बंधन भाग 4

Social Issue, Love


बंधन 4
( तिसर्‍या भागात भाऊसाहेबांच्या केबिनमध्ये काय खलबतं शिजत होती ते उघड झालं. भाऊंनी मॅनेजमेंन्ट विभागाच्या हेड म्हणून खंदारे मॅडमची नियुक्ती केली होती. आता त्यांनी असं का केलं त्याचं एक जुजबी कारण त्यांनी मॅडमना सांगितलं पण काळेसर, कॉलेजमधले दिनेश, शंकर हे  शिपाई यांना पक्क काहीतरी 'एक्ट्रा ' माहित आहे हे त्यांच्या बोलण्यावरुन दिसतंय या सगळ्याचा उलगडा पुढे होईल पण तुर्तास शिवाने सामंत सरांना फोन केलाय. आता पाहुया पुढे)

" हॅलो सामंत सर " 
 " बोल रे शिवा काय म्हणतोस ?" समोरुन डायरेक्ट प्रश्न.
" सर अहो कॉलेजमध्ये काय झालं तुम्हाला माहितीय का?"
" अरे शहाण्या मला कसं माहित असणार मी घरी आहे." सर त्याच्यावर डाफरले.
" अहो सर घरी काय करताय कॉलेजला या लवकर." तो आजूबाजुला कोणी नाही ना हे पाहत हळू आवाजात म्हणाला.
" का रे आगबिग लागली कि काय!" सर हसत म्हणाले.
" अहो सर आगच लागलीय म्हणजे लागेल हा !"
" काय बडबडतोयस ?"
" अहो सर खंदारे मॅडम हेड झाल्या तुमच्या डिपार्टमेंन्टच्या."
" व्हॉट ! काय बोलतोयस तू हे ! आणि I've no idea कुणी सांगितलं तुला हे !" सरांच्या आवाजात आश्चर्य होतं.
" अहो आज मुलाखती होत्या ना नवीन प्राध्यापकांच्या. भाऊसाहेब  आलेले सकाळी त्यांनीच सांगितलं सकाळी हे प्राचार्यांना. अहो करंबेळकर सर,निंबाळकर सर सगळे होते  केबिनमध्ये."
" काय सांगतोस काय !"
" मग सगळ्या कॉलेजला बातमी कळली एव्हाना." शिवाने सगळी माहिती त्यांना पुरवली.
" पण माझ्या गैरहजेरीत हे ठरवलंच कसं!" सर चिडून म्हणाले.
" हम् खंदारे मॅडम जाम खुश आहेत " तो म्हणाला.
" त्यांना खूश न व्हायला काय झालंय"
" तुम्ही सावध असा सर " त्याने सल्ला दिला.
" शट अप बरं बघतो मी काय ते. ठेव तू" त्यांनी फोन कट केला.

" ज्याचं करावं भलं तो म्हणे आपलंच खरं " शिवा मोबाईल खिश्यात ठेवतं पुटपुटला. पण सामंत सर कितीही बडबडले तरिही त्यालाही हे माहित होतं कि त्याला सरांशिवाय पर्याय नाही. शिवा एका गरिब कुटुंबातला होता. आई- वडिल शेतमजूर होते. त्यात आपण शिकून सवरुन या दारिद्र्यातुन बाहेर पडावं याकरिता प्रयत्न करण्यापेक्षा उनाडक्या करणे, शाळेला दांड्या मारणे याकडेच त्याचा कल असायचा. असा हा शिवा फक्त बारावी पर्यंत कसाबसा शिकला खरा पण नोकरी मिळेना. मुंबईसारख्या शहरात त्याला पाठवणं त्याच्या आईला आपल्या लेकाचे 'गुण' माहित असल्यामुळे पटतं नव्हतं. त्यात शिवाची आई शेतात काम करायची,घरचं सगळं पहायची. आणि वडिल कधीतरी मनात आलं तर काम करायचे नाहीतर दारु ढोसुन असायचे. दोघांची भांडणं जुंपली कि आई वाघीणच व्हायची मग त्याच्या वडिलांचं काहीच चालत नसे.दोघांच्या भांडणात हा कधी पडला तर ह्याचंच सँण्डविच व्हायचं.एकदा तर दारु ढोसलेल्या वडिलांवर आईनं रागानं तांब्या फेकून मारला जो मध्ये पडलेल्या शिवाच्या डोक्यावर आदळला आणि टेंगुळ आलं. असा हा घाबरट, आळशी आणि कामाचा कंटाळा करणारा शिवा एका मित्राच्या आग्रहाखातर 'गुरुकुल' मध्ये शिपायाच्या जागेसाठी गेला. कॉलेजमध्ये त्याची नेमकी गाठ पडली ती सामंतसरांबरोबर. त्यांना त्याने त्याची कुंडली सांगायला सुरुवात केली. मी तुला इथं नोकरी मिळवून देतो पण मी सांगेन ती कामं करायची या अटीवर सरांनी प्राचार्यांकडे त्याच्यासाठी शब्द टाकला आणि प्राचार्य तयार झाले. अशा प्रकारे शिवाची कॉलेजातली नोकरी फिक्स झाली. तेव्हापासुन शिवा सरांचे कागद,पुस्तकं सांभाळण्यापासुन ते कॉलेजातल्या इत्थंभुत बातम्या सरांना पोचवण्यापर्यंत सगळी कामं करायला लागला.
.......................
" बाय बाय डॅड " बाईकची किल्ली एका बोटाने गोल गोल फिरवत राजेश रुममधून बाहेर आला. समोरच्या कोचावर त्याचे बाबा त्याला अस्वस्थ दिसले. त्याने जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
" डॅड "
" हा काय म्हणतोस राजेश " राजेशच्या चाहुलीने सामंत सर विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले.
" डॅड Why are you so miserable? काय झालं?" राजेशने वडिलांच्या उतरलेल्या चेहर्‍याकडे पाहून विचारलं.
" मला एच.ओ.डी. च्या पोस्टवरुन बाजूला करुन त्या खंदारे मॅडमना हेड केलं त्या भाऊसाहेबाने."
" What पण कसं शक्य आहे आणि कधी झालं हे !" राजेशने आश्चर्याने विचारलं.
" आजच सकाळी,कोण सांगत यांना नसता उद्योग करायला ! वय होतं आलंय तर शांतपणे घरात बसावं ना माणसाने ! " चिडून सर म्हणाले.
" हो पण Why कश्यामुळे वागले असतील ते असं !" राजेशला शंका आली.
" I don't know why he did so. आधी त्या जाधवसरांच्या रिटार्यडमेंन्ट नंतर त्या निंबाळकर सरांना व्हाईस प्रिन्सिपॉल केलं आणि आता हे ! ते जाधव बरे होते हे निंबाळकर जरा अतिच प्रामाणिक आहेत!" डोकं धरुन ते वैतागून बोलत होते.
" डॅड Don't Worry भाऊसाहेब आता फक्त नावापुरते आहेत जोपर्यंत विक्रम आहे तोपर्यंत नो टेंन्शन. स्वतः इंन्स्टिट्युटचा डायरेक्टरच जर आपल्या बाजूने असेल तर चिंता कसली ! आणि विक्रमला तुम्ही कळवा हे तो नक्कीच काहीतरी करेल का मी कॉल करु ?"
" नको,मी बघतो काय ते आज दुपारी इंन्टिरव्हियु आहेत तेव्हा भेट होईलच." सामंत त्याला म्हणाले.
" डॅड, विक्रमला तुम्हाला नाराज करुन नाही चालणार नाही का !" कुत्सितपणे हसत तो म्हणाला आणि या वाक्यावर सामंतही त्याच्याकडे पाहून गूढ हसले.
क्रमशः
( आता I know तुम्ही पहिल्या भागात आपल्या कथेच्या नायिकेला म्हणजेच अनघाला भेटलात  मग कथेतली मध्यवर्ती व्यक्तीरेखा भाऊसाहेब राजेशिर्केंना भेटलात मग इतर काही प्रमुख पात्रं तुम्हाला मागील तीन भागातून भेटली पण तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल ते कथेच्या नायकाची सो आता पुढील भागात भेटूया विक्रमला म्हणजेच या कथेच्या नायकाला हा आता तो 'निरागस प्रेमाच्या गोष्ट ' मधल्या समर सारखा नाही आहे पण जसजशी कथा पुढे पुढे जाईल तसा तसा तो तुम्हाला आवडू लागेल आणि हा सगळा प्रकार काय आहे तेही हळूहळू उलगडत जाईल सो आता पुढचे भाग खूप हॅपनिंनग असणार आहेत चुकवू नका आणी पाचव्या भागाआधी नव्या वाचकांनी आधीचे चार  भाग पटकन वाचून टाका कारण आता पाचव्या भागानंतर कथा खर्‍या अर्थाने सुरु होईल. भेटूया )

🎭 Series Post

View all