बंधन भाग 31

Love Story, Social Issues

भाग 31
( गेल्या भागात अनघा सकाळी शुद्धीवर येते. रिया खंदारेमॅडमना फोन करुन अनघा आजारी आहे सांगून दहा दिवसाची रजा द्यायला सांगते. विक्रमला सकाळी त्याचं लॉकेट हरवल्याचं कळतं म्हणून तो पुन्हा गोडावुनला जातो पण लॉकेट तिथे सापडत नाही. तिथून घरी येताना त्याला रस्त्यावर नितू आणि अविनाश दिसतात. त्यांच्या मैत्रीबद्दल त्याला कल्पना नसल्याने त्याचा गैरसमज होतो आणि अविनाश तिला त्रास देतोय अस समजून तो अविनाशवर भडकतो. नितू त्याला समजावते. पाहूया पुढे)

अनघा उठुन बेडवरती बसली. सगळ अंग ठणकत होत. डोक प्रचंड दुखत होतं. तरी तिने  हळुहळु अंगावरचं ब्लँकेट बाजुला केलं आणि भितींच्या आधाराने उठत ती वॉशरुमला फ्रेश व्हायला गेली. शॉवरच्या थंडगार पाण्याने तिला जरा बर वाटलं. किती बरं झाल असत ना या पाण्याने त्या घटनेच्या सगळ्या काटेरी आठवणी धुवुन गेल्या असत्या   अस तिला वाटलं. डोक्यावरती पडणार्‍या शॉवरच्या पाण्याच्या धारांमध्ये तिचे अश्रुही मिसळुन गेले. अंगांभोवती बाथरोब गुंडाळून ती बाथरुमबाहेर आली आणि ड्रेसिंगटेबलच्या आरश्यासमोर उभी राहिली. स्वतःचा चेहरा आरश्यात पाहताना तिचा विश्वासच बसेना. स्वतःच्या देहाकडे पाहायचीही तिला भिती वाटायला लागली आणि ती मोठ्याने किंचाळली.तिचं ओरडणं ऐकुन हॉलमध्ये बसलेले बाबा रिया, आईला हाका मारू लागले. त्या अंगणातून धावतच रुममध्ये गेल्या.
" अनु " आई धावतच रुममध्ये आली तोपर्यंत ती जमिनीवर बसुन लहान मुलासारखी पाय दुमडुन रडत होती.
" अनु चल ऊठ ये बस इकडे " आई तिच्या हाताला धरुन तिला उठवीत म्हणाली. दोघींनी तिला बेडवरती बसवलं.
" रडु नको बाळ माझं " आई तिला कुशीत घेऊन स्वतःच रडायला लागली.
" आई शांत हो. ताई अजिबात रडायचं नाही हा!" रिया तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
" हं.... आई मी पोलीसस्टेशनला जायचं ठरवलय." ती निश्चयानं म्हणाली. आई अवाक होऊन काळजीने तिच्याकडे पाहु लागली.
...........
नितू अविनाशसोबत भटकून दुपारी निवांत घरी पोहचली. घरी अरुंधती हॉलमध्येच मासिक वाचत बसली होती. आत्या किचनमध्ये होती. 
" काय ग नीतू विक्रमचं काय केलस तू ?" नितूच्या आत येण्याची चाहूल लागताच अरूंधतीने नजर वरती करित विचारलं तशी ती चपापली. बापरे! घरी काय सांगितल याने नक्की असा विचार पहिला तिच्या डोक्यात आला.
" काही नाही कुठे काय!" ती आपल्याला काहीच माहित नाही अस दाखवत बोलली.
" मग तो म्हणाला नितू मोठी झाली आता! तिला माझी गरज नाही." अरुंधती मासिकाची पानं परतत म्हणाली.
" अ ते असच तु कुठे ते मनावर घेतेस काही पण!" सारवासारव करित नितू तिथून पळाली.
ती विक्रमच्या रुममध्ये जात होती इतक्यात जिन्यात तिला वरुन येणारा जितेंद्र भेटला.
 " हाय, ए काय ग मघाशी काय झालं?" त्याने हसत विचारलं.
" कधी कुठे काय ?" तिने खांदे झटकत विचारलं.
" I know अविनाशला विक्रमने चोप दिला ना सॉल्लीड."तो हसत हळु आवाजात बोलला.
" ए अस काही नाही ते त्याला वाटलं तो मला त्रास देतोय."
" वा रे वा " तो हसत म्हणाला.
" गप्प रे तू चल फुट आता " म्हणून ती त्याचा हात बाजूला करुन विक्रमच्या रुममध्ये गेली.
..................
विक्रम आतमध्ये बसला होता इतक्यात दरवाजा ढकलुन ती आत आली.
" दाद्या सॉरी " तिने तिचे दोन्ही कान पकडले.
" सॉरी काय मलाच वाटलं की असो " तो खाली नजरेने तिच्याकडे न पाहताच म्हणाला.
" दाद्या I know तुला खूप काळजी असते माझी, मम्माची, आत्याची " ती त्यांच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाली.
" ह " इतकच तो म्हणाला. नितू तुझा साधा हात त्याने हातात घेतला तर मला इतकी चीड आली मी तर एका मुलीला...मग  तिच्या भावाला, बहिणीला काय वाटलं असेल! तो मनातून म्हणाला.
" दाद्या काय विचार करतोयस इतका?" तिने त्याच्या शेजारी बसत विचारलं.
" नितू, समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला खूप त्रास दिला असेल आणि त्यामुळे तिला खूप दुःख मिळाल असेल तर काय करायचं गं?" त्याने विचारलं.
" दाद्या तू का विचारतोयस पण हे." तिने आश्चर्याने विचारलं.
" असच सांग ना तूपण अश्या खुपजणींसाठी काम करतेस ज्या त्रासलेल्या असतात, दुःखी असतात मग तुला माहित असेल ना." त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं.
" ह तर तिला सॉरी म्हणायचं माफी मागायची I know नुसत्या सॉरीने एखादीचा त्रास नाही कमी होतं मग काय जमल तर तिला हेल्प करायची पुन्हा हॅपी होण्यासाठी." ती म्हणाली तशी त्याची नजर तिच्याकडे वळली.
" ह " तो म्हणाला.
" ओके तर पण दाद्या तुला याची गरज नाही लागणार तू अॉलरेडी सगळ्याजणींशी इतका वेल मॅनर वागतोस, बोलतोस सो चला तर जेवुया आता." ती हसत बेडवरुन उठली आणि त्याच्या हाताला धरुन ओढत जेवुया चल ना म्हणाली. त्याची इच्छा नसतानाही मग तो उठुन तिच्यासोबत खाली आला.
.........................
" आई आई ऐक ना श्रीकांतचा फोन आलेला." रूममधुन धावत खाली येत रिया म्हणाली. अनघा पोलीस स्टेशनला जायच म्हणतेय याविषयीच कुमुद श्रीधरना सांगत होती इतक्यात रिया तिथे आली. श्रीकांतचा फोन हे ऐकुनच आई घाबरली.
" रे देवा मग तू काय सांगितलस?" आईने विचारलं.
" बाथरुममध्ये पाय घसरुन पडली असं सांगितलं. आजारी सांगितल आणि तो घरी आला तर तिच्या चेहर्‍यावरच्या जखमा बघुन विचारेलच ना तो! बर कॉल का नाही लागत तिचा असपण विचारत होता. तो रात्री ट्राय करत होता कॉल तिचा." रियाने सांगितलं.
" अग तिचा मोबाईल हरवला असेल ना." आई बोलली.
" आई त्याचा पुन्हा कॉल आला तर मी सेकंण्ड नंबर देते आणि ताईचा आहे म्हणून सांगते. तो काही जास्ती कॉल नाही करत." रियाने सुचवलेल्या युक्तीला आईबाबांनीही नाईलाजाने मान डोलावली.
" अहो किती दिवस अस चालणार काय सांगायच ओ त्या वझेंना." आईने काळजीने श्रीधरना विचारलं.
" मला वाटत काही लपवालपवी नको. निर्मलाताईंचा फोन आला तर बघु काय करायच ते." बाबा शांतपणे म्हणाले.
" मला तर काळजीच वाटते. काय होऊन बसलं हो हे. तो कधीच सुखी होणार नाही माझ्या लेकीच्या आयुष्याची माती केली त्याने." आई रागात बोलू लागली आणि रडायला लागली.
" कुमुद शांत हो गं. खचुन नाही चालणार असं." श्रीधर म्हणाले.पण त्यांनाही काही सुचत नव्हतं.  त्यांचं डोकही सुन्न झाल होतं.
................
दोन दिवसानंतर अनघा बाबांसोबत पोलीस स्टेशनला गेली. तिला काही झालं तर या भितीने आईने श्रीधर आणि अनघाला नका जाऊ पोलीस स्टेशनला अस सांगितलं होतं तरीही ते दोघे ऐकले नव्हते. आईला टि.व्ही.वरती च्या बातम्यांमध्ये दिसणारे अत्याचार पिडित तरूणींचे चेहरे आठवले आणि अॅसिड हल्ल्याचे सुद्धा! त्या भितीने तिला पोलिस स्टेशनवगैरे नको वाटत होतं.
" मॅडम तुम्ही सांगताय ते सगळ खरं असलं तरीही काहीतरी क्लू असता तर आपल्याला तपास करायला बरं पडलं असतं." अनघाने 26 डिसेंबरच्या रात्री घडलेलं सगळ त्यांना सांगितलं. सांगितलेला सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सातव म्हणाले.
" हो साहेब तुमचं बरोबर आहे पण मला खरच कॉलेजच्या कँम्पस मधलंच तेवढ आठवतय बाकी मी तिथवर कशी पोचले ते काहीच आठवत नाही. मी शुद्धीवर आले तेव्हा एका अंधार्‍या रुममध्ये होते. अंधारामुळे मला त्याचा चेहराही दिसला नाही." ती म्हणाली.
" हं खूपच चालाखीने हा सगळा प्लॅन बनवलेला होता असणार. तुम्ही घरी आलात तेव्हाही बेशुद्ध होतात म्हणजे तुम्हाला गाडीचा रंग वगैरे पण माहित नसणार." इन्स्पेक्टर म्हणाले. त्यांनी थोडा विचार केला.
" मॅडम तुमचा कोणावर संशय म्हणजे अलिकडच्या दिवसात तुम्हाला कुणी धमकीचे फोन किंवा प्रत्यक्ष भेटून त्रास द्यायचा प्रयत्न असं काही झालं होतं का?" त्यांनी विचारलं.
" नाही तसं काहिच नाही." तिने सांगितलं. तो कॉलेजच्या अॅडमिशन वरुन तिला धमकावत होता हे तिने सांगण जाणूनबुजुन टाळलं. त्यामुळे इन्सपेक्टरनी भाऊसाहेबांना फोन लावला असता. त्यांना आधी कॉलेजच्या अॅडमिस्ट्ररेशनवरुन विचारल असतं मग ते कॉलेजला आधी अॅडमिशन्सच्या प्रकाराची शहानिशा करायला आले असते. त्यामुळे मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार गुरुकुल मध्ये बिनभोबाट सुरु होता अस सिद्ध झालं असत. कॉलेजची त्यामुळे बदनामी झाली असती आणि या प्रकरणामुळे आपल्यावरती हि वेळ आली हे सगळ्यांनाच कॉलेजमध्ये कळलं असतं. अश्यानं भाऊसाहेबांना धक्का बसला असताच शिवाय कॉलेजच्याच एका प्रोफेसरवर अत्याचार झालाय म्हटल्यावर कुठल्या विश्वासाने पालकांनी मुलींना कॉलेजला पाठवलं असतं. हा सगळा विचार ती पोलीसस्टेशनच्या खुर्चीत बसुन करित होती.
" मॅडम मॅडम ऐकताय ना." इन्सपेक्टरनी विचारलं.
" अ हो बोला ना " 
" तुम्ही काहीतरी लॉकेटविषयी मघाशी बोललेलात." त्यांनी आठवण केली तस तिने आपल्या हातातलं ते गोल्डन लॉकेट त्यांच्यासमोर धरलं.
" ह अशी लॉकेट्स हल्ली मुलं सहज वापरतात. यावरुन काही धागेदोरे नाही मिळणार पण असो आम्ही गुन्हा नोंदवुन घेतलाय. तुम्हाला काही आठवलं किंवा कळलं तर नक्की या. आम्हाला काही समजल तर नक्कीच कळवु आम्ही." ते आश्वासकपणे म्हणाले.
" थँक्यु सातव साहेब " अनघाचे बाबा खूर्चीतून उठत म्हणाले. दोघेही तिथून बाहेर पडले. इथे एक आशा वाटत होती तीही फोल ठरली होती.
................
" हॅलो मॅडम, Vikram speaking " अनघाच्या रजेविषयी त्याला समजल तसा त्याने केबिनमधून खंदारे मॅडमना फोन केला.
" हा बोला सर " मॅडम म्हणाल्या. त्याला कसा विषय काढायचा ते कळत नव्हतं.
" कारखानीस मॅडम रजेवर आहेत. Any problem?" अशीच त्याने बोलायला सुरुवात केली.
" हो आयमिन त्या आजारी आहेत अस त्यांची बहिण बोलली मला फोनवर. गँदरिंगनंतर त्यांनी डायरेक्ट रजाच टाकली." काहीच कल्पना नसलेल्या मॅडम बोलल्या.
" हं, तुम्ही आलात का भेटून?" अजुन काही कळतय का म्हणून त्याने विचारलं.
" नाही अजून उद्या जाईन. उद्या 31तारिख आहे ना! न्यु इयरच्या शुभेच्छापण देईन." त्या अस म्हणाल्या आणि त्याला कळेचना कस सांगाव त्यांना नवीन वर्ष साजर करण्याएवढं सुद्धा बळ तिच्यात नसेल इतकं हे वर्ष तिच्यासाठी खराब गेलय. पण काहीच न बोलता फक्त ओके म्हणून त्याने कॉल ठेवुन दिला. खुर्चीवरती मागे टेकून तो विचार करु लागला. आपणच जाऊन भेटूया का असं मन म्हणाल पण दुसर्‍या मनाने लगेच म्हटलं,आतापर्यंत कुठल्याही लेडिज प्रोफेसर्सच्या घरी आपण गेलोलो नाही. भाऊसाहेब सगळ्या प्राध्यापकांना आपल्या घरातले असल्यासारखच वागवतात. त्यांनी कधीही कोणाच्याही घरी जाऊन भेटण वेगळ आणि आपण अस एखाद्या तरुण प्रोफेसरच्या घरी भेटायला जाणं वेगळं. त्यावर पहिलं मन पुन्हा म्हणालं,'विक्रम याचा विचार त्या रात्री करायला हवा होतास हि वेळच आली नसती.'एकच मन दोन वेगळे विचार करित होतं. त्याने दोन्ही हात डोक्याला लावले. शेवटी एकच विचार मनात आला,'ती कशी असेल?'
...................
विक्रमला सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबरला दुपारी कॉलेज सुटल्यावरती खंदारेमॅडम अनघाच्या घरी पोचल्या. त्यांना अस अचानक आलेलं पाहून अनघाची आई बावचळली. तिने त्यांना पाणी देऊन हॉलमध्येच बसवलं आणि ती रूममध्ये गेली. बाहेर मॅडम आल्याचं तिने तिला सांगितलं. अनघाने त्यांना काहीही सांगू नकोस अस आईला सांगितलं. तिला स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन नको होतं शिवाय का कुठे कस अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद तिच्यात आता नव्हती. 
कुमुद बाहेर गेली आणि मॅडमना घेऊन अनघाच्या रुममध्ये आली.
" अनघा काय हे! किती लागलय कुठे पडलीस?" मॅडमने बेडवरती बसत विचारलं.
" अ हा बाथरुममध्ये पडली ती! आजारपणामुळे अशक्त झालीय ना पाय घसरला बाथरुममध्ये." आई पटकन बोलली.
"पण काय झालय? Any serious एवढी आजारी पडलीस अचानक!" 
" काही न
" हो " तिने होकारार्थी मान हलवली.
" बर आणि हॅपी न्यु इयर." त्या तिला मिठी मारित म्हणाल्या. तस तिला रडु आलं. मोठमोठ्याने तिला रडावस आणि त्यांना सगळ सांगाव वाटल पण तिने अश्रु खाली ओघळु दिले नाहीत.
" अ हो तुम्हाला पण खुप शुभेच्छा." ती म्हणाली.
" बर Get well soon. लवकर जॉईन हो." त्या तिच्या गालाला हात लावित प्रेमाने म्हणाल्या. तीही हो म्हणाली.
मॅडम तिथून बाहेर पडल्या खर्‍या पण अनघाचा चेहरा त्यांना पहिल्यांदाच आज इतका भकास आणि उदास वाटला. एखाद झाड मूळांपासुन वादळाने उन्मळुन पडावं तशी भासली ती त्यांना! पण काहीही ज्यादा चौकशी न करता सगळे प्रश्न मनातच ठेवून त्यांनी गाडी त्यांच्या घराकडे वळवली.
क्रमशः

🎭 Series Post

View all