बंधन भाग 66

Love, Social

भाग 66
( गेल्या भागात वटपौर्णिमेचा छान अर्थ विक्रमने तिला समजावला. त्यामुळे तिलाही बर वाटलं त्याचे विचार पाहून. त्यातच नीतूनेही तिला एक छान बातमी सांगितली आणि पहिल्यांदाच तिला विक्रमचं सोबत असणं आवडतय याची जाणीव झाली पाहूया पुढे)

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होऊन एव्हाना दहाएक दिवस झाले होते. भाऊसाहेबांनी विक्रमला सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्राचार्यांना फोन करुन अॅडमिशन्सच्या प्रकारात लक्ष घालण्यास सांगितलं होतं. गेल्या वर्षी जो काही गोंधळ झाला होता त्यामुळे आपल्यामुळे मुलांचं आर्थिक नुकसान झालं असच त्यांना वाटत होतं. सांगली नव्हे तर आजूबाजुच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली मुलंदेखील केवळ 'गुरुकुल ' ला अॅडमिशन मिळावं म्हणून सांगलीत यायची. शहरातल्या विद्यार्थ्यांइतकेच ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी गुरुकुलला होते. गरिब मजूर आणि शेतकरी आईबापाची पोरं नी पुण्यामुंबईला जाऊन आयटी,मॅनेजमेंन्ट, कंप्युटर सायन्स सारख्या महागड्या कोर्सेसचं शिक्षण घेणं त्यांच्या खिश्याला परवडणारं नव्हतं पण शिक्षण तर घ्यायचं आणि तेही चांगलं असावं अशी त्यांच्या आईबापांची इच्छा असायची आणि अश्यांसाठी आशेचा किरण होता ' गुरुकुल ' जिथे शिक्षणही चांगलं होतं शिवाय हुशार, होतकरु मुलांना शिष्यवृत्त्या मिळायच्या आणि त्यातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करायचे. शेतकर्‍यांच्या मुलांना खास फिसवलत मिळायची शिवाय प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाला जास्तीत जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांकडून त्यांचे आईवडील श्रीपाद आणि शारदा यांच्या स्मरणार्थ काही ठराविक रक्कम बक्षीसरुपात मिळायची त्यामुळे इथे फक्त मान मोडेस्तोवर अभ्यास करुन यश मिळवलं की झालं असा भाबडा समज घेऊन विद्यार्थी गुरुकुलला मोठ्या आशेनं यायचे. ही अशी मेहनती आणि शिक्षणाची आस असणारी मुलं पाहिली की भाऊसाहेबांना बरं वाटायचं. आपल्या आईवडिलांनी एका चार खोल्यांच्या शाळेच्या रूपात लावलेलं छोटस रोपटं ज्याचा आज इतका मोठा वृक्ष बनलाय आणि आपण 'गुरुकुल 'च्या रुपाने हे काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला याचच समाधान त्यांना असायचं आणि हे सगळं विक्रम सांभाळेल याची खात्रीसुद्धा त्यांना होती आणि विक्रमनेही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या तीन वर्षात खूप मेहनत घेतली होती आणि बर्‍यापैकी कॉलेजचा चेहरामोहरा बदलला होता. पण एखादी शिक्षणसंस्था उंचीवरती पोहचण्यासाठी केवळ हुशार विद्यार्थी आणि दर्जेदार शिक्षण इतकच आज जरुरी नसतं हेही त्याला माहित होतं. भाऊसाहेब निष्ठा, श्रद्धा, सबुरी या तत्वांवर काम करणार्‍या पिढीतली माणसं पण नव्या पिढीच्या विक्रमला याप्रमाणे काम करणं अशक्य वाटत होतं. त्याला गुरुकुलला यशाच्या उंचीवरती पाहायचं होतं आणि त्यासाठी वडिलांच्या तत्वांना थोडीशी मुरड घालण्याची त्याची तयारी होती. त्याला हव तस कॉलेज सांभाळणं तीन वर्ष सुरु राहिलं पण अनघा गुरुकुलमध्ये आली आणि नंतर त्याच्या आयुष्यातसुद्धा त्यामुळे सगळच विस्कळीत झालं होतं त्याच्यासाठी. आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे एका व्यक्तीचं आयुष्य उद्धवस्त झालं त्यामुळे आता पुन्हा दरवर्षी सारखं अॅडमिशन्सच्या कामात त्याने लक्ष दिलं नाही. सामंतसरांसोबतही त्याचं काहीचं बोलणं झालं नव्हतं त्यामुळे सामंतांनाही नवल वाटलं   आणि एका दिवशी त्यांनी विक्रमसोबत बोलण्याचं ठरवलं.
" May I come in Sir " केबिनचा दरवाजा लोटत सामंतसर आत आले. त्यांना अस अचानक आलेलं पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं.
" Yes, Come in " त्याने लॅपटॉप च्या स्क्रीनवरून त्यांच्याकडे लक्ष दिलं. त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचय हे त्याच्या लक्षात आलं.
" Please have a sit " त्याने म्हटलं तस ते समोरच्या चेअरवरती बसले.
" सर, अॅडमिशन्स सुरु झाल्यात I know यंदा मी काही एच.ओ.डी. नाही मॅनेजमेन्ट डिपार्टमेंन्टचा त्यामुळे तुमची काही मदत नाही करु शकणार आणि खंदारेमॅडम म्हणजे प्रामाणिकपणाचा कळस आहेत. " आणि त्यांनी हातातली लिस्ट त्याच्यासमोर टेबलवरती ठेवली आणि पुढे बोलायला लागले. " पण इंटरव्हीयुज आहेत नवीन प्राध्यापकांचे MCA च्या डिपार्टमेंन्टसाठी. आपण असु इंटिरव्हीयुच्या पॅनेलला सो किती रेट सांगायचा ? अहो नोकरीसाठी अडलेले असतात हे लोक हुशारी असते, मार्कशीट्सवरती मार्क्स असतात पण जॉबलेस मग काय आपण सांगू तो आकडा नाही का!"
" हं......" तो सामंतांचं बोलणं ऐकून इतकच रिअॅक्ट झाला.
" सर मग....." सामंतसर म्हणाले तस त्याने त्यांना थांबवलं.
" सामंतसर प्लीज....होऊ द्या सगळ प्रोसेस प्रमाणे ! I don't want to interfere in this." त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांना धक्काच बसला.
" But why ? हे दरवर्षीचं आहे मग यंदा काय झालं?" सामंतसर बोलले. सामंतांच्या कपाळावरचं आठ्याचं जाळ त्याला दिसत होतं पण मन तयारच होईना त्यांना Ok, Go ahead म्हणण्यासाठी!
" हो,  I know that पण प्लीज नको " त्याने असं म्हटल्यावरती ते खूर्चीतून ताडकन उठले. मागे वळून पाहिलं.केबिनचं दार उघडं नाही ना याची खात्री केली आणि धडाधडा ते बोलायला लागले.
" What's wrong with you Vikram ? तू हल्ली काय वागतोयस तुझं तुलाच कळत नाहीय."
" सर......" त्याने त्यांच्याकडे वरती नजर वळवत म्हटलं.
" What ! तुला लक्षात नसेल तर विक्रम तीन वर्षापुर्वी तू यु.एस. वरून सांगलीला आलास तेव्हा तुमच्या बंगल्यावर साहेबांनी तुझ्या वेलकमसाठी मोठी पार्टी ठेवली होती. तेव्हा तू मी आणि जाधवसर पहिल्यांदा भेटलो. तुझ्यासोबत बोलताना I was really impressed by your confidence and your ideas about education and college तेव्हा लक्षात आलं आपले तिघांचे विचार सिमिलर होते म्हणून आपण एकत्र काम करायच ठरवलं होतं. तुझा मोटोच होता गुरुकुलला मोठं करायचं नी हि सेवा म्हणून बघितली ना तर भिक मागायची वेळ येईल. प्रत्येक गोष्टीत बिझनेस असतो जसा तो education मध्येसुद्धा असतो अस तूच तेव्हा बोलला होतास!"
" हो हो बोललो होतो मी आणि त्याप्रमाणे वागतपण होतो आपण पण....." विक्रम त्यांच्या भडकण्यावरती उठून उभा राहत बोलत होता.
" हो पण.....पण ती मुलगी इथे जॉईन झाली नी आता तर काय तुझ्या लाईफमध्येपण आली नाही का! Sorry to say Vikram, this's not right place to talk about your personal life पण तुमचं लग्न ठरल्यापासून observe करतोय मी हे " सामंतांनी टोमणा मारला.
" सर प्लीज She's my wife and you too should respect her " 
" O God ! विक्रम तु....आता तु तिच्यासारखेच विचार करणारयस का? and remember one thing, चार वर्षांपुर्वी NAAC कमिटी आली होती तेव्हा कॉलेजला B++ Grade होती आणि CGPA होता 2.77 पण त्यावेळेला सगळे यात खूश होते नंतर त्याच्या पुढच्या वर्षी तू हे सगळ हातात घेतलस नवीन जिद्दीने आणि कॉलेजला A+ ग्रेड मिळावी हे स्वप्न होतं तुझं तेव्हा....Look This is not Mumbai or Pune सांगलीत राहतो आपण We have to work very hard. मग कॉलेजच Infrastructure असेल किंवा अजुन बर्‍याच गोष्टी आणि त्यासाठी पैसा लागतो विक्रम...नी तुझा प्रोब्लेम हा आहे तुला यात भाऊसाहेबांचा पैसा वापरायचा नाहीय, तुला राजेशिर्के ट्रस्टची मदत नकोय तुला सगळ स्वतःच्या बळावर करायचं. मग सांग मला हे MBA साठी नवीन बिल्डींगच काम बाकीय, नवे कोर्सेस सुरु करायचं तू म्हणतोयस शिवाय Summer internships, Exam preparation services, College advertisements कितीतरी गोष्टीवरती खूप काम करायचय आणि next year ला कमिटी पुन्हा येईल. कस मॅनेज करणायरस तू ? "
" Yes I know all these things " तो शांतपणे बोलला.
" मोठी मोठी कॉलेजेस आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट फिज घेतात म्हणून त्यांना हे सगळं पॉसीबल होतं." सर आता शांत होऊन बोलायला लागले.
" Give me some time आणि होईल सगळ शक्य " तो सुसासे टाकत हतबलतेने बोलला. 
" विक्रम, त्या मुलीपायी एक दिवस तुझी स्वप्नं नी गुरुकुल पणाला लावू नको म्हणजे झालं!" सामंतसर त्याला समजवण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात येताच चिडून बोलले.
" असो मी हि लिस्ट ठेवतो इथे Final decision is yours" त्यांनी ती लिस्ट टेबलवरती त्याच्यासमोर टाकली 
 आणि केबिनचं दार उघडून तडातडा बाहेर गेले. ते गेल्यानंतर तो खाली बसला आणि लिस्ट हातात घेतली. 

'नाही, आपल्या वागण्यामुळे कोणाचं आधीच इतकं नुकसान झालेलं असताना पुन्हा त्याच चुका नकोत ' त्याने मनाशी ठरवलं आणि लिस्ट हातातून बाजूला ठेवली.
......................
कॉलेजमधून घरी आल्यानंतरही त्याच्या डोक्यात सामंतसरांचं बोलणं घोळत होतं. ते बोलत होते त्यात कितीही तत्थ्य असलं तरीही पुन्हा आधीसारखं वागण्यासाठी त्याचं मन तयार होईना. तो कसल्यातरी विचारात आहे ते तिच्या लगेच लक्षात आलं. कॉलेजमधून घरी येताना गाडीतही तो गप्प गप्पच होता. घरी आल्यानंतरही तिच्याशी नेहमीसारखं बोलत नव्हता. तिला वाटलं विचारावं त्याला, ' आज मुड नाही वाटतं  की काही टेन्शन आहे !' त्याच्याशी बोलायला ती रुममध्येच वरती जाणार होती इतक्यात तोच वरून तयार होऊन खाली आला आणि घाईतच बाहेर पडला जे तिने कोपर्‍यातून पाहिलं. संध्याकाळ होत आली होती आणि बाहेर पावसाचा जोरही वाढला होता. ' पावसातून कुठे गेले आता ? सांगून तरी जायचं ' तिच्या मनात आलं मग दुसरं मन म्हणालं, ' काहीतरी महत्त्वाचं असेल काम ' मग स्वतःच्याच विचारांनी तिचं समाधान झालं आणि ती खोलीत गेली.
.............................. 
त्याने सामंतांच्या घराचा दरवाजा ठोठावला. गेल्यावेळसारखं यावेळीही राजेशसोबत दुसरं कोणी नसावं अशी त्याची अपेक्षा होती. सामंतसर कॉलेजमधनं उशीरा घरी येणार होते म्हणून राजेशने विक्रमला मेसेज करुन बोलावलं होतं. त्याला राजेशला त्या व्हिडीओक्लीपवरून जाब विचारायचाच होता.  अनघाला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न राजेशने करु नयेत आणि त्याने सध्या गप्प बसावं अशी विक्रमची इच्छा होती. राजेशनेच दरवाजा उघडला.
" Come in " राजेशने त्याला आतमध्ये बोलावलं. विक्रमने आत आल्यानंतर एकदा सगळीकडे नजर फिरवली तर घरी कुणीच नसल्याचं लक्षात आलं. राजेशसोबत बसून गप्पा वगैरे मारण्यात आता त्याला रस नव्हता. त्याने सरळ विषयालाच सुरुवात केली.
" राजेश, झालय काय तुला? Why're you behaving like this ?" 
" विक्रम हेच मी तुलासुद्धा विचारु शकतो ! यार तु का असा वागतोयस तेच कळत नाहीय आणि frankly speaking डॅडना पण आता वाटतय तु हल्ली हे अस विचित्र.." 
" अरे विचित्र काय I can't understand it " विक्रम रागाने त्याला बोलला.
" विक्रम, तुझ्या या असल्या वागण्याने एक दिवस जेलमध्ये जाऊन बसायची वेळ येईल. आधीचं ते सगळं कॉलेजचं प्रकरण नी त्यात भर तुझा प्लॅनसुद्धा फ्लोप झाला त्या गॅदरिंगदिवशी बरं इतकं सगळ होउन तुला तिचा पुळका आला आणि तिला घरातच घेऊन आलास लग्न करुन! बरं हे लग्न तू भाऊसाहेबांना दाखवायला केलयस का तुलाच goody goody husband व्हायची हौस आलीय तुलाच माहित." राजेश आवाज चढवून बोलत होता.
" राजेश, What are you talking अस अस नाहीय काहीच " तो नजर खाली झुकवत म्हणाला.
" हो का, मग त्या क्लीपवरून तुझा जीव का इतका कासावीस होतोय रे! त्या क्लीपवरून काहीही प्रुफ होऊ शकत नाही हे तुलाही चांगलच माहितीय तरी तरी तू गोव्यावरून आल्या आल्या मला जाब विचारायला इथे आला होतास! का तर तिला त्रास नाही झाला पाहिजे. तिला कुणी काही करायच नाही, तिला काही बोललेल तुला चालत नाही. Why ! अरे मरु दे ना यार तिला तसही वेड्यासारखीच वागते की ती हल्ली! उलट जीवबिव दिला या मॅटरमध्ये तर बरच आहे ना ! काहीही होणार नाही उलट तू समिहाशी लग्न करायला मोकळा...." 
" राजेश.....Just shut up " आणि त्याचा ताबा सुटला नी त्याने राजेशच्या कानखाली मारली. राजेशला धक्काच बसला.
" विक्रम, तू.......तू उरलीसुरली friendship पण संपवलीस आज त्या पोरीसाठी....डोक फिरलय तुझं. I can't believe तू तिच्यासाठी !" राजेश गाल चोळत बोलत होता. त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं विक्रम अस त्याच्यासोबत वागेल.
" हो हो.....becuse I feel about her and she mean so much to me. I really love her !" तो चिडक्या सुरात भराभरा बोलून मोकळा झाला आणि राजेशला अजून धक्का बसला. त्याला काय चाललय हेच समजेना.
" विक्रम, Are you out of your mind ? " 
" I know what I'm saying राजेश सो हे सगळे उद्योग बंद करायचे आणि तिला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास तर बघच तू " विक्रम जायला वळला तस राजेशने मंदस हसत त्याचा मोबाईल अॉन केला आणि एक अॉडियो क्लीप सुरु झाली.

विक्रम -  " हॅलो, All plan ok न "
राजेश -   " हो...But it's so risky विक्रम God knows
                    कोणाला कळलं तर खूप प्रोब्लेम्स होतील.
विक्रम -  " Don't worry गॅदरिंग आहे रात्री  
                   सगळे कॉलेजलाच असतील नी सगळा प्लॅन
               झालाय न आता. त्या आगाऊ अनघामुळे         अॉलरेडी खूप लोस झालाय माझा. तिला अशी सहजासहजी नाही सोडणारय मी. 
राजेश -    "  तीपण कॉलेजलाच असेल रे रात्री प्रोग्रॅमला"
विक्रम -      "  Don't  worry काहीतरी कारण काढून ती Campus बाहेर कशी येईल ते बघ. आमच्या जून्या गोडावूनला आण तिला outside ला आहे नाही लक्षात येणार कोणाच्या "
राजेश   -    " तरीपण यार....अस नको वागायला तू थांब आधी सगळा नीट विचार कर.
विक्रम -    " च्च, कॉलेजच्या व्यवहाराबद्दल भाऊसाहेबांना समजून नाही चालणार रे. या पोरीने सगळ्याची वाट लावलीय. झालं तेवढं खूप झालं तिला लवकर गप्प बसवायला हवं."
राजेश  -    "   हं......"
विक्रम -      "   चल बाय. रात्री Sharp 10.30 ला कॉल कर मला. See you at night "
ओडिओ क्लीप संपली आणि मंद हसत राजेश पुढे आला.
" So my dear friend जिच्यावर तू प्रेम करायच्या गोष्टी करतोयस तिला सपोज हि क्लीप मिळाली तर Can you imagin ?" राजेशच्या या बोलण्यावरती त्याच्या पायाखालची जमिनच सरकली आणि असंख्य प्रश्न समोर उभे राहिले. मनात शंभर विचार विजेच्या वेगाने धावायला लागले. ' नाही नाही, तिची मेंन्टल कन्डिशन बिघडलेली असताना हे सगळ आपल्यामुळे झालय हे कळलं तर काय करेल ती! पुर्ण खचुन जाईल. पुरुषांवरचा विश्वास संपेल तिचा आणि तिने काहीतरी बरवाईट करुन घेतल तर जे करायचा गोव्याला तिने प्रयत्न केलाच....नो अस होता नये ' त्याच मन शंभरदा त्याला बजावत होतं आणि राजेश त्याच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव पाहून गालात हसत होता. पुढच्याच क्षणी विक्रम वळला.
" Look तू तिला त्रास......" 
" नाही देणार.....तसही तिला त्रास देऊन मला काय फायदा ?"  राजेश मोठ्याने हसला.
" How much price to shut your mouth ?" विक्रमने रागाने आणि संयमाने विचारलं.
" हं.....सांगेन " 
" नी मी विश्वास ठेवू का ? कश्यावरून तू ही क्लीप!" विक्रमने शंकेने त्याच्याकडे पाहिलं.
" नाही पोचणार तिच्यापर्यंत....फक्त मी सांगेन तेव्हा पैसे  माझ्यापर्यंत पोचतील ते बघ." राजेशने विचार करत म्हटलं. विक्रमने आता मैत्रीच संपवली होती म्हटल्यावरती पार्टीज, बाहेर फिरणं हे सगळ राजेशच आपसुकच बंद होणार होतं त्यातून विक्रमच्या कॉलेजच्या इलिगल व्यवहारातून सामंतसरांना होणारा नफासुद्धा बंद झाला होता त्यातून  गॅदरिंगच्या रात्रीपासूनचा त्याचा राग मघाचच्या विक्रमच्या वागण्याने अजून धुसफुसत होता त्यामुळे विक्रमला कोंडीत पकडण्याची आयती संधी राजेशने आता सोडली नाही. गॅदरिंगच्या दिवशीचा प्लॅन कितीही म्हटलं तरी आपल्या अंगलट येऊ शकतो याची राजेशला भिती होती त्यामुळे आपण विक्रमची मदत करायची पण आपण सहीसलामत यातून सुटलो पाहिजे असा विचार करुनच त्याने त्या दिवशीचं त्यांचं बोलणं रेकॉर्ड करुन ठेवलं होतं. विक्रमने त्याला गोडावूनच्या इथून जायला सांगितल्यावरतीसुद्धा त्याने व्हिडीओ क्लीप बनवायचा प्रयत्न केला होता आणि आपला जवळचा मित्र अस काही वागेल याची विक्रमला कल्पनाच नव्हती पण राजेशच्या आताच्या बोलण्याने विक्रमचे चांगलेच डोळे उघडले होते.
" ओके......गुडबाय " इतकच बोलून विक्रम तिथून बाहेर पडला. त्याची ती हतबलता बघून राजेशला मात्र खूप आनंद मिळाला.
...................... 
रात्रीची जेवणं सुद्धा आटोपली पण अनघाचं जेवणात लक्षच नव्हतं. भाऊसाहेब मुंबईला गेले होते नी अरुंधती कितीही उशीर झाला तरी त्यांच्यासाठी जेवायला थांबायची. ते घरी नसले की लवकर जेवून झोपायची त्यामुळे आताही अरुंधती लवकरच जेवली. विक्रमबद्दल अरुंधतीने विचारल तर बाहेर गेलाय म्हणून सांगून आत्याने वेळ मारून नेली. अनघा मात्र जेवतानासुद्धा भिंतीवरच्या घड्याळाकडे सारख पाहत होती. जेवल्यानंतर नीतू, जितेंद्र झोपायला आपापल्या रूममध्ये गेले नी ती एकटीच हॉलमध्ये सोफ्यावरती बसुन होती. इतक्यात आत्या बाहेर आली.
" काय सुनबाई झोपला न्हाईत ! "
" आत्या लेट झाला नाही अजून सर नाही आले! " ती काळजीच्या सुरात बोलली.
" आग येईल कि कायतर काम अासल....बाहिर पावसातन पानी बी साचतया की येल नग चिंता करु " 
" पण फोन तरी उचलायचा ना! बाहेर पाऊस पण खूप आहे." ती सोफ्यावरुन उठून येरझार्‍या घालायला लागली.
" बर बाई.....बस कि तू मी जाते झोपाया " त्यावर अनघाने मान हलवून बर म्हटलं. आत्याने पुढे जाऊन पुन्हा मागे पाहिलं नी अनघाकडे पाहून मनातून हसली. 
.......................
विक्रम राजेशच्या घरुन बाहेर पडला तोपर्यंत संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते. बाहेर पावसाचा जोर थोडा ओसरला होता पण अंधारून आलं होतं पुन्हा मोठी सर येईल इतक आभाळ दाटलेलं नी मनात दाटून आलेल मळभही सरता सरेना. राजेश इतक्या टोकाला जाऊन वागेल याची कल्पनाच नव्हती केली त्याने! क्षणभर वाटलं, काय कामाची आपली बुद्धीमत्ता माणसं ओळखताच नाही आली आपल्याला! मनात इतके विचार सुरु होते. त्याला कोणासोबत बोलायचीही इच्छा नव्हती. त्याने गाडी तशीच घरी न वळवता फार्महाऊसच्या रस्त्याला वळवली आणि थोडं अंतर गेल्यावर माळरानाजवळ थांबवली जिथे फार वर्दळ नव्हती. गाडीतून उतरल्यावर त्याला बर वाटलं. ' आपण राजेशला रागाच्या भरात काय बोललो हे आठवलं आणि त्यालाच आश्चर्य वाटलं, खरंच आपलं प्रेम आहे का तिच्यावरती! अनघा आपला चॉईस नव्हताच कधी.  कॅफेमध्ये आपण पहिल्यांदा तिच्यासोबत बोललो खरंतर. कसलाही विचार न करता तिने तिच्याबाबतीत घडलेल सगळं खरं सांगितलं आपण नकार दिला तर, लग्न मोडलं तर कश्याचीच पर्वा न करता तेव्हापासूनच तिच्यासोबत बोलायला आपण कारणं शोधायला लागलो. तिची हुशारी आणि काम करायची पद्धत हळुहळु आवडायला लागली आपल्याला! आता क्षणभर नाही दिसली तरी मन अस्वस्थ होतं. खरच किती गुंतलो आपण तिच्यात......पण मन वेडं असतं. सत्य कस नाकारू मी? आणि जे खरय ते तिला कळेल तेव्हा काय वाटेल तिला ! पण पण तिच्याबाबतीत अस काही करण्याचा विचारसुद्धा आपल्या मनात नव्हता फक्त तिला थोडस घाबरवायचं आणि कॉलेजच्या बाबतीत लक्ष देउ नकोस अस बजावायचं इतकच पण ती ठाम राहिली तिच्या बोलण्यावरती शेवटपर्यंत आणि आपला संयम सुटला नी नको ते घडलं..... पण हे फक्त आपल्याला नी राजेशलाच माहितीय. ती क्लीप जर तिने ऐकली तर तिला असच वाटेल कि मी मुद्दाम प्लॅनिंग वगेरे करुन तिच्याबाबतीत तसं.... त्याच्या मनातले विचार थांबत नव्हते. समोर फक्त प्रश्नचिन्हं होती आणि डोळ्यातून अश्रु ओघळले पहिल्यांदाच तिच्यासाठी !  दाटलेलं आभाळ बरसायला लागलं आणि पावसाची मोठी सर आली. तो तसाच उभा होता धो धो पावसात. डोळ्यातले अश्रू आणि पाऊस एकमेकांत मिसळून गेले.
......,...,..........................  
रात्रीचे बारा साडेबारा वाजत आले. त्याला कॉल करुन आणि वाट पाहून थकलेली ती हॉलमध्ये सोफ्यावरतीच पाय वरती घेऊन दुमडून बसली होती मघापासून. हळूहळू तिचाही डोळा लागला इतक्यात दाराची बेल वाजल्यासारख वाटलं. तिला जाग आली. मोबाईलमध्ये पाहिलं तर त्याचा एकही कॉल नव्हता आता तिला काळजी वाटायला लागली. मघाशी बेल वाजल्यासारखं वाटलं म्हणून तिने धावत जाऊन दरवाजा उघडला तर समोर तो उभा! पावसात ओलाचिंब भिजलेला. त्याला अस पाहून ती पुढे आली.
" तुम्ही....होतात कुठे तुम्ही? घरी कळवायची काय पद्धत आणि ही वेळ घरी यायची ?" तिने हाताला धरुन त्याला आतमध्ये घेतलं.
" तुम्ही....अजून झोपला नाहीत !"  तिला अशी जागी बघून त्याला आश्चर्य वाटलं. आत्या थांबली असेल वाट बघत असं त्याला वाटलं होतं.
" नाही....तुम्ही कळवायचत तरी ना लेट होणार होता तर!" 
" ते...गाडी पंक्चर...." तो कसाबसा बोलला.
" थांबा...मी येते " त्याला अस इतकं पावसात भिजलेलं बघून ती धावत रूममध्ये गेली आणि पाच मिनिटातच टॉवेल हातात घेऊन खाली आली. 
" च्च....किती भिजलायत कुठेतरी थांबायचत ना थोडावेळ या इकडे " तिने हाताला धरून त्याला सोफ्यापर्यंत नेलं आणि खाली बसायला सांगितलं आणि तिच्या हातातला टॉवेल पुढे करुन त्याचे केस पुसायला सुरुवात केली.
" राहु द्या ना...I'll manage तुम्ही झोपा ना जाऊन " तो नजर खाली झुकवत बोलला. तिच्या नजरेत पाहायची हिम्मत होईना. 
" इट्स ओके..सर असं Careless नका वागत जाऊ न उगीच नसती काळजी...तुम्ही बाहेर गेलाच कश्याला इतक्या पावसातून बरं सांगून तरी जायचं...बाहेर इतका पाऊस पाणी पण साचलय तुम्हाला स्वतःचच खरं करायचं असतं नेहमी ! "  अलगद हाताने त्याचे केस पुसता पुसता ती रागावून भडाभडा बोलत होती.
" हं....पुन्हा नाही होणार असं " तो बोलला आणि डोळे पुन्हा भरून आले. त्याने तिचा हात हातात घेतला तशी ती थांबली.
" It's ok thanks. तुम्ही झोपा आता लवकर Good night " तो सोफ्यावरून उठत बोलला आणि रुममध्ये निघून गेला.

क्रमशः
तुमचा आवडता ट्रॅक सुरु झालाय.....
Like, Comment & Share

माझ्याकडून शंभर टक्के देऊन झालय आता तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

🎭 Series Post

View all