बंधन भाग 54

Love, Social

भाग 54 

कथेतील लग्न, साखरपुडा किंवा तत्सम वर्णने, पात्रांचे स्वभाव याची नक्कल कुणीही नव्या लेखकांनी त्यांच्या कथांमध्ये करु नये. बंधन वाचून जे लेखक ईरावरती नव्याने लिहतायत त्यांना नम्र विनंती.... Show your own creativity. Don't only change the words and name of characters to create your story. 

(  गेल्या भागात अनघाने कॉलेजला जायला सुरुवात केली. जयपूरला विक्रम त्याचं काम आटोपून मित्र डॉ.विशालला भेटला. विशालने त्याला बरच काही समजावलं. विशालसोबत बोलून त्याला बरं वाटलं आणि मनाशी बरच काही ठरवून तो सांगलीला यायला निघाला.)

अरुंधती मैत्रीणीच्याघरी जायला निघाली होती. दुपारचं लन्च बाहेर सगळ्याजणी एकत्र घेणार होत्या. तयारी करून तिने निघताना आत्याला हाक मारली. आत्या किचनमध्ये तिच्या कामात व्यस्त होती. 

" आत्याबाई मी निघते !" तिने निघताना हॉलमधूनच आत्याला सांगितलं. आत्याने आतमधूनच हो म्हणून सांगितलं. ती निघणार इतक्यात दारातून विक्रम ट्रॅव्हलबॅगचं हॅन्डल धरुन आतमध्ये आला. हॉलमध्ये डायनिंगटेबल पुसणार्‍या नोकराने धावत येत त्याची बॅग आपल्या हातात घेतली.

" अरे, आलास तू ! " त्याच्यापाशी येत अरुंधती म्हणाली. पाच सहा दिवसांनंतर लेकाला पाहून तिला आनंद झाला.

" कसा आहेस? दमलास की काय!" अरुंधतीने विचारलं तस चेहर्‍यावरचा थकवा जाणवू न देता तो म्हणाला,

" नाही ग! दमायला काय झाल! चालत थोडी ना गेलो होतो तू पण ना मम्मा! ओके How is my sweet मम्मा." त्याने छानस हसत आईच्या खांद्यावरती हात ठेवीत विचारलं.

" मी मस्त नेहमीसारखी! " तिने त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवित म्हटलं. 

" ओके तू कुठे बाहेर जातेस की काय!" त्याने विचारलं.

" हो रे! जाऊ ना! तू म्हणत असशील तर थांबते काही अर्जन्ट नाही." ती म्हणाली तसा तो पटकन म्हणाला.

" नो नो, तू ये की जाऊन " तो बोलत होता तस तिचं त्याच्या हातातल्या बॉक्सकडे लक्ष गेलं.

" काय रे हे !" तिनं कुतुहलाने विचारलं.

" गिफ्ट! पण सिक्रेट आहे नॉट फोर यु हा ! नेक्स टाईम नक्की तुझ्यासाठी !"  तो हसत बॉक्सकडे पाहत म्हणाला. त्याचा असा खुललेला चेहरा पाहून ते गिफ्ट कोणासाठी आहे हे तिच्या लक्षात आलं.

" ओके "  ती चेहर्‍यावरती हसू आणीत म्हणाली. त्याची नजर मात्र हॉलमध्ये इकडेतिकडे फिरत होती हे तिच्या लक्षात आल तस ती म्हणाली,

" बरं, मी निघते हा बाय." अरुंधतीने असं म्हटलं आणि तो भानावरती आला.

" आ हा हा बाय " आणि हसून तो पटापट पायर्‍या चढत त्याच्या रुमकडे निघून गेला. अरुंधतीला त्याचा जरासा राग आला होता पण तीही मग मूड ठिक करुन बाहेर पडली.

..................

अनघाने नुकतीच पुन्हा कॉलेजला जायला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये तिचं फार कोणाशी बोलणं व्हायचं नाही. स्टाफरुममध्ये जाणं ती शक्यतो टाळायची. तिचं लेक्चर झालं की खंदारे मॅडमच्या केबिनमध्ये जाऊन बसायची आणि तिचं काम करायची. पण सकाळी एस.वाय. च्या क्लासमधलं सामंतसरांचं लेक्चर संपलं आणि ते बाहेर आले. ती आतमध्ये जाणार इतक्यात सर समोर आले होते आणि त्यांची नजरानजर झाली. सामंतांनी तिच्याशी बोलणं टाळलं आणि चेहर्‍यावरती कसनुसं हसू ठेवून ते पुढे सरकले होते. कॉलेजमधून अनघा घरी आली तरी तिच्या डोक्यात सामंतसरांचं वागणच होतं. ती फ्रेश होऊन स्टडीटेबलची चेअर ओढून नोट्स काढायला बसली तरी सामंतांचे विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते. ' असं का वागतात सामंतसर आपल्याशी ! इतर प्रोफेसर्स आपलं विक्रमसरांशी लग्न झाल या जेलसीमुळे आपल्याशी फटकून वागतात पण सामंतसर तर आपण कॉलेज जॉईन केलय त्या पहिल्या दिवसापासूनच असे फटकून वागतात ! गेल्या दीड एक वर्षात ते एकदाही नीट आपल्यासोबत बोललेले नाहीत! आम्ही एकाच डिपार्टमेंन्टचे प्रोफेसर्स आहोत पण ते अजिबात आपल्याला कोअॉपरेट करित नाहीत! का असं असेल या विचारातच तिने पेन वहीवरती टेकवलं इतक्यात रुमचा दरवाजा लोटल्याची चाहूल लागली.

" सर तुम्ही ! तुम्ही कधी आलात! या ना " ती चेअरवरुन उठत विक्रमसमोर येत म्हणाली. इतक्या दिवसांनंतर तिला पाहिल्यावर त्याला बरं वाटलं आणि प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळाला. 

" जस्ट आलो तुम्ही बिझी होता कि काय?" त्याने टेबलवरच्या उघडलेल्या पुस्तकांकडे पाहत विचारलं.

" नाही म्हणजे जस्ट वाचत होते. साहेब म्हणाले मग कॉलेजला जायला सुरु केलं " तिने म्हटलं. यावर त्याला आनंद झाला. 

" ओह  That's nice "  त्याने हसत म्हटलं. आल्या आल्या इतकी पॉझिटिव्ह बातमी तिच्याकडून ऐकल्यावर त्याला बरं वाटलं. त्याच आनंदात त्याने हातातला बॉक्स तिच्यासमोर धरला.

" हं.....ओके This.....This is for you !" त्याने हातातला गिफ्टचा बॉक्स तिच्यासमोर धरत म्हटलं. तिला काय रिअॅक्ट व्हाव ते कळेना. तिने संकोचतच बॉक्स घेण्यासाठी हात पुढे केले. त्याने गिफ्ट तिच्या हातात दिलं तस त्याला सुटका झाल्यासारखं वाटलं. 

" आणि हे काय! तुम्ही बॅगा अजून रिकामी नाही केल्या वॉर्डरोब आवडलं नाही का !" त्याचं बोलता बोलता लक्ष कोपर्‍यातल्या तिच्या बॅगांकडे गेलं.

" नाही अस नाही काही! छान आहे." ती नजर खाली वळवित म्हणाली.

" ओके, मी जरा फ्रेश होऊन येतो " त्यावर तिने मानेनच हो म्हटलं. त्याने वॉर्डरोब उघडलं आणि कपडे घेऊन तो वॉशरूमला गेला. तो गेला आणि तिला वाटलं, अरे थँक्स तरी म्हणायला हवं होतं.

............................

विक्रम फ्रेश होऊन खाली आत्याला आणि नीतू, जितेंद्रला भेटायला हॉलमध्ये गेला. ती दुसर्‍या दिवशीच्या लेक्चरच्या नोट्स काढत बसली होती. तो बाहेर गेला आणि तिची नजर त्या बॉक्सकडे गेली. काय असेल त्यात याची उत्सुकता तिलाही होती. तिने उठून बेडवरचा बॉक्स हातात घेतला. ती बेडवरती बसली आणि तिने हळुच बॉक्स उघडला तर छान तीन रंगाच्या पट्ट्या असलेला राजस्थानी प्रकारातला दुपट्टा!त्याच्या टोकांना गोंड्याची डिझाईन. तिने त्यावरून अलगद हात फिरवला. तिचे डोळे भरून आले आणि तिला तो गॅदरिंगचा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी दुपारी तिचं रियाला हौशीने तिचे ड्रेसेस दाखवत होती. ते सगळ आठवून तिने हातातला दुपट्टा बाजूला ठेवला. तो अंगावर घेऊन हौशीने आरश्यात स्वतःला पाहण्याचीही तिची इच्छा होईना. तिने तो दुपट्टा शेवटी तसाच बॉक्समध्ये ठेवला आणि बॉक्स उचलून कपाटात ठेवला.

.........................

रात्री जेवताना नीतू आणि जितेंद्र खूश होते. विक्रम सहा सात दिवसांनी आज त्यांच्यासोबत जेवायला होता. तो घरी नसला की आत्या आणि या दोघांना अजिबात चैन पडायची नाही. नीतू खूश होती पण त्याने जयपूरहून येताना वहिनीला गिफ्ट आणलं नी आपल्यासाठी काही आणलं नाही म्हणून ती नाराजपण होती थोडीशी विक्रमवर! जेवता जेवता नितूचं लक्ष अनघाकडे गेलं. ती शांतपणे जेवत होती. भाऊसाहेब जेवता जेवता विक्रमला म्हणाले,

" कसं झालं लेक्चर मग ?"

"  मस्त नेहमीप्रमाणे " तो म्हणाला तस त्यांनी कॉलेजचा विषय काढला.

" मग हव तर उद्या आराम करा नी परवापासून आहेच पुन्हा कॉलेज! " 

" नो नो, आराम वगेरे नको मी उद्यापासूनच जाईन." त्याने उत्साहाने त्यांना म्हटलं तस बरं तुमची इच्छा म्हणत त्यांनीही हो म्हटलं.

" ए हे काय ! तुम्ही नेहमीसारखं दोघं आता कॉलेजला जाणार !"  नीतूने किंचाळत म्हटलं.

" मग अजून काय अपेक्षित! तू पण येतेस का आमच्यासोबत कॉलेजला ? चल आपण तुझं अॅडमिशन करुन टाकू पुन्हा !" विक्रम तिची थट्टा करीत म्हणाला. विक्रमच्या या बोलण्यावर जितेंद्र फसकन हसला तस तिने त्याला चापट मारली.

" तस नाही रे दाद्या! तुमचं लग्न झालं नी आठवड्यातच तू असा जयपूरला निघून गेलास तो आज उगवलास. आता उद्यापासून कॉलेज मग तुम्ही फिरायला कधी जाणार! Come on एन्जॉय कधी करणार मग! एवढे कसे तुम्ही दोघं बोअरिंग!" नीतूच्या या बोलण्यावर अनघाच्या हातातला चमचा प्लेटमध्ये क्षणभर तसाच राहिला. तिने नजर वरती वळवत भाऊसाहेबांकडे पाहिलं. पण त्याआधीच विक्रम बोलायला पुढे झाला.

" तस नाही काही म्हणजे! पण आता एप्रिल सुरुय आणि मुलांच्या एक्झाम पण जवळ आल्यात अश्यात आम्ही अस बाहेर जाणं बरं नाही ना कामं टाकून "  तो अनघाकडे नजर वळवत म्हणाला तस तिनेही होकारार्थी मान हलवली.

" विक्रम, तुम्ही खरच जाऊन या की बाहेर वहिनी बोअर झाल्या असतील " जितेंद्रनेही नीतूच्या बोलण्याची री ओढत म्हटलं.

" हं.......बट सध्या नको नंतर जाऊ ना आम्ही. हो न मॅडम " त्याने पुन्हा तिच्याकडे नजर वळवत म्हटलं. तिनेही कसनुस हसत मग हो म्हटलं.

" चला म्हणजे तुम्ही फायनली जाणार तर फिरायला! " नीतूने टाळी वाजवत म्हटलं तस अरुंधतीने रागानेच तिच्याकडे पाहिलं तशी ती शांत झाली. आत्याला मात्र विक्रमचं बोलणं ऐकून बर वाटलं. नंतर का होईना पण दोघे एकत्र बाहेर गेले तर दोघांना बोलायला, एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल अस तिला वाटत होतं. तिने उघडपणे विक्रमला तुम्ही बाहेर जाऊन या असा काही विषय काढला नसला तरी नितू अचानक बोलली हे तिला बरच वाटलं. विक्रम मग जेवायला लागला. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती याच विचारात असेल अस त्याला वाटलं. सगळ्यांसमोर आता वेळ मारुन नेण्यासाठी तरी 'आम्ही जाणार आहोत ' अस सांगणंच त्याला सोयीच वाटलं. तिला मात्र या विषयावर काय बोलायचं सुचलं नव्हतं म्हणून तिने त्याच्या बोलण्याला सगळ्यांसमोर हो म्हटलं असलं तरीही त्याच्यासोबत एकटीने बाहेर कुठेतरी फिरायला जायचं या विचाराने तिचं मन मात्र अस्वस्थ झालं.

......................

सकाळी विक्रम जीममधून येईपर्यंत अनघाने तिची कॉलेजला जायची तयारी केली. विक्रम काल म्हणाला म्हणून तिने शेवटी एकदाच्या तिच्या सामानाच्या बॅगा रिकाम्या केल्या आणि सगळे कपडे व्यवस्थित नव्या वॉर्डरोबमध्ये लावून ठेवले. कॉलेजला जाताना ती लग्नाच्याआधी वापरायची त्यातल्याच सुती साड्या पुन्हा वापरायला लागली. नव्या नवरीसारख सजणंनटणं नव्हतचं. लग्नानंतर पुजा, फंक्शन याच कार्यक्रमांमध्ये तेवढी ती सजली होती. तेही स्वतःच्या हौशीने, इच्छेने नव्हतच नीतूची आणि रियाची हौसच तिला सजवण्याची जास्त त्यात आत्याही त्यांना काही ना काही सांगायची. आत्याचा फुल सपोर्ट मग त्या दोघी तर अनघाला भंडावून सोडायच्या. मेकअप, दागिने, साड्या किती काय आणि सगळ्यात या दोघींचं अनघाने ऐकाव अशी यांची इच्छा असायची शिवाय पैपाहुण्यांमध्ये आपण असं सुतकी चेहर्‍याने वावरणं ठिक नाही म्हणून तीही नितू नी रियाच्या म्हणण्याप्रमाणे छान तयार व्हायची पण आता पुन्हा नेहमीचं रुटीन सुरु झालं तस तिने पहिल्यासारखच राहायला सुरुवात केली फक्त त्यात भर पडली होती ती हातातल्या बांगड्यांची आणि मंगळसूत्राची! तिने ड्रेसिंगटेबलवरच्या बांगड्या हातात घालायला घेतल्या आणि कुणीतरी आल्याची चाहूल लागली.

" येऊ का ?"  विक्रमने दरवाजा थोडासा लोटत विचारलं.

" या ना, मी निघणारच होते आता कॉलेजला " ती पाठीवरचे मोकळे केस क्लीपने बांधत म्हणाली.

" हो का मग थांबा थोडावेळ मीही निघतोच आहे " त्याच्या या बोलण्यावर ती गोंधळली. कॉलेजला दोघांनी एकत्र जायचं एकाच गाडीतून ! सगळ्यांना बोलायला विषय मिळेल म्हणतील ' डायरेक्टर बाई ' आल्या या विचारानेच तिला कसतरी वाटलं. 

" मॅडम " तो पुन्हा म्हणाला तशी ती भानावर आली. " तुम्ही थांबा खाली मी येतोच give me ten minuts " तो म्हणाला मग तिने बरं म्हटलं. बेडवरची पर्स उचलून हातात घेतली नी ती रुमबाहेर गेली. ती बाहेर जाताना तो क्षणभर पाहत राहिला. आज एकत्र कॉलेजला जायचं या कल्पनेनच त्याला भारी वाटत होतं.

...........................

राजेश आळस देत उठला. घड्याळात पाहिलं तर दहा वाजत आले होते. सर कॉलेजला गेले असतील या विचारातच आळस देत त्याने वॉशरुम गाठली. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दारावरची बेल वाजली.

" छे यार! सकाळी कोण आलं आत्ता ! अरे बाबा थांब!  " त्याने रुममधूनच ओरडून सांगितलं. " आता शर्ट कुठे गेलं !" म्हणत वैतागत त्याने इकडेतिकडे पाहिलं तर शर्ट काही हाताला सापडलं नाही तोपर्यंत पुन्हा बेल वाजली. " छे! मरू दे " म्हणत रेडकलरच्या बाथरोबमध्येच तो रुममधून ओरडत बाहेर आला तोपर्यंत दोनतीनदा बेल वाजली.

" अरे कोणाचा जीव चाल्लाय !" त्याने पटकन जाऊन दरवाजा उघडला तर समोरची व्यक्ती बघून त्याचा चेहरा एका क्षणात आनंदी झाला. ग्रे कलरचा स्टायलिश डेनिम ड्रेस, हातात ड्रेसच्या कलरला मॅचिंग हँन्डबॅग, डोळ्यावर गॉगल अशी ती ताटकळत दारात उभी होती. राजेशने दरवाजा उघडताच तिने डोळ्यावरचा गॉगल बाजूला केला आणि त्याच्याकडे पाहत ती छान हसली.

"  Wooow What pleasant surprise at morning वेलकम माय डिअर नताशा !"  त्याने हसर्‍या चेहर्‍याने तिचं वेलकम केलं.

" हॅल्लो राजेश ! हाऊ आर यु ?" म्हणतच तिने त्याला मिठी मारली. 

क्रमशः

🎭 Series Post

View all