बंधन भाग 40

Love, Social Issues

बंधन भाग 40

( गेल्या भागात अनघा - विक्रमच्या साखरपुड्याची तयारी सुरु असल्याची बातमी गुरुकलमध्ये सगळ्या प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांना समजते. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सामंतसर राजेशला हे बोलून दाखवतात मात्र तो त्यांना काळजी करु नका असं सांगतो. गेल्या भागात एकदाचा साखरपुड्याचा कार्यक्रमही पार पडतो ज्यामुळे अनघाचे आईबाबा खूश आहेत. पाहूया पुढे)

विक्रम - अनघाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यामुळे गंगाआत्या आणि भाऊसाहेब खूश होते.. जितेंद्र आणि नितूला अनघा पसंदच पडली त्यामुळे त्यांचा आनंदाला पारावार उरला नव्हता. दोघांनी लग्नात आपण कोणते कपडे घालायचे,शॉपिंग काय करायची इथपासुनची तयारी सगळ्यांच्याआधीच सुरु केली होती.  त्यांचा उत्साह पाहून मग आत्यालाही राहवेना म्हणून तिने भाउसाहेबांकडे लग्नाच्या तारखेचा विषय काढला.

" साहेब, लग्नाचा मूहुर्त कधीचा पाहूयात?" 

" ताई हो हो मुलांचं मी समजू शकतो तुलाही घाई झाली की काय सुनबाईला आणायची." साहेब हसत हसत म्हणाले.

• " तसं नाही साहेब, इतकं सगळ चांगलं जुळून आलय तर काही विघ्न नको म्हणून म्हटलं." आत्या काळजीने बोलली.

" हो गं ते तर बरोबर आहे. तिच्या बाबतीत जे आधी घडलय ते पाहता हे लग्न लवकर झालं तर श्रीधरही यातून जरा टेंन्शन फ्री होतील आणि तिलाही इकडे आल्यानंतर बरं वाटेल. शिवाय तोंड फुगवून बसणारी माणस काही कमी नाहीत आपल्याकडे." ते हाताचे तळवे चोळत म्हणाले

" हं आल लक्षात. पण बाईसाहेबांनी विक्रमच्या म्हणण्याला हो म्हटलं ना तोच म्हणाला बा तसं."  आत्या म्हणाली.

" अरुंधतीच काही सांगू नका. तिच्या मनात खरतर नाहीच आहे अनघा आपल्याकडे सुन म्हणून येणं. असो मला वाटतं आपण पुढल्या महिन्यातलाच मुहुर्त पाहुया अगदीच मे महिना नको. देव न करो मधल्या वेळात पुन्हा काही प्रोब्लेम झाला तर."

" अगदी मनातलं बोललात साहेब. मी आजच कुमुदताईंना फोन करते." आत्या उत्साहाने म्हणाली. त्यावरती तेही हो म्हणाले.

• ...................................

कॉलेजमध्ये अनघा- विक्रमच्या होणार्‍या लग्नाची चर्चा सगळ्यांमध्ये सुरु होती. त्याने मात्र या सगळ्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केलं होतं तसंही त्याच्यासमोर येऊन त्याला याविषयी काही विचारण्याची हिंम्मत कुणीही केली नाही आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यालाही वेळ नव्हता. कॉलेजमध्ये स्कील डेव्हलपमेंन्ट प्रोग्रॅमचं डिपार्टमेंन्ट सुरु करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलं होतं.  अनघा कॉलेजला जॉईन झाली त्या वर्षीच्या  जुलैमध्ये अनघाने ही संकल्पना भाऊसाहेबांनी ऐकवली आणि त्यांना ती आवडली म्हणून त्यांनी तिला विक्रमला भेटायला सांगितलं होतं त्याला आता दीड वर्ष झालं होतं. या दीड वर्षात किती काय काय घडून गेलं होतं तिच्या आयुष्यात! विक्रम त्याच्या केबिनमध्ये बसुन हाच विचार करित होता.   कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याचा विचार करत असतानाच अनघा यासाठीच त्याच्या केबिनमध्ये पहिल्यांदा आली होती ते आठवलं. त्याने काहीसा विचार करित खंदारे मॅडमच्या केबिनला फोन लावला.

• " हॅलो बोला विक्रमसर " 

• " मॅडम तुम्ही वरती येऊ शकाल का? आपल्या स्कील डेव्हलपमेंन्टच्या विभागाचं उद्घाटन आहे ना पुढल्या आठवड्यात सो बोलायचं होतं थोडं त्याबद्दलच."  

• " ओके पण सर मला आता लेक्चर आहे मी नंतर येऊ का ?" मॅडम म्हणाल्या.

• " नंतर......नको आयमिन मी नाहीय अकरानंतर " त्याने म्हटलं.

• " Ohhhh  मग काय करुया? दुसर्‍या कोणाला पाठवू का मी. काही अर्जन्ट असेल तर मग." त्या पलिकडून म्हणाल्या.

• " हो हो चालेल ना." तो पटकन बोलला.

• " Ok मी कारखानीस मॅडमना पाठवते तसही त्यांना याविषयीची जास्त माहिती आहे." त्यावर काय बोलावं ते त्याला कळेना. तो मग ओके बोलला.

• ..................

• खंदारे मॅडमनी अनघाला आपल्याला लेक्चर असल्याने विक्रमला भेटायला जाता येणार नाही. नव्या विभागाच्या उद्घाटनाच्या विषयी त्यांना बोलायचं होतं तर तु जाऊन ये असा निरोप त्यांनी अनघाला दिला. ती यामुळे गोंधळली.  पण कॉलेज आणि आपलं वैयक्तीक आयुष्य वेगवेगळं आहे त्यामुळे काही काम असेल तर विक्रमला कॉलेजमध्येही भेटावं लागेल, बोलावं लागेल याची कल्पना तिला होती. त्यामुळे सगळे विचार बाजूला ठेवून ती विक्रमच्या केबिनमध्ये जायला निघाली. केबिनच्या त्या मजल्यावरती पोहचल्यावर तिला तो मागचा प्रसंग आठवला जेव्हा ती पहिल्यांदा याच कामाविषयी बोलायला तिथे आली होती.तिने केबिनच्या दारावरती टकटक केली.

• " Come " मागच्या वेळेसारखच याहीवेळी विक्रमने लॅपटॉपमधली त्याची नजर वरतीही न करता  फॉर्मली तिला आत यायला सांगितलं. ती आतमध्ये आली आणि त्याच्या टेबलसमोरच्या खूर्च्यांशेजारी त्याने बसायला सांगण्याची वाट पाहत उभी राहिली.

• " Please have sit " तो तिच्याकडे पाहत म्हणाला तशी ती चेअर सरकवित बसली. 

• " झाली का तयारी उद्घाटनाची ?" खुर्चीत बसत तिने विचारलं.

• " Not yet.  Chief guest म्हणून कोणाला बोलवायचं त्याचा विचार चाललाय. होईल फिक्स तुम्ही कार्यक्रम पत्रिकेचा मजकूर लिहून घेताय का जरा मग एकेक पॉइंन्टवरती डिस्कस करता येईल. तुमची आयडिआ होती ही सो तुमची काही सजेशन्स असतील तर सांगा." तो पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाला. तिने टेबलवरचे कागद पेन हातात घेतलं आणि ती रेडीच्या पोजमध्ये बसली.

• " ओके Please continue " तिने म्हटलं. त्याप्रमाणे त्याने सांगायला सुरुवात केली. उद्घाटनादिवशी दिवसभराचा काय कार्यक्रम असेल, पाहुण्यांचं नाश्तापाणी इथपासून ते उद्घाटनानंतर आलेल्या पाहुण्यांना कॉलेजमध्ये काय काय दाखवायचं जेणेकरुन ते इंप्रेस होतील इथपर्यंत त्याने सगळं सांगायला सुरुवात केली त्यातील आवश्यक ते ती पेपरवरती नोट डाऊन करीत होती. जे पटत होतं ते ओके म्हणेन सांगत होतं

• ती लिहित असताना त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती आजही नेहमीप्रमाणेच आली होती. साखरपुडा झाल्यानंतर इतर मुलींच्या चेहर्‍यावरती असणारा आनंद, उत्साह, हूरहुर काहीच तिच्या चेहर्‍यावरती नव्हतं. जणु काही घडलंच नाही आहे अश्याच प्रमाणे ती वागत होती. स्वतःहून सजणं- नटणं तर तिने कधीचं सोडलं होतं. त्याचं तिच्या चेहर्‍याकडे लक्ष गेलं आणि त्याला वाटलं, किती साधी, निरागस आहे ना ही! कामाच्या बाबतीत तर किती प्रामाणिक! स्वतःवरती असा प्रसंग येउनसुद्धा स्वतःच्या तत्वांवर ठाम राहीली ती आणि मी मात्र एखाद्या राक्षसासारखा वागलो! ' त्याची नजर तिच्या बोटातल्या अंगठीकडे गेली.तो मनातून म्हणाला,

• ' कशी आहे रिंग! Of Course its nice माझ्या चॉइसची आहे.' तिला मात्र याची कल्पनाच नव्हती.  तिच्यासाठीची रिंग जरी आत्याने पसंद केली असली तरीही त्याला डिझाईन दाखवुनच त्याच्या चॉइसने खरेदी केली आणि सगळ्यांना वाटलं साखरपुड्याची सगळी खरेदी आत्याने केली. त्याची नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती होती पण लक्ष तिच्या चेहर्‍याकडे होतं जे तिच्या लक्षात आलं तशी ती म्हणाली,

• " Ok, मी सगळे डिटेल्स नोट डाउन करुन घेतलेत." तिच्या या वाक्याने तो भानावरती आला.

• " आ...Ya Ok then you may go now and Thanks " त्याने म्हटलं तशी ती कागद पेन हातात घेऊन चेअरमधून उठली.

• "हं Welcome " इतकच ती बोलली आणि केबिनचा दरवाजा उघडून निघून गेली. त्याने याविषयी बोलण्यासाठी प्राचार्यांना फोन केला आणि कार्यक्रमाची रुपरेषा त्यांच्याही कानावरती घातली.

• .................

• ती केबिनमधून बाहेर पडली तोच समोरून शिवा येताना तिला दिसला. तिच्याच दिशेने तो येत होता.

• " मॅडम तुम्ही इथे आहात होय! तुमच्या S.Y. ची मुलं गोंधळ घालतायत क्लासमध्ये. त्यांना वाटलं लेक्चर अॉफ आहे." तो घाईत म्हणाला तसं तिने रिस्टवॉच पाहिलं तर लेक्चर संपायला अवघी पंधरा वीस मिनिटं उरली होती.

• " हो मी जातेय तु हो पुढे."  ती त्याला म्हणाली खरी पण तिला अवघडल्यासारखं झालं. 'लवकर सोडलं साहेबांनी ' असे भाव त्याच्या नजरेत तिला दिसले. शिवा निरोप देऊन पुढे निघून गेला. तिला वाटलं, पुन्हा सरांनी बोलावलं तर आपण यायला नको खंदारे मॅडमना पाठवुयात. आपण कितीही कामाचं का बोललो असेना गेला पाऊण तास आपण त्यांच्या केबिनमध्ये होतो एकतर या फ्लोअरवरती वर्दळही नसते फार त्यातून आपल्या एन्गजमेंन्टची गोष्ट तर अजून कॉलेजमध्ये कोणाच्या पचनी पडत नाही आहे. सगळ्यांच्या नजरेतली प्रश्नचिन्ह नकोशी वाटतात विक्रमना काही फरक पडत नाही त्यांचं राहणीमान, वागणं बोलणं, हाय प्रोफाईल कल्चर त्यांच्यासाठी या गोष्टी काहीच नाहीत पण आपल्याला नाही असं बेफिकिर वागायला जमणार. ' या विचारातच ती खालच्या मजल्यावरती लेक्चरला पोहचली.

• .................

• आत्याने भाऊसाहेबांना सांगितल्याप्रमाणे अनघाच्या आईबाबांना फोन करुन पुढल्या महिन्यातला म्हणजे मार्च मधला मुहुर्त पाहुया का अशी विचारणा केली आणि यामागील कारणही सांगितलं. कुमुद आणि श्रीधरच्या डोक्यातूनही अनघाच्या पहिल्या साखरपुड्यादिवशी झालेला गोंधळ आणि ते निनावी पत्र हे सगळं घोळतच होतं त्यामुळे जास्त वेळ मध्ये घालवण्यात अर्थ नाही. लवकर हे लग्नकार्य पार पडलेलं बरं अस त्यांनाही वाटतच होतं त्यामुळे आत्याच्या म्हणण्यावरती श्रीधररावही तयार झाले. आत्याने त्यांना दोघांनाच घरी बोलावलं मग भटजींना त्याच वेळी  घरी बोलावून मुहुर्ताचं पाहता आलं असतं. ते दोघेही मग तयार झाले. भाऊसाहेबांनी इतका पुढाकार घेतलेला असताना आपण आढेवेढे कश्याला घ्यायचे असं त्यांना वाटतं होतं.

• ...................

• त्यांच्या एन्गगेजमेंन्टला आठवडा झाला होता तरीही फारसं बोलणं किंवा एकमेकांना भेटणं नव्हतचं. हे लग्न ज्या प्रकारे जूळुन आलं होतं ते आधी सर्वांसाठी अविश्वसनीयच होतं. विक्रमचा स्वभाव, रूबाब, हुशारी हे सगळं पाहता अरुंधतीच्या म्हणण्याप्रमाणेच त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी म्हणजे जणू सौंदर्य, बुद्धीमत्ता, टॅलेंन्ट, बोल्डनेस याचा एकत्रित संगम असेल अशी एकदंरीत सगळ्यांची कल्पना होती कदाचित यु.एस.ला शिकत असतानाच आपल्या भारतातल्या पोरींपैकी एखादी कुणीतरी भेटलीच असेल तिकडे असही काहींना वाटतं होतं पण अनघासोबतच्या त्याच्या एन्गगेजमेंन्टने सगळ्यांच्या या कल्पनांना सुरुंग लागला होता. त्याला मात्र या सगळ्याशी काहीच देणघेणं नव्हतं. मात्र कॉलेजमधल्या अनघासोबतच्या तिच्या वयाच्या इतर प्राध्यापिकांचे चेहरे मात्र या बातमीने पडले. आपल्यासोबतच काम करणारी आणि आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी आणि तिचं नशीब कसं इतकं लखलखलं असं त्यांना वाटतं होतं. तिच्या दुःखाची, वेदनांची त्यांना कल्पनाच नव्हती त्यांना फक्त शहरातल्या प्रतिष्ठित घराण्याची, एका आमदाराची सुन होण्याचा मान तिला मिळाला होता हेच त्यांना दिसत होतं. आपल्याच कॉलेजच्या उच्च पदावर असणार्‍या स्मार्ट, चार्मिंग पर्सनॅलिटी असणार्‍या मुलाची ती लाईफपार्टनर होणार आहे हेच त्यांना दिसत होतं पण त्यामागची कर्मकहाणी त्यांना माहित नव्हती पण कार्ले मॅडम, वर्दे मॅडम, रेगे मॅडम  या  प्राध्यापिकांनी मात्र तिच्याबद्दल उलटसुलट चर्चांना सुरुवात केली. काही सिनिअर प्राध्यापिका सोडल्यातर तिच्या वयाच्या इतर प्रोफेसर्स तिच्याशी कामाबद्दलच फक्त बोलायला लागल्या. पहिल्यासारखी थट्टामस्करी, सुटीला तिच्या घरी जाणं, कँन्टनला एकत्र जाणं, सगळं शेअर करणं आता बंद झालं. त्यांच्या अश्या वागण्याने आपल्याला वाळीत टाकल्यासारखच तिला वाटायला लागलं.  

कॉलेज दुपारी सुटल्यावरतीही ग्रुपने बाहेर पडणं, एकमेकीसाठी थांबणं बंद झालं. एरव्ही ती आणि श्रीया वर्दे मॅडम एकत्रच बाहेर पडायच्या. दोघींची घरंही एकाच रस्त्याला असल्याने श्रीया मॅडम अनघाला स्कुटीवरुन घरी सोडायच्या आणि पुढे त्यांच्या घरी जायच्या. त्यांना कधी कॉलेजला थांबावं लागलं तरच अनघा रिक्षाने घरी जायची पण आता श्रीया ही तिच्याशी बोलेनाशी झाली त्यामुळे घरी जातानाही तिला कोणाची सोबत नसायची. विक्रमने बर्‍याचदा ते पाहिलं. कॉलेज सुटल्यावरती ती एकटीच बाहेर पडते आणि रिक्षाने जाते. एक दिवस ती अशीच रिक्षाची वाट पाहत उभी होती. मार्च जवळ येत होता त्यामुळे उष्णताही वाढली.

 चेहर्‍यावरचा घाम रुमालाने पुसत ती रस्त्याच्याकडेला उभी होती इतक्यात एक कार समोर येउन थांबली आणि कारच्या काचा खाली करित आतल्या माणसाने विचारलं.

" मॅडम, Can I give you a ride home ?"  

तिने समोर पाहिलं तर विक्रम कारच्या विन्डोतून तिला हाक मारित होता. 

" No Thanks मी जाईन अॉटोने "  ती कारच्या विन्डोपाशी येत म्हणाली.

" Come on, Don't be so formal. " तो पुन्हा म्हणाला. तिला वाटलं, एखाद्याशी औपचारिक वागण्यात एक्सपर्ट असणारा माणूसच मला उपदेश करतोय. पण तिने असं काही त्याला बोलून दाखवलं नाही. तो इतकं सांगतोय तर ऐकुया म्हणून तिने कारचा मागचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवरती ती बसली. त्याने कार स्टार्ट केली.

.......................

. बाहेरच्या उकाड्याने थिजलेला जीव तिचा कारमधल्या एसीच्या थंडगार झुळकीने आणि म्युझिकच्या गोड सुरांनी तिला बरं वाटलं. तिने डोक सिटला मागे टेकलं आणि शांतपणे डोळे मिटले. रेकॉर्डवरती श्रेया घोषालच्या गोड आवाजातलं गीत सुरु होतं,

           ' पल एक पल में हि थम सा गया

             तू हाथ में हाथ जो दे गया

चलो में जहा जाए तू 

दाए मैं तेरे, बाए तू

हूँ रुत मैं, हवाएं तू साथिया ।

हंसू मैं जब गाए तू 

रोऊँ मैं मुरझाए तू

भीगूँ मैं बरसाए तू साथिया ।' 

• .......................

• कार सिग्नलला थांबली पुढे ट्रॅफिकही होतं. कारमध्ये बसल्यापासून ते आतापर्यंत दोघे दोन शब्दही बोलले नव्हते. फक्त सुमधूर गीतं एकामागोमाग एक सुरु होती. इतक्यात कारच्या काचेवरती टकटक झाली. त्याने काच खाली केली.

• " What ? "

• " दादा फुलं घे की रं " साधारणतः सात - आठ वर्षाची एक छोटी मुलगी समोर उभी होती. तिच्यापेक्षा डगला गुडघ्यापर्यंत पोचणारा शर्ट आणि हाफ पँन्ट, केसांचा बॉयकट, चेहर्‍यावर हसु अशी ती मुलगी. तिच्या हातात गुलाबाची फुलं होती आणि दुसर्‍या हातात टोपली जी तिने कमरेवरती धरली होती. मॉडर्न फुलवालीच जणू!

• " No Thanks " तो तिच्याकडे पाहत म्हणाला.

• " क्यु बें ले लो ना... भाव काय खातोस. सगळी फुलं संपली एवढीच उरलीत. आज बरी कमाई झाली."ती फुलांकडे पाहत म्हणाली.

• " Ok Good but I don't want it." तो पुन्हा तिला बोलला. त्यावर तिने नाक मुरडलं आणि तिचं लक्ष मागच्या सीटवरच्या अनघाकडे गेलं. ती कारच्या विन्डोंतून मान टाकत पुढे आली आणि त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली,

• " क्या तुम भैय्या, तेरे पिछे इतना खूबसुरत फूल बैठा है और तेरेको फुलं नही चाहिए!" ती असं मस्करीत म्हणाली त्यावर तो हळु बोल असं हाताने तिला म्हणाला.

• " घे ना. उससे भी केह दो तुम उससे कितना चाहते हो।"  ती हि हि करुन हसत म्हणाली. तिच्याकडे बघून त्याला नितू आठवली.

• • " ओके दे " त्याने खिश्यातून वॉलेट बाहेर काढलं आणि तिच्या हातात शंभरची नोट दिली.

• " एवढे!!!! "  ती आश्चर्याने म्हणाली.

• • " दे सगळीच " तो म्हणाला. तिने हात पुढे केला.

• " काटे नाही आहेत ना गं."  त्याने विचारलं.

• • " नाय नाय. क्या बात कुछ तो खास है।  Girl Friend !"  ती हसत हसत डोळे मिचकावित म्हणाली त्यावर त्याने हसत नकारार्थी मान डोलवत बोटातली रिंग तिला दाखवली.

" हम्ममममम " मोठ्ठा हं म्हणत तिने हातानेच ' मस्त ' ची खूण केली आणि गुलाबांचा तो गुच्छ त्याच्या हातात दिला. पैसे घेतले आणि गर्दीतून दिसेनाशी झाली.

....................

त्याने हातातल्या गुलाबाच्या फुलांवरुन हळुवार हात फिरवला आणि मागे पाहिलं. तिने शांतपणे डोळे मिटले होते. त्याने दोन क्षण तिच्याकडे पाहिलं आणि हाक मारली.

"  मॅडम हे "  

तिला जाग आली आणि पाहिलं तर त्याच्या हातात दहा एक गुलाबाची फुलं होती. तिला काही कळेना.

" आ काय झालं ?"  तिने विचारलं.

" हे घ्या "   त्याला कुठल्या शब्दात बोलायचं ते समजत नव्हतं.

" एवढी flowers ! "  ती आश्चर्याने म्हणाली.

" अ.... ती एक छोटी मुलगी गाडीजवळ आली आता सो घेतली. प्लीज "  तो आर्जवी नजरेने मान मागे वळवून फुलं हातात धरत म्हणाला. 

" ओके थँक्स "  म्हणत तिने फुलं हातात घेतली.

" Its ok " म्हणत त्याने पुन्हा पुढे पाहत कार स्टार्ट केली. त्याच्या चेहर्‍यावरती स्माईल पसरलं. तिने फुलांवरुन हलकेच हात फिरवला आणि त्यांच्यातले शब्द संपले. पुन्हा गाडीत जावेद अलींच्या गीताचे सुमधुर स्वर पसरले. 

'   तू ही हकीकत , खाब तू

     दरिया तू ही,   प्यास तू

       तू ही दिल की बेकरारी 

           तू सुकूं,   तू सुकूं

जाऊ मैं अब जब जिस जगह

पाऊं  मैं तुझको ऊस जगह

साथ होके ना हो तू है रुबरू, रुबरू

        तू हमसफर 

       तू हमकदम

      तू हम नवा मेरा

         तू हमसफर

        तू  हमकदम

         तू हम नवा मेरा.' 

क्रमशः

आधुनिक स्त्रीच एक रुप ' मॉर्डन फुलवाली ' च्या रुपात साकारलय....आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. Like, Comment & Share with name. Don't forget to follow.

🎭 Series Post

View all