बंधन भाग 57

Love, Social

भाग 57

(  गेल्या भागात जितेंद्रच्या वागण्यामुळे अनघाला अॉकवर्ड वाटतं. तिने घरातल्या सगळ्यांशी मोकळेपणाने वागावं म्हणून विक्रम प्रयत्न करण्याचं ठरवतो पण दुसरीकडे कॉलेजमध्ये तो तिच्यासोबत आधीसारखचं स्ट्रिकली वागतो. त्याच्या मनात सद्या काय चाललय याची तिला कल्पना नाहीय पाहूया पुढे)

कॉलेजमध्ये मुलांच्या परिक्षा आता जवळपास संपत आल्या होत्या तरी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही पेपर्स अजूनही बाकी होते. मे महिन्याचे दिवस त्यातून बाहेर उन्हाचा कडाकाही वाढत चालला होता. अनघाचं रिक्षाने कॉलेजला जाणयेणं बंदच झालं होतं. विक्रमसोबतच तिचं कॉलेजला जाणयेणं सुरु होतं. त्याला कितीही काम असलं तरी तो तिला दुपारी कॉलेज सुटल्यावरती घरी सोडायचा नी पुन्हा कॉलेजला जायचा अगदीच त्याला शक्य नसलं तर बंगल्यावरुन ड्रायव्हर कॉलेज सुटायच्या वेळी तिला न्यायला यायचा. रिक्षा, टॅक्सीची वाट पाहणं नाही म्हणून ती घरीही लवकर पोहचायची मग फ्रेश होऊन थोडावेळ वाचत बसायची. दुपारी जेवताना भाऊसाहेब किंवा विक्रम,नीतू क्वचितच घरी असायचे नाहीतर आत्या, अरुंधती आणि जितेंद्र तिघंच डायनिंगटेबलला त्यामुळे थोडावेळ जितेंद्रशी तिचं बोलणं व्हायचं पण तेही जुजबी असायचं. तोच बोलायला सुरुवात करायचा नी ती जेवढ्यास तेवढं बोलायची. अरुंधतीला जेवताना बडबड आवडायची नाही त्यामुळे ती शांतपणे ऐकत असायची. संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत विक्रम कॉलेजमधून यायचा मग त्याच्याशी थोडस बोलणं व्हायचं त्यातही कॉलेजचा विषयच जास्त असायचा. संध्याकाळ सरेपर्यंत ती कॉलेजचं काम पूर्ण करायची नी नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी आत्याला मदत करायची. असा तिचा रोजचा दिवस असायचा. एका दुपारी ती कॉलेजमधून लवकर घरी आली. परिक्षेचं सुपरव्हिजनचं काम होतं त्यामुळे पेपर संपल्यानंतर पेपरचे गठ्ठे अॉफिसमध्ये दिले दुसरं काही कामही नव्हतं त्यामुळे ती लवकर निघाली. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन तिने साडीची घडी घातली नी तिचं वॉर्डरोब उघडलं तोच विक्रमने जयपूरहुन येताना आणलेल्या त्या बॉक्सकडे तिचं लक्ष गेलं. जवळपास महिना झाला होता त्या गोष्टीला तरी तिने अजून तो दुपट्टा वापरायला सुरुवात केली नव्हती. त्यानंतर विक्रमनेही तिला त्याबद्दल काही विचारलं नव्हतं. तिने बॉक्स आतमधून बाहेर काढला आणि उघडला. ड्रेसिंगटेबलच्या आरश्यासमोर ती उभी राहिली. तिने फिकट पिवळ्या रंगाचा चुडीदार ड्रेस घातला होता. त्यावरची पिवळ्या कलरची ओढणी अंगावर न घेता तिने बॉक्समधला दुपट्टा हातात घेतला. क्षणभर त्याकडे पाहिलं आणि गळ्याभोवती पांघरला. तिच्या चेहर्‍यावरती हसु नव्हतं ना कुठली भावना होती तरीही तिला मनातून खुप छान वाटलं त्या क्षणी पण त्यामागचं कारण तिला कळलं नाही. तिच्यासाठी नेहमी ड्रेस, साड्या कुमुदच खरेदी करायची आणि अगदी लहानपणापासून ते जॉबला लागेपर्यंत असच सुरु होतं. तिलाही तिच्या आईचा कपड्यांचा चॉइस आवडायचा. लग्नाच्या खरेदीतही तिने फार लक्ष घातलं नव्हतं. आई आणि रियाने मिळूनच तिच्यासाठी शॉपिंग केली होती. अनघा घरी असताना रिया तिला अधूनमधून एखादा ड्रेस सणाच्या दिवशी स्वतःच्या पैश्यातून गिफ्ट करायची. स्वतःच्या पैश्यातून काहीतरी खरेदी केल्याचा आनंद रियाला भारी असायचा म्हणून अनघाही खूश व्हायची पण आज पहिल्यांदाच तिला तिच्यासाठी असं कुणीतरी गिफ्ट दिलं होतं  म्हणून असेल कदाचित पण तो दुपट्टा आपल्या अंगावरती पाहताना खूप छान वाटलं तिला. असच पाहू कसा दिसतो ते म्हणून काढलेला दुपट्टा तिने ड्रेसवरती वापरायलाच घेतला. स्वतःला आरश्यात पाहताना ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. स्टडीटेबलकडे लक्ष गेलं तर पेपर्सचे गठ्ठे तिची वाटच पाहत होते त्यामुळे इकडेतिकडे वेळ न घालवता ती पेपर्स चेक करायला बसली.

...............................

विक्रम नुकताच कॉलेजमधून आला होता खाली न रेंगाळता तो लगेच हॉलमधून रुममध्ये आला. हॉलमध्ये कुणी भेटलं कि बोलत राहणार आणि आता बाहेरुन आल्या आल्या कोणाशी गप्पा ठोकत बसण्याची त्याची इच्छा नव्हती. तो त्यांच्या रुमचा दरवाजा लोटून आत आला तर समोर अनघा बेडवरती बसून तिचं काम करित होती. तिने उशी मांडीवरती घेतली होती नी त्यावरती रायटिंग पॅड धरलं होतं. तिच्यासमोर उघडलेली दोन तीन पुस्तकं होती आणि पेपर्सचा गठ्ठा त्यात तिने चेक केलेले पेपर्स एका बाजूला नीट लावून ठेवले होते. ती तिच्या कामात इतकी व्यग्र होती की तो आतमध्ये आलेलाही तिच्या लक्षात आलं नाही! त्याच्या मात्र लगेच लक्षात आलं आज तिने आपण गिफ्ट केलेला तो राजस्थानी दुपट्टा ड्रेसवरती घेतला आहे. क्षणभर पाहतच राहिला तो तिच्याकडे. तिने केस क्लीप लावून नीट बांधले होते. ' मॅडम छान दिसताय कधीतरी बघा की आमच्याकडे पण!' त्याने मनातूनच म्हटलं नी दारातून तो हलक्या पावलांनी आत आला तरी तिचं लक्ष नव्हतं. त्याने जरा इकडेतिकडे पाहिलं नी समोरचं आर्मचेअरवरती एसीचा रिमोट कंट्रोल पडला होता. तो उचलला नी मुद्दामहून एसी वाढवला तसे बेडवरचे पेपर्स एसीच्या वार्‍यामुळे उडून जमिनीवरती पसरले. अचानक वारा आला म्हणून तिने वरती पाहिलं तर विक्रमच्या हातात एसीचा रिमोट पाहून ती ओरडली.

" सर! हे पेपर्स ! च्च तुम्ही पण ना !"  ती तशीच तिथून उठली नी भराभरा फरशीवरचे इकडेतिकडे विखुरलेले पेपर्स गोळा करायला लागली.

" सॉरी सॉरी " तिच्या रागावण्यामुळे तो धावत पुढे आला आणि त्यानेही पेपर्स पटापट उचलायला सुरुवात केली. ती खाली पडलेले पेपर्स उचलत होती तोच स्टडीटेबलवरच्या पेपर्सवरचा पेपरवेट वार्‍यामुळे बाजूला सरकला आणि तेही पेपर्स जमिनीवरती उडाले तस ती पटकन स्टडीटेबलकडे गेली नी धावता धावता तिच्या गुंडाळलेल्या केसांचा क्लीप सुटला आणि सगळे केस खांद्यावरती मोकळे सुटले तस पटकन त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ' हं....Now looking soo beautiful ' त्याने मनातून म्हटलं नी गालातल्या गालात मंदसं हसत तिच्या नकळत पटकन एसी कमी करुन घेतला. ती आपली पटापटा पेपर्स गोळा करित होती त्या सगळ्यात तिचे केस दोन्ही खांद्यावरती मोकळे सुटल्यामुळे पुढे आलेत हेही तिच्या लक्षात आलं नाही.

" सॉरी मॅडम, ते मी जस्ट बाहेरुन आलो. बाहेर किती गरमी आहे त्यात ब्लेझर म्हटलं की अजूनच......  सो चूकुन एसी वाढवला " त्याने तिला एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात  केली आणि साध्याभोळ्या चेहर्‍याने तिला सॉरी म्हणून टाकलं. ती पेपर्स फाईलला लावत होती. चेक केलेले पेपर्स आणि न चेक केलेले पेपर्स आता एकत्र झाले होते जे तिला वेगळे काढावे लागणार होते आणि तिच्या हातांनी पटापट ते काम करायला सुरुवात केली. त्याच्या या एक्सप्लेनेशवरती बोलायला तिला वेळच नव्हता. तिने मानेनच हो बरं म्हटलं आणि ती तिच्या कामाला लागली. तो वॉशरुमकडे जायला वळला.

' अनु सॉरी पण मला तुला असचं पाहायचं होतं. वार्‍यावरती केस छान उडतात न!' मनातून पुन्हा तो बोलला आणि एकदा मागे वळून पाहिलं आणि छान हसला. तिला यातलं काहीही कळलं नाही. ती पुन्हा आपलं काम करत शांतपणे बसली.

..........................

कॉलेजच्या परिक्षा संपत आल्या होत्या तसे नीतू आणि जितेंद्र मात्र खूश झाले. आता थोड्या दिवसांची का होईना सुटी मिळेल आणि या दोघांकडे कामाचं कोणतही कारण नसेल त्यामुळे त्यांना बाहेर फिरायला पाठवता येईल असा त्यांचा प्लॅन होता. दोघांनी आत्यालाही हे बोलून दाखवलं मग तीही तयार झाली. तिची तर कधीपासुनची इच्छा होती विक्रमने अनघाला घेऊन बाहेर जाऊन यावं पण त्यांचं लग्नच मुळी घाईत झालं त्यात मार्चपासून कॉलेजमध्ये परिक्षांचं वातावरण होतं त्यामुळे त्यांना याविषयी काही सांगणं आत्याला बरोबर वाटलं नाही आता मे महिन्याचा पंधरवडा जवळ आला होता पुन्हा जूनपासून त्यांची कामं सुरु होतील म्हणून आत्यानेही नीतू आणि जितेंद्रच्या बोलण्याला होकार दिला त्यामुळे नीतू, जितेंद्र खूश होते. आत्यासोबत बोलल्यानंतर चार पाच दिवसांनी नितू अनघा सोबत गप्पा मारायच्या बहाण्याने त्यांच्या रुममध्ये गेली.

" वैनी, येऊ काय?"  तिने रुमचा दरवाजा हाताने थोडा बाजूला करितच बाहेरुन विचारलं. अनघा पुस्तकं नीट लावून ठेवत होती नी विक्रम उभ्यानेच फाईल्सची पानं पलटत होता. 

" अरेवा नीतू! किती शहाणी झालीस ये Come " तो फाईल मधून डोक वरती न करता नीतूला हसत म्हणाला.

" हॅ.......तुझ्याशी बोलतय कोण! मी वैनुडी कडे आलीय तिला एक गंम्मत सांगायचीय." ती नाक मूरडून त्याच्यासमोरुन अनघाच्या टेबलजवळ गेली.

" काय ग कसली गंम्मत !" अनघाने तिचा गाल ओढत विचारलं.

" इकडे ये कानात सांगते!" नीतूने हळु आवाजात तिला म्हटलं तस विक्रमने मोठ्याने म्हटलं,

" आम्हालाही सांगा काय ते! " 

" तू फाईल बघतोयस ना!" नीतूने कमरेवरती हात ठेवला नी आजीबाईसारखं त्याला दटावलं. 

" काय गं " अनघाने टेबलवरचा लँम्प ठिक करित विचारल. नीतूने तिचा कान ओढला नी हळु आवाजात तिला सांगितलं, " तुम्ही फिरायला जाताय तयारी करा " ते ऐकून ती मोठ्याने ओरडली. 

" काय ! कधी नी केव्हा ठरलं ?" तिच्या अश्या हावभावांमुळे विक्रमनेही पटकन नीतूकडे पाहत म्हटलं,

" काय ग? काय झालं ?" तस नीतू त्याला शांत करत म्हणाली,

" ए तू चिडू नको असा ! "

" का ! चिडण्यासारखं काय केलयस नक्की ?"  

" मी......म्हणजे मी एकटी नाही हा जितू नी आत्यापण तर आम्ही.....आम्ही तुम्हाला हनिमूनला जायला " ती इतकच बोलली आणि तो चिडला.

" What rubbish ! कुणी सांगितले हे नसते उद्योग तुम्हाला! हे असं काही ठरवण्याआधी अॅटलिस्ट विचारण्याची काही पद्धत कि मनमर्जी कारभार सगळा " नीतूच्या या अचानक बॉम्ब टाकण्यामुळे तो तिच्यावरती चांगलाच चिडला.

" पण.....आता आता एक्साम पण बर्‍यापैकी संपत आल्यात सो आम्हाला वाटलं...."  नीतू त्याला समजावत होती.

" काय वाटलं, आम्ही फिरायला जावं आणि तुम्ही प्लॅनिंग करुन मोकळे सुद्धा झालात आम्हाला कधी सांगणार सगळं ठरल्यावरती." तो नीतूकडे पाहत बोलला. तो तिच्यावरती असा चिडलेला पाहून अनघा त्यांच्यात मध्ये आली.

" सर तुम्ही शांत व्हा ! कश्याला चिडताय उगीच " ती शांतपणे अस म्हणाली आणि तिच्याकडे पाहिल्यावर त्याचा राग जरा शांत झाला.

" चिडत नाही आहे पण यांनी सांगायचं न आधी " आता तो शांतपणे नॉर्मल होऊन बोलायला लागला तस नीतू अनघाकडे वळत बोलली,

" वैनी बघ ना आणि आम्ही फक्त ठरवलय अजून कुठे जायचं किती डेजसाठी ते सगळं तुम्हालाच ठरवायचं आहे." नीतू अनघाला म्हणाली.

" नशीब! ते पण नाही ठरवलत " तो नीतूला टोमणा मारित बोलला तस ती आता ठचक्यात म्हणाली,

" ए ज्यादा शहानपना नाही करायचा आणि तसही ही आयडिआ माझी एकटीची नव्हती जा आत्याला जाऊन ओरड " नीतू त्याच्याकडे पाहत बोलली तस त्याला वाटलं खरच आत्याशी बोलायला हवं आता.

" चल वैनी मी येते......गुड नाईट " तिने तिला गूडनाईट म्हटलं आणि ती जायला वळली. दारावरती गेली नी वळून मागे पाहिलं तर विक्रम अजून त्याच विचारात उभा होता. जाता जाता नीतूने त्याला चिडवायचा चान्स सोडला नाही.

" पण वैनी काय ग तुझे विक्रमसर असे त्यांना जरा प्रेमाने बोलायला शिकव कि येताजाता सगळ्यांवर ओरडत असतात ." 

" नीतू तू ! " तो धावत तिला पकडायला दारापर्यंत आला तशी ती हसत तिच्या रुममध्ये पळाली. ती गेली नी तो दरवाजा लावून अनघाकडे वळला.

" तुम्ही....तुम्ही नका टेन्शन घेऊ मी बोलतो यावर आत्याशी" तो पुढे येत म्हणाला.

" हं....पण त्यांना सारखं काय कारण सांगणार ! घरातले सगळेच म्हणतायत आपण बाहेर जाऊन यावं." ती विचार करित म्हणाली. खरतर बाहेर कुठे जाण्याची तिची अजिबात मनःस्थिति नव्हती आणि इच्छा तर त्याहून नव्हती.

" हं...बरोबर आहे तुमचं. बघू मी बोलतो आत्यासोबत " तो शांतपणे म्हणाला तस तिला बरं वाटलं. त्याच्या अश्या शांत आणि समजूतदार वागण्यामुळे तिला धीर यायचा. तिला वाटायचं, विक्रम किती समजूतदारपणे सगळी परिस्थिती हाताळतोय ! त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित नसता असं वागला हे एकच समाधान तिच्या मनाला वाटायचं आणि ती शांत व्हायची.

......................

दुसर्‍या दिवशी कॉलेजमधून आल्यानंतर तो फ्रेश होऊन आधी आत्याला भेटायला खाली आला. अजून जितेंद्र घरी आला नव्हता नी नीतूही बाहेर गेली होती. आत्यासोबत बोलताना आजूबाजूला कोणी नसलं तर बरं होईल असं त्याला वाटत होतं आणि दुपारच्या वेळी तस कुणी घरी नसतं म्हणून तो आत्यासोबत बोलायला किचनमध्ये गेला.

" आत्या ऐक ना! एक बोलायचं होतं " तो म्हणाला आणि आत्याने पुर्ण लक्ष त्याच्या बोलण्याकडे द्यावं अश्या अपेक्षेनं तो तिच्याकडे पाहू लागला.

" बोल काय म्हणतोस ?" आत्या गॅसवरती कढई ठेवीत म्हणाली. तिचं त्याच्याशी बोलताना काम सुरुच होतं. ती बोल म्हणाली नी त्याने गॅस बंद केला.

" अरे! भाजी व्हायचीय अजून " आत्या ओरडली.

" होईल नंतर माझं ऐक आधी तू आणि त्या नीतू - जितेंद्रने मिळून काय चालवलय नक्की!" तो आत्याकडे पाहत म्हणाला.

" कुठे काय? काय केलं बा आमी!" तिने लटक्या रागाने विचारलं.

" काय केलं काय! हे हनिमूनचं काय खुळ काढलय तुम्ही! You know about all the situation तरीपण तू त्या दोघांच्यात कुठे सामील होतेस!" तो आत्यावर थोडासा नाराज होता जे तिच्या लक्षात आलं.

" हो मला म्हाईत हाये पन माझं जरा ऐकशील आता ?" 

" काय ? " त्याने विचारलं मग आत्याने शांतपणे त्याला समजावायला सुरुवात केली.

" हे बग त्या दोघांना न्हाई म्हाईत कायीच म्हनून त्यांनी सुचवलं पन मला बी त्यांचं पटलं. बग आता तुमचं लगीन झालय आनी मी समजू शकती रं तिला आपन थोडा सावराया येळ दिल्हा पायजे म्हनूनच तू जरा तिला या समंद्यापासुन थोडं दूर घेऊन जा की तिला बी बरं वाटलं नी तुला बी ! एकमेकासोबत येळ घालवा, एकमेकाला समजून घ्या याच्यासाठी तर बाहेर कुठे देवदर्शन म्हन कुठं फिराया म्हनं जाऊन यावं नी हे दिस आनंदाचं असतात, नातं फुलायचे असतात नात्याला येळ द्यावा रं." आत्या अशी तत्वज्ञान सांगितल्यासारखं बोलायला लागलेली पाहून तो अवाक झाला.

" हं......आत्या You are genius ! कुठे शिकलीस असे मोठे मोठे विचार बोलायला " तो तिचे दोन्ही गाल ओढत म्हणाला.

" म्या काय शिकलेली हाय व्हय तुमच्यासारकी! पन आयुष मानसाला शिकवतचं कि नी शहानपन सुद्धा देतं नी शहान्या तुमी आजकालची पोरं तुम्हासनी फिरायला जानं म्हन्जे काय वाटतं ते तुमचं तुम्हाला म्हाईत! व्हय ना!" आत्या हसत म्हणाली.

" तसं नाही ग पण त्यांची सद्या माझ्यासोबत बाहेर यायची इच्छा नसेल म्हणून मी म्हटलं. बाकी मी त्यांना जितका हवा तितका वेळ देतोय त्या जोपर्यंत मनापासून आमचं नातं अॅक्सेप्ट करीत नाहीत तोपर्यंत मला त्यांना कश्यासाठीच फोर्स करायचा नाहीय." तो शांतपणे बोलत होता. आत्याने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला.

" चांगलं केलस पन आता बग बोलून नी या थोडं दिस जाऊन बाहेर " 

" हो, बघतो " त्यालाही तिथून निघताना आत्याचं म्हणणं पटलं. थोडे दिवस कुठेतरी बाहेर गेलो तर या विचारांतून, वातावरणातून बाहेर गेल्यावर तिलाही रिलॅक्स वाटेल असं त्यालाही आता वाटायला लागलं.

..................................

रात्री झोपण्यापूर्वी त्याने अनघाकडे आत्या जे बोलली तो विषय काढला. ती काय रिअॅक्ट होईल यावर तोही आत्यासोबत बोलल्यानंतर विचार करत होता पण शेवटी आत्याचच बोलणं त्याला पटलं.

" ऐका ना, मी बोललो आज आत्यासोबत म्हणजे नीतूने आपल्याला जे सांगितलं त्या विषयावरच " त्याने असं म्हटल्यावरती ती हातातलं ब्लँकेट बाजूला ठेवून लक्ष देऊन त्याच्याकडे पाहत त्याचं बोलणं ऐकू लागली.

"  मग काय म्हणाल्या त्या ?" तिने विचारलं.

" मॅडम सॉरी टु से पण आत्याचं म्हणणं पटलं मला! ती म्हणाली, आपण थोडे दिवस बाहेर जाऊन आलो तर बरं वाटेल तुम्हालाही नवीन वातावरणात." विक्रम म्हणाला आणि ती काही बोलेल या अपेक्षेने तिच्याकडे पाहू लागला. विक्रमने बोलूनही आत्या ऐकल्या नाहीत म्हणजे त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही असं वाटलं तिला. 

" बरं मग काय करायचं आता ?" तिने विचारलं.

" येऊया का जाऊन जवळच कुठेतरी त्यांच्या समाधानासाठी!" विक्रमने तिला विचारलं तस तिने नाईलाजाने हो म्हटलं.

" ओके, जाऊया " तिच्या या बोलण्याने त्यालाही बरं वाटलं. 

"हं....नका चिंता करु . चार दिवस गोव्याला जाऊन येऊ बाकी सगळ्यांना काय उत्तरं द्यायची ते बघेन मी!" त्याने असं बोलल्यावर तिचा जीव भांड्यात पडला आणि ती गूडनाईट बोलून झोपी गेली. त्याला सगळ्यांच्या बर्‍याच शंकांना उत्तरं द्यावी लागणार होती. ' गोव्याला! लांब जायचं कुठेतरी मस्तपैकी हि पहिली शंका नीतू आणि जितेंद्रची असेल मग किती दिवस जाताय हि दुसरी शंका आणि तिकडून आल्यानंतरही बरीच थट्टामस्करी आणि 'इतक्यात आलातसुद्धा ' हा भलामोठा प्रश्न असणारच होता. या सगळ्याची उत्तरं त्याला द्यावी लागणार होती ज्याचा विचार करतच तो झोपी गेला.

क्रमशः

पुढचे भाग गोव्यात असणार आहेत आणि आठवत असेल तुम्हाला तर दहा भागांनी कथेचा ट्रॅक बदलतो...20, 30,40, आता 50 व्या पार्टपासून ते आतापर्यंत आपण त्यांच्यातला थोडासा संवाद पाहिला. मैत्रीची थोडी सुरुवात पाहिली आता 60 व्या भागापासून पुन्हा नवीन वळण सुरु होईल आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरही मिळतील. Stay tunned for upcoming parts.

🎭 Series Post

View all