Feb 26, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ६)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ६)


अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… अव्यक्त रहस्य

भाग ६

-©®शुभांगी मस्के…


मध्य रात्री कसल्याशा आवाजाने, राघवला जाग आली..
भास झाल्यासारख वाटलं त्याला, जवळ पाण्याची बॉटल होतीच त्याने घटाघटा पाणी प्यायलं ...

"कसला आवाज होता?".. खिडकी वगैरे खुली राहिली तर नसेल, त्याने खात्री केली.पुन्हा येऊन झोपला.

या कडावरून त्या कडावर, झोपेचा प्रयत्न करू लागला. झोप काही केल्या येईना..

पहाटेचे पाच वाजले होते. पडून पडून कंटाळला होता.. उठून त्याने, खिडकी उघडली, मंद वाऱ्याची झुळूक आत आली आणि तो शहारला!! अंगावर काटा उभा राहिला!!

असं होत नाही कधी, अक्षरशः शहारलं होतं त्यांचं अंग, अंगावर उठलेले रोमांच, तो शहारा!! दोन्ही हात एकमेकांवर घासले, तेच हातावर चोळले, शिरशिरी क्षणात कमी झाली होती. त्याने खिडकी बंद केली तो पुन्हा, बेडवर येऊन झोपला.

सृष्टी, छान साखरझोपेचा आनंद घेत होती. तिच्या अंगावरच विस्कटलेल पांघरून त्याने नीट केलं.

लोटल्या लोटल्या, मोबाईलवर,काहीतरी बघत बसला…

पुन्हा कसलासा आवाज आला!l काहीतरी सरकवल्याचा.

आता सकाळचे सहा वाजले होते. दरवाजा उघडून तो बाहेर आला...

अरे हे काय? हा स्टूल असा इथे मध्येच कसा? त्याने स्टूल उचलून एका कोपऱ्यात ठेवला आणि बाहेर बगीच्यात आला. बाहेर एकदम फ्रेश वाटत होतं. छान झुळझुळ वारा आणि त्यात सोनचाफ्याचा मंद मंद सुगंध सर्वत्र दरवळत होता. तो पोर्च मध्ये खुर्ची घेऊन बसला.

मागून, गळ्यात दोन्ही हात… आणि तो चमकला..

"अरे, मी आहे, एवढं दचकायला काय झालं.. अंगावर बघ कसा शहारा आलाय". सृष्टी ने मागून येऊन हातांचा पाळणा त्याच्या मानेभोवती घातला होता.

काही नाही, त्याने नकारार्थी मान डोलावली.

"उठवलसं ही नाही, आवाज द्यायचा ना! किती लेट झालंय!". आईंचा फोन आला, रिंग वाजली तेव्हा,खडबडून उठले!"..
गावाला गेलो की कसं ना शिस्तीत वागतो आणि इकडे"..

"हो ग, आईची सकाळपासून खडबड खुडबड सुरू होते की इच्छा असूनही झोपावं वाटत नाही"..

"आईच्या हातचा बांगड्यांची किणकिण, तो कपांचा टीचटीच आवाज, चमचा पडतो तर कधी गाळणी, मग कसली झोप आणि कसलं काय. उठावचं लागत".

" अभ्यासाच जागरण असो की नाईट शिफ्ट मग मात्र, चिडीचूप असतात सगळे. संपावर जातात जणू", राघव बोलत होता..

"हो रे, एक दिवस तर माईंच डोकं खूप दुखतं होतं, मी हॉस्पिटलमधून, नाईट शिफ्ट करून, प्रवास करून गावाला गेले, थकले होते, झोप लागली अचानक". "उगाच मला त्रास व्हायला नको म्हणून त्यांनी, स्वत:ला त्रास करून घेतला होता".

"मला उठवायचं मात्र कटाक्षाने टाळल". सृष्टी बोलत होती अन् किचनमधून धडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला..

"मांजर वगैरे आली की काय घरात?", राघव धावत आत गेला.

"चहा गाळणी पडली होती!"

"इकडे आईच्या गप्पा आणि चहा गाळणी पडली बघ"...

" आईच्या हातून पण चहा गाळणी पडली असणार बघ तिकडे"...

" टेलिपथी काय आहे बघ!" राघव बोलत होता.

आठवण आली की उचकी लागते म्हणतात.. "किती भाबड्या समजुतींनी खूश होवून जातो ना आपण. सृष्टी बोलत होती.

" खरं खोटं करण्याच्या भानगडीत पडत नाही".

"हीच तर असते ना"."आपुलकीने सांधलेल्या नात्याची गंमत". बोलता बोलताच, राघवने चहा ठेवला..

"दोन कपात चहा गाळून घेतला"..

"साखर कमी झाली वाटत". सृष्टीने चहाचा एक घोट घेत म्हटल.

"नाही ग! नेहमी एवढीच घातली साखर"... राघवने एक घोट घेतला चहाचा.

"मला चालतो, तू तुझ बघ... तुला हवा असतो गोड चहा सकाळी सकाळी". सृष्टी

"नो वरीज मॅडम"...

"ओठों से छू लो तो, ये चाय मिठी हो जाये!" राघव जास्तीच मूड मध्ये होता.

"ये फिल्मी... गप्प रे!". सृष्टीने राघवच्या हातावर हळूच मारलं.

"यार वेगळाच रोमान्स आहे ना, वेगळं राहण्यात!". राघव पुटपुटला.

"काही काय! जे सुख एकत्र राहण्यात आहे ते वेगळं राहण्यात नाही!"... सृष्टीने रागात डोळे वटारले.

"गंमत केली ग! एवढी काय सिरीयस होतेयस"... राघव उत्तरला

"नाही आवडत मला अशी गंमत".. सृष्टी चिडून बोलली

"वाव!! आज संडे. छान, एन्जॉय करू आज"... राघव

"एन्जॉय काय? बॅग्ज खाली करायच्या आहेत,आज".

"उद्यापासून रूटीन चालू झालं की वेळ नाही मिळायचा", सृष्टी बोलली.

दोघांच्या गप्पा सुरू होत्या, तेवढयात सुगंधा आली.

आल्या आल्या तिचं लक्ष भिंतीला टेकवून ठेवलेल्या झोपाळा,आराम खुर्चीकडे गेलं आणि सुगंधाच्या डोळ्यात पाणी तरळलं....

"काय झालं सुगंधाताई!".

"काही नाही ताई". सुगंधाने डोळे पुसले.

"आठवण आली, तारा आजी आणि आजोबांची".

"खूप प्रेम दिलय आजींनी मला.. जीव होता त्यांचा माझ्यावर खूप"..

"मलाच मूर्खला त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करता आली नाही. नशिब… आणखी काय!" सुगंधा हळहळली...

"कमरेला पदर खोचला आणि सुगंधा कामाला लागली.

मिहिर चा कॉल आला,
"हा!!येतोयस का तू?"
ये.. ये!" मिहिर येत असल्याचं आणि थोडा चहा टाकण्याचा त्याने सृष्टी ला सांगितलं.

"वाव!! छान जसच्या तसं आहे रे गार्डन!".. मिहिरने आल्या आल्या गार्डन च कौतुक केलं.

"हो छान मेन्टेन केलंय". राघव

"आई बाबा नाहीच रे सापडत आहे",

"जवळच्या दूरच्या नातेवाईकांकडे खूप शोधल".

"कुणालाच काही पत्ता नाही".

"बरेच दिवस झाले म्हणाले संपर्क नाही".

"मी ही असा दूर, मी ही फार कुणाच्या संपर्कात नाही.
अनेकांचे तर घर ही विसरलो होतो. तिथल्या तिथे फिरत होतो पण घराचा पत्ता सापडत नव्हता".

"अनेकांनी तर मला ओळखलं देखील नाही"
"अनेकांनी.. ओळख दाखवून ही.. आता वेळ मिळाला का? म्हणत टोमणे मारले".
"असा पोरगा नको रे बाबा! म्हणत माझ्या असण्यावर पण ताशेरे ओढले".

"एक, दूरच्या काकू म्हणाल्या.. मुलांना जन्म अशासाठीच देतात का मायबाप!" तुमच्या सारख्या मुलांपेक्षा.. मुल नसलेले बरे नाही का?

"मावशी म्हणाली.. माझ्या बहिणीची तर कुस वांझ राहिली असच समजते मी.. माझा तू कोणीच नाही. म्हणून पाठ फिरवून निघून गेली".

"वाईट वाटलं रे खूप"..

"किती एकटे पडले असतील, माझे आईबाबा पॅन्डॅमिकमध्ये. घर खायला उठलं असेल. आता विचार करून ही अस्वस्थ होत".
मिहिर ने बोलता बोलता आसव पुसली.

"बिल्डर गायब आहे, लोक काय काय बोलतात?.. कळायला काहीच मार्ग नाही.. समजत नाही काय करू? मिहिर बोलत होता.

"अक्च्युअली वुई डोन्ट नो, व्हॉटस हॅपअन्ड".. विथ देम...लवकर सुटावा हा तिढा.. परतायचं आहे लवकर, मिहिर समोरून बोलला.

"रिपोर्ट्समधले बऱ्यापैकी सर्वच, या समोरच्या क्लब हाऊसमध्ये क्वारंनटाईन होते".
"त्यात तुझे आई बाबा पण असूच शकतात".
"काय झालं? कस झालं?". कुणालाच माहिती नाही. पण केस पुढे आलीच नाही. राघव बोलत होता. मिहिर बंद क्लब हाऊसकडे एकटक बघत बसला.

खूप वेळ मिहिर आणि राघव बोलत बसले होते. आणि थोड्याच वेळात मिहिर निघून गेला.

"कुठे राहता सुगंधाताई तुम्ही?"... सृष्टीने विचारलं..

"मी व्हय.. त्या पलिकडच्या वेटाळात राहते".

"आम्ही नवरा बायको, सासू सासरे आणि चार लेकरं आहेत"..

"नवरा ऑटो चालवतो, पोरं शिक्त्यात आणि मी घरकाम करते. सासू सासरे आहेत, घराले आधार आहे त्यांचा.

"दोन घास भाजी भाकरीचे खातो पण मेहनतीने करून खातो". बोलक्या स्वभावाच्या सुगंधाची काम करताना, बडबड चालू होती. एका दमात तिने सगळं काही सांगून टाकलं होतं".

"बघा ना ताई, एवढे मोठमोठे बंगले, ओसाड पडले हायेत.. म्हातारे मेले का संपलं सगळं"...

"आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला, आपलं माणूस असावं सोबत"...
"एकट्यात रडताना, कुढताणा, आला दिवस कसाबसा घालवताना, पाहिलंय मी या बंगल्यातल्या लोकांना".

"पैसा पाणी खूप… पण आयुष्यात एकटेपण". आणि शरीरानेच नाही तर मनाने दूर गेलेली त्यांचीच जवळची माणसं. सुगंधा बोलता बोलता हळहळली.

"त्यांच्यापेक्षा आपण लाख पटीने सुखी अस वाटत कधीकधी".. आणि सुगंधा काम करायला लागली.


सृष्टीने उरलंसुरलं, सगळं सामान अलमाऱ्यात ठेवलं. कपड्यांच्या घड्या कपाटात व्यवस्थित रचून ठेवल्या..

दरवाजे, खिडक्यांना पडदे लावले,सोफ्यावर कव्हर चढवले.आता सामान आपापल्या जागी व्यवस्थित लागल्यासारखं वाटलं.

काही सामान कुठे एडजस्ट करावं विवंचनेत असताना ..
सुगंधाने बऱ्याच वस्तू ठेवायला मदत केली.

भांडी कपड्याच्या साबण, वॉशिंग पावडर.. तिच्या वापरात येणाऱ्या वस्तू.. अगदी आजी ठेवायच्या तशाच पूर्वीसारख्या फळीवर रचून सुगंधाने ठेवल्या.

वॉशरूमवर असलेल्या सज्जात, बनवलेल्या खोपच्याच आता स्टूलवर चढून बॅगा, हाता वेगळ्या वरती ठेवायच्या राहिल्या होत्या.

लाईट लावलेला होताच, सृष्टीने लाईटच बटन दाबल..

आणि बघते तर काय.. आत कोपऱ्यात.. ट्रंकसारखं काहीतरी..


"अहो ताई, उतरा बरं तुम्ही, मी ठेवते बॅगा वरती" हट्टाने सुगंधाने सृष्टीला खाली उतरवल.

ती स्वतः वर चढली आणि सृष्टीने दिलेल्या बॅगा एक एक करून तिने आत व्यवस्थित सरकवल्या.

आता, सगळं सामान बऱ्या पैकी लागलं होत. अरे, सोबत येताना, चार सोनचाफ्याची फुलं घेवून ये, कोपऱ्यात ठेवायला सृष्टीच्या हाकेला, राघवने थम्स अप केलं...

सृष्टीने घरी व्हिडिओ कॉल लावला. घराचा कोपरान कोपरा दाखवला.

"माई हा झोपाळा.. आणि ही आराम खुर्ची.. हॉल मध्ये ठेवायचाय… छान दिसेल ना! सृष्टीने विचारलं".

"हो ठेव की!! बोलक्या माई घराचं तोंडभर कौतुक करत होत्या".

"पाय कसा आहे ग, बरा आहे ना! माईंनी विचारलं.. ठीक आहे माई, काळजी घ्या स्वतःची.. आणि या जमेल तेव्हा!" सृष्टी ने फोन ठेवला.

लेकरांचा सजलेला संसार बघून, घरी सर्वांना आनंद झालं होता. मुलं, आपापल्या जबाबदाऱ्या पेलताना आपल्या कर्तव्याच्या जागी कंफर्टेबल आहेत, आणि मुळात आपण त्यांच्या विचारात आहोत.. आठवणीने कॉल करतात, चौकशी करतात. ही जाणीवच आनंददायी होती.. सगळे आता निश्चिंत झाले होते. सृष्टी आणि राघवच रूटीन सुरू झालं होतं.

कथा आवडत असल्यास लाईक करा, तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहेच. काय होईल पुढे, वाचत राहा पुढच्या भागात.. खूप खूप धन्यवाद
-©®शुभांगी मस्के…

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//