Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य ( भाग ७)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य ( भाग ७)


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… अव्यक्त रहस्य

भाग ७

-©®शुभांगी मस्के…

आता, बऱ्यापैकी रूटीन चालू झालं होत. कधीकाळी काहीतरी पडल्या सारखं तर कधीकाळी काही तरी सरकवल्याचा भास व्हायचा.. आता सवय झाली होती या सगळ्याची..

हॉस्पिटलमधून थकून आल्यावर, दोघांना ही काहीच त्राण उरायचे नाही आणि पडल्या पडल्या झोप लागायची.

बऱ्यापैकी, आता नव्या घरात, सृष्टी आणि राघव रुळत चालले होते. महिना होत आला होता, आपआपल्या कामात व्यस्त असलेल्या दोघांना, बाहेर पोर्चमध्ये असलेला झोपाळा लावायला काही सवड मिळाली नव्हती.

हॉस्पिटल जबाबदाऱ्या पेलताना स्वतःसाठी फार काही वेळ मिळतच नव्हता.

"अरे,एव्हढा छान झोपाळा तसाच पडला आहे बाहेर, लावुया ना आपण, एका सुट्टीच्या दिवशी, सृष्टीने हट्टच धरला".

आज बऱ्याच दिवसानंतर, थोडी सवड मिळाली होती.

राघवने ही आळस झटकुन, भिंतीला टेकवून ठेवलेला झोपाळा हॉलमध्ये कड्यांमध्ये अडकवला...

"वाह !! किती मस्त.. सृष्टी, पटकन येऊन झोपाळ्यावर बसली. हलके हलके झोके घेऊ लागली".

राघवने, एका कोपऱ्यात, आराम खुर्ची ठेवली राघव आरामात, आराम खुर्चीत बसला, खुर्ची हलके हलके हलवत होता.

"आपल्या आप्पासाठी, घेऊ या ही आराम खुर्ची.. आप्पा छान बसले राहतील, बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना.. बघत राहतील. आजी घरच्या झोपाळ्यावर बसली राहिलं.. आणि त्यांची नोक झोक ऐकून.. घराचं घरपण टिकुन राहिलं".

"आयुष्याच्या उत्तार्धात..
निवांत असा ही यावा
हलके हलके झोके घेत
प्रवास सुखाचा व्हावा!!"

वाह!! वाह!! बसल्या बसल्या राघवने रचलेल्या चारोळीवर सृष्टीने दाद दिली.

तेवढ्यात, मिहीर आला...

मिहिरचा स्वर खोल गेला होता..

"काय झालं मिहिर?". राघवने विचारलं..

"अरे, अरिहंतचा बिल्डर ह्यात असेल की नाही". की कोरोनात तोही, शक्यता नाकारता येत नाही. तो बोलता बोलता थांबला.

"आईबाबांबद्दल तर विचार ही करवून होत नाही रे". काय करू?

"जावं लागेल आता, थांबून फायदा नाही.. संपलं सगळं!! मिहिर हतबल झाला होता".

"मिहिर, यार वाईट वाटेल तुला… आता नाही रे गड्या.. संपलं तर या आधीच होत"… (कदाचित तुझ्यासाठी आता पण त्यांच्यासाठी कधीच)

बघतो तिकीट करतो… सांगतो तुला!! थोड्या फॉरमलिटीज करायच्यात.. त्या झाल्या की निघतो…
एवढं बोलून मिहिर निघून गेला…

"गड्या चूकलास तू"…

"जसा आता आलास तसा , पूर्वी येत राहिला असतास तर". "निदान हे अपराधी पण तुला बोचल नसतं".. "ही दरी तयारच झाली नसती". नाती अशी विस्कटली नसती.

"का करता रे गड्यांनो असं… करिअर महत्वाचंच!! दुमत नाहीच पण… काही जबाबदार्यांकडे पाठ फिरवून चालत नाही… कधी कळणार तुम्हाला"..

"आज, जग तर एवढं जवळ आलंय की.. एक कॉल केला तरी.. ख्यालीखुशाली कळते..
"शरीराने तर जाताच पण मनाने ही दूर गेले असता तुम्ही"…
सॉरी पण चुकलास तू .. आणि आता पश्चातापाशिवाय दुसरा मार्ग नाही. राघव पाठमोऱ्या मिहिरकडे बघत बोलला.

"थंड हवेची झुळूक आली आणि मनावर कुणीतरी फुंकर घातल्यासारख वाटलं राघवला"…


"पर्याय नाही.. आता थांबाव लागेल असं वाटतेय".

मिहिरला गेट पर्यंत सोडायला आलेला राघव, गेट समोर उभा होता… तोच, एका बंगल्यासमोर!! पाच, दहा, पंधरा लोकांची गर्दी दिसली..

खूप उत्सुकतेपोटी.. राघव त्यांच्या जवळ जावून उभा राहिला….

खूप बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून सगळे आले असल्याचं जाणवलं.

सगळे, एकमेकांच सांत्वन करत होते.. जाताना किती हाल झाले यावरून विषय चघळत होते. हळहळत होते. कुणाचे तरी अंतिम कार्य, वर्षभरानंतर पार पडलं होतं. पेंडमिक नंतर, आता घरच्यांना ते बहुतेक शक्य झालं होत.

राघव जड अंःकरणाने घरी परतला. काहीशा विवंचनेत हॉलमध्ये आराम खुर्चीत येऊन बसला.

आतून घर झाडत येताना, सुगंधा जोरात किंचाळली!

"आ…आ…..जी!!!!!
"आ…..आ…..जो….बा!" सुगंधाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते".

सुगंधाला, दरदरून घाम फुटला होता...

"अहो सुगंधा ताई, काय झालं"…

"अहो दादा, आ…. जोबा खुर्चीत बसून असल्याचा भास झाला "..

एकटक खुर्चीकडे बघत सुगंधा स्तब्ध एका जागी उभी राहून बघत राहिली.

राघवला हसूच आलं...

"काय दादा, माझ्यावर जीव जायची वेळ आली आणि तुम्ही हसता होय"... ती ही हसली.

"आजी आराम खुर्चीत आणि आजोबा झोपाळ्यावर बसलेले असायचे"..

"आजीला झोक्याचा फार त्रास व्हायचा.. झोके घेतले की गरगरायचं त्यांना. आजोबा आराम खुर्चीत, बसले की लवकर सहज उठता यायचंच नाही त्यांना".

"मग काय, आजी आराम खुर्चीत आणि आजोबा, झोपाळ्यावर बसले असायचे".

"आमच्यासारख्या म्हाताऱ्याच्या थांबलेल्या आयुष्याला वेग आल्याचा निदान भास तरी होतो. असं म्हणायचे".

"थांबलं होत, त्यांचं आयुष्य, एक दिवस संपल ते संपलं.. बोलता बोलता सुगंधा काम करायला निघून गेली"...

"आपल्याला गंमत वाटते, पण असे धस्के... महाभयंकर असतात बरं का?" सृष्टी शांतपणे बोलली..

"किती दिवसात, मलाही बऱ्याचदा... असाच कशाचा आवाज येऊन.. धाडकन जाग येते... नंतर झोपच येत नाही.. मन विचारात गुंतत .. काहीतरी अर्धवट राहून गेलंय अस वाटतं"

" मुळात, या सगळ्या गोष्टींवर किती विश्वास ठेवावा, हा वादाचा विषय". सृष्टीच्या मतावर राघव बोलला.

"काही negative energy वगैरे असावी का या घरात?" सृष्टी पाळणा आणि झोपाळ्याकडे बघत बोलली.

"हे भास वगैरे मनाचे खेळ... माझा विश्वास नाही या सगळ्यांवर".. "पण ,मला ही कधी कधी वाटतं, चाहूल आहे अवतीभोवती कुणाची तरी".. राघव सृष्टीचा हात हाती घेत म्हणाला.

"एक मात्र लक्षात ठेवायच, डॉक्टर आहोत आपण!" आपल्या पेशालाच काय आपल्या शिकल्या सवरल्या बुद्धीला ही पटत नाही या गोष्टी"… सृष्टीने ही राघवच्या हो ला हो मिळवलं...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//