायची सोसायटीत, आजोबा कटकट करायचे. मुल रस्त्यावर उभे राहायचे, त्यांची बडबड, गोंधळ, आजोबांना चिडचिड व्हायची. आजसारखी शांतता नसायची तेव्हा अशी सोसायटीत.

आजी आजोबांचा मुलगा रोहन, खूप हुशार. आजोबांना तर खूप म्हणजे खूप गर्व त्याच्यावर. शिक्षणासाठी परदेशात पाठवलं त्यांनी त्याला. शिक्षण आटोपलं आणि त्याने तिथेच राहायचं नक्की केलं.

"माझं कुणावाचून काही अडत नाही", पैसा आहे तर सगळं आहे, म्हणणारे आजोबा नंतर नंतर मात्र खचले होते. डोळ्यात तेल टाकून वाट बघत असायचे मुलाची. एवढा तापट स्वभाव आजोबांचा पण हळूहळू शांत होत गेला. सुगंधा सांगत होती.

बायका बोलून दाखवतात. प्रेम व्यक्त करतात, रडतात. माणस बोलून दाखवत नाही ताई, पण तेही हळवी असतात. कधीकधी तर आजीपेक्षा जास्त तेच खचलेले दिसायचे, आजीला स्वत:पेक्षा आजोबांची जास्ती काळजी वाटायची.

एकमेकांना खूप जपायचे दोघेही!! छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणारे, हळूहळू, त्यांच्यातली नोकझोक ही कमी झाली होती.

"गेले कसे ग ते!" सृष्टीने विचारलं.

"काय माहिती?" महाभयंकर कोरोनाची लाट आली. "मला आणि माझ्या घरी सर्वानाच कोरोना झालेला, माझं यायचं बंद झालं".

"आणि एक दिवस कळलं.. आजी आजोबा गेले.. वाईट वाटलं खूप"..

" साधं शेवटच बघता पण आलं नाही". बोलता बोलता सुगंधाने डोळे पुसले.

"आणि बिल्डर कसा होता?"… राघवने विचारलं

"ते काही नाही माहित बा!". तसा चांगला तर होता, पण माणूस बदलायला कितीसा वेळ लागतो.

"इथले सगळे म्हणतात, मढयावरच लोणी खाल्ल त्याने" कुठे पचवेन म्हणून"…

" दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत, आजोबा नेहमी म्हणायचे.. त्यालाच उद्देशुन का काय माहिती नाही!"

"ते कॉर्नरच घर… मिहिर दादाच!"…

मिहिर दादाच्या बाबांचं आणि त्यांच खूप चांगलं होत. खूप पटायचं दोघांच… मुलासारखा होता त्यांच्यासाठी. आणि त्याने काय केलं? "त्यांचं घर आपल्या नावावर करून घेतलं".

"काय खर काय खोटं?" पण आपलं राहत घर कोण्या दुसऱ्याच्या नावावर करून द्यायला मूर्ख नव्हते मिहिर दादाचे बाबा! ऑफिसर माणूस होता तो.. हुशार होते.
सुगंधा इकडून तिकडून मिळालेली माहिती पुरवत होती".


"सुगंधा ताई, तुम्ही या कॉलनीत बऱ्याच वर्षापासून काम करता"..

"आजी आजोबा चांगले होते, कोणाच्या अध्ये मध्ये नसायचे".. पण तुम्हाला या बंगल्यात काही वेगळा अनुभव नाही का आला कधी.. राघवने विचारलं

सुगंधा : "कसा दादा?"

राघव : "असा काही!! अनपेक्षित".

सुगंधाला काहीच कळत नव्हत..

"म्हणजे त्यांची आत्मा वगैरे का! तिने आश्चर्याने विचारल".

"अगदीच तस नाही…पण आजूबाजूला कुणी असल्यासारखा".

"खर सांगू का दादा, मी घरात काम करते तेव्हा. माझ्या मागे उभ राहून तारा आजी, काम करवून घेते असच वाटत नेहमी!"

सुगंधाची काम आटोपली होती. निघणार होती ती, थोडी थबकून म्हणाली.

"ताई, माझ्या सासूबाईंच्या ओळखीचा एक आहे, जानता" .. पूजा पाठ करतो, भूत प्रेत बांधून ठेवतो. वास्तू दोष काढतो.. झाडफुक वगैरे वगैरे सगळं जमत त्याला. बाहेरचं वगैरे लागलेलं सगळ काढून देतो. कुणाच्या अंगात वगैरे येतं ते ही काढतो. मृतात्म्यांच्या
आत्म्याला तर बोटावर नाचवतो म्हणतात". घाबरतच सुगंधा बोलली.

"अग बाई, आमची देवावर श्रद्धा आहे, पण श्रध्देच रूपांतर अंधश्रद्धेत होवू देणारे आम्ही नाही".

आणि तू सांगते आहेस त्या सगळ्या तोटक्यांवर आमचा मुळीच विश्वास नाही. आणि मुळात अस काही नसत सुगंधा", उगाच अंधश्रद्धा असतात या.. हे जाणते लोकच फसवतात अगं, सृष्टीने सुगंधाला रागवलच.

"पुढचे चार दिवस आम्ही नसणार, गावाला जाणार तेव्हा येऊ नका. सृष्टीने सुगंधाला जाता जाता सांगितलं". सुगंधाने मान हलवली आणि निघून गेली.

वीक एंड होता.. दोघेही गावाला जाणार होते. थोडी खरदी करायची होती.

सृष्टी आणि राघव मार्केटमध्ये गेले.. माई आप्पा, आई बाबांसाठी आवश्यक ते थोड सामान घ्यायचं होतं त्यांना.

मिहिरला राघवने हॉटेलमध्ये सोबत जेवणाला बोलवून घेतलं होतं. दोन दिवसानंतर तो ही जाणार होता निघून. येऊन काहीच फायदा झाला नाही. आईबाबा सापडले नाही. काहीच सुगावा लागला नाही. upset झाला होता मिहिर खूप.

जेवण वगैरे आटोपून रात्री, सृष्टी आणि राघव घरी परतले.

माई आणि अप्पांबरोबर, बंगल्याबद्दल बोलायचं ठरवलं. हा फक्त सोपस्कार होता. माईंच मत काय असेन, घरच्यांचा निर्णय काय असेन त्यांना माहिती होता. राघवने ब्रोकरला, दुसरं घर बघण्यासाठी म्हणून फोन केला आणि ते झोपायला गेले…

मध्यरात्री, पुन्हा, भांड्यांची खुडखुड...
"म्हणतात ना... मन चींती ते वैरी न चिंती".
असच झालं होतं...

विश्वास नव्हता... पण जे काही आयुष्यात चालू होतं, जे काही भास व्हायचे, यावरून आयुष्यात खळबळ मात्र माजली होती..

"तारा, ये तारा.. उठ!! उठ ना गं!" राघवला भास झाला.

कोण आहे, कोण आहे? सृष्टी पण घाबरली.

घाम फुटला होता दोघांना ही.

किती ही निर्भिड, धीट असल तरी.. अनभिज्ञ माणसांसाठी अशी अनपेक्षित परिस्थितीशी हाताळणं थोड कठीण होऊन जातं. तसच राघवच झाल.

आज सोक्षमोक्ष लावायचाच त्याने ठरवलं..

त्याने खाडकन दरवाजा उघडला. तू थांब इथेच अस बोलून त्याने धाडकन दरवाजा बंद केला... बाहेर आला.


झोपाळा हलके हलके झोके घेत होता...

आणि खुर्ची.... खुर्ची ही हलत होती..

"कोण आहात!! कोण आहात कोण तुम्ही!"


"विज्ञानाला अध्यात्माची जोड असलेल्या विचारांचे आहोत आम्ही... मनात अपरंपार श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा आमच्या मनाला शिऊ शकत नाही".

"भूत खेत, काळी जादू वगैरे, प्रकार आम्ही मानत नाही. आमचे कर्म आहेत आमच्या सोबत, आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही"..

"म्हणतात आपली कर्म चांगली ठेवा, आणि आम्ही तर!! कुणाचं काहीच वाईट केलं नाही".

"या या चला या समोर!! खूप झालं आता तुमचं नाटक.. राघव जोरातच बोलत होता"..

"अरे या ना समोर या!! हिम्मत असेल तर या… राघव ओरडलाच".

कोण असेल? काय असेल? वाचत राहा.. बंगल्याच रहस्य.
(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही)
-©®शुभांगी मस्के…


🎭 Series Post

View all