Login

बंधन भाग 74

Love Social

भाग 74
( गेल्या भागात कॉलेजच्या चांगल्या रिझल्ट्समुळे अनघा खूश असते आणि स्वतःसाठी वेळ द्यायचं ठरवते. विशालने सांगितल्याप्रमाणे तिला पिक्चर पाहताना त्यातल्या दृश्यांमुळे जुन्या आठवणी जाग्या होतात आणि ती पॅनिक होते पण विक्रम तिला समजावतो पाहूया पुढे)

नेहमीप्रमाणे अनघा सकाळी कॉलेजला निघण्याची तयारी करत होती. तिला आपण आजूबाजूला असल्यामुळे अवघडल्यासारख वाटू नये म्हणून तो तिच्याआधी आवरुन खाली जाऊन थांबायचा. तिने आता त्याच्याशी मोकळेपणाने वागायला सुरुवात केली असली तरीही तो तिच्या आजूबाजूला वावरताना मात्र काळजी घ्यायचा उगीच आपण काही चुकीचं वागलो किंवा बोलून गेलो ज्याच्यामुळे ती घाबरेल किंवा चिडेल आणि आतापर्यंत तिच्यासोबत मैत्री करण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरतील आणि पुन्हा दरी निर्माण व्हायची अस त्याला वाटत होतं पण डॉ.विशालने सांगितल्याप्रमाणे त्या सिनेमामुळे ती पुन्हा तशीच घाबरली यावरुन विक्रमने नंतर बराच विचार केला पुन्हा त्याला मागे एकदा विशालने सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात आल्या. विशालने सांगितल्याप्रमाणे त्याने तिचा विश्वास तरी मिळवला होता त्यामुळे त्याने समजावलं, धीर दिला तर ती आता त्याच्याकडे पाहून शांत होत होती. आता ती त्याच्यासोबत मोकळेपणाने बोलायची, हसायची, तिला काही सांगायचं असेल तर त्याच्यासोबत शेअर करायची त्यामुळे पुरुष म्हणजे भिती अस एक समीकरण तिच्या मनात तयार झाल होतं आणि त्यामुळे कोणाशी बोलण, मैत्री करणं तिला नको वाटायचं जे तिचं वाटणं विक्रमला तिच्या मनातून पुसुन टाकण्यात थोड थोड यश आल होतं आणि ती त्याला तिचा मित्रसुद्धा मानायला लागली होती पण हे इतक पुरेस नव्हतं आता हळुहळु तिचा नवरा होणंही गरजेच होतं आणि त्यासाठी आता सतत तिला काय केल तर काय वाटेल हा विचार करुन आपल्याला भिती वाटून चालणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यासाठी त्याने आता प्रयत्न करायचे ठरवले आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती तिची स्पर्शाविषयी वाटणारी भिती किंवा घृणा कमी करणं. आपले बाबा सोडले तर कोणीही आपल्याला स्पर्श केला तर तो माणूसच वाईट हे एक तिने डोक्यात घेतलं होतं. त्याला आठवलं, लग्नाआधी ती आजारी असताना आपण कितीदातरी आधाराचा हात पुढे केला जो तिने झिडकारला अगदी जितेंद्रही मदतीला पुढे आला तरी तिला ते नकोस वाटतं त्यामुळे प्रत्येक स्पर्श हा वाईट नसतो ते तिच्या लक्षात यायला हवं हाच विचार त्याच्या दिवसरात्र डोक्यात घोळत होता.  
........................
एके दिवशी ती आरश्यासमोर तयारी करत उभी होती. तिच्या नेहमीच्याच साड्या ती वापरायची आणि चेहर्‍याला साधीशी फेसपावडर लावून बाहेर पडायची. आजही तिने फिकट पिवळ्या कलरची सुती साडी नेसली होती आणि थोडीशी कसरत करत तिने Claw क्लीपने नीट केस बांधले. तो मुद्दामहून खाली हॉलमध्ये नेहमीप्रमाणे गेला नाही. थोडा वेळ खाली रेंगाळून तो लगेच वरती येऊन न्युजपेपर वाचत बसला होता. पेपर वाचतानाही त्याचं लक्ष तिच्याकडे होतं. त्याने बर्‍याचदा तिचे मानेखाली असणारे व्रण पाहिले होते आणि ती केस बांधताना तर ते हमखास दिसायचे आणि त्याला वाटायचं आपण माणूस नाही राक्षस आहोत! पण आज तो गॅलरित चेअरवरती बसल्या बसल्या वेगळाच विचार करत होता आणि मनात आलं, ' मनावरच्या जखमा काही पुसुन टाकता येत नाहीत पण शरिरावरच्या जखमांचं रुपांतर तर गोड आठवणीत करता येतं ना !' त्याने पेपर बाजूला ठेवला आणि तो गॅलरीतून आतमध्ये आला. तो आत आला तस ती आरश्यात पाहतच बोलली,
" झाला का पेपर वाचून ! चल निघूया का?"
तो हळूहळू चालत पुढे आला आणि अगदीच तिच्या मागे येउन उभा राहिला.
" हं....चल आता काय आरश्यात पाहायचय छान दिसतोच! चल निघुया " ती हसत म्हणाली.
तो शांतपणे तिच्या मागे उभा होता आणि तिच्या लक्षात येण्याआधीच त्याने तिच्या केसांचा क्लीप बाजूला केला.
" च्च काय अरे ! मी बांधलेले ना केस तू पण ही टाईमपास करायची वेळ आहे का !"  ती मागे न वळताच रागवली तसा तो थोडस हसला आणि त्याने दोन्ही हात तिच्या खांद्यावरती ठेवले. थोड पुढे सरकला आणि आरश्यात पाहत म्हणाला,
" असु देत, छान दिसतात." त्याने अलगद बोटांनी तिचे मानेवरती रुळणारे केस बाजूला केले. ती स्तब्धपणे उभीच होती. तिने अलगद डोळ्यांच्या पापण्या मिटल्या. त्याने मिररमध्ये नुसत पाहिलं आणि तो छानसं हसला. त्याने तिचे केस बाजूला सारले आणि इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदा त्याने ते व्रण स्वतः इतक्या जवळून पाहिले तसा अपराधी भावनेने त्याच्या अंगावरती काटा आला. त्याने मन शांत ठेवलं आणि हळुवारपणे तिच्या पाठीवरुन हात फिरवला क्षणभर वाटलं आपल्या हातात जादू असती तर पटकन सगळ पहिल्यासारख बनवल असतं आपण! तिचं शांत, स्थिर आयुष्य तिला परत दिलं असतं. याच विचारात त्याने अलगद त्याचे ओठ तिच्या मानेजवळ टेकले आणि गोड शहारा तिच्या अंगावरती उमटला.
" I'm always with you " त्याने तिच्या कानात हळुच म्हटलं आणि तो तिच्याजवळून दुर झाला. तिने पाचएक मिनिटांनी पापण्या उघडल्या आणि आरश्यात पाहिलं तर तिचा एकटीचाच चेहरा दिसला. तिने पटकन मागे वळून पाहिलं तर तो नव्हता. ती गोड हसली आणि तिने केसांवरुन हेयरब्रश फिरवला आणि क्लीप न लावताच ती पर्स घेऊन रुममधून बाहेर पडली.
..............................
तो गाडीला टेकून तिची वाट उभा होता. ती चालत पुढे आली आणि क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. फॉर्मल ग्रे कलरचा सुट, ब्लॅक शुज, हातात ब्रँड्रेड रिस्टवॉच आणि नेहमीचा क्लिनशेव्हवाला प्रसन्न चेहरा आणि त्यावरचा आत्मविश्वास.
" चलो Let's Go " ती समोर आली तस तो तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडत म्हणाला तरी ती तिथेच उभी होती.
" हॅलो....." त्याने पुन्हा मागे वळून म्हटलं तशी ती विचारातून भानावरती आली आणि कारमध्ये बसली.
" हं....निघूया "  गाडीतल्या ए.सी.मुळे तिचे मोकळे केस वार्‍यासोबत खेळायला लागले. तो गाडी स्टार्ट करण्याआधी सहज तिच्याकडे वळला. तिच्या गालावरती येणार्‍या केसांच्या बटा त्याने त्याच्या हातानेच तिच्या कानामागे सारल्या आणि ती छान हसली. त्याला त्यांच्या लग्नाचा दिवस आठवला आणि वाटलं, त्या दिवशी पण आपण तिच्या डोळ्यांत असेच हरवून गेलो होतो. दोन तीन क्षण असेच गेले आणि ती पटकन स्वतःला सावरत म्हणाली,
" चला चला सर पुरे आता " तिने तिच्याकडचं त्याच लक्ष विचलित करत म्हटलं मग हसून त्याने एकदाची गाडी स्टार्ट केली. तिला विचारावस वाटत होतं, ' मघाशी रुममधनं खाली का आलास मी पण येणारच होते की ' पण ती गप्प होती मग त्यानेच बोलायला सुरुवात केली.
" अनु तू अशी का राहतेस? "
" अशी म्हणजे ? " तिने विचारलं.
" म्हणजे असच....सगळ लाईफ जगून झालय आणि जगणच बोअर झाल्यासारखी! Yeah I know everything and I don't wanna talk about it पण तरीही....You...You're so adorable आणि...." पुढे तो काही बोलणार इतक्यात तिने गाडीच्या काचेतून बाहेर पाहणारी तिची नजर त्याच्याकडे वळवली.
" आणि काय ?" तिने पटकन विचारलं.
" आणि...सुट होतील ना सगळेच कलर्स तुला....सो " त्याने शब्दांची जुळवाजुळव केली तस तिनेही मग मस्करीत विचारलं,
" हो का! म्हणजे एक्झाटली व्हॉट ?" 
" म्हणजे For example रेड कलरची साडी, रेड नेलपेंन्ट, रेड इयररिंग्ज, रेड लिपस्टिक...आणि"
" What !"  तिने मोठे डोळे करुन विचारलं तस त्याने लगेच त्याच्या बोलण्यावरती सारवासारव करायला सुरुवात केली.
" सॉरी....सॉरी I didn't mean it that way " त्याने तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. त्याला वाटलं उगीच आगाऊपणाने काहीतरी बोललो आपण आता शांतच राहणं बरं! ती मात्र त्याच्याकडेच पाहत होती आणि ती हळुच गालात हसली आणि मोठ्याने नाही पण मनातून तिने म्हटलं,  'You're so sweet '
................................
कॉलेजमध्येही त्याच्या डोक्यात तेच सकाळचे विचार सुरु होते. त्याला खरतर तिला शॉपिंगला जाशील का किंवा तुझ्यासाठी शॉपिंग करुया का आपण अस विचारायचं होतं पण गाडीत त्याबद्दल काही बोलणचं झालं नाही. त्याला वाटलं, दुपारी घरी निघताना तिला शॉपिंगसाठी घेऊन जाऊ मग दुसर मन म्हणालं, सकाळपासून ते लोक लेक्चर्स घेत असतात आणि दुपारी शॉपिंग करण्याएवढं त्राण कुठे असायला! मग संध्याकाळी घेऊन जाऊ अस त्याने ठरवलं. दुपारी कॉलेजमधुन निघतानाच त्याने गाडीत बसल्यावरती तिला सांगितलं, संध्याकाळी येशील का माझ्यासोबत बाहेर म्हणजे जस्ट मार्केटला त्यावर ती ओके म्हणाली आणि अर्ध काम फत्ते झाल्याचा त्याला आनंद झाला.
...............................
संध्याकाळी त्याने आत्याला आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणून सांगितलं आणि स्वतःची तयारीसुद्धा केली. ती रुममध्ये नव्हती. त्याने मिररमध्ये पाहत उत्साहाने हातात रिस्टवॉच चढवलं आणि वॉर्डरोब ओपन केला त्याच्या आवडत्या पर्फ्यूमकडे आपसुक हात जाणार इतक्यात तो फार्महाऊसवरचा प्रसंग आठवला आणि तो पर्फ्युम पुन्हा वापरायचा नाही अस त्याने ठरवलं. दुसरी एक पर्फ्युमची बॉटल हातात घेतली आणि वॉर्डरोब बंद केलं इतक्यात ती रुमचा दरवाजा लोटून आत आली.
" अरे झालीपण तुझी तयारी!" 
"हो कधीच चल तू पण रेडी हो लवकर " त्याने जॅकेट घालत म्हटलं तशी ती मंद पावलांनी चालत पुढे आली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली.
" काय ग अशी काय पाहतेयस?"
" असच......नको पाहू का!" तिने थट्टेच्या सुरात विचारलं.
" अस नाही काही " तो टेबलवरच्या कारच्या कीज घेत म्हणाला. तिच्या नजरेला नजर देणं त्याने सकाळच्या आगाऊपणामुळे टाळलं.
" विक्रम " 
" आ काय बोल ना " त्याने कॉर्नरपिसवरचा मोबाईल उचलला आणि तो तिच्याकडे वळला.
" झालं सगळं घेऊन! आहे का जरा आपल्याला वेळ ?" तिने रागावून म्हटलं तसा तो तिच्यासमोर उभा राहिला.
" हो बोल ना " त्याने जरा चाचरतच म्हटलं तसे
तिने त्याचे दोन्ही हात हातात घेतले. 
" Thank you and I'm always with you " ती म्हणाली. त्याचे आणि तिचे दोन्हीही हात एकमेकात गुंफलेले होते. तिने आपल्या हातातले त्याचे हात तिच्या हृदयाजवळ नेले.
" याची केअर पण घ्यावी लागेल मग " ती हसत म्हणाली.
" हो नक्की " त्याने तिला मिठीत घेत म्हटलं.
" अनु तू रागवलीस माझ्यावरती की मला भारी वाटतं कारण आपल्या जवळच्या माणसावरतीच आपण जास्त रागवतो ना"
" चल काहीपण..." ती गोड लाजली.
...........................


तिची तयारी झाली आणि दोघे बाहेर पडले. आपण कुठे जातोय हे त्याने तिला सांगितलच नव्हतं पण गाडीत बसल्यानंतर तिने विचारलचं,
" कुठे जायचय नक्की ?"  
" चल ना सांगतो नंतर. माझ्यावरती नाही विश्वास!" त्याने पटकन विचारल.
" काहीही काय! बरं चल आता " ती हसत म्हणाली तस त्याने गाडी स्टार्ट केली.
............................. 
थोड्यावेळाने एका मॉलसमोर त्याने कार पार्क केली आणि दोघं खाली उतरले.
" चलो " 
" हे काय! काही घ्यायचय का तुला ?" तिने आश्चर्याने विचारलं.
" चल तर आत तुझ्यासाठी शॉपिंग करायला आलो ना आपण!" 
" माझ्यासाठी! " तिला काहीच कळलं नाही.
" चल चल आता no more questions ok " तो पटकन आतमध्ये जायला वळला. आत तर जायलाच हव होतं त्यामुळे तीही मग फार न बोलता त्याच्यामागून आतमध्ये गेली.
.............................
" विक्रम मला नाही करायच हे शॉपिंगबिपिग ! माझ्याकडे आहेत ड्रेसेस अॉलरेडी मग कश्याला उगीच "  ती त्याच्यासोबत चालतच बोलत होती आणि त्याचं लक्ष काय बरं शॉपिंग करायची याकडे होतं. त्याने इकडेतिकडे नजर फिरवली आणि चालत तो पुढे आला. एका बाजूला वेगवेगळ्या डिजाईन्समधल्या कुर्तीस लटकवलेल्या होत्या.दुसर्‍या बाजूला लाॅंन्ग वेस्टर्न ड्रेसेस होते. 
" त्यातल्या कुर्तीस दाखवा जरा " त्याने तिला न विचारताच तिथल्या एका मुलीला सांगितलं. तिने पटकन दोन तीन कुर्तीस हँगरमधुन बाहेर काढल्या आणि समोर ठेवल्या.
" मॅम बघा अजून दाखवू का?" तिने अनघाला विचारलं तस ती पुढे आली.
" बघ ना तुला आवडेल " तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला.
" विक्रम तू....." ती कुर्तीस च्या डिजाईन्स पाहत हळू आवाजात म्हणाली.
" रागवू नकोस इथे हा " त्याने मंदस हसत म्हटलं मग तिलाही हसू आलं. त्याच्या हट्टामुळे मग तिने दोन तीन कुर्तीज खरेदी केल्या.
" अजुन.....अनु ते बघ Why don't you try something different त्याने वनपिस कडे बोट दाखवत म्हटलं.
" ए नको! " तिने पटकन म्हटलं.
" पण का! तुला नाही आवडतं मॉर्डन टाईप काही..." त्याने विचारलं तस ती त्याच्याकडे वळली.
" मला ज्या ड्रेसेसमध्ये कमफर्टेबल वाटत मी तेच वापरते. कपडे आपण कोणाला मॉर्डन वाटाव म्हणून वापरायची गोष्ट नव्हे! आपला Comfort महत्त्वाचा आणि मॉर्डन कपड्यांवरुन दिसण्यापेक्षा thoughts मॉर्डन असणं important असतं नाही का." तिचं उत्तर म्हणजे त्याला आपल्याला चपराक लगावल्यासारख वाटलं.
" हं........" तो इतकच म्हणाला तिच्या या बोलण्यावरती.
" बरं.....मग साड्या घेऊया का आपण माझ्यासाठी ?" तिने विचारल तस तो थोडासा हिरमुसत बर म्हणाला. त्या मुलीने वेगवेगळ्या पोताच्या, डिजाईन्सच्या साड्या दाखवायला सुरुवात केली. तिने कॉलेजला वापरता येतील अश्या फॉर्मल लुकींग साड्या बाजूला काढल्या.
" शिफॉनमध्ये असतील तर दाखवा ना " त्याने पटकन म्हटलं तस तिने शिफॉनच्या प्लेन आणि प्रिन्टेंड अश्या दोन तीन साड्या समोर ठेवल्या.
" ए गप्प बस जरा तू....या अश्या साड्या काय कॉलेजला वापरु मी!" 
" कॉलेजला नाही ग अश्याच वापरायला....छान दिसतील!" तो बॉक्स ओपन करत म्हणाला.
" हा मॅडम...तुम्ही इतक्या छान दिसता मग अश्या साड्यांमध्ये अजून छान दिसाल. दाखवू का?" 
" हो रेड,अबोली, पिंक, ब्लु असे कलर्स दाखवा....." त्याने ती बोलण्याआधीच सांगून टाकलं.
" अरे ! विक्रम....आपण माझ्यासाठी शॉपिंग करतोय की नाही मग तु तुझ्या सोयीने काहीतरी सांगू नकोस...."
" अस नाहीय काही......ब्राईट कलर्स वापरावे मग आपल्यालाही मस्त एनर्जेटीक वाटतं." तो बोलला तस ती हसली," काहीतरी सुचतं रे तुला !" 
त्या मुलीने दाखवलेल्या साड्यांपैकी शेवटी मध्येमध्ये बडबड करुन सहा सात शिफॉनच्या साड्या त्याने तिला घ्यायला लावल्याच शिवाय तिने सिलेक्ट केलेल्या तिला कॉलेजला जायला वापरता येतील अश्या कॉटनच्या काही साड्यासुद्धा घेतल्या. तिला ड्रेसेसेवरती घरी वापरता येतील असे डिजाईनवाले स्कार्फसुद्धा त्याने घ्यायला लावले.
.......................
कपड्यांची खरेदी तर झाली. बॅग्ज घेऊन ती आधी बाहेर आली. तो काउंटरवरती बिल पे करत उभा होता. तिने शॉपिंगबॅग्ज कारमध्ये ठेवून गाडीचा दरवाजा बंद केला आणि सहजच समोर नजर गेली तर आकाशात इंद्रधनुष्य फुलुन आलं होतं. पावसाळ्याचे दिवस आता संपत आले होते तरी अधूनमधून दिवसभरातून एखाददुसरी सर यायची आणि त्यातच एखादं इंद्रधनुष्य आभाळात उमटून जायचं. ती एकटक त्या इंद्रधनुष्याकडे पाहत होती. तो तिच्या मागेच येऊन उभा राहिला.
" काय ग कुठे हरवलीस ?" त्याने खांद्यावरती हात ठेवत विचारलं. तिने काही न बोलता आकाशाकडे बोट दाखवलं.
" विक्रम....आपल्या आयुष्यात सुद्धा येतील ना रे असे रंग?" तिने विचारलं तस तिच्या खांद्यावरती विश्वासाने त्याने हलकेच थोपटलं आणि त्याचं मन म्हणालं, ' अस इंद्रधनुष्य तुझ्या आयुष्यात मी नक्की फुलवेन आणि त्याची सुरुवात झालीय.' दोघे काही क्षण निःशब्दपणे त्या इंद्रधनुष्याकडे पाहत राहिले.

क्रमशः

नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे आतापर्यंतच्या सहकार्यासाठी आणि प्रतिसादासाठी खूप आभार. हे माझं शेवटचं मनोगत कारण मी दररोज प्रत्येक पार्टखाली मनोगत मांडते आणि त्या भागाविषयी थोड एक्सप्लेन करते. दोन वाचकसंवादसुद्धा लिहिलेले त्यातून तुमच्याशी कथेविषयी बोलणं किंवा माझी बाजू वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवणं हेतू होता पण मला वाटतय, तुम्हाला कथेमध्ये रस आहे. अनघा मध्ये इंटरेस्ट आहे पण अनघा विक्रम काही स्वतःहून बोलत नाही त्यांच्या तोंडून जेव्हा मी बोलते ते तुम्हाला आवडतं पण त्या पलिकडे 'स्नेहा ' म्हणून माझं ऐकण्यात,माझ्याशी बोलण्यात वा मैत्री करण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आणि मला वाटतं, माझं सततच तुम्हा वाचकांशी बोलणं, कनेक्टेड राहणं ' अति '  झालय त्यामुळे माझ्याकडून होणारा हा संवाद मी इथेच थांबवतेय पुढच्या पार्टखाली मनोगत नसेल आणि वाचकसंवादही इथून पुढे नसेल.......
कथेचे भाग दोन दोन दिवसांनी नेहमीसारखे येतीलच.
Thank you so much
.................................. 

0

🎭 Series Post

View all