बंधन भाग 43

Love, Social Issues

भाग 43

(  गेल्या भागात अनघा कॉलेजमधले तिचे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या तिच्याबाबतच्या उलटसुलट बोलण्याने अस्वस्थ झाली होती. तिला आपण या लग्नाला हो म्हटल्याचा आता पश्चात्ताप होत होता आणि गेल्या भागाच्या शेवटी तिच्या सगळ्या भावनांचा स्फोट झाला. नकळत ती मनातलं सगळं विक्रमला बोलून गेली पाहूया आता याचे परिणाम या लग्नावरती होतात का)

अनघाचे आईबाबा तिच्या रुमबाहेर बराच वेळ उभे होते पण तिने आतून दरवाजा उघडलाच नाही उलट मला एकटीला राहू द्या जरावेळ प्लीज अशी तीच त्यांच्यावरती आतून ओरडली.

"  अनु ए अनु तू काहीतरी भावनेच्या भरात बोलून जाऊ नकोस." कुमुद तिला म्हणाली.

" आईबाबा प्लीज मला जरा एकटीला सोडा प्लीज तुम्ही जा सगळे इथून." ती असं म्हणाली म्हटल्यावर गप्पपणे हॉलमध्ये येण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्यांना. तिने मोबाईल स्वीच अॉफ केला आणि ती ढसाढसा रडायला लागली. तिला वाटलं काय परिस्थिती ओढावली ही आपल्यावर! सगळेजणच आपल्यालाच बोलतात आणि कोणाकोणाला काय काय उत्तरं देणारं. ऐकून घेण्याशिवाय काय करु शकतो आपण! 

....................

" श्रीधर, तिच्या अश्या वागण्याने विक्रमसरांना काय वाटलं असेल."  कुमुद चिंताग्रस्त चेहर्‍याने म्हणाली.

" हो ग आधीच आपली त्यांच्याशी सोयरीक होणं म्हणजे विचार करण्यापलिकडेच आहे हे! हे लग्न झालं तर बरं होईल. आपली अनू सुखी होईल बघ." श्रीधर आशावादी नजरेनं म्हणाले. त्यांनी विक्रमचा नंबर धीराने डायल केला.

तिचा फोन असेल म्हणून त्याने पटकन पलिकडून उचलला.

" हॅलो " त्याने अधिरतेनं म्हटलं.

" हॅलो मी मी बोलतोय अनघाचा बाबा." तिच्या बाबांचा फोन तोही मघाच्या प्रसंगानंतर असा लगेचच त्यामुळे त्याला टेंन्शन आलं.

" सर तुम्ही तिचं नका मनावरती घेऊ प्लीज तिच्यावतीने आम्ही दोघं तुमची माफी मागतो पण हे लग्न मोडू नका हो." ते काकुळतीने बोलत होते.

" नाही नाही तुम्ही उगीच नका त्रास करुन घेऊ तस तस काही नाही होणार." त्याच्या या शब्दांनी श्रीधरला बरं वाटलं.

" तरीही सॉरी तिची मनःस्थिती माहितीय ना तुम्हाला आणि हल्ली इतकं काही घडतय पटापट तिला सगळ्या नव्या बदलांशी जूळवून घ्यायला वेळ तर लागेल." ते असं म्हणाले त्यावर तो पुन्हा म्हणाला,

" हो तुमचं पटतय मला. तुम्ही नका काळजी करु. ठिक होईल सगळं."  पुढे त्यांच्याशी फार त्याला बोलवेना. त्यांच्या मुलीच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत ही भावना त्याचं मन पोखरुन काढत होती. तिचे आईवडिल नुसते समोर जरी आले तरी त्यांच्या नजरेसमोर आपण अपराधी आहोत असं वाटायचं त्याला आणि आज तर त्यांना अस माफी मागताना ऐकून त्याला त्यांना कसं समजावायचं ते कळत नव्हतं. त्याने तेवढच बोलून बरं गूडनाईट म्हणून फोन ठेवून दिला. त्याच्या शांत राहण्याने आणि अनघावरती न चिडल्याने श्रीधर कुमुदला बरं वाटलं.

......................

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने नेहमीप्रमाणे तिला गुड मॉर्निंगचा मेसेज नाही केला. त्याला वाटलं, आपण सकाळ संध्याकाळ स्वतःहून तिला मेसेजेस करतो, कॉलेजमध्येही बाकी सगळे काय बोलतील याची पर्वा न करता तिच्याशी बोलतो, कामासाठी तिला केबिनला बोलावतो पण यामुळे तिची परिस्थिती अॉकवर्ड होत असेल. कदाचित आपला बाकी स्टाफशी डिरेक्ट संबंध येत नाही म्हणून आपल्याला ते जाणवत नसेल पण खंदारे मॅडमनी सांगितलं तसल्या चर्चा खरच जर तिच्यामागे बाकी स्टाफच्या सुरु असतील तर तिला  काय वाटत असेल. खरंच आपल्या वागण्याने तिच्या त्रासात भर नको पडायला अॉलरेडी आपल्यामुळे न भरून निघण्याइतकं नुकसान झालय तिच्या लाईफचं. आरश्यासमोर उभं राहून नेहमीसारखी कॉलेजला जायची तयारी करत असताना त्याच्या मनात विचार सुरु होते. तो नाश्ता आटोपून लवकर कॉलेजला गेला. आज तिच्याशी न बोलण्याचं त्याने ठरवलं होतं.

.....................

" काय डॅड गेला नाहीत अजून कॉलेजला ?"  सामंतसरांची कॉलेजला निघण्याची वेळ झाली तरीही ते पुस्तकांमध्येच डोक खूपसुन बसलेले पाहून राजेशने विचारलं.

" नाही रे निघतोय निघतोय.....न जाऊन कसं चालेल सेकण्ड टर्म एक्साम तोंडावर आल्यात विक्रमने सगळ्यांना स्ट्रिकली सांगितलय, कॉलेजमध्ये वेळेत या लेक्चर्स वेळेत घ्या परवा मिटिंगपण होती. अनघाची चांगली तासमपट्टी निघाली."  ते हसत म्हणाले.

" काय सांगता! " तो सोफ्यावरती टेकत म्हणाला.

" हो ना पण राजेश परवाची ती एक गोष्ट सोडली तर विक्रम हे जे काही वागतोय ते मला पटलेल नाही बघ.मी बोलणार होतो पण कॉलेजमध्ये त्याच्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलणं करेक्ट नाही म्हणून नाही बोललो "

" हे जे म्हणजे काय आता?" राजेशने बोअरींग नजरेने न्युजपेपर चाळत विचारलं.

" म्हणजे हेच रे अनघाच्या मागे मागे फिरणं आणि त्यातून हे लग्न वगैरे सगळच प्रकरण जरा unbelievable च आहे." सामंतसर शंकास्पद नजरेनं बोलत होते.

" डॅड मी म्हटलं ना ही सगळी ड्रामाबाजी बाकी नथिंग ओ!" तो बोलला.

" पण तू हे इतकं शुअर कसं म्हणतोयस?" त्यांच्या या प्रश्नावरती त्यांना नजरेनच थांबा म्हणत त्याने खिश्यातून मोबाईल काढला. गॅलरी ओपन केली आणि त्यांच्यासमोर मोबाईल धरला.

" What is this ? " ते हातातला चष्मा डोळ्यावरती चढवित म्हणाले. 

" एक एक मिनिट "  त्यांनी मोबाईल त्याच्या हातातून घेतला.

" O My God ! Is he Vikram राजेश काय हे सगळं?" राजेशने गॅदरिंगच्या दिवशी रात्री घडलेली ती घटना त्यांना अजून सांगितलीच नव्हती. पण त्यांच्या अतिप्रश्नांमुळे शेवटी त्याने त्या रात्री रेकॉर्ड केलेली ती अनघाची व्हिडिओ क्लीप त्यांना दाखवली. ते पाहून त्यांना धक्का बसला.

" बापरे! I couldn't imagin विक्रम हे असं काहीतरी!" ते अजूनही आपण स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवत नव्हते. 

" हं आता समजलं डॅड विक्रमचं लग्नाला हो म्हणण्याचं कारण कारण हि क्लीप जर उद्या समजा भाऊसाहेबांपर्यंत पोचली तर तुम्हाला वाटतं का ते त्याला असं माफ वगैरे करतील. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते त्याला अजिबात पाठीशी घालणार नाहित. "  तो हसत त्यांच्या हातावर टाळी देत म्हणाला पण सामंतांचा हसण्याचा मुड नव्हता.

" हो रे पण लग्नानंतर तिला कळलं कुठुनतरी मग काय ? अरे चोविस तास सोबत राहणार म्हटल्यावरती किती दिवस तो हि गोष्ट लपवून ठेवणारय?"  सामंतांनी त्याला विचारलं.

" डॅड ती अनघा सो कॉल्ड मिडलक्लास फॅमिलितली पोरगी तिला समजा जरी हे कळलं तरी कुठल्या तोंडाने स्वतःच्या घरी जाईल ती! आई वडिलासाठी तरी तिला त्याच्याच घरी दासी म्हणूनच रहावं लागणार बघा आणि विक्रमचं तिच्यावर काही प्रेमवगैरे नाही ओ.....या सगळ्या प्रकारातून सुटण्याचं हे लग्न म्हणजे मिडियम आहे फक्त."  त्याचं हे सगळं बोलणं सामंतसर अविश्वसनीय नजरेनं ऐकत होते.

" Ok, पण तू बोल त्याच्याशी जरा." कॉलेजला जायची तयारी करण्यासाठी उठत ते म्हणाले. त्याने ओके म्हटलं.

............,..,...........

विक्रम कॉलेजला पोहचला. त्याने कॉलेजच्या प्रिमायसेसवरुन नजर फिरवली पण त्याला अनघा दिसली नाही. मग तिचा विचार बाजूला ठेवूनच तो त्याच्या केबिनमध्ये गेला. काही महत्वाचे मेल्स करायचे होते ते काम करायला त्याने लॅपटॉप ओपन करुन सुरवात केली इतक्यात मोबाईलवरती न्यु मेसेजचं नोटिफिकेशन आलं. त्याला वाटलं तिचा मेसेज असेल त्याने मेसेज ओपन केला तर राजेशचा मेसेज होता, ' Hey, Busy ? '

त्याने 'नो ' असा रिप्लाय दिला. पुन्हा राजेशने मेसेज केला,

' Ok meet me afternoon today, My home' 

यावर विक्रमने त्याला ओकेचा रिप्लाय दिला. आज तसही काम आटोपून त्याला घरीच जायचं होतं. अनघाच्या आदल्या रात्रीच्या बोलण्यानंतर आज तिला घरी ड्रॉप वगैरे करायला नको अस त्याला वाटलं. तिला आपलं वागणं पटत नाही त्यामुळे इथूनपुढे ती बोलेपर्यंत शांत रहायचं त्याने ठरवलं होतं.

.......................

दुपारी कॉलेज सुटल्यावरती गाडी पार्किंग स्लोटमधून बाहेर काढत असताना त्याने कॉलेजच्या गेटपाशी नजर टाकली. विद्यार्थ्यांचे घोळके बाहेर पडत होते. दुपारसत्राची मुलं गेटपाशी गप्पा मारत उभी होती. प्रिमायसेस मध्येही मुलांची वर्दळ सुरु होती. प्राध्यापकांची ये- जा सुरु होती. त्या सगळ्यांमध्ये ती कुठेच दिसली नाही. घरी गेली असेल असा विचार करितच त्याने कार स्टार्ट करुन सामंतसरांच्या घराच्या दिशेने वळवली.

...............................

तो सामंतांच्या घरी पोहचला. दरवाजा ओपनच होता. त्याने दरवाजातून डोकावून आत पाहिलं. तेवढ्यात आतून टि.व्ही.चा आवाज आला. 

" Welcome विक्रम, Come in, Come in " . त्याला राजेश दिसलाच नाही फक्त टि.व्ही. समोर सोफ्यावरती बसलेल्या त्याचं डोक दिसलं. तो मस्तपैकी सोफ्यावरती बसला होता आणि दोन्ही पाय समोरच्या वुडन टिपॉयवरती सोडले होते. विक्रम आतमध्ये आला. त्याला राजेशच्या अश्या वागण्याचं नवल वाटलं. एरव्ही कधीही विक्रम त्याच्या घरी आला आणि त्याने राजेशला हाक मारली कि घराच्या असेल त्या कोपर्‍यातून तो धावत येत ' अरे यार तू कधी आलास ?' असं उत्साहाने म्हणत त्याला वेलकम करायचा पण आज राजेश पुढे आलाच नाही. विक्रम दारातून हॉलमध्ये आला आणि राजेशसमोर जाऊन उभा राहिला.

" What is this all Rajesh ?"  त्याने राजेशला विचारलं.

तो अजूनही सोफ्यावरतीच बसला होता. त्याच्याकडे न पाहता हातातल्या रिमोटवरुन चॅनेल्स चेंन्ज करित राजेशने म्हटलं,

"  कुठे काय अरे! म्हटलं तुझ्या so called marriage ची पार्टी सुद्धा तू आम्हाला दिली नाहीस मग आपणच तुला पार्टी देऊया! तुझं मॅरेज म्हटल्यावर पार्टी तो बनती है न."  राजेश टीपॉयवरुन पाय मागे घेत म्हणाला. त्याने शॅम्पेनची बॉटल ओपन केली आणि ग्लास भरला. 

" वाव! aromatized ! I love this freshness यार." तो शॅम्पेनचे घोट घेत म्हणाला. विक्रम त्याच्याकडे पाहत त्याच्या बोलण्याचा अंदाज घेत होता. राजेशने विक्रमकडे पाहिलं.

" अरे तू अजून उभाच बस न ! घे रे तुझा Favourite brand आहे, Louis Roederer पण एकच बॉटल होती घे रे."  अस म्हणत त्याने विक्रमसाठी ग्लास भरला आणि विक्रमसमोर धरला.

" राजेश What's this nonsense ?" 

" अरे पार्टी! माझ्याकडून आहे अस समज.....अरे हो मी पण विसरलोच रे, तू फक्त Occasionally घेतोस नाही का? only parties तीसुद्धा फक्त शॅप्मेन. पण आता घे या लग्नाचं तसही टेन्शन असेलच तुला. It's ok to drink यार to release stress." तो हसत म्हणाला.

" कश्यासाठी बोलावलयस तू नक्की कळू शकेल?" विक्रमने सरळ त्याला विचारलं.

" हेच रे! एरवी तुझ्या सगळ्या गोष्टी branded असतात. सनग्लासेस, रिस्टवॉच, परफ्युम्सपासून अगदी शूजपर्यंत मग या सगळ्या brand मध्ये होणारी बायको मात्र......" आणि तो त्याला चिडवण्याच्या सुरात बोलत मोठ्याने हसला.

" Just Shut up! " विक्रमने रागाने म्हटलं.

" का रे वाईट वाटलं ऐकताना! अरे तूच म्हणायचास, I don't like that typical serial type girls मग आता, विक्रम यार सोड तिचा विषय. तिच्या अतिआगाऊपणाचा बदला घेतलास न तू. तुझा फायदा पुरेपुर झाला ना आणि ती पण पुन्हा कॉलेजच्या प्रकारात इन्टरफियर नाही करणार आता. so रात गई बात गई.....सोडून दे. तिचं नशीब आणि ती मरु दे ना तुला काय करायचय." 

" राजेश " त्याने चिडून राजेशची कॉलर धरली तसा घाबरुन तो उठून उभा राहिला.

" Mind your language हा नाहीतर मी विसरुन जाईन कि तु माझा मित्र आहेस." 

" विक्रम मुर्खासारखा वागू नकोस....यार आपण गोत्यात येऊ अश्याने आणि कॉलेजमधलं ते फि चं प्रकरणही तू केलय हे जर तिला कळलं ना तर ती भाऊसाहेबांपर्यंत पोचवेल ते आणि ते तुला माहितीयत कसे आहेत ते! " राजेश आता घाबरुन समजावण्याच्या सुरात बोलू लागला.

" I don't care हा कोणाला काय समजायचं ते समजू दे पण हे लग्न होणारच आणि that's final " तो राजेशची कॉलर शांतपणे ठिकठाक करित म्हणाला. त्याला चांगलं माहित होतं राजेशने कितीही मोठ्या बाता मारल्या तरी तो स्वतःहून कोणाला काही सांगणार नाही एकतर तोही त्या रात्रीच्या प्लॅनमध्ये सहभागी होता आणि दुसरी गोष्ट जर हा प्रकार उघडकीस आला असता तर सामंतसरांना मान खाली घालावी लागली असती. राजेश अस काहीही करणार नाही ज्याने सामंतसरांच्या नोकरीवरती गदा येईल याची विक्रमला पूर्ण कल्पना होती.

" विक्रम This is not right " राजेशने पुन्हा म्हटलं.

" राजेश, I know what I'm doing. मला कुणीही काही सांगण्याची गरज नाही. नी दुसरी गोष्ट जर तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुला सोडणार नाही! Do you understand, Better understand. " तो त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला आणि त्याने टीपॉयवरचा राजेशने भरलेला मघाचा ग्लास उचलला. थोडा उंचावरती धरला. राजेशला काही कळलं नाही.

" By the way राजेश,   Drinking liquor is the sign of weakest man my friend ! & Vikram is not weak person " एवढं बोलून त्याने भरलेला ग्लास हातातून खाली टाकला. ग्लासचे तुकडे विखुरले आणि ग्लासमधली शॅम्पेन फरशीवरती पसरली. राजेश पुढे काही बोलण्याआधीच विक्रम तरातरा तिथून बाहेर पडला. राजेश आवासून त्याच्याकडे पाहतच राहिला होता. तो जरा सावरला, विक्रम स्वतःला वाचवण्यासाठी लग्न करण्याचं नाटक करतोय असच राजेशला या क्षणापर्यंत वाटत होतं पण सामंतसरांची शंकाच शेवटी खरी ठरली. विक्रमने गॅदरिंगच्या रात्री त्याला गोडावूनमधून जायला सांगणं, त्याआधी अनघाने अंधारात राजेशच्या कानाखाली मारणं हे सगळं राजेशला आठवलं. इतकं सगळ होऊनही राजेश पुन्हा विक्रमला समजावायला आता भेटला होता आणि विक्रमचं हे वागणं आणि  धमकीच्या सुरात बोलणं राजेशला अनपेक्षित होतं. आता मात्र राजेशला विक्रमच्या वागण्याचा राग यायला लागला होता, " विक्रम, तुला सगळच महागात पडेल हे! आता मला हे लग्न मोडण्यात काडीचाही इंन्टरेस्ट नाही. आता मलाही पाहायचं हे लग्न झाल्यावर कसं टिकतं ते! विक्रम अरे तू तुझ्या कॉलेजच्या डेलिसोपच्या हिरोईनीलाच घरी घेऊन यायला निघालास म्हटल्यावर घरी ड्रामा तर होणारच ना!" तो शॅप्मेनचा ग्लास हातात घेत स्वतःशीच मोठ्याने हसला.

..............,.,..,,,

तो सामंतसरांच्या घरुन बाहेर पडला आणि गाडी स्टार्ट केली.  रोडला आल्यावरती त्याला बरं वाटलं पण राजेशचं बोलणं अजूनही त्याच्या मनात घोळत होतं. त्याला राजेशचा प्रचंड राग आला होता. त्याच विचारात ड्राईव्ह करताना प्राचार्यांचा कॉल आला. इयरफोन्सवरुन प्राचार्य बोलत होते,

" हॅलो सर, तुम्ही बाहेर असाल तर कॉलेजला याल का जरा मला एक फाईल हवी होती. आपले लेबर्स आहेत त्यांच्या महिन्याच्या पेमेंन्टची फाईल तुमच्या केबिनमध्ये आहे. It's urgent, Please try to come "

" Ok Ok, I'm coming " त्याने म्हटलं. त्यालाही मघाच्या विचारातून सुटका हवीच होती. त्याने गाडी बंगल्याकडे न वळवता कॉलेजच्या दिशेने वळवली.

........................

कॉलेजच्या दिशेने जाणार्‍या रोडच्या आधी असणार्‍या एका चौकात त्याला गर्दि दिसली. दहा पंधरा माणसांचा घोळका होता. त्याला गाडी पुढे नेता येईना. 

" शट, नको त्यावेळी हि लोकं गर्दी करतात कुठेही !" असं पुटपुटतच तो गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्या घोळक्यात शिरणार्‍या एका माणसाला त्याने हटकलं,

" काय झालं तिकडे?" त्यावर तो माणूस म्हणाला,

" काय माह्यत बा कुनीतरी मॅडम पडल्या मनतात चक्कर आली. रिक्षाची वाट बगत व्हत्या आता इतक्या ऊनात कश्या थांबायचं. आडोश्याला तरी उब राहायचं ना!" तो माणूस अस बोलला आणि विक्रम पटकन धावत धावत त्या घोळक्यात पोहचला. गर्दीला मागे सारत तो पुढे गेला आणि समोर बघतो तर अनघा चक्कर येऊन पडलेली आणि आजूबाजूला दहा - पंधरा  माणसं उभी होती. एक मध्यमवयाच्या काकू त्यांच्या पर्समधल्या बोटलमधलं पाणी तिच्या चेहर्‍यावरती शिंपडत होत्या इतक्यात तो धावत पुढे आला,

" अनघा, अनघा उठ ना." तो तिच्या हाताला धरुन तिला उठवायचा प्रयत्न करित होता तश्या आजूबाजूच्या बायका खवळल्या.

" ओ मिस्टर कोण तुम्ही आणि तुम्ही कुणीही असा असं एखादीला कुणाच्याही भरवश्यावर आम्ही सोडणार नाही " एकीने विचारल.

" ओ मॅडम, तुम्ही जरा गप्प बसता, She is my wife. मी ' गुरुकुल चा डायरेक्टर आहे आता Id दाखवू का ? कॉलेजला जाऊन माहिती काढून या. अनघा ऊठ, " तो त्या बाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करित तिला जागं करत होता. तिला हॉस्पिटलला न्यावं लागणार होत. त्याने दोन्ही हात तिला उचलण्यासाठी पुढे केले आणि तो क्षणभर थांबला. मन म्हणालं, ' तुला तिला हात लावण्याचा काहीही हक्क नाहीय. तुझ्या याच हातांमुळे तिचं व्हायचं तेवढं नुकसान झालय.' या विचाराने तो भानावरती आला. त्याने गर्दीतल्या दोघीजणींकडे मदतीच्या नजरेनं पाहिलं,

" काकू, प्लीज जरा हेल्प " 

त्यातल्या दोघी तिघी पुढे आल्या आणि त्यांनी तिला गाडीत बसवायला मदत केली. तो गाडीत बसणार इतक्यात गर्दीतून दोघतीघं बोलताना त्याच्या कानावर पडलं,

" काय पण हल्लीची नवरा बायकू म्हनायची. नवरा एसीगाडीतनं फिरतो अन बायको रिक्षाची वाट बगते."

" असु द्या हो भांडणबिडण झालं असेल जरासं. " 

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करितच त्याने गाडी हॉस्पिटलकडे वळवली. 

क्रमशः

Like, Comment, Share & Follow

विक्रम मित्रांसोबत शॅप्मेन घेतो असा एक सिन मागे एका भागात होता ते सुरुवातीचे  भाग होते आणि त्याची लाईफस्टाईल, त्याच्या आवडीनिवडी याबद्दलचा तो संवाद होता पण त्यानंतर आतापर्यंत कुठल्याच भागात तो ड्रिंक घेताना दिसत नाही. ही कथा सामाजिक अंगाने जाते त्यामुळे जो माणूस स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करु शकत नाही त्यासाठी ड्रिंक करतो तो स्वतःच्या चुकिची जबाबदारी घेउन तिला काय सावरणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता म्हणून आजचं त्याच्या तोंडी असलेलं quote विचार करुन तयार केलेलं आहे आणि ताणतणावावरती ड्रिंक करणे हा उपाय नव्हे हे दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. 

Next Part शनिवार सकाळ

🎭 Series Post

View all