बंधन भाग 5

Love, Social Issues

भाग 5 ( चौथ्या भागात प्युन शिवरामने सामंतसरांना फोन केला. खंदारे मॅडमची नियुक्ती 'बिजनेस मॅनेजमेंन्ट ' विभागाच्या प्रमुखपदी केल्याची बातमी त्याने सरांना दिली. सामंतसरांना यामुळे राग आला पण त्यांच्या मुलाने राजेशने त्यांना समजावलं पण त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं बर्‍याच शंका उपस्थित करणारं होतं पाहुया आजच्या भागात काय होतंय )

बंगल्यातील जिन्याच्या पायर्‍या धडाधड चढत निता वरती जात होती समोरुन येणार्‍या गंगाआत्याच्या कपाळावर ती आपटलीच असती तोच आपल्या नऊवारी साडीचा खांद्याभोवती घेतलेला पदर सावरत आत्या तिला थांबवत म्हणाली," अगं अशी धावतेस का ? पडलीस मग."
" काही नाही आत्या, दाद्या गेला का कॉलेजला !"
" नाही,आहे तो खोलीत तयार होतोय "
" ओहो, बरं मी पण बाहेर जातेय. यायला उशीर होईल काळजी नसावी तेच त्याला सांगायचं आहे आणि हो तूही लक्षात ठेव." ती आत्याला बोट दाखवत सुचना देत म्हणाली.
" हो पण बाईसाहेबांना माहितीय ना !" गंगाआत्याने विचारलं.
" हो ग आत्या मी सांगितलंय आईला आधी तयारच नव्हती मग सगळ्या सुचना देऊन झाल्यावर जा म्हणाली." 
" बरं बाय मी येते " ती तशीच धावत रुममध्ये गेली. तिच्याकडे पाहून आत्याला हसुच आलं.
.....................

" May I come in Saheb" ती खोलीच्या दारापाशी उभी राहून टकटक करित म्हणाली.
" नीतू दरवाजा उघडा आहे  ये " विक्रम पाठि न वळताच स्वतः समोरच्या मोठ्या आरश्यात पाहत म्हणाला. शर्टच्या हाताच्या घड्या दुमडत त्याने बेडवर ठेवलेलं कडक इस्त्रीचं जॅकेट अंगावर चढवलं. कपाटाच्या आरश्याला लागूनच एक कप्पा होता. त्यातल्या परफुम्सच्या बॉटल्सपैकी Nautica Blue ची त्याची फेवरेट पर्फ्युम बॉटल त्याने उचलली आणि शर्टवर पर्फ्युम मारला. हातात रिस्टवॉच चढवत पुन्हा त्याने नितुला आत ये म्हटलं. ती दबक्या पावलांनी त्याचं निरिक्षण करित त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली.
" ओहो Handsome hulk काय कुठे दौरा " ती विक्रमच्या कडकडीत ड्रेसवरुन नजर फिरवत म्हणाली.
" अगं कॉलेजला इंन्टिरव्हियु आहेत ना! सकाळीही होते पण बाबा गेले होते. मला दुपारी जायला सांगितलंय." तो शर्टची कॉलर नीट करित म्हणाला.
" हम्म दि ग्रेट भाऊसाहेबांचा दि जिनिअस बेटा." विक्रमचं कौतुक करित नीता म्हणाली.
" जिनिअस वगैरे काही नाही गं." तो म्हणाला.
" मग आहेच माझा दादु जिनिअस " ती पुन्हा म्हणाली तशी त्याने तिच्याकडे पाहत नुसतीच स्माईल केली.
" पण तू का एवढा रेडि होतोयस म्हणजे इंन्टिरव्हियुला येणारे आयमिन येणार्‍या जर कुणी असतील तर त्यांचं इंन्टिरव्हियुमध्ये लक्ष राहिल का त्यातून तू प्रश्न विचारायला लागलास तर त्यांना काहीतरी उत्तरं तरी सुचायला हवी ना" ती त्याला चिडवीत म्हणाली.
" नीतू तू ना खूप बोलतेस नाही का ?" त्याने आरश्यासमोरुन बाजूला होत नीतूकडे पाहिलं आणि तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली.
" मी कुठे काय केलं दाद्या " ती हसत त्याच्या पासुन चार हात लांब पळत म्हणाली.
" ओके मी याच्यासाठी आले होते कि मी म्हणजे आम्ही एनजीओचे लोकं वर्ध्याला जाणार आहोत." ती सिरियस होत म्हणाली.
"का गं ?" त्याने वॉचकडे  पाहत विचारलं.
" काही दिवसांपुर्वी हिंगणघाटला जे घडलं आरोपीला भलेही पोलिसांनी अटक केली पण न्यायासाठीची लढाई अजून बाकीच आहे ना ! हा आता आम्ही काही न्याय देऊ शकत नाही पण समाजाचा एक घटक म्हणून निदान या यंत्रणांना जागे ठेवण्याचा प्रयत्न तरी करू शकतो."
"हं आल लक्षात " तो म्हणाला
" आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत आणि लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकार्‍यांना संस्थेच्यावतीने निवेदन देणार आहोत." तिने सविस्तर सांगितलं पुढे म्हणाली," पण मला निघावं लागेल दोन- तीन दिवस तरी मी तिकडेच असेन."
" ओके ओके पण एक सांगु ?" विक्रमने नीताच्या चेहर्‍याकडे पाहत विचारलं.
" काय ?"
"Please you take care of yourself " तो कळकळीने तिच्या गालावर हात ठेवत मायेने म्हणाला.
" हो रे दाद्या आणि मुझे दो भाई है तो फिकर नॉट जी." ती त्याच्या हातावर आश्वासकपणे थाप मारित म्हणाली.
" हं गुड बरं आहे कुठे तुझा जितूदादा " त्याने हसत विचारलं.
" तो काय बुवा कारखान्याचा चेअरमन आहे आता." निता
" हो  हो ते तर आहेच." विक्रमनेही तिला हसत दुजोरा दिला इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने कट केला पुन्हा वाजला.
" काय रे कोणीतरी वेट करतंय वाटतं!" ती चिडवत मोबाईलकडे पाहत म्हणाली आणि त्याच्या हातातल्या मोबाईलस्क्रिनवरचं नावं पहायचा प्रयत्न करु लागली. तिचा हा आटापिटा पाहून त्याने सरळ मोबाईल तिच्यासमोर धरला.त्यावर ' Samant sir ' असं नाव झळकत होतं. 
" बघ बघ कॉलेजमधूनच कॉल आहे. आता पटली खात्री" 
" हो " तिने लांबलचक ' हो ' म्हटलं.
" ओके बाय " ती म्हणाली.
" हं बाय अँण्ड पोचलीस की कॉल कर" विक्रमने रुमबाहेर धावत जाणार्‍या निताला मोठ्याने सांगितलं. ती हो हो म्हणत आली तशी घाईत निघून गेली.
....................
निता म्हणजेच भाऊसाहेबांची धाकटी मुलगी, राजेशिर्केंच्या घरातलं शेंडेफळ. लहानपणापासुन सगळ्यांना मदत करण्यास तत्पर असणारी हळवी पण तितकीच अन्यायाविरुद्ध बंड करणारी अशी ही निता. घरातच आजी- आजोबांपासुन सुरु झालेला समाजसेवेचा वारसा पुढे भाऊसाहेब म्हणजेच रणजित राजेशिर्केंनीही सुरु ठेवला. लोक त्यांच्यात जणू श्रीपादरावांनाच पाहत असत. निताला भाऊसाहेबांविषयी  प्रचंड आदर आपणही लोकांसाठी काही करावं हा विचार तिला स्वस्थ बसु द्यायचा नाही. एच.एस.सी. नंतर तिने बॅचलर अॉफ सोशल वर्क चा कोर्स करण्याचं ठरविलं. त्यानंतर तिने सांगलीतल्या एका एन.जी.ओ.साठी नुकतचं काम करण्यास सुरुवात केली होती. पण विक्रम  आणि जितेंद्र या दोघांचा तिच्यावर खूप जीव. दोघांची लाडकी बहिण. पण ती नेहमी त्यांना समजावायची. तिलाही तिच्या दोघा भावांचा अभिमान वाटायचा. जितेंद्रही तिच्यासारखाच होता साधा,प्रामाणिक माणूस. शेतकर्‍यांसाठी काम करण्यास त्याने सुरुवात केली अन् हळूहळू लोकांचा विश्वास जिंकत तो कारखान्याचा चेअरमनही बनला.कारखाना फायद्यात आणला त्यामुळे शेतकरीही जितेंद्रवरती खूश होते. त्यामुळे आता कारखान्याच्या जबाबदारीची भाऊसाहेबांना चिंता नव्हती. तिघांमध्ये मोठा म्हणजे विक्रम. उंचापुरा,गोरा वर्ण,कुरळे केस कोणालाही आवडेल अशी पर्सनॅलिटी आणि मुळात आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची जाणीव असणारा त्यामुळे त्याचं वागण- बोलणं,राहणं सगळचं टापटिप समोरच्याला प्रभावित करणारं असायचं. फक्त दिसणंच नव्हे तर तितकीच कुशाग्र बुद्धीमत्ताही अंगी  होती. त्यामुळे भाऊसाहेबांनी त्याला यु.एस.ला शिक्षणासाठी पाठवायचं ठरवलेलं. तिकडे शिक्षण घेऊन त्याने इथे यावं आणि त्या ज्ञानाचा 'गुरुकुल ' ला फायदा  व्हावा, इथल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे विक्रमने विदेशातून एम.बी.ए.पूर्ण केलं तेही उत्तम मार्क मिळवून आणि त्यानंतर तो सांगलीला आला. भाऊसाहेबांनी मग त्याच्यावर गुरुकुल च्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली आणि स्वतः अधूनमधून जसं शक्य होईल तसं ते कॉलेजला भेट देत असतं. एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे संस्थेला मार्गदर्शन करत असत. सगळं इतकी वर्ष सांभाळलं आता मुलं हे सगळं छान सांभाळतील अशी त्यांची अपेक्षा होती. 'गुरूकुल' चा कारभार गेल्या दोन वर्षांपासुन विक्रम चांगल्या रितीने सांभाळतोय याची खात्री त्यांना पटली होती. आता हा त्यांचा समज कितपत बरोबर होता काय माहित!
...................
विक्रम रुममधून बाहेर आला तेवढ्यात अरुंधतीने हाक मारली.
"विक्रम निघालास "
"हो मम्मा निघतो मी "
" बरं नीट जा " 
" हो " तो आईला बाय करुन बाहेर पडला. अरुंधती भाऊसाहेबांची पत्नी. आईला आपली सगळी मुलंच जीव की प्राण असतात तसंच या तिघांचीही अरुंधतीला काळजी असायची पण कितीही काही म्हटलं तरी सगळ्यांनाच ठाऊक होतं तिचा जास्त जीव विक्रमवरती आहे. विक्रमचं कौतुक करताना ती थकायची नाही त्यातून भाऊसाहेबांनी त्याच्याकडे 'गुरुकुल ' च्या डायरेक्टर पदाची जबाबदारी दिल्यामुळे तर ती अजूनच खूश होती. खरंतर हा विचार तिच्याही मनात आला होता. विक्रमकडे 'गुरुकुल ' ची जबाबदारी द्यावी असं भाऊसाहेबांना सांगावसं तिला वाटतं होतं पण अरुंधती म्हणतेय म्हणजे नफा तोट्याचा विचार करणारं तिचं डोकं असाच ग्रह भाऊसाहेबांचा तिच्याबद्दल होता म्हणून ते तयार झाले नसते पण अचानक भाऊसाहेबांनी स्वतःहून हा निर्णय घेतल्याने ती मनातून खूश होती. विक्रम आणि अरुंधती आई लेकाचं नातं घट्ट होतं. भाऊसाहेबांनाही हे माहित होतं कि विक्रमला आई जास्त जवळची आहे आणि आईच्या बाबतीत तोही जास्त इमोशनल आहे.
..........................

विक्रमने त्याच्या आलिशान कारचा दरवाजा उघडला आणि गाडी स्टार्ट करणार तोच त्याच्या डोक्यात प्रो.सामंतांचा विचार आला. त्याने लगेच त्यांना कॉल केला.
विक्रम - "हं बोला काय म्हणताय सामंत ?"
सामंत सर - "अहो साहेब मी काय बोलणार आता माझ्या हातात काय उरलंय?" पलिकडून अगतिकतेने सामंत सर बोलत होते.
विक्रम -"म्हणजे ?" विक्रमने न कळून प्रश्न विचारला.
सामंत - "साहेब खंदारे मॅडमना माझ्याजागी हेड नेमलंय " 
विक्रम - " हो I know that प्रिन्सिपलचा कॉल आला होता मला." शांतपणे विक्रम म्हणाला
सर - " हो पण मला कुणीही काही याविषयी सांगितलं नाही हे बरोबर नाही साहेब "
विक्रम - " असु द्या हो, चूक बरोबरची तुम्ही का काळजी करताय ! मॅडम झाल्या 'एच.ओ.डी.' तर तुम्हाला काही फरक पडणार आहे का ! " 
सर - " साहेब असं काय म्हणता ! मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल ना "
विक्रम - " तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी and you can't forget she is senior than you Samant सो आता हा विचार सोडा आणि आपल्या कामाला लागा त्यात जास्त फायदा आहे काय ?"
सामंत - " हो सर आलं लक्षात. मी कॉलेजला आलोय तुम्हीही या इंन्टिरव्हियुला भेटुच मग " आता पलिकडून हसत ते म्हणाले.
विक्रम - " गुड I'm coming भेटुच " तो हसत म्हणाला. पलिकडून समाधानाने सामंतांनी फोन ठेवला आणि आपलं उत्तर त्यांना पटवून दिल्याचा विक्रमला आनंद झाला. त्याने डोळ्यांवर सनग्लासेस चढवले आणि कॉलेजला जायला गाडी स्टार्ट केली.
क्रमशः

🎭 Series Post

View all