बंधन भाग 55

Love, Social

भाग 55
(  गेल्या भागात विक्रम जयपूरहून पुन्हा सांगलीला येतो. त्याने आणलेलं गिफ्टही तो अनघाला देतो. रात्री जेवताना सगळे त्यांना बाहेर फिरायला जाऊन या असा आग्रह करतात पण नंतर जाऊ सांगून विक्रम तो विषय तिथंच थांबवतो. गेल्या भागाच्या शेवटी नताशा राजेशला भेटायला येते पाहूया काय होतय पुढे)

" नताशा, Come Come " राजेशने ओढतच तिला हाताला धरून हॉलमध्ये आणलं.
" Oh राजेश बाकी कैसे हो तुम ? और कर क्या रहे थे।" तिने हसत डोळे मिचकावीत विचारलं.
" अरे नथिंग. I just woke up तू बोल काय म्हणतेस? Everything is okey ना !"  त्याने विचारलं.
" Ya.......आयमिन त्यासाठीच आली होती मी. Wait a minut "  म्हणत तिने तिची हँण्डबॅग ओपन केली. तो पाहतच राहिला ती काय सांगते ते. तिने पटकन पर्समधून फोटोज काढले आणि ते राजेशच्या हातात दिले. त्याने उत्सुकतेनं ते फोटो पटापटा पाहिले आणि त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत गेले.
" ओके.......good job ! Well Done !" तो हसतच म्हणाला.
" But this is not enough हा ! नताशा मला तुझी अजून हेल्प लागणारय."  
" any time dear call me. I'm always ready to help you " ती म्हणाली तस त्याने होकारार्थी मान हलवली.
" चलो बाय, मुझे जाना होगा अब।" ती म्हणाली तस तो त्याच्या आनंदातून बाहेर येत म्हणाला,
" सॉरी. तू कॉफी घेणार का!" 
" नो नो. I've to go now मै सिर्फ ये फोटोज देने आयी थी।" 
" Ok then by and thanks " त्याने हसत तिला म्हटलं. ती बाय म्हणून लगेच बाहेर पडली. त्याने दारातून तिला बाय केलं अन दरवाजा लावून घेतला. तो आता आरामात सोफ्यावरती येऊन बसला आणि हातातले फोटोज पुन्हा पाहू लागला.
" वा! क्यात बात है नताशा! आता मला खात्रीच पटली आपली भेट झाली ते बरच झालं! तू बर्‍यापैकी माझं काम सोप केलस नताशा!" तो स्वतःशीच हसला.
..........................
विक्रम रुममध्ये बसला होता. समोर लॅपटोप सुरु होता पण त्याचं लक्षच नव्हतं कामात! सतत विशालचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं. ' मित्र म्हणून वागायला सुरुवात कर ' म्हणजे नेमकी सुरुवात कुठुन करायची हेच त्याला समजत नव्हतं. आपण काय वागलं कि तिला बरं वाटेल याचा विचार करुन त्याला डोक अक्षरशः बधीर झाल्यासारखं वाटलं. 'नाही विक्रम, असं विचार करुन काही होणार नाहीय! गेले किती दिवस विचारच तर करतोय आपण आता काहीतरी करायला हवं. कुठुनतरी मैत्रीची सुरुवात करायलाच हवी निदान आपण एक पाऊल पुढे टाकलं तर काय माहित तीही समोरुन दोन पावलं येईल ' असा सगळा विचार त्याच्या डोक्यात सुरु असतानाच अनघा दरवाजा लोटून आत आली तस त्याने आर्मचेअरवरुन मागे वळून पाहिलं. ती आली तशीच अस्वस्थ चेहर्‍यानं बेडवरती बसली. दोन्ही पाय बेडवरती सोडून तिने डोक मागे उशीला टेकलं. तिला अस पाहून त्याने मांडीवरचा लॅपटॉप बाजूला ठेवला नी पटकन तो तिच्यासमोर आला,
" का ओ अश्या का बसलात! तब्येत बरीय ना तुमची!" त्याने काळजीने विचारलं.
" अ.....हं थोडस स्टमक पेनिंग........" तिने पुन्हा दिर्घ श्वास घेत डोक मागे टेकलं.
" हो का काही खाल्लं होतं का तुम्ही बाहेरचं फूड?  हा तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाची सवय असेल ना आता इकडच्या जेवणाची सवय नाही म्हणून एखादवेळी....." तो बोलत होता इतक्यात ती हातानेच त्याला थांबवत म्हणाली,
" नीतू आली का? तिला बोलवा न " त्यावर हसत तो म्हणाला,
" अहो ती डोकं खात बसेल तुमचं! असु द्या तुम्ही आराम करा थोडा. तिच्याकडे काम असेल तर नंतर सांगा काय ते!" असं बोलून तो जायला वळला.
" मी आत्यांकडे जाऊन येते."  ती उठत म्हणाली.
" थांबा न तुम्ही आराम करा. काही काम आहे का मला सांगा न मी सांगतो आत्याला."  त्याच्या या बोलण्यावरुन तिने बोटांची थोडी चाळवाचाळव केली. दोन क्षण शांततेत गेले. 
" अ नाही राहु देत " ती त्याला बोलली. तिचे हावभाव पाहून तिला खूपच पेनिंग होत असेल अस त्याला वाटलं.
" तुम्ही बसा थोडा वेळ बरं वाटेल " तो एवढच म्हणाला आणि दरवाजा लोटून बाहेर गेला.
.................................
हॉलमध्ये येऊन तो टेबलवरचे न्युजपेपर चाळत बसला. पण त्यातही लक्ष लागत नव्हतं. त्याला वाटलं उठावं आणि रुममध्ये जावं पण पुन्हा वरती रुममध्ये जाणं त्याने टाळलं. संध्याकाळ होत आली तरी नितूचा पत्ता नव्हता. अनघाला नितूशी बोलायचं होतं म्हणून त्याने एकदा तिचा फोन ट्राय करुन पाहिला पण तिने उचलला नाही. विक्रमचं लक्ष लागेना मग तो उठला आणि सरळ किचनमध्ये गेला.
"  आत्या ऐक ना!"  त्याने आत्याशी बोलायला प्रस्तावना करायला सुरुवात केली.
" काय सायेब आज इकडं कुणीकडे! " आत्याने थट्टेच्या सुरात विचारलं.
" काही नाही "  तो जरासा विचार करित तिला म्हणाला.
" न्हाही कसं काय बोलायचय बोल " आत्या दटावून म्हणाली तस त्याला वाटलं, आत्याला सांगून पाहू म्हणून तो म्हणाला,
" ते......अनघाची तब्येत बिघडली " 
" का रं !"   आत्याने आश्चर्याने विचारलं.
" म्हणजे I don't know exactly पण ती म्हणाली थोडस पोटात दुखतय आणि थोडीशी थकल्यासारखी वाटली म्हणून म्हटलं."   त्याने आत्याला सांगितलं.
" हो का बरं! "  आत्या मांडणीवरची बरणी हाताने खाली काढत म्हणाली.
" बरं काय फक्त! अगं काय होतय ते सांगायला नको का त्याशिवाय कस कळणार बरं त्यात त्यांना त्या नितूशी बोलायचं होतं. आता आराम करायचा सोडून नितू कशाला हवी! त्या शहाणीचा फोनपण लागत नाही."
" अरे हो हो किती चिडतोस! "  आत्या हसत म्हणाली.
" आत्या डॉक्टरांना बोलावू का ग?" त्याने काळजीने विचारलं. त्यावर आत्या शांतपणे म्हणाली,
" डाक्टर काय करनार तुझा ! " 
" म्हणजे........" त्याला काहीच कळलं नाही.
" अरे शहाण्या, म्हन्याचा त्रास बाकी काही नाही! या दुखण्यावर तुझा कुठलाच डाक्टर कायी करु शकत नायी बग."  तिचं ते बोलणं ऐकून त्याला आपण किती निर्बुद्ध आहोत असं वाटलं.
" ओह! माझ्या लक्षातच नाही आलं पण त्यांनी सांगायचं न मी विचारलं तेव्हा !" त्याने म्हटलं तस आत्या फसकन हसली.
" काय सांगणार तुला ! नी तसही ती नवीन आहे आपल्या घरात नवी नवरीबाई मग थोडा संकोच वाटतोच की असो तुला नायी कळणार !" आत्या पाण्याचं भांडं गॅसवरती ठेवीत म्हणाली.
" हं........खरय आम्हा पुरुषांना नाही कळत तुमच्या वेदना कधीच !"   तो स्वतःशीच म्हणाला. आत्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं तस त्याने आत्याकडे पाहिलं. थोडासा धीर वाटला त्याला.
"  मग नीतूला कधी असं स्टमक पेनिंग नाही होत सो माझ्या लक्षात नाही आलं पटकन " 
" अरे येडा रे तू! असं सगळ्याजनींना एकच त्रास थोडी ना होतो. नितूला हे असं कधी ओटीपोट दुखत नाही हा पन हातपाय इतके दुखतात न तिचे बिचारी हैरान व्हायची शाळेत असताना! मळमळल्यासारख वाटनं, डोकं दुखनं, गरगरल्यासारख वाटनं हे होतं अश्या त्रासात वेगळ ते काय त्यात नी तसबी बाईचा त्रास फक्कस नऊ म्हन्याचा नसतो आयुषभराचा असतो समजलं "  आत्याच्या या बोलण्यावर त्याने पटकन म्हटलं.
"  हं......ती म्हणते तिचे पाय दुखतात पण आम्हीच तिला म्हातारी झालीस म्हणतो नी थट्टा करतो तिची! सॉरी आत्या !"  तो लहान मुलासारखा चेहरा करीत म्हणाला. आत्याने मंदस हसत त्याच्या डोक्यावर हात फिरवला.
" मग आता कळलं ना! धर हे घे " आत्याने ग्लासमध्ये उकळलेलं गरम पाणी ओतलं.
" हे काय !" त्याने विचारलं.
" मेथीचे दाणे टाकून उकळलेलं पाणी. आपले साधेसे उपाय. जा नेऊन दे तिला बरं वाटेल." आत्याने ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास ठेवत म्हटलं.
"Thank you आत्या " तो तिला म्हणाला तशी आत्या छानस हसली. खूप आश्वासक नजर होती ती.
........................
तो रुममध्ये आला तर ती डोळे मिटून उशीला डोक रेलून बसली होती. 
" मॅडम, हे घ्या. आत्याने दिलय. बरं वाटेल तुम्हाला." त्याने ट्रेमधला ग्लास उचलून तिच्या हातात दिला. ती ग्लासमधलं पाणी प्यायली आणि ग्लास ट्रेवरती ठेवित त्याला थँक्यु म्हणाली. 
" बरं, तुमी आराम करा जरा. मी आहे खाली हॉलमध्ये " त्याने आपला लॅपटॉप घेत म्हटलं. तिने फक्त मान हलवली आणि डोळे मिटून घेतले. ती मघाशी बाहेरून आली तीच अशी येऊन बसली. पर्ससुद्धा तिथेच बेडवरती पडलेली होती. त्याने तिचं वॉर्डरोब उघडलं आणि पर्स उचलून आत ठेवली नी हाताचा धक्का लागून एक कसलतरी पॅकेट खाली फरशीवरती पडलं. काय पडलं पाहायला तो खाली वाकला तर सॅनिटरी नॅपकीन्सचं पॅकेट होतं ते ! त्याने उघडून पाहिलं आणि तिचं नेमकं काय काम होतं नीतूजवळ ते लक्षात आलं. पण अनघाच्या अश्या तुटक वागण्याने वाईट वाटलं त्याला.
' मॅडम, तुम्ही परक्यासारख का वागता माझ्यासोबत! मी गेलो असतो मेडिकलशॉपला तुम्ही सांगितलं असतं तर! ' असा विचार करतच तो उठला आणि त्याने ते रिकामी पॅकेट तसच वॉर्डरोबमध्ये ठेवून वॉर्डरोब बंद केलं नी तो रुमबाहेर निघून गेला.
..............................
रात्री तिला जेवण्याची इच्छा नव्हती म्हणून ती रुममध्येच वाचत थांबली तर आत्या वरती तिला भेटायला आली.
" काय सुनबाई! बरं वाटतय का?" आत्याने आतमध्ये येत विचारलं.
" हो.....आता ठिकय पण जेवण नको....इच्छा नाही " ती म्हणाली तस आत्या मानेनच बर म्हणाली.
" हे घे! उपाशी झोपू नये असं. " आत्याने हळदीचं दुध ग्लासभरुन आणलं होतं.
" आत्या तुम्ही किती काळजी करता सगळ्यांची!" आत्याचा प्रेमळ स्वभाव बघून तिला आईची आठवण झाली.
" चल कौतुक पुरे आता! प्या हे आणि झोपा शांतपणे!" आत्याने रागावून हसत म्हटलं. ग्लासभर दूध तिला सगळ संपवायला लावलं आत्याने.
" आत्या थँक्यु " आत्या जायला उठली तस ती म्हणाली.
" असु दे! सारखं काय ग सॉरी नी थंक्यु!" आत्याने तिच्या गालावरुन हात फिरवत म्हटलं.
" चला मीही जाते झोपायला तू पण झोप आता."
" हं गूडनाईट " तिने म्हटलं. आत्या गेल्यावर तिने पुस्तकं उचलून नीट ठेवली. झोपायला जाण्याआधी दाराकडे पाहिलं पण विक्रम अजून खालीच होता. भाऊसाहेबांशी बोलत असेल कदाचित असा विचार करतच ती झोपायला गेली. तो थोड्या वेळाने खोलीत आला तोपर्यंत तिला झोप लागली होती. मग तोही त्याचा बिछाना फरशीवरती अंथरुन झोपला.
......................
दुसर्‍या दिवशी सकाळी ती उठली. उठून पाहिलं तर नेहमीसारखे खिडकीचे पडदे अजून बाजूला केले नव्हते त्याने. तो नेहमीसारखा जीमला निघून गेला होता. तिने डोळ्यांवरुन हात फिरवले आणि उठून खिडकीचे पडदे दूर सारले. कोवळ्या सुर्यकिरणांना पाहताना बरं वाटलं तिला. ती मागे वळली तर तिचं लक्ष बेडशेजारच्या कॉर्नरपिसवरती गेलं आणि आश्चर्य वाटलं तिला त्यावर बरचस काही मांडलेलं होतं. तिने पटकन जवळ जाऊन पाहिलं तर त्यावरती व्यवस्थित घडी घातलेला टॉवेल होता. त्याशेजारी तीची कॉलेजला निघताना वापरते ती पर्स होती. छोटासा स्टिलचा लन्चबॉक्स होता. तिने तो उघडून पाहिला तर त्यात मेथीचे आणि शेंगदाण्याचे लाडू होते तिला कॉलेजमध्ये लेक्चरनंतर थकवा वाटू नये म्हणून खाण्यासाठी! ते सगळ पाहून तिच्या चेहर्‍यावरती हसु फुललं. तिने वॉशरूमला जाण्यासाठी टॉवेल हातात घेतला तर हाताला काहीतरी जाणवलं म्हणून तिने टॉवेलची घडी उघडली आणि तिला अजूनच आश्चर्य वाटलं त्यात नवकोर सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट होत आणि सॅनिटायजरची छोटीशी बॉटल! ते पाहून तिला खूप बरं वाटलं. 
" विक्रमसर तुम्ही इतकं सगळी तयारी केलीत! तुम्हाला नाही माहित आपल्या नवर्‍याने अशी आपली काळजी करावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते हो पण कुणी बोलून नाही दाखवत तुम्हा नवरेमंडळींना! You are such a nice person !" तिच्या तोंडून नकळत शब्द आले आणि छानस हसु सुद्धा पण ते पाहायला विक्रम तिथे नव्हता!

क्रमशः

आजचा भाग छोटा आहे पण प्रत्यक्षात आपली बहिण, पत्नी यांची जराशी काळजी घेतली, अश्या त्रासावेळी त्यांना समजून घेतलं, महिलांची चीडचीड समजून घेतली तरी आजचा भाग सार्थकी लागला अस म्हणूयात. पुरुषवाचकांनी जरुर विचार करावा. 
Like, Comment & Share 
कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन 

🎭 Series Post

View all