"कशी आहे तब्येत?"रूद्रावती ताई
"बरी आहे.तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे आज मी जीवंत आहे."एकनाथ राव
"तिथले सगळे डॉक्टर रणविजयच्या ओळखीचे असल्यामुळे हार्ट सर्जरी लगेच झाली,नाहीतर सर्जरीच चार लाखापर्यंत जाते"रूद्रावती ताई
"काकू,मी जॉबला लागल्यावर तुमचे सगळे पैसे परत करेन"मुक्ता हिंमतीने बोलते
"तू आमचे पैसे परत करण्याची गरज नाहीय.त्याबदल्यात आम्हाला तुमच्याकडून एक गोष्ट हवीय.मुक्ता माझ्या घरची सून व्हावी असं मला वाटतं.जवळच्याच मुहूर्तावर दोघांचं लग्न लावू,लग्नाचा खर्च आम्ही करू"रूद्रावती ताई
त्यांनी अचानक घातलेल्या मागणीमुळे काय प्रतिक्रिया द्यावी,हे तिघांनाही कळेना
"मुक्ताच शिक्षण बाकी आहे अजून"एकनाथ राव
"तिची ईच्छा असेल,तर ती लग्नानंतर सुद्धा शिकू शकते"रूद्रावती ताई
एकता ताई कारण काढून मुक्ताला आतमध्ये नेतात
"आई,मदतीच्या बदल्यात लग्नासाठी प्रस्ताव कोण टाकत?"मुक्ता
"मग काय झालं!मोठ्या घरचं स्थळ येणं,साधी गोष्ट नाही.मला वाटतं,तू रणविजयशी लग्न करावं"एकता ताई
"काय??"मुक्ताला धक्काच बसतो
"अनोळखी असूनही किती मदत केली त्यांनी.लग्नाचा खर्च ते करणार आहेत.तुझ्या बाबांच्या मनावरचा तुझ्या लग्नाचा भार किती हलका होईल"एकता ताई
मुक्ताच्या डोळ्यांसमोर एकनाथ रावांचा चेहरा येतो.मुक्ताने लग्नाला होकार दिल्यावर आठवड्याभरात दोघांचं लग्न होतं.
"लग्नात काही कमी झालं असेल,तर माफ करा"पाठवणीच्या वेळी एकनाथ राव हात जोडत म्हणतात
"लग्न म्हटल्यावर असं होतंच!"रूद्रावती ताई सूचक हसत म्हणतात
रणविजय खोलीत येऊन मागून तिला मिठीत घेतो.आयुष्यात पहिल्यांदाच पुरूषी स्पर्श झालेली मुक्ता बावरून लगेच त्याच्या मिठीतून बाहेर येते
"अशी दूर का जातेस?"रणविजय
"आपण एकमेकांना समजून घेऊया."मुक्ता
"एकमेकांना समजून घ्यायला अख्खं आयुष्य पडलय."रणविजय बोलतो आणि दोन्ही हातांवर उचलून तिला बेडवर ठेवत तिच्यावर कब्जा करतो
"आजपासून रणविजयच तुझं सर्वस्व आहेत.त्यांना खूष ठेवायचं."एकता ताईंनी पाठवणीच्यावेळी दिलेला कानमंत्र आठवून मुक्ता शांत पडून राहते
सकाळी मुक्ताला उठायला उशीर होतो.
"पहिल्याच दिवशी उठायला उशीर.पुढे काय होणार देव जाणे."रूद्रावती ताई
राजन कॉलेजला जायला निघतो
"अहो,मला पुन्हा कॉलेज जॉईन करायचंय."मुक्ता
"आता कशाला हव कॉलेज?चूल,मूलच तर सांभाळायचंय"रूद्रावती ताई
"सासूबाई,तुम्हीचं मी लग्नानंतर सुद्धा शिकू शकते म्हणालेलात"मुक्ता त्यांना आठवण करून देते
"तू मला उलट उत्तर देतेस.देसाई घराण्याच्या सुना शिकण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत."रूद्रावती ताई बेडरूममध्ये जातात
रणविजयकडे आशेने पाहणारी मुक्ता पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला जाताना बघत राहते
क्रमशः
✍️नम्रता जांभवडेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा