Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ८)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ८)


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… अव्यक्त रहस्य

भाग : ८

-©®शुभांगी मस्के…


राघव आपल्या केबिनमध्ये बसला होता.. वेळ झाली तसा, राऊंडवर गेला. "डॉक्टर".... मला सुट्टी कधी होईल, एका पेशंटने विचारलं… आणि राघव दचकला!

"काय झालं डॉक्टर!" काही चुकलं का? पेशंट

राघव : सांगतो… पेपर्स तयार करायला..

\"तंद्रि भंगल्यासारखी… आजकाल अस बऱ्याच दा व्हायला लागलंय\"…

\"का आठवतात एकच एक गोष्टी.. का सुटका होत नाही. का मनातल्या मनात, एकच एक… गोष्ट घोळत राहते\"..

\"का अवघड जातेय… झालं गेलं विसरून जायला हवंय!\"

\"डॉक्टर.. आहोत!! आपल्या पेशाला शोभत नाही हे सगळं!\"

\"कसलं दडपण घेऊन जगतोय मी… कळेनासं झालंय" राघव चिंतनात गुंतला\".

\"दिवसागणिक हे वाढत चाललय का?\"

\"ऋत्विकची मदत घ्यायला हवी आहे का? आणि त्याने मानसोपचार तज्ञ असलेल्या ऋत्विकचा नंबर मोबाइल वर डायल केला"…

"काहीशा संकोचाने स्वतःच, कॉल कट केला"…..

एक दिवस, जेवणखावन आटोपलं आणि दोघेही बराच वेळ, झोपाळ्यावर मंद स्वरात गाणी ऐकत बसले. झोपेची वेळ झाली तसे दोघे रूममध्ये झोपायला गेले...

खोलीत, सोनचाफ्याची चार फुल.. कॉर्नर टेबलवर ठेवली होती सृष्टीने, फुलांचा सुगंध खोलीभर पसरला होता!!

सृष्टी आणि राघव लगेच झोपी गेले... कानात कुणीतरी कुजबुजल्यागत झालं आणि..आणि राघव खाडकन जागा झाला

तो रूम मधून बाहेर आला, झोका आणि ती आराम खुर्ची हलत होती... राघवला आश्चर्य वाटल.

\" खिडकी खुली राहिली का?, पण ती बंदच होती. त्याने दरवाजा खोलल्ला, बाहेर एक झाडाचं पान ही हलत नव्हत... तो घाबरला\"…

त्याच्या धडपडीत, सृष्टीला जग आली.
त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला.

"अरे पंखा असेल सुरू, बंद करायचा विसरु शकतो ना आपण\".. सृष्टी बोलली.

"नाही ग, फॅन बंदच होता....!! तसा तो पुन्हा तंद्रीत गुंतला"...

"कुणीतरी सतत आपल्या अवतीभोवती असत अस जाणवतं.. भीती नाही पण, आपली आपलीच गट फिलिंग असते!!"

"मला ही दोन चार वेळा हा अनुभव आला. राघव च्या बोलण्याला सृष्टीने दुजोरा दिला".

"कधी पाण्याचा ग्लास, तर कधी वाटी चमचा, पडल्याचा आवाज... सकाळी आलेला न्यूजपेपर तर कुणीतरी पूर्ण वाचून काढला असल्याचं जाणवत"...

राघवला अस गोंधळलेला पाहून, सृष्टीने राघवला कवटाळून घेतलं.

"पुन्हा तोच कुर्र कुर्र आवाज."...

"कोण आहे, कोण आहे रे तिकडे?"....

म्हणत, दोघेही आतून बाहेर आले... बाहेरचा दरवाजा उघडला... झोक्याला कुणीतरी धक्का द्यावा, आणि तो हलावा असा हलत होता.

दोघांनाही दरदरून घाम फुटला. दोघांनी ही एकमेकांना सावरलं...

कसं शक्य आहे यार! .. दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी, किती आणि काय काय, कशाकशाकडे दुर्लक्ष करणार..

काही गोष्टी मनाला पटत नसल्या तरी.. विचार करायला भाग पाडतात, तेच खरं!.. अखेर त्यांनी स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलं.

धीर देण्याचा एकमेकांना दोघेही प्रयत्न करत असेल तरी.. घाबरले होतेच दोघेही… पहाटे पहाटे सृष्टीचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी, शेजारच्या आजोबांबरोबर या विषयावर बोलायचं राघवने ठरवल.

बगीचाला पाणी घालत असलेल्या काकांकडे लक्ष गेलं तस राघवने काकांजवळ विषय काढला.

"राघव जरा गोंधळलेला दिसतोय", काकांनी ओळखलं. "काय झालं डॉक्टर साहेब, चेहरा थोडा उतरलेला दिसतोय. डॉक्टरीण बाई तर बरोबर ना! त्यांनी चौकशी केली"..

"सगळं ठीक".. राघव बोलला.

"हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक ना. आणि गावाला!"

"हो हो सगळ ओके आहे!" राघव उत्तरला

"काका आजकाल ना! सारखं अस वाटतं, घरात कुणी तरी आहे!" राघव बोलला.

"कुणी तरी म्हणजे? कोण?" काकांनी विचारलं.

कोण असणार त्या बंद घरात.. मागच्या वर्षी हेच ते दिवस.. आणि बोलता बोलता आजोबांनी खांदयावरच्या दुपट्ट्याने डोळे पुसले...

"काय झालं काका?" मागच्या वर्षी काय झालं?

"अरे, हे सूनेसुने बंगले बघतो आहेस ना... पूर्वी नव्हते रे असे सुनसान"

"पोरं मोठी झाली.. आपल्या आपल्या कामा धंद्याला लागली.

"कुणी कुठे कुणी कुठे?".

"पाखर उडून गेली रे.. दूर आकाशी" "आणि राहिले ते फक्त, आमच्या सारखे म्हातारे!"

समोरच्या क्लब हाऊसमध्ये, छान... भेटायचो .. गप्पा टप्पा व्हायच्या.. हास्य क्लब होता आमचा.

"कोरोना आला.. सगळं चित्र बदललं"...

"शेजारी सरदेसाई, राहायचे… चांगले होते दोघे नवरा बायको.. आपल्यातच राहायचे. कुणाच्या अधेमधे पडले नाही कधी".

"एक मुलगा होता, तो ही विदेशात".

घर आणि गार्डन… बसं वाहून घेतलं होतं. थोडे एकलकोंडे होते अस म्हणायला हरकत नाही.

"होळीला मी आणि आमची ही आमच्या गावी गेलो, तेवढ्यातच कोरोना आला आणि अडकलो तिकडेच, येताच आलं नाही".

"अध्ये मध्ये.. फोनवर बोलन व्हायचं. त्यांच्याकडून थोडीफार माहिती मिळत होती".

"सर्दी खोकला ताप असलेल्यांसाठी, कारोना टेस्ट अनिवार्य झाली. एरिया सिल करणे, पेशंटच्या घरांवर बोर्ड लावून इतरांना सावधगिरी बद्दलच्या सूचना देणे".

"कोरोनाच्या टेस्ट आणि टेस्ट पॉझीटिव्ह आली रे आली की हॉस्पिटलायझेशन. पेशंट वाढायला लागले आणि जागोजागी क्वारंटाईन सेंटर तयार झाले".

"पेशंट वाढायला लागले, बेड अपुरे पडायला लागले. आपल्या या क्लब हाऊसला पण क्वारंटाईन सेंटर बनवलं होतं".

"घरोघरी, कोरोना पेशंट होते. बऱ्यापैकी सगळ्यांना ट्रीटमेंटसाठी क्लब हाऊस मध्ये ठेवण्यात आलं".
पुढे एक एक करून बऱ्याच जणांची जीवन यात्रा संपली. दाराच्या फटीतून आत गेले ते त्यांचे मृत्यू पत्र फक्त. काहींच्या तर मागे पश्चात रडायला ही कोणी उरलं नव्हतं".

तुम्ही लोक तर, देवदूत होऊन झटत होतात.. ग्रेट आहात तुम्ही लोक.. आजोबा बोलत होते कौतुक करत होते.

पण त्याचा.. तुमच्या घरातल्या हालचालीशी काय संबंध.. आणि कसल्या हाल हालचालींविषयी बोलतो आहेस तू? आजोबा विचारात पडले.

"आणि बिल्डर" राघव ने विचारलं..

आपल्याला काही तसा अनुभव नाही त्याचा. आजोबांकडून फार काही माहिती मिळाली नव्हती.


कथेचा वस्तविकतेशी काहीच संबंध संबंध नाही. Ktha पूर्णपणे काल्पनिक आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. याची वाचकांनी नोंद घ्यावी.
काय होईल पुढे.. सापडेल का काही राघवच्या हाती काही पुरावा.. वाचा कथेचे पुढचे भाग. धन्यवाद.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//