बंधन भाग 53

Love, Social

भाग 53
(  गेल्या भागात राजेश्वरी अरुंधतीला भेटायला घरी येते. दोघी मिळून अनघाला अॉकवर्ड वाटाव म्हणून मुद्दामहून समिहाचा विषय काढतात. समिहाचे फोटोज पाहून अनघाचा चेहरा उतरतो पण अरुंधतीचा हा आनंद फार टिकत नाही. दुपारी विक्रमच्या सांगण्यावरुन अनघासाठी नव्या वस्तू नोकरमंडळी घेऊन येतात आणि अरुंधती चिडते. पाहूया आज )

सकाळी नेहमीप्रमाणे अनघा उठली. तयारी करुन किचनमध्ये गेली तर आत्या तिच्या कामात व्यस्त होती. भाऊसाहेब अजुन बाहेर गेले नव्हते. त्यांच्या घरुन निघण्याच्या आणि येण्याच्या वेळा काही ठरलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांची आणि तिची फार भेट व्हायची नाही. म्हणून आज अनघानेच त्यांना चहा नेऊन द्यायचं ठरवलं.
.........................
सुनबाई रुममध्ये चहा घेऊन आलेली पाहून त्यांनाही आनंद झाला. ते काही फाईल्स चाळत बसले होते.
" अरे सुनबाई! या या आज तुम्ही चहा आणलात." भाऊसाहेबांनी प्रसन्न चेहर्‍याने हसत म्हटलं.
" हो आत्यांनीच केला खरतर मग मी घेऊन आले." चहाचा कप त्यांच्या हातात देत ती म्हणाली.
" बरं बरं "  त्यांनी चहाचे घोट घेत म्हटलं. ती थोडस हसली. त्यावर त्यांनीच विषय काढला.
" काय मग कॉलेजला कधीपासून जाताय?" 
" कॉलेज! नाही, अजून नाही ठरवलं!"  तिला त्यांचा हा प्रश्न अनपेक्षित होता. कॉलेजला तर जायला सुरुवात करावीच लागणार होती पण विक्रम नसताना एकटीने जायचं तिच्या जीवावरती येत होतं. सगळ्यांच्या नजरांना सामोरं जाताना तिची दमछाक होणार हे तिला माहित होतं. पण भाऊसाहेबांना यातलं काहीही तिने सांगितलं नाही.
" त्यात काय ठरवायचं ! पुजाअर्चा, बाकी सगळे कार्यक्रम झाले की आता! पाहुणेमंडळीपण आता कमी झाली तेव्हा आता तुमच्या कॉलेजच्या कामावरती लक्ष द्यायला वेळ लावू नका."  ते तिला समजावित म्हणाले.
" अ......हो......."  ती खाली मान घालीत म्हणाली.
" बरं, मग तुमचं आवरुन झालं असेल तर जायला सुरुवात करा आजपासूनच "   यावरती तिने पटकन वरती पाहिलं. ते म्हणतायत तर नाही कस म्हणणार म्हणून तिने होकारार्थी मान हलवली.
" बरं, ड्रायव्हर सोडेल तुम्हाला " ते चहाचा कप ट्रेमध्ये ठेवत म्हणाले.
" बरं थँक्यु " ती म्हणाली तस त्यांनी छानस हसत तिला बेस्ट लक म्हटलं.
..............................
भाऊसाहेबांनी कॉलेजला जायला सांगितल्यामुळे मग तिने कॉलेजला जायची तयारी केली. पण जायचा मूड नव्हता. शेवटी कधीतरी जाव लागेलच या विचाराने ती निघाली. 
......................

ड्रायव्हरने तिला कॉलेजच्या गेटबाहेर सोडलं आणि निघताना फोन करा वहिनीसाहेब असं म्हणून तो बंगल्यावर निघून गेला. आठ दहा दिवसांंनी ती आज कॉलेजला आली होती. कॉलेजची इमारत पाहून तिला बरं वाटलं. आपण बर्‍याच काळानंतर इथे आलोय की काय असच वाटत होतं तिला ! दहा - पंधरा दिवसांपूर्वी ती फक्त तिथली एक एम्पलोयी होती आणि आज कॉलेजच्या डायरेक्टरची बायको म्हणून सगळ्यांच्या नजरा औत्सुक्याने तिच्याकडे वळणार होत्या. ती गेटमधून आत आली. बाहेर कट्ट्यावर काही विद्यार्थी घोळक्याने उभे होते. ती आत आली तसं विद्यार्थ्यांचं पटकन तिच्याकडे लक्ष गेलं. त्यातल्या काही मुली तर अगदी पायापासून ते केसांपर्यंत तिला न्याहाळत होत्या.
" ए Look who's coming !"  त्यातल्या एकीने अनघाकडे पाहत दुसर्‍या मैत्रीणीच्या कानात म्हटलं.
" कोण ग! "बाकी दोघीजणी त्यांच्यात येऊन उभे राहिल्या.
" कारखानीस मॅडम आल्या !" अजून एकीने म्हटलं आणि त्यावर बाकि कोणी काही बोलण्याआधी अनघाने पटकन मागे वळून त्यांच्या घोळक्याकडे पाहिलं तश्या खाली माना घालून सगळ्या आपापल्या नोटबुक्समध्ये डोकं खूपसून बसल्या. ती चालतच शांतपणे पुढे गेली तशा पुन्हा त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
...............,..,.,.......
तिने स्टाफरुममध्ये जाणं टाळलं. ती खंदारेमॅडमना जाऊन पहिल्यांदा भेटली. तिला अचानक आलेलं पाहून त्यांनाही आनंद झाला.
" मॅडम, येऊ का ?" ती त्यांच्या केबिनचा दरवाजा लोटत म्हणाली.
" अनघा तू! आज अचानक कशी! ये ये वेलकम वेलकम " त्या हसत म्हणाल्या तशी ती पुढे आली आणि चेअर ओढून बसली. 
" So काय मग ! Everything Okey ! " त्या हसत म्हणाल्या तशी तिने होकारार्थी मान हलवली.
" मला वाटलं तू विक्रम सरांसोबतच येशील आता ते जयपूरहून आल्यानंतर ! "  मॅडम रिसिव्हर हातात घेत म्हणाल्या आणि त्यांनी खाली कॉल करून दोघींसाठी मस्त कॉफी मागवली.
" मग आता आजपासूनच जॉईन होतेस ना!" त्या फोन ठेवित तिच्याकडे पाहत उत्साहाने बोलल्या.
" हो, भाऊसाहेब म्हणाले सकाळी सो "  तिने म्हटलं.
" वा! गुड गुड " इतक्यात शिवा कॉफीचे मग घेऊन आतमध्ये आला. अनघा अचानक कॉलेजला आलेली बघून त्यालाही आश्चर्य वाटलं जे त्याच्या चेहर्‍यावरून तिच्या लक्षात आलं.
" मॅडम आलात होय तुम्ही !"  तो कॉफीचे मग टेबलवरती ठेवताना म्हणाला. 
" हं, आजच "  ती थोडस हसु चेहर्‍यावर आणीत म्हणाली. तो बर म्हणून केबिनबाहेर गेला. 
" ओके मॅडम, मीही निघते आता लेक्चरला " अनघा कॉफी घेत म्हणाली.
" हो निघ निघ, बेस्ट लक " त्या हसत म्हणाल्या तस थँक्यु म्हणत ती चेअरमधून उठली. आज बर्‍याच दिवसांनी लेक्चरला जाताना मुलांना भेटण्याचीही उत्सुकता तिला होती. डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवून ती लेक्चरला गेली.
.........................

विक्रमचं सेमिनारमधलं लेक्चर आदल्या दिवशी झालं होतं त्यामुळे तो रिलॅक्स होता. आता अजुन एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे डॉ. विशालला त्याला भेटायचं होतं. त्याने सकाळीच विशालला फोन केला तेव्हा तो त्याच्या क्लिनिकला होता. काही पेशन्ट्सना भेटुन निघतो असं विशालने विक्रमला सांगितलं. विशालच्या क्लिनिकजवळच्याच एका कॅफेमध्ये भेटायचं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे विक्रम वेळेत तिथे पोहचला. विशाल आल्यावरती त्याच्याशी कस हे सगळं बोलायचं तेच त्याला कळत नव्हतं. पण जे जे घडलय ते मित्र म्हणून नव्हे पण डॉक्टर या नात्याने तरी विशालला सांगणं गरजेचं होतं. विक्रमने ठरवलं, अनघा कॉलेजला जॉईन झाल्यापासून ज्या घटना गेल्या दीड वर्षात घडल्या त्या सगळ्या विशालच्या कानावरती घालायच्या अगदी आपण गॅॅदरिंगच्या रात्री केलेला नालायकपणा सुद्धा ! हा विचार त्याच्या डोक्यात सुरु होता तोच समोरून विशाल आला.
" Hellooo my friend " उत्साहाने त्याने म्हटलं तसा विक्रम आनंदाने चेअरमधून उठला. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. बर्‍याच महिन्यानंतर ते भेटत होते. 
" Looking classy हा ! मला वाटलं, लग्न झाल्यावर आळशी बनला असशील पण तू तसाच आहेस अगदी पुर्वीसारखा वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर !" विशाल हसतच समोरच्या चेअरवरती बसत म्हणाला.
" तू पण विशाल झालास सुरु ! तुझीच कमी होती आता !" विक्रमने हसत म्हटलं. वेटरने कॉफीचे मग आणून टेबलवरती ठेवले आणि तो निघून गेला. आता विषयाला सुरुवात करायला हरकत नाही अस विक्रमला वाटलं. विशालने कॉफीचा घोट घेत म्हटलं,
" सो How do yo feel after marriage ? वहिनी काय म्हणतात आमच्या !" 
" ठिक........ती पण छान." विक्रमने जूजबी उत्तर दिलं.
" एकदा यायला पाहिजे सांगलीला ! पण काय रे एवढा प्रेमात पडलास आणि आम्हाला खबर पण नाही !" विशालने कॉफी पित त्याची मस्करी करायला सुरुवात केली.
" तस नाही रे......" विक्रम संकोचून म्हणाला.
" का रे एनी प्रोब्लेम ! मीच मघापासून एवढा उत्साहाने बोलतोय तू का असा गप्प !" विशालने विचारलं.
" विशाल, I want to tell you something." त्याने बोलायला सुरुवात केली.
" अरे मग बोल ना! एक मिनिट कॉलवर पण असच काहीतरी म्हणाला होतास. What happened ?" विशालने चिंतीत चेहर्‍याने विचारलं.
" I married हे खरय but......but She...She is rape victim "  त्याने नजर खाली वळवीत म्हटलं.
" What !!!!! विक्रम तू! तू अश्या मुलीशी लग्न! वाव! ग्रेट यार, I'm proud of you my friend असा विचार करायला पण....." विशालच्या चेहर्‍यावरून मित्राविषयीचा अभिमान लपत नव्हता. विक्रमला वाटलं, किती ग्रेट झालो आपण याच्या नजरेत पण त्याला कळेल तो माणूस आपणच आहोत तेव्हा हीच त्याची नजर आपला किती तिरस्कार करेल. त्याने विशालला थांबवत शेवटी खरं काय ते सांगायचं मनाशी पक्क केलं.
" विशाल, I'm not great but I'm so cheap ! " विक्रमच्या या बोलण्याने विशालला काहीच कळेना.
" म्हणजे ?" 
" हेच की.......मी...मीच आमच्या लग्नाआधी....म्हणजे माझ्याकडून नको ते घडलं." त्याने पुन्हा नजर वरती न करता म्हटलं.
" व्हॉट! अरे Why !" विशालला हे ऐकुन चांगलाच धक्का बसला होता.
" becuse तिने कॉलेजमधले काही illigal व्यवहार भाऊसाहेबांपर्यंत नेले. साहेबांनी बरीच चौकशी लावली त्या प्रकाराची आणि....आणि खूप राग आलेला तिचा मला. कॉलेजच्या व्यवहारात तिने असच लक्ष घातलं तर सगळच कठीण होईल असच वाटत होत मला आणि त्यातून एका रात्री....." त्याने दोन्ही हात डोक्याला लावत म्हटलं.
" ओ माय गॉड ! पण मग ती लग्नाला !" विशालने स्वाभाविक प्रश्न विचारला.
" She didn't know.....अंधारामुळे नाही समजलं." 
" विक्रम तू हे ! छे! I can't believe it !" विशालने आश्चर्याने म्हटलं.
" विशाल, I'm soory. I know, you will hate me पण..." विक्रम बोलत होता आणि विशाल म्हणाला,
" It's ok. हं सांग आता काय प्रोब्लेम आहे नक्की ?" पुढच्या काही सेकंदातच विशालचा मूड बदलला आणि मघापासून बोलणार्‍या मित्राची जागा आता डॉक्टरने घेतली. त्याचं हे अनपेक्षितपणे मुद्द्याला हात घालणं पाहून विक्रमलाही नवल वाटलं.
" विक्रम, मी मित्र आधी असलो तरीही आता मित्र म्हणून नव्हे डॉक्टर म्हणून विचारतोय. हे बघ एक डॉक्टर म्हणून तुला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो तेव्हा काहीही न लपवता नक्की काय झालय आता ते सांग. I'll definitely help you !"
विशालच्या या बोलण्याने त्याला धीर आला.

त्याने आता शांतपणे बोलायला सुरुवात केली.
" विशाल, आमच्या लग्नाआधी तिची कंन्डिशन फार ठिक नव्हती. She was not recovered from that shock आणि त्यातच तिची एन्गेंजमेंन्ट यामुळेच मोडली. सो भाऊसाहेबांना तिच्या आईबाबांची अवस्था बघवेना म्हणून त्यांनी माझ्यासाठी तिचा विचार.....actually I was going to tell him but it was not right time कारण त्यातून सगळ्यांनाच मनस्ताप मिळाला असता. तिच्या आईबाबांचं टेन्शन कमी व्हाव म्हणून मी तयार झालो पण...She was not totally agree for marriage. ती आतल्या आत कुढत बसली तेव्हापासूनच आणि तब्येत पण बिघडली त्यामुळे."  तो उसासे टाकीत बोलला. विशालने सगळं ऐकून घेतलं.
" ओके पण तिच्याबाबतीत जे घडलय ते इतरांना कळल्यामुळे आणि बाकी सगळे काय विचार करतील म्हणून ती...." विशालने त्याला शंका बोलून दाखवली.
" नाही, याबद्दल बाकी कोणाला माहित नाहीय भाऊसाहेबांशिवाय नी आत्या पण प्रोब्लेम बाकी कुणी तिला काही म्हटलय म्हणून तिची अवस्था बिघडलीय असा नाहीच आहे. तिला......तिला भिती वाटते सतत की कुणीतरी तिला काही करेल. तिला सारख वाटतं, आपण खूप worthless आहोत किंवा कुणीतरी आपल्याला हसेल, बोलेल. ती रात्र तिच्या डोळ्यासमोरुन जातच नाही. आमच्या लग्नादिवशी रात्री ही ती तशीच घाबरली होती आणि झोपेतून दचकुन उठली. भितीने ईतका घाम फुटला तिला. She couldn't even breath...."  विक्रमचं हे बोलणं ऐकून विशाल क्षणभर त्याच्याकडे पाहत म्हणाला,
" You mean....It's panic attack !" विशालच्या बोलण्यावरती दिर्घ श्वास घेत विक्रमने मान हलवली. दोन क्षण तसेच शांततेत गेले.
" Panic attack is a natural reaction in these type of cases म्हणजे अत्याचार, रेप अश्या केस मध्ये हे अस होणं स्वाभाविक आहे. emotional crisis असतो हा."  विशालने म्हटलं तसा विक्रम बोलला,
" हो पण हे सारख चालू राहिलं तर ! तिची अवस्था क्रिटिकल होईल अश्याने ! " विक्रम काळजीच्या सुरात म्हणाला.
" See, This happens when you're stressed or anxious. पॅनिक अॅटॅक येण्यामागची भावनाच ही असते की तुम्ही एखाद्या घटनेने धक्का बसून घाबरता, दुःखी होता, किंवा गिल्टी वाटत तुम्हाला खूप! मनाचा तळ ढवळून निघतो आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे हे असे पॅनिक अॅटॅक. हा आता अश्या प्रकारच्या केसेसमध्ये एखादीच्या मनावरती आघात होणं स्वाभाविक असतं. त्यातून ही गोष्ट बाहेर समजली तर आपली मान शरमेने खाली जाईल अस मानसिक दडपण असतच. वेस्ट्रन कंन्ट्रिजमध्ये अश्या केसेसमध्ये वूमेनना दोष देऊन त्यांना वेगळं ट्रिट केल जात नाही. आपल्याकडे या सगळ्यागोष्टी पावित्र्य, चारित्र्य याच्याशी जोडल्या जातात. त्यामुळे एखादी मुलगी अजून मानसिकदृष्टीने कमकुवत बनते. बघ ना सौंदर्य आहे, शिक्षण आहे, नोकरी आहे. आपल्याकडे लग्न जुळायला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या होत्याच कि तिच्याकडे तरीही या एका गोष्टीमुळे तिची एन्गेजमेंन्ट...." विशाल बोलत होता नी तो ऐकत होता. त्याने त्याला थांबवत एक्साईट होत विचारलं,
" मग मी आता काय करु सांग ना! I...I can't see her in this situation. I feel totally collapsed यार You can't understand how I feel now. I....I want to wipe her tears. I want to hugh her. I want to ask her....."
"  विक्रम.......थांब....थांब.....तू ! See घाई करुन काही होणार नाहीय उलट सिच्युएशन हाताबाहेर जाईल !" विशाल त्याला शांत करित म्हणाला तसे त्याने दोन्ही हात डोक्याला लावले. त्याला अस हार मानलेल्यासारखं विशालला पाहवलं नाही.
" विक्रम, लुक आणि आता मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐक. तू कितीही जाऊन बोलण्याचा प्रयत्न केलास तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि दुसरी गोष्ट ही कि, या अश्या परिस्थितित तिला हे सगळं सांगून काहीही चांगलं होणार नाहीय त्यापेक्षा यातून तिला कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी ट्राय करायला हवेत. Luckliy She's your wife now त्यामुळे इतर तिसरी व्यक्ती तिच्यासाठी जे करु शकत नाही ते ते सगळं तू करु शकतोस becuse you're her husband." विशालच्या या बोलण्यावरती त्याने नजर वरती वळवित विचारलं,
" What do you mean म्हणजे नक्की काय ?" 
" या अश्या केसेसमध्ये कोणतीही मुलगी मानसिकरीत्या पहिल्यांदा कमकुवत बनते आणि मनचं जेव्हा आपलं आपली साथ देत नाही तेव्हा मग जगणं नकोस वाटतं, अगदी आपलं काम, आजुबाजूची माणसं सगळचं नकोस होऊन जातं. मुली काहीवेळा स्वतःच्याच नजरेतून उतरतात. आपलं कुणीच नाही आहे, आपल्यासोबत कुणी नाहीय असं त्यांना आतून वाटत राहतं. स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःचा एक वूमेन म्हणून स्वतःला वाटणारा आदर सगळचं अश्या केसेसमध्ये कमी होतं. तुला हेच तर करावं लागेल, तिचा कॉनफिडन्स, स्वाभिमान सगळ तिला तुझ्या वागण्यातून तुला परत मिळवून द्यावं लागेल. तिला स्वतःला वाटलं पाहिजे, Yes I'm beautiful, I've confidence, I'm happy, I want to be happy या सगळ्या इमोशन्स तिला स्वतःबद्दल वाटायला हव्यात." विशाल शांतपणे बोलला.
" हं........ओके "  त्याने विचार करित म्हटलं.
" आणि अश्या केसेसमध्ये मुलीला बर्‍याचवेळा पुरुषांची भिती वाटते, एखाद्याचं सतत आजूबाजूला असणं, त्याचा स्पर्श हे नकोस वाटतं. त्यातून फिजिकल रिलेशनची तर प्रचंड भिती मनात असते.सो इतर गोष्टींसोबतच तिची हि भीती पण तुलाच दूर करावी लागेल. स्पर्श वेगळ्या प्रकारचे आणि सुखद सुद्धा असतात जस कि तिच्या बाबांच्या प्रेमाची तिला भिती वाटत नाही कारण त्यात माया आहे. तसच एखाद्या मित्राचा स्पर्श आपुलकीचा असतो. प्रियकराचा स्पर्श अजून हॅपी फिलिंग देतो. नवर्‍याच्या स्पर्शातली काळजी असते, गोड हक्क असतो सो in short तुला यापुढे तिचा मित्र बनून वागाव लागेल. खरतर प्रत्येक नवरा बायकोचं नात मैत्रीच असायला हवं पण इट्स ओके, बाकिच्यांचं सद्या राहू दे तू तुझ्यावर फोकस कर." 
" हं........" विशालचं ऐकल्यावर दिर्घ श्वास घेत त्याने म्हटलं.
" विक्रम, हे सगळ काही एका दिवसात नाही होणारय सो Keep patience " त्याने त्याच्या हातावरती किंचितस थोपटत म्हटलं.
" हं.........."   तो विचार करित म्हणाला.
" विक्रम, Come on !  It's not sooooo difficult for you ! कारण विक्रम कधीच हार मानत नाही हो न !"  विशालने छानस हसत म्हटलं तसा त्याच्या चेहर्‍यावरचा ताण पळून गेला.
" ओके, आणि हो आपण टच मध्ये असुच पण तुला अधूनमधून इकडे जयपूरला माझ्या क्लिनिकला याव लागेल. समोरासमोर भेटून आपण बोललो तर बरं होईल." विशाल उठत म्हणाला.
" हो ओके.......I'll come and see you soon " विक्रमने त्याच्या सगळ्या बोलण्याला तयारी दर्शवली.
................

विशालला भेटून विक्रमला बरं वाटलं. गेले तीन एक महिने जे जे मनात होतं ते ते सगळं कोणासमोर तरी घडाघडा बोलावस त्याला वाटत होतं. त्यातून अनघाच्या बिघडलेल्या अवस्थेमुळे तो अजूनच टेन्शनमध्ये होता पण डॉ. विशालमुळे त्याला वाटल होतं तसा आशेचा किरण त्याला दिसू लागला. मनावरचं ओझं हलकं झालं होतं. आता हि सगळी परिस्थिती हाताळायला विशाल आपल्यासोबत आहे यामुळे त्याला बर वाटलं. याच खुशीत त्याने हॉटेलला गेल्यानंतर सामान पॅक करायला घेतलं. बॅगा रूमबाहेर काढताना सहजच त्याचं जुईच्या रुमकडे लक्ष गेलं पण रुम बाहेरुनच कुलुपबंद होती. मग तो बॅग घेऊन खाली काउंटरपाशी आला. फॉर्मलिटिज पूर्ण करून तो हॉटेलबाहेर पडला तेव्हा त्याला खूप उत्साही वाटलं. कधी एकदा सांगलीला जातो अस वाटत होतं त्याला.
..........................
मार्केटमधून निघताना गाडीतून सहज त्याचं लक्ष मार्केटमध्ये असलेल्या कपड्यांच्या दुकानांकडे गेलं. तो गाडीतून खाली उतरत एका बाईंच्या दुकानापाशी गेला.
" बोलो साहब, क्या चाहिए ?" ती मध्यमवयीन बाई तिच्या हातातले ड्रेस नीट लावून ठेवीत होती. दुकानात लावलेल्या सगळ्या कपड्यांवरुन त्याने नजर फिरवली. तो काही मोठा मॉल नव्हता ना सुपरमार्केट. रस्त्यावरची साधीशी दुकानं होती ती ! 
" अरे बोलते क्यो नही !" त्या बाईंनी पुन्हा विचारलं. त्याने मग एका दुपट्ट्याकडे बोट दाखवलं. कॉटनचा प्रिटेंड दुपट्टा होता तो. हिरवा, मरून, पिवळा असे तिन रंग त्यावरती होते आणि दोन्ही टोकाला छानशी गोंड्याची डिझाईन.
" बेहनजी वो दुपट्टा दिखा दो। " तिने तो दूपट्टा काढून त्याच्या हातात दिला.
" ले लो। अरे अच्छा है गलफ्रेन्ड के लिए चाहिए क्या।" त्यांनी हसून विचारलं.
" अरे नही बिवी है मेरी।" तो हसतच तिला म्हणाला.
" बढिया। तो फिर ले लो खूश हो जाएगी।" ती हसतच म्हणाली तस त्याने वॉलेटमधून पैसे काढून तिच्या हातात दिले. तिने तिचे पैसे घेतले आणि सुटे पैसे त्याच्या हातात दिले. दुपट्टा एका बॉक्समध्ये पॅक करुन त्याच्या हातात बॉक्स दिला.
" तुमने पैसे नही पुछे मुझे । तुमने दिए और मैने बाकी पैसे कितने दिए ये भी नही देखा तुने।" ती बाई आश्चर्याने म्हणाली.
" It's ok ! I like this लाखभर थोडी ना है इसकी किमत।" त्याने हसत उत्तर दिलं आणि तिला बाय म्हटलं.
गाडीत बसल्यावरती त्याला वाटलं, त्या दुपट्ट्यावरचे रंग प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात आणायचे आहेत आता. या विचारानेच त्याने गाडी स्टार्ट केली.
क्रमशः

🎭 Series Post

View all