बंधन भाग 70

Love Social

भाग 70
( गेल्या भागात नताशा आणि राजेशच्या प्लॅनविषयी आणि त्यांची ओळख कशी झाली याबद्दल सगळंच समजलेल आहे. गेल्या भागात दोघेही एकमेकाने आपल्याशी बोलावं याची वाट पाहत होते. पाहूया पुढे काय होणारय)

कॉलेजच्या सर्व प्रवेशप्रक्रिया संपल्या. कॉलेजचा नव्या विद्यार्थ्यांचा स्वागतसमारंभ झाला आणि कॉलेजचं शैक्षणिक वर्षही आता बर्‍यापैकी सुरु झालं होतं. यंदा गेल्यावर्षी सारखा प्रवेशप्रक्रियेत काही गोंधळ झाला नाही म्हणून भाऊसाहेबही खूश होते. अनघा आता हळुहळु घरात रमतेय हे बघून आत्याही खूश होती. अरुंधतीने मात्र विक्रम आजारी पडल्याच्या दिवसानंतर पुन्हा विक्रमवरुन तिने अनघाला काही विचारलं नाही. दोघांचं कॉलेजला नेहमी एकत्र येणं जाणं सुरु होतं. अनघाला आता विक्रमच्या असण्याची सवय झाली होती. ती त्याच्यावरती चिडायची, रागावयाची आणि त्याची काळजीसुद्धा घ्यायची. तिला वाटायचं आता तो आजारी पडल्यापासून जवळपास महिना झाला तेव्हापासून आपण किती बदललोय, त्याच्याशीही आपण छान वागतो तरीही तो मात्र अजूनही पुर्वीसारखाच वागतो आपल्याशी. दुसरीकडे त्याच्या मनात मात्र अनेक शंका होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं होत ती आपल्या प्रेमाला होकार देईल का ही शंका. केबिनमध्ये बसल्या बसल्या हाच सगळा विचार  त्याच्या डोक्यात सुरु होता इतक्यात फोन वाजला.
" हॅलो, काय? पण कधी ?" एवढं बोलूनच त्याने फोन ठेवला आणि तो कॉलेजमधून एकटाच घाईत बाहेर पडला.
.................................
 दुपारचं कॉलेज सुटण्याची वेळ होत आलेली तरी अनघासाठी न थांबताच तो कॉलेजमधून गेला. शंकरने सर लवकर गेले अस अनघाला सांगितलं मग ती एकटीच घरी आली तर घरीही तो नव्हता. तिने कॉल केला तर तोही उचलला नाही. शेवटी संध्याकाळ व्हायला आली तरी तो घरी आला नाही त्यामुळे ती आता अस्वस्थ झाली. तिला तो गेल्यावेळी पावसात भिजून रात्री उशीरा आलेला त्या प्रसंगाची आठवण झाली आणि तिने काळजीने एकामागोमाग मेसेजेस करायला सुरुवात केली इतक्यात त्याचाच मेसेज आला,
'  Sorry...Come as soon as possible on Farmhouse....Madhav kaka serious' एवढाच मेसेज होता आणि तिने पटकन कॉल केला.
" हॅलो....हॅलो अरे झाल काय नक्की ? कुठेयस तू?" तिने पटापट प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
" अग ऐक ऐक माधवकाकांची तब्येत बिघडलीय may be हॉस्पिटलला न्याव लागेल तू प्लिज येशील का इकडे नी आत्याला सांगू नकोस काळजीने जीव अर्धा होईल तिचा प्लीज तू ये मग बघू नंतर "
" ओके ओके तू थांब मी येते नी in case हॉस्पीटलला घेऊन गेलास तर कळव ओके बाय बाय " 
" ओके लवकर पोच " इतकचं बोलून त्याने फोन कट केला. ती तशीच उठली आणि वॉर्डरोब उघडून हाताला मिळेल ती साडी नेसली. हातात पर्स लटकवली. केसही साधे विंचरण्याचं भान तिला नव्हतं. आत्याला बाहेर जातेय लवकर येईन इतकच सांगून ती घरातून निघाली. त्याने इतकं घाईत बोलावलय म्हणजे काहितरी गंभीर आहे याची तिला कल्पना आली. तिने ड्रायवरला सांगून गाडी लवकर फार्महाऊसकडे घ्यायला सांगितली. स्वतः ड्राईव करुया नी पटकन पोहचू असा विचार आलाच पण तिने ड्रायवरला सोबत घेतलं.  माधवाकाकांना लग्नादिवशी ती भेटली होती ते तिला आठवलं. किती प्रेमळ आहेत ते पण वय झाल की कधी काय होईल माणसाच्या जीवाला सांगता येत नाही हेच विचार गाडीत बसल्यानंतर तिच्या डोक्यात सारखे येत होते. 
...............................
दीड दोन तासांनंतर ते फार्महाऊसला पोहचले तोपर्यंत संध्याकाळ टळुन दिवेलागणीची वेळ झाली होती. ड्रायवरने गाडी फार्महाऊससमोर उभी केली. ती गाडीतून उतरली. गेटचे लाईट्स तर सुरु होते पण लॉनवरती कुणी दिसेना. तिने इकडेतिकडे नजर टाकली.
" वैनी मी थांबू का निघू ?" ड्रायवरने विचारलं.
" नको नको निघा तुम्ही सर पोचलेत." तिने सभोवार नजर फिरवली पण तो नव्हताच.
" बरं, काही लागल तर फोन करा " ड्रायवरने गाडी वळवायला घेतली आणि दोन तीन सेकंदात तो निघूनही गेला. ती चालत पुढे आली. आजुबाजुला दुरदुरपर्यंत वस्ती नाही ना हाक मारली तर येईल अस माणूस नाही ती शांतता पाहून क्षणभर घाबरली ती. ती लॉनवरुन त्याला हाका मारत पुढे आली तर दरवाजा उघडाच होता. ती हळुहळु आतमध्ये आली तर हॉलचे लाईट्स सुरुच होते.
" विक्रम.........विक्रम अरे आहे का कुणी?" तिने इकडेतिकडे नजर फिरवली तर कोणीच नव्हतं. तिने मोबाईल पाहिला तर 'आम्ही हॉस्पिटलला आलोय ' असाही काही मेसेज नव्हता. आता तिला भिती वाटायला लागली. ड्रायवरला उगीच पाठवुन दिलं अस वाटलं. तिने पुन्हा हाका मारायला सुरुवात केली तर वरच्या फ्लोअरच्या रुमला लाईट्स सुरु दिसले म्हणून ती धावत वरती गेली आणि रुमचा दरवाजा लोटणार इतक्यात लाईट्स बंद झाले तरी तिने दरवाजा ढकलला आणि ती आत गेली नी पटकन खोलीत लख्ख प्रकाश पसरला. तिचा डोळ्यांवरती विश्वासच बसेना. खोलीभर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. 

रेड कलरचे फुगेही फरशीवरती उड्या मारत होते. 
" बापरे! विक्रम काय हे याच्यासाठी एवढी मोठी थाप मारलीस तू !" ती थोडीशी रागवली.
" ओके सॉरी आता आणि हे एवढच बाकी मला काही सुचलं नाही."  तो हसत म्हणाला तशी ती फसकन हसली.
" विक्रम मुलींना खूश हे स्वतः मनापासून करण्याची गोष्ट असते हे अस टास्क दिलाय आणि तो पुर्ण करतात तस झालं."  ती हसायला लागली. तो हातात गुलाबाचा गुच्छ  घेऊन समोर उभा होता.  तिचं हसणं मन भरुन पाहत होता शेवटी ती हसायची थांबली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याने रेड गुलाबाचा गुच्छ तिच्या हातात दिला.
" विक्रम तू पण ना कश्यासाठी इतकं " ती गोड हसत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
तो गुडघ्यावरती वाकत खाली झुकला आणि त्याने तिचा हात हातात घेत छानश्या ओळी म्हणायला सुरुवात केली तसे तिचे डोळे लकाकले.

" Far Near, Far, Wherever you're 
I believe that the heart does go on
once more you open the door 
And you're here in my heart 
And my heart'll go on and on " 

"  वाव! It's from Titanic!" तिला तिच्यासमोर गुडघे टेकुन तिचा हात हातात धरणारा तो बघून एखाद्या सिनेमात आपण असल्यासारखं वाटत होतं. जगातल्या प्रत्येकाला भुरळ घालणारा तो टायटॅनिक मधला नायक नायिकेचा जहाजावरती एकत्र उभं असल्याचा तो सिन आणि तिने कधीच कल्पना केली नव्हती आपल्याला  कोणी असं प्रपोज वगैरे करेल तेही टायटॅनिकमधलं गाणं बोलून! तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्याने जॅकेटच्या खिश्यातून छोटासा बॉक्स काढला.
" अरे! हे काय आता चल उठ ना " ती गोड हसली. 
" Wait Wait " त्याने नजर तिच्याकडे वळवली आणि बॉक्स उघडला. त्यात काय आहे ते तिला कळायच्याआधीच तिच्या पायांना त्याने स्पर्श केल्याचं जाणवलं. त्याने तिच्या दोन्ही पायांच्या बोटांना हात लावून नमस्कार केला.
' मी तुझा खुप मोठा अपराधी आहे I know आणि माफी मागण्याएवढी शुल्लक चुक नव्हे ती हेही माहितीय मला तरी मला कधीच सोडून नको जाऊस ' त्याने मनातल्या मनातच त्याच्या चुकीची कबुली दिली आणि त्याला थोड बरं वाटलं. बॉक्समधले Golden anklets त्याने बाहेर काढले.
" चला मॅडम " त्याने हाताचा तळवा पुढे केला.
" कुठे ? काहीही काय! मी खाली बसते थांब " त्याच्या हाताच्या तळव्यांवरती आपल पाऊल ठेवून ते अँकलेट्स पायात बांधून घ्यायचे या कल्पनेनं ती अवघडली. त्याला अस आपल्यासमोर झुकलेलं पाहायला तिला आवडलं सुद्धा पण कसतरीच वाटलं आणि मनात आलं, आपण इतक्या महिन्यात त्याच्यासाठी कुठे काय केलय! 
" बरं, पण खाली नको बसु Wait for two minutes " त्याने हळुवारपणे ते नाजूकसे अँकलेट्स तिच्या पायात बांधले. ती त्याच्याकडे इतक्या कौतुकाने पाहत होती. तो एकदाचा तिच्यासमोर पुन्हा उभा राहिला.
" अनु, थँक्यु माझं छोटस सरप्राईज आवडून घेतल्याबद्दल" त्याने तिच्याकडे पाहत छानसं हसत म्हटलं.
" थँक्यु सो मच " ती खाली नजर झुकवत गालातल्या गालात हसली आणि गुच्छ ठेवायला टेबलकडे वळली तर समोर भिंतीवरती थर्माकोलवरती रंगीबेरंगी अक्षरात काहीतरी चिकटवलेलं होतं. तिने पुढे जाऊन पाहिलं तर त्यावर शब्द होते,  ' माझी होशील ना '. ते पाहून ती छानसं लाजली.  तो तिच्यामागेच येऊन उभा राहिला होता. ' अनु उत्तर नाही दिलं तू?' त्याच्या शब्दांनी तिने मागे वळून पाहिलं.
" विक्रम " तिने इतक्या गोड आणि प्रेमळ आवाजात त्याला हाक मारली क्षणभर त्याच्या लक्षातही नाही आलं तिने आपल्याला मिठी मारली हे. त्याला तो क्षण तसाच हातात गच्च पकडून ठेवावासा वाटत होता.
" विक्रम तू इतका कसा वेडा! Do you know you're special person in my life आणि तुझ्याइतकं स्पेशल माझ्यासाठी दुसरं कुणी नाही." ती इतकं बोलली आणि त्याला जणू जग जिंकल्यासारखं वाटलं. त्याने अलगद त्याचे हात तिला मिठीत घेण्यासाठी वरती केले. तिच्या पाठिला त्याच्या हातांचा स्पर्श झाला तसा तिच्या अंगावरती काटा आला. त्याच्या  त्या रात्रीच्या पर्फ्युमचा तो रंध्रारंध्रात भिनलेला गंध तिने विसरणं शक्यच नव्हतं आणि तोच पर्फ्युमचा गंध तिला आता जाणवला आणि ती अख्खी घटना नजरेसमोर आली आणि मोठ्याने किंचाळत तिने त्याला दूर लोटलं.
" तो....तो माणूस नको.....He's dangerous....Don't...Don't touch " तिचं शरीर भितीने थरथरायला लागलं.
" अनु....तू प्लीज....बस ना बस " तो पटकन पुढे गेला.
" आ....विक्रम....तो...तो माणूस...वाईट...भी..ती " तिला श्वासही धड घेता येईना. त्याला वाटलं कुठुन दुर्बुधी झाली नी तोच पर्फ्युम मारला. त्याचा आवडता पर्फ्युम म्हणून सहजच त्याने तो Nautica Blue चा पर्फ्युम आज वापरला पण अस काही होईल याचा विचारच त्याने केला नव्हता.
" अनु, बस Just cool down ये इकडे Come " त्याने तिला कसबस बेडवरती बसवल आणि ग्लासात पाणी ओतलं.
" घे आधी and don't worry " तो तिच्या समोरच बसला. ती पाणी प्यायली नी थोडी शांत झाली.
" अनु मी आहे ना " त्याने ग्लास बेडलगतच्या टेबलवरती ठेवलं आणि तिच्याकडे क्षणभर पाहिलं तशी ती रडायला लागली.
" तो....तो माणूस मला...He's soo cheap " ती रडत बोलत होती.
" हो हो पण तू शांत हो आधी...झोप बघु तू मग बर वाटेल" त्याने बेडला उशी टेकवली तस शहाण्या मुलासारखी ती बेडवरती आडवी झाली.
" Take rest अजिबात कसला विचार नको हा" तो तिच्या कपाळावरती हाताने थोपटत म्हणाला तस त्याच्याकडे पाहत तिने हळुहळु डोळे मिटले. 
' अनु, Don't worry मी चांगला का वाईट नाही माहित मला पण तुला खूप खुश ठेवायचय मला. मला तुझ्या आयुष्यातले सगळे रंग पुन्हा तुला मिळवून द्यायचेत.' तिला झोप लागली तसा त्याने तिच्या कपाळावरचा हात बाजूला केला. तो तिच्याशेजारीच बसला होता तिथून किंचितसा पुढे सरकला आणि तिच्या कपाळावरती त्याने ओठ टेकवले. " You're also special for me " 

क्रमशः

🎭 Series Post

View all