Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ४)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग ४)
अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला.. एक अव्यक्त रहस्य

भाग ४

-©®शुभांगी मस्के…
****

बाहेरून आलेल्या, आप्पांना धाप लागली, आणि राघव विचलित झाला… आप्पांना पाणी दिलं..

"अप्पा, मनाविरुद्ध घेतलेल्या निर्णयातून समाधान मिळत असेल तर.. काय हो करायचं!!" राघव

" त्या वेळेची ती गरज म्हणून सोडून द्यायचं!! विसरून जायचं, अप्पा बोलले".

"मला घरी जायचंय, आमची ही घरी एकटी आहे, वाट बघत असेल माझी". कधीकधी आठवत नाही तिला काहीच! खायचं काय पण, पाणी प्यायच ही विसरते.. भान हरवते अनेकदा.. माझ्याशिवाय कोण लक्ष देणार तिच्याकडे. मला जायला हवयं!!

माझ्यासारख्या म्हाताऱ्याला कशाला हवीय ट्रीटमेंट.. आज काय आणि उद्या काय? जगायचं तेवढं जगून झालंय माझ… हा तरणाताठा नवजवान.. याचं जगणं महत्वाचं!! सुरकुतलेला त्यांचा हात… खूप काही सांगून गेला…

आणि मी, पुढचा मागचा विचार न करता.. सुट्टी दिली. डिस्चार्ज पेपर्सवर साईन करताना हात थरथरले पण.. का कुणास ठाऊक, मनाला समाधान मिळालं होतं. आप्पांच्या वयाचा पेशंट.. त्या आजोबांची राघवला आठवण आली.

एका अर्थी त्यांनी, हॉस्पिटल मध्ये अडमीत करून घ्यायला जागा नसताना.. बेड फुल असताना, एका पेशंट चे प्राण वाचवले.. किती उदात्त विचार.…मी असमर्थ ठरलो पण, त्यांना नाही शोधू शकलो.. राघव विचारात गुंतला.

आयुष्याच्या प्रत्येक पडावावर... आपापली कर्तव्ये निभावणं क्रमप्राप्त असतात, त्यापासून सुटका करून घेता येत नाही. पण अनेकदा आपण असमर्थ का ठरतो ग माई! दाटून आलेलं पाणी लपवत, राघव आजीच्या कुशीत शिरला..

"हो रे बाळा.. काय काय सहन केलंय तुम्ही या दिवसांमध्ये".. माईने पदराने डोळ्याच्या कडा पुसल्या.

"खरचं गुणाची माझी लेकरं" आजीने दोघांना ही कौतुकाने कुरवाळलं.

"खरे देवदूत आहात रे बाळा तुम्ही लोक.. खरे देवदूत" माई गर्वात येऊन बोलत होती.

"फक्त आम्हीच नाही ग माई, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, आरोग्य सेवक". "एवढंच नाही तर घरी राहून आपली काळजी घेणारे, तू तुझी काळजी घे आम्ही सुखरूप आहोत म्हणून, आम्हाला निश्चिंत ठेवणारे, आपण सगळेच वॉरियर्स आहोत" , देवदूत आहोत. राघव बोलताना हळवा झाला...

"हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करवून घेण्याबाबतचे निर्णय असो कि रेमडीसिव्हरचा स्टॉक, गरीब रुग्णांसाठी तुझी तगमग, त्यावरून राजकारण किती उचलून धरला होता तो इश्यू, किती तो संताप. सृष्टी बोलली.

"माई, अगं एका एका श्वासासाठी आणि आपल्या जीवलगांच्या शेवटच्या भेटीसाठी तळमळनारे लोक बघितलेत गं, आठवून आजही डोळे पाणावतात"..

खूप काही शिकवलंय या महामारीने, महत्वाचं म्हणजे. नात्यांची किंमत करायला शिकवलंय. राघव भाऊक झाला होता.

"झालं गेलं गंगेला मिळालं".. आता सगळं छान होणार बघ.. राघव ने आश्वस्त केलं.


"आई, माई,आप्पा, बाबा",तुम्ही सगळे चला ना काही दिवस, थोडा बदल हवा असतो आयुष्यात! किती दिवस झाले कुठ आला गेला नाहीत तुम्ही". राघवने आग्रह धरला.

"नाही रे बाबा, आताशी प्रवास झेपत नाही आम्हाला". "तब्बेतीच्या कुरबुरी वाढल्यात ".

"हल्ली, गुडघे, कुरकुर करू लागलेत, चालायचं नाकारतात"..

"शरीर थकलं आता, आता नको वाटते दगदग"... माईंनी, डोक्यावरचा पदर सावरत म्हटल.

"माई, आम्हाला ही नाही जावं वाटत तुम्हा, सगळ्यांना सोडून, पण काय ना, पर्याय नाही आमच्या जवळ". सृष्टी बोलली.


"सृष्टी आणि राघवच्या सामानाचा शिफ्टींगच्या दृष्टीने, आई सगळं सामान जमवत होती. आठवणीने एक एक वस्तू, बरोबर सामानात ठेवली जात आहे की नाही बारकाईने माई लक्ष ठेवत होत्या.

लोणची पापड आणि एकामागून एक सूचना, एका काठून एका एकाच्या सुरू होत्या. सृष्टीच्या डोळ्यात राहून राहून पाणी येत होत..

"वेडी की खुळी ग बाई तू, अशी आसव का गाळतेस".. हल्ली पोरींना आपला आपला राजाराणीचा संसार हवा असतो. घरातली म्हातारी हाडं, जड वाटतात आणि आपली ही पोरं काही वेगळीच आहे. आई सृष्टीला उद्देशुन बोलल्या.

आजवर हॉस्टेलला राहालो. असा दुसरा संसार थाटनं माझ्या तरी पचणी पडत नाही..

"घरात कसं मोठ्या माणसाचं छत्र आशीर्वाद रुपात असावंच. वाटेकडे डोळे लावून वाट बघत असलेले, बाहेर गेलेली लेकरं परततील लवकरच म्हणत वाट बघणारे आप्पा असावे".

"बाळा आलीस का? म्हणत काळजीने विचारणारी एक माई असावी. जिच्या कुशीत स्वर्गाच सुख मिळाव".

"थकल्या भागल्या मनाला आल्या आल्या शांत करणारी.. आलीस बाळा, बस हा तू, म्हणत स्वयंपाक घरातून ग्लास भर पाणी हातात देऊन, चहा टाकते म्हणत लगोलग स्वयंपाक घरात जाणारी आणि जाताना... अगं अगं, पाणी हळू पी, घटाघट नको पिऊस म्हणत काळजी करणारी.. घरात एक आई असावी"..

"तुला आवडतात ना, म्हणून मुद्दाम आतून लाल गुलाबी रंग असलेले पेरु आणलेत.. पेरूच्या फोडी कापून त्यावर जुगतीने तिखट मीठ पेरून देणारे वडील असावे"..

तुम्ही सगळे नसालं ना तिथे सृष्टीच्या डोळ्यात कब्जा केलेली आसव आता गालावर ओघळू लागले..

" माहेर सोडून जातेयस असं वाटतंय".. राघव हसून बोलला.

"हा बघा ना हो आई, हा असा खोडी काढतो, याला सांगा, "डॉक्टर असले म्हणून काय झाले, भिंतीवरच्या पालीची भीती वाटूच शकते मला".

"एखाद वेळी रात्री भुताचा सिनेमा बघितला की, रात्री झोपेतून दचकून उठूच शकते मी. हा हसतो खूप आणि घाबरवतो"..

ये राघव, त्रास दिला ना माझ्या पोरीला. तर तू आहे नि मी आहे".. आईच्या बोलण्यावर सगळे खळखळून हसले

"हा!! आणि एक, डॉक्टर झालात म्हणून काय? ते डाएट वियट बाजूला ठेऊन चांगले खात पित जा"..

"हेच वय आहे खायचं प्यायच नंतर दातांचा खुळखुळा झाला की नाही, हो जिभेचे चोचले पुरवता येत".. माई बोलल्या

"आणि हो.. उशिरा पर्यंत मोबाईल नको.. वेळेत झोपत जा, वेळेत उठत जा". नाहीतर आजच्या तुमच्या पिढीच काय चालू असतं... उशिरा झोपायच, उशिरा उठायचं"... "लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वत: कोरडे पाषाण"....बोलताना आप्पांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

" हां!! आता जाता जाता, डोळ्यात पाणी नको, बरं आईंनी देवघरातलं हळदीकुंकवाच करंड आणलं".. सृष्टी आणि राघवने देवाला नमस्कार केला.

सृष्टीला हळदीकुंकू लावलं. माई, आईला सृष्टीने हळदीकुंकू लावून नमस्कार केला.

हां!! आता, घ्या मनावर! पतवंडाची सेवा करूनच जायचंय बरं का आम्हाला. माईंनी आशीर्वादाचा हात डोळ्यावर ठेवत सृष्टीला दोन्ही हातांनी कुरवाळलं. हाताची दहा बोट कांशिलावर मोडून दृष्ट काढली.

काय हो माई!! घरात काय लेकरं कमी आहेत का काय? आणि अजून एकाची भर, आम्हाला जगू द्या की आमचं आमचं बालपण, शिरू द्या ना आम्हाला छोट बनून तुमच्या कुशीत. सृष्टीने माईंना कवटाळून घेतलं.


टेम्पोत सामान भरून झालं होत. टेम्पो निघाला, तसा.. काहीशा अंदाजाने, कारने राघव आणि सृष्टी टेम्पोच्या पाठोपाठ निघाले..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//