Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला..एक अव्यक्त रहस्य (भाग ५)

Read Later
बंगला..एक अव्यक्त रहस्य (भाग ५)
अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला… एक अव्यक्त रहस्य

भाग ५

-©®शुभांगी मस्के…टेम्पोत सामान भरून झालं होत. टेम्पो निघाला, तसा.. मागोमाग काहीशा अंदाजाने राघव आणि सृष्टी टेम्पोच्या पाठोपाठ निघाले.

राघवच्या मोबाईलवर एक कॉल आला.. अरे, "अरिहंत सोसायटीतले. बरेच बंगले, बिल्डरच्याच नावावर आहेत".

"रिपोर्ट केली? त्याच काय झालं? राघव ने विचारलं
काही नाही रे.. उलट तपासणी..
कधी? काय? कसे?
शेवटच कधी बोललात?
संपर्कात का नव्हतात? वगैरे वगैरे..
असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात".

"काय झालं? कुणास ठाऊक?
अचानक कुणी असं गायब कसं होऊ शकतं.
पण आता हवे आहेत रे मला माझे आईबाबा
दूर गेल्यावर का कळत असावी
आईवडिलांची किंमत"..
मिहिर बोलताना हळवा झाला होता.
फोन ठेवला आणि, राघव विचारात गुंतला.

" अरे काय हे, काय चालू असतं तुझं, एखाद्या जर्नलीस्ट सारखे तुला आजकाल कॉल येत असतात.
"हा!हु! बोलून कॉल कट करतोस". विचारात गुंतलेल्या राघवकडे बघत सृष्टी बोलली.

काही नाही, त्याने" कार चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं".

"पुन्हा,फोनची रिंग वाजली.
"अगैन!" बघ पुन्हा..
कार ड्राईव्ह करतोयस ना!" सृष्टी चिडली.

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, त्याने फोन घेतला..

ब्रोकरचा कॉल आला होता.

"डॉक्टर साहेब,", अरिहंत सोसायटीतून अननोन नंबर वरून कॉल आला होता, अग्रीमेन्ट कॅन्सल करा म्हणून बजावलय त्यांनी मला...

बंगले फक्त,कॉलेजच्या मुलांना पिजी स्वरूपात देण्यात येतील, म्हणून सांगितलं त्यांनी, धमकवल आहे तस.

"इट्स नॉट फेअर…. अचानक आम्हाला असं कुणीच सांगू शकत नाही". सामान निघालयं आमचं आता"..

"स्टॅम्प पेपरवर अग्रीमेंट केलंय आम्ही. अकरा महिन्याच, अग्रिमेंट आहे, अडवान्स दिलाय पूर्व परवानगी शिवाय रद्द करू शकत नाही म्हणावं त्यांना..

"येतोय आम्ही.. बोलूच पोहचल्यानंतर"... राघवने तावातावात फोन कट केला..

"मूर्ख कुठला! राघवचा संताप संताप झाला होता!".

"अरे कशाला पडतो आहेस तू आता यात", "कशाला नसल्या भानगडीत अडकतोस"... सृष्टी चिडून बोलली.

"अगं, मिहिर... माझा मित्र!" राघव बोलला.

"आता त्याच काय?" सृष्टी..

अगं, तो बरेच वर्ष, विदेशात आहे?
त्याचे आईबाबा इथेच भारतात राहायचे..
आपण घेतलेल्या सोसायटी मध्येच त्याच पण घर होतं.. राघव सांगत होता..

"त्याचे आई, वडील अचानक एक दिवस, काय माहिती काय झालं?"…
घर पूर्वी त्याच्या बाबांच्या नावावर होतं म्हणजे नंतर त्या प्रॉपर्टीवर मिहीरचा हक्क असायला हवा होता"…

"पण त्यांचं राहत घर आता बिल्डरच्या नावावर आहे". राहत घर विकणाऱ्यातले ते नाही, असा ठाम विश्वास आहे मिहीरला..

"या बिल्डर ने काहीतर घोडबंगाल करून बळजबरीने घर आपल्या नावाने करून घेतलय अस वाटतय मिहिर ला आणि ते साहजिकच नाही का?"

"अचानक काका काकू गायब झालेत.
"बर गायब झालेल्यांपैकी, एक दोन आणखी आहेत, ज्यांची मुलं बाहेर गेलेली".. नोकरी निमित्ताने कोणी कुठे तर कोणी कुठे.. त्यांनी तर म्हणे अजूनपर्यंत फिरकून ही बघितलं नाही.

"बिच्चारा,हा मिहिर तरी, आईबाबांच कळल्या लगेच, वेळात वेळ काढून निघून आला भारतात".

"खूप शोधतोय तो, पण त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. पोलिस स्टेशन आणि बिल्डरच्या घराच्या चकरा फक्त. पण फायदा काहीच नाही"..

"आणि मुळात फ्रॉड केल्याची पोलिसात तशी तक्रार तरी कोण नोंदवणार? तशी तक्रार ही नाही कुणाची? मिहिरने आणि एक दोघांनी केलीय तशी तक्रार. पण आरोपाला वजन नाही.. बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली फक्त"..

वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी, पेपर्सवर सही असल्याने तो काहीच करू शकत नाही. राघव सांगत होता.

"डॉक्टर आहेस तू, तू काय करणार आहे, त्याला मदत.. पोलिस बघून घेतील काय ते?" सृष्टी चिडून बोलली.

स्पीड ब्रेकरवर अचानक कार उसळली आणि राघवने जोरात ब्रेक मारला.

"अरे हळू.. किती जोरात ब्रेक मारलास". सृष्टीने घाबरून उश्वास सोडला.

अरिहंत सोसायटीत कार पोहचली.पाठोपाठ सामानाचा टेम्पो ही पोहचला. शेजारच्या बंगल्यातले दोघे म्हातारे आजी आजोबा डोकावून पाहू लागले..

एक अनोळखी, बाई काहीशा.. संकोच भऱ्या नजरेने खाली उतरवण्यात येत असलेल्या सामनाकडे बघत त्याच शेजारच्या बंगल्यात शिरली.

बंगल्यातल्या आजी आजोबांनी, पुढे येऊन सृष्टी आणि राघवची चौकशी केली.

"मी राघव देवधर आणि ही माझी बायको सृष्टी".

"आम्ही दोघेही, डॉक्टर आहोत"...
"इथेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो".
दोन वाक्यात राघवने आपली ओळख करून दिली..

"ताई, मी सुगंधा घरकाम करते, तुम्हाला घरकामाला बाई लागणार असेल तर, मी करेन काम!"

सुगंधा शेजारच्या आजीकडे घरकाम करीत असल्याने, बाई चांगली असल्याची आजींनी पुष्टी दिली..

"सुगंधाताई उद्यापासून या कामाला!".. की आजपासून येता..

"नाही ओ ताई, आज नाही जमायचं"..

सुगंधाने, मनातल्या मनात काय विचार केला कुणास ठाऊक?
आणि दुसऱ्याच क्षणी, सुगंधा गेट मधून आत आली.

" द्या ताई झाडू," "चला, पटापट झाडून तरी देते आणि पुसून काढते घर पटापटा". सुगंधा कामाला लागली.

घर रिकामं होत, त्यामुळे सहज झाडल्या जाणार होतं.

सृष्टीने सगळ्या दारं खिडक्या पुसून काढल्या.

टेम्पोतलं सगळं मोठ सामान राघवने माणसांच्या हातून, उतरवलं आणि जागच्या जागी अगदी हवं तसं लावून घेतलं.

स्वयंपाक घरातलं लागतं लागतं सामान, भांडीकुंडी लावून घेतली. दिवसभराचा प्रवास आणि सामानाची उठाठेव करून थकवा आला होता.

आज दोघेही बाहेरच गेले जेवायला.

घर मोठ्ठं होत, त्यामानाने घरात जेमतेमच सामान.. त्यामुळे मोकळढाकळ वाटत होत.

ओंजळभर चाफ्याची फुलं सृष्टीने रूममध्ये एका कोपऱ्यात ठेवली. चाफ्याचा मंदमंद सुवास, रूमभर पसरला होता. रात्री, गादीवर पडल्या पडल्या झोप कधी लागली कळलच नाही....

काय होईल पुढे, काय असेल रहस्य.. कथेचे पुढचे भाग वाचत रहा... खूप खूप धन्यवाद
-©®शुभांगी मस्के…ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//