बंधन भाग 123

Social Love

भाग 123
( गेल्या भागात भाऊसाहेबांनी त्यांचं अनघा आणि विक्रमविषयीचं मत अरुंधतीला पहिल्यांदा बोलून दाखवलं. विक्रमची स्थिती पाहून त्यांना त्रास झालाच. दुसरीकडे राजेशने युकेला जायची तयारी सुरु केलीय. नताशा आल्यानंतर काय होणार पाहूया)

                  तिला सकाळी लवकर जाग आली. रात्र या कुशीवरून त्या कुशीवर तळमळून कशीबशी सरलेली. सकाळी तिनं लवकर आटोपलं. कॉलेजला जायचं मनच नव्हतं. आदल्या दिवशी सकाळीच आलेली ती बातमी, तिची स्वतःची ऐनवेळी बिघडलेली तब्येत आणि तरीही हॉस्पिटलला त्याला भेटायला जायचा तिचा हट्ट, घरच्यांना समजावून थकलेली ती. दिवसभर मीडियातून येणाऱ्या त्याच्याबद्दलच्या बातम्या, कॉलेजमधून तिची चौकशी करण्यासोबतच त्याच्याबद्दल आडुन आडुन चौकशी करणारे प्राध्यापकांचे, ऑफिसस्टाफचे फोन, घराबाहेर पडलं तर कोणत्याही क्षणी समोर येतील तसे दबा धरून बसलेले पत्रकार! सगळ्याने ती अक्षरशः हैराण झाली. घरी आत्या वा अरुंधती ला फोन करून त्याच्याबद्दल विचारण्याची हिंमत होईना. भाऊसाहेबांनी आपल्या साठी इतकं काही केलं. प्रत्येक वेळी तो आणि आपल्या मध्ये त्यांनी आपल्याला झुकतं माप दिलं. लग्नाआधी आपल्या पाठीशी उभे राहिले. आपण घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाही ते होतेच आपल्या मागे उभे. आपण विक्रम सोबतचा संबंध तोडला तरी आपलं पुढचं आयुष्य चांगलं जावं म्हणून डिव्होर्ससाठी ही त्यांची ना नव्हती! तिला क्षणभरासाठी वाटलं आपण त्यांच्या करता का होईना पण विक्रमचं ऐकून घ्यायला हवं होतं का! अन्याय करणारी माणसं गुन्हेगार असतातच. पण जी माणसं मदतीला धावून येतात आणि आपण त्यांना मदत घेऊनही दुखावतो तोही अन्यायच ना! जगात वाईट माणसं असतातच पण वाईटासाठी चांगल्याचा बळी जाता नये. भाऊसाहेबांच्या बाबतीत तेच केलं आपण. या विचारातच तिने ड्रेसिंग टेबल वरचा कुंकवाचा करंडा उचलला आणि नेहमीच्या सवयीने भांगेत कुंकू लावलं. मनात त्याचा विचार आपसूक आलाच. तिने टेबल वरचा मोबाईल हातात घेतला आणि जितेंद्र ला फोन लावला.

" हॅलो हा बोला वहिनी."

" भावोजी सॉरी ते मला नाही काल येता आलं."

" इट्स ओके."    जितेंद्र म्हणाला. त्याच्या सुरातली नाराजी तिच्या लक्षात आली.

" भावोजी चिडलाय का तुम्ही?"  तिने न राहून विचारलंच.

" न......नाही " तो तुटकपणे म्हणाला.

" आय एम सॉरी पण तुम्हाला तर माहितीय सगळं! आत्यांना  मम्मांना काही विचारलं तर नाही रुचणार त्यांना कदाचित म्हणून तुम्हाला कॉल....." ती म्हणाली.

" डोन्ट वरी, पहाटेच शुद्धीवर आला तो. ठिक आहे आता."

"हा बरं थॅंक्यु " तिच्या चेहऱ्यावरती नकळत मणभर आनंद पसरला.

" बरं ठेवू का ?"   तो पलीकडून पुन्हा रुक्षपणे बोलला.

" हो ठेवा. ऐका ना." 

" हा बोला."    कानात प्राण आणून तो तिचं पुढचं बोलणं ऐकू लागला. दोन सेकंद तिच्याकडून शांतता.

"  नाही काही..... बाय."    म्हणून तिने फोन लगेच ठेवून दिला. ती म्हणेल मी भेटायला येते त्यांना असं काही तिच्याकडून त्याला ऐकायचं होतं. पण तसं काहीच झालं नव्हतं. आता त्याच्यासमोर हाच प्रश्न होता, विक्रमसमोर आपण गेल्यावरती त्याने अनघाविषयी विचारलं तर काय सांगायचं!
................................................

        गुरुकुल मधलं वातावरण या बातमीने फार काही बरं नव्हतं. सगळं ठीक आहे किंवा सगळं पूर्वीसारखचं ठीक होणार आहे हे भासवण्याचा प्रयत्न सुरू होता. विक्रम असं काही वागेल यावरती कॉलेजमध्ये कोणाचा विश्वास बसत नव्हता.  तीन-चार वर्षे त्याने कॉलेज कडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं होतं. नवे उपक्रम, नवीन नवीन कोर्सेस, कॉलेजच्या इमारतीचा विस्तार, कॉलेजच्या परिसराचे सुशोभिकरण, अद्ययावत हॉस्टेलची सोय, डिजीटल क्लासरुम्स, कॉलेजच्या वाचनालयात तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर या सगळ्या सोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचे उपक्रम, वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, दिग्गजांच्या मुलाखतींचे आयोजन अस बरंच काही कॉलेजच्या सर्वांगीण विकासासाठी त्याने केलं. सगळे कर्मचारी, प्राध्यापक यांना एका टिमप्रमाणे बांधून ठेवलं. त्यांना शिस्त लावली. यु एस ए वरून तो आल्यापासून त्याने कॉलेजचं सगळं चित्रच पालटून टाकलं. कॉलेज वरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यात त्यांना सगळ्यांना धीर देणे यामुळे तर तेव्हा सगळेच कॉलेजमध्ये निर्धास्त झाले होते. त्याने पहिल्यांदाच सगळी सूत्र हातात घेतली होती तेव्हा मात्र काही दिवसातच प्राध्यापक मंडळी वैतागली. भाऊसाहेबांच्या मवाळ स्वभावापुढे कामातली दिरंगाई, कारणं, 'आम्ही करतोय ', ' होईल सगळं ' ' विश्वास ठेवा ' हे गोड शब्द  खपून जायचे. सतत येऊन टोकणारं, मागे पडून  हवं तसं सगळं करून घेणारं कोणी नव्हतं. भाऊसाहेबांना त्यांच्या व्यापातून वेळ नसायचा.पण विक्रमच्या  येण्यामुळे कॉलेजमध्ये ही सगळी मरगळ झटकली गेली. सगळ्यांना जोमाने काम करण्याची सवय लागली. सुरुवातीच्या दिवसात कंटाळलेले, त्याच्या शिस्तीचा जाच वाटणारे आता मात्र त्याच्यासाठी, त्याने लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत होते. सगळ्यांना त्याच्या अवतीभवती असण्याची सवय झाली होती. अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या बातमीने धक्का बसला होता. स्टेजवरून तडफदार बोलणारे, मोठ्या मोठ्या लोकांचे विचार सांगून आपल्याला आयुष्याचं, ध्येय, स्वप्नांचं महत्व सांगणारे सर डिप्रेशनमध्ये होते असतील का! होते असतील तर काय कारणं,  वैयक्तिक आयुष्य फॅमिली प्रॉब्लेमने कंटाळले होते असतील का अशा बऱ्याच चर्चा मुलांमध्ये सुरू होत्या. कॉलेजचं झाकोळलेलं वातावरण प्राध्यापकांच्या लक्षात येत होतं. त्यांनाही हेच प्रश्न भेडसावत होते. प्राध्यापकांनी पासून शिपायांपर्यंत सगळीकडे याच आत्महत्येच्या बातमी चर्चा होती. तर्क- वितर्क सुरू होते.

     सामंतांनी हातातला पेपर बाजूला ठेवला. सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावरती ठळक अक्षरात ती बातमी होती! कालचा दिवस कधी पाहावा लागेल याची कल्पना त्यांनी केली नव्हती. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. त्याचा आत्मविश्वास, त्याची जिद्द, मेहनत  त्याच्या या स्वभावामुळे राजेशने ही असं व्हावं, आपल्या मुलानेही स्वतःचं करिअर घडवावं असं त्यांना वाटायचं. राजेशशी त्याची ओळख झाली तेव्हापासून हे वाटणं वाढतच गेलं.  त्याने कॉलेजकडे लक्ष द्यायला लागल्यापासूनची पुढची तीन वर्ष छान गेली. त्यानंतर मात्र अनघा कॉलेजला रुजू झाली आणि  त्याच्या पुढच्याच वर्षी तिने अॅडमिशनच्या प्रक्रियेतला पैशांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यानंतर चिडलेला तो आणि तिचा बदला घेण्यासाठी म्हणून त्याच वर्षी त्याच्या हातून घडलेली ती चूक. त्याच्या पुढच्याच वर्षी अचानक त्याने तिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी आणि अचानक घाईत आटोपलेलं त्यांचं लग्न आणि उरलेलं वर्षभर तिच्यासोबत आनंदी असणारा, तिला जस हव तस वागणारा तो! ते वर्ष संपलं नी लगेच पुन्हा सगळं बदललं. तिने कॉलेजचे जुने रेकॉर्ड्स तपासणं, माहेरी राहायला जाणं, तिच्या घरी कुणी आजारी आहे अस त्याने सांगत सुटणं, तिचं अधूनमधून वेगळ्याच मुलासोबत येणं- जाणं, गेल्या दोन महिन्यांपासून त्याचं कॉलेजला अधूनमधून कधीतरी येणं आणि अचानक ही कालची बातमी! सगळंच अनाकलनीय होतं.

साधारण चार वर्षांपूर्वीचा तो प्रसंग त्यांच्या नजरेसमोर उभा राहिला. भाऊसाहेबांनी विक्रमच्या स्वागतासाठी बंगल्यावरती आयोजित केलेली वेलकम पार्टी जिथे पहिल्यांदा त्याच्यासोबत त्यांची आणि तेव्हाचे उपप्राचार्य जाधव सरांची ओळख झालेली!


बंगल्याचा सुशोभित केलेला लॉन, लाइटिंग, पाहुण्यांसाठी टेबल्स- खुर्च्या सगळी चोख व्यवस्था. भाऊ साहेबांच्या पक्षातील स्नेही मंडळी, घरातले सगळे सदस्य त्या पार्टीला उपस्थित होते. गुरुकुलच्या सगळ्या प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना आणि शाळेच्या शिक्षकांना सुद्धा आग्रहाचे निमंत्रण होतं. तो यु.एस.ए वरून सांगलीत येऊन चार- पाच दिवस उलटले होते.

" Welcome to India."  जाधव सरांनी त्याला शेकहँन्ड करत म्हटलं. सामंत सर जाधव सरांच्या बाजूलाच उभे होते.

" ओह थँक्स."  त्याने त्यांचं शेकहँन्ड स्वीकारत म्हटलं.

" You're vice principal of our college, Right ?" त्याने म्हटलं तस जाधव सरांनी सामंतांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.

" Come on जाधव सर, मी कसं ओळखलं याचा विचार करू नका. झाले फोर फाईव्ह डेज इकडे येऊन! इतकी बेसिक गोष्ट माहीत असणारच ना!"  तो हसत म्हणाला तसे तेही कसंनुसं हसले.

" By the way,  तुम्ही इतकी इन्फॉर्मेशन ठेवताय याचा अर्थ आम्ही काय समजायचा?"  सामंतांनी काही अंदाज लागतो का ते पाहण्याचा प्रयत्न केला.

" घाई काय आहे हो.... काय Your name येस सामंत सर." तो पुन्हा कोड्यात बोलत हसला.

" न..... नाही म्हणजे तुम्ही गुरुकुलमध्ये आलात तरी आमच्याकडून वेलकम असेल तुम्हाला!"


 जाधव सरांनी मस्का मारुन आपण त्याच्या मर्जीतले कसे होऊ ते पाहण्याचा प्रयत्न सुरू केला.

" इंटरेस्टिंग खूपच आतुर आहात म्हणजे तुम्ही! येऊया की लवकरच!"  तो दोघांच्याही नजरेला नजर देत हसला.

" But be ready for the change!"  तो म्हणाला तसं त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. इतक्यात वेटर ड्रिंकचे ग्लासेस घेऊन आला.

" हं...घ्या "

 दोघांनी ट्रेमधले ग्लासेस त्याच्याकडे पाहत उचलले. त्याने ग्लास हातात घेतला तस जाधव सरांनी नजरेनं सामंतांना खुणावलं. दूर कोपऱ्यात भाऊसाहेब नी जितेंद्र पाहुण्यांसोबत बोलत होते. त्यांच्या हातातले कोल्ड्रिंक ग्लासेस पाहून विक्रमचं असं वागणं त्यांना जरा वेगळं वाटलं!

" हे असं रिअॅक्ट व्हायला काय झालं! माझा फेवरेट ब्रँन्ड आहे...शँम्पेन आवडेल तुम्हाला!"  तो त्यांच्या रंग उडालेल्या चेहर्‍यांकडे पाहत म्हणाला.

" तस.....तसं नाही."

" सामंत My decisions,  My choices लक्षात ठेवा!"

त्याच्या या बोलण्याने दोघांच्याही लक्षात आलं तो भाऊ साहेबांसारखा नाहीये आणि तेव्हा त्यांच्या हे सुद्धा लक्षात आलं, गुरुकुलमध्ये बदलाची ही सुरुवात आहे!

हसून जाधव सर लगेच म्हणाले,
" Wow, I like your confidence बोलणं आणि करणे यात फरक असतो विक्रम."

" असेल पण माझ्यासाठी नाहीये. मी जे बोलतो तेच करतो बाकी कोणाला काय वाटतं आय डोन्ट केअर!"

" विक्रम, तुम्ही हे जे काही ठरवताय, म्हणताय ते वाटत तितकं सोप नाहीये."  जाधव सरांनी म्हटलं.

" I know, I know पण माणसाने स्वप्न पहावीत The sky is not the limit, your mind is ठरवलं तर सगळं शक्य आहे ओ."  त्याने ग्लास ओठाला लावला.

" हं ठीकय. करा काय ते! आम्ही आहोतच." जाधव सर हसले.

" हो पण तुमचं लक्ष असू द्या म्हणजे झालं....."

" म्हणजे What do you mean?"  त्याने सामंतांकडे पाहिलं.

" हेच , तुम्ही कुठे अडकू नका म्हणजे झालं! हो ना सामंत सर."

  जाधव सरांनी सामंतांच्या बोलण्याला दुजोरा दिला.
" कसय You're young, charming, brilliant guy." 

"No way  तसं काही होणार नाही." त्याने ठामपणे म्हटलं.

" नाही, भले भले लोक मोठ्या मोठ्या बाता मारतात. पण एकदा प्रेम रिलेशनशिप....."

" जाधव सर, तुम्ही त्याचा विचार नका करू. काय असल्या बालिश गोष्टींमध्ये मला पडायचं नाहीये." तो मोठ्याने थट्टेच्या सुरात हसला.

" हा चांगलय.पण पुढे एखादी भेटली तर आपल्या फिल्ड मधली तरी नको...." सामंत सर हसताना थट्टेने बोलले.

" सामंत, आपल्या फिल्ड मधल्या मुली म्हणजे बघायलाच नको. एकदा असिस्टंन्ट प्रोफेसर काय झाल्या त्यांना आपणच सर्वज्ञानी असल्याचा फील येतो. मग त्यांची शिक्षणाची कणव, प्रामाणिकपणा, ज्ञानदान वगैरे सगळी तत्त्व जागी होतात....." जाधव सर बोलले त्यावर हसत विक्रम म्हणाला,

" सर तुम्ही पण ना! या असल्या मुलींच्या नादी कोण लागेल! असली मास्तरीण बाई माझ्या घरात आणून मला स्वतःची शाळा नाही करून घ्यायची! अश्या पोरी वरती प्रेम वगैरे...No, Not possible. चलो, Don't think about the future, Enjoy the present. चिअर्स." 
......................................

" सामंत हॅलो, Are you alright ? "काळे सरांनी टेबल वरती हाताने थाप मारली तसे ते भानावरती आले. त्यांनी नजर वरती वळवली. त्यांचे पाण्याने भरलेले डोळे पाहून काळेसर धीर द्यायला पुढे झाले,

" सर, Are you crying.....Please control yourself." तसा त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा बाजूला केला. हाताने  डोळ्यांच्या कडा पुसल्या. काळे सरांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं.

" सर, काय झालंय?  I mean काल ती विक्रम बद्दलची न्यूज आली तेव्हापासून तुम्ही डिस्टरब आहात."

" नो..... का....ही नाही."  सरांच्या नजरेला नजर देण्याचे त्यांनी टाळले. आता काळे सरांनी एक दीर्घ श्वास घेतला.

" Sir, I can understand. विक्रम नी असं का केलं त्याचा विचार तुम्ही सुद्धा करताय न!" तस सामतांनी पटकन नजर वरती वळवली.

" सर, तुम्हाला काय वाटतं हे जे सगळं झालं ते त्यांच्या घरातील प्रॉब्लेम्स मुळे असेल!"

" नाही, I.... I don't know exactly."  सामंतांनी म्हटलं.

" सर, त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मुळे त्यांच्या पर्सनल लाईफ ची वाताहत झालीय. येतय का लक्षात तुमच्या!"

" म्हणजे ?"  सामतांनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं.

" कारखानीस मॅडम..... त्यांनी ते जुने रेकॉर्ड्स मागून घेतलेले. बोलल्या होत्या त्या मला. त्यावेळी तुमचं नाव घेणं मला इष्ट नाही वाटलं. मी तो टॉपीक तिथच बंद केला. पण त्या डिस्टरब वाटल्या होत्या मला. मग त्यानंतरच ते दोघं कॉलेजला एकत्र येईनासे झाले. मॅडमच्या घरी मेडिकल इमर्जन्सीचं कारण सांगितलं. त्यात ते कॉलेज वरती बापुसाहेबांनी केलेले आरोप.... ते सगळं झालं त्यात मॅडमनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली.सगळं वरुन ठीक वाटलं तरी मेबी त्यांचं पर्सनल लाईफ डिस्टर्ब होतं असेल!"

सामंतसर शांतपणे त्यांचं ऐकत होते.

" आणि त्यामुळे जर हे असं घडलं असेल तर मग....."

" मग काय ?"

" हेच की करियर नी रिलेशन या दोन्हींचा बॅलन्स करणं कठीण होऊन बसलं असेल त्यांना किंवा मग दोन भिन्न  विचारांची, मतं असलेली माणसं एकत्र आली की संघर्ष होतो! नी याचा अर्थ एकच हे, जे काही कॉलेजमध्ये.... म्हणजे ते ऍडमिशन्स, जॉब इंटरव्यू मध्ये पैश्यांचा घोळ... सगळ्यात विक्रमची सहमती होती तर!"

 काळे सरांनी थेटपणे अस बोलताच सामंत सरांचा चेहरा खाडकन उतरला. काळेसर समजून गेले काय ते!

" सर, I know your point of view. तुम्ही कष्ट घेऊन इतकं शिक्षण घेतलंत. मान मोडेस्तोवर अभ्यास करून, मेहनत घेऊन साध्या फॅमिली मधून पुढे आलेली आपण माणसं! लाइफ आता तरी सेटल असावं. आरामात जगावसं वाटणं साहजिक आहे. पण आपलं प्रोफेशन वेगळे आहे... शिक्षण म्हणजे प्युअर बिझनेस नव्हे न! युवा पिढी घडवण्याचं काम कॉलेजेस करतात आणि हे असे प्रकार घडतात तेव्हा एज्युकेशन सिस्टीमवरचा तरुणांचा विश्वास उडतो. तुम्ही लोकांनी इथे अॅडमिशन्स साठी वारेमाप पैसे मागायला सुरुवात केली. स्कोरिंग असूनही पैसे.... मग का मुलं  अॉनेस्टली अभ्यास करतील. शिक्षण क्षेत्रात जायचं या भावनेने जॉब साठी इथे येणारे तरुण प्राध्यापक आपल्या बर्वे सरांसारखे.....इथली एक सीट मिळवण्यासाठी पैसे..."

" काळे सर, आय एम सॉरी पण त्यामागचा हेतू फक्त आमचे खिसे भरणं नव्हता. आम्हाला कॉलेजची पर्वा नाही असं नाहीये."

"  सामंत, I know But तुम्हा लोकांना मार्ग निवडला तो चुकीचा होता ना!  एका घटकेत रेवोल्युशन करून कॉलेज सुधारून एज्युकेशन सिस्टीम सुधारणार नाहीये. सातत्य महत्त्वाचं. विद्यार्थी पालक यांचा विश्वास जपत पुढे जाणं महत्त्वाचं. ज्यांच्यासाठी तुम्ही हे करता त्या मुलांचा विश्वास उडाला तर कॉलेजचं नाव मोठं होऊन काय फायदा? आणि दुसरी गोष्ट She's part of his life. आयुष्यात साथीदार हवाच तो नसतो तेव्हाचा एकटेपणा काय असतो ते You know better."

काळे सर म्हणाले तसं सामंतांनी होकारार्थी मान हलवली. आपलं म्हणणं त्यांना पटलं हे त्यांच्या नजरेतून काळे सरांना समजलं तसे ते हसले.
......................................................


            जितेंद्र रूमचा दरवाजा लोटून आत मध्ये आला. त्याच्या चाहुलीने विक्रमने डोळे उघडले. त्याला पाहताच ओळखीचं स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. तो तसाच चालत पुढे आला. त्याची ती अवस्था जितेंद्रला पहावेना. आदल्या दिवशीच्या त्या घटनेने त्याच्या जीवाला सुद्धा चैन नव्हती. अरुंधती, आत्या, नीतु सगळे हवालदिल झालेले. त्या रडून व्यक्त तरी होत होत्या पण तो, भाऊसाहेब त्यांच्या मनाची झालेली अवस्था ते कुणाला सांगणार! त्याला तस बेडवरती एखाद्या आजारी रुग्ण सारखं पाहून भाऊसाहेबांचे डोळे पाणावलेले त्याने पाहिले होते. कालपासून त्याला एक गोष्ट लक्षात आली होती, कितीही काहीही झालं तरी आई-वडील मुलांवर फार काळ नाराज नाही राहू शकत! तो समोर आला आणि त्याच्या समोरच्या स्टुलचेअर वरती बसला. काय बोलावं ते त्याला सुचेना. त्याला वाटलं कुठल्याही क्षणी तो तिच्याबद्दल विचारेल. त्याच्या डोळ्यातून आत्ता या क्षणी पाणी आलेल आपण नाही पाहू शकणार! तो खाली मानेनं त्याच्या समोर बसला.

" काय रे हे असं चेहरा पाडून का बसला?"  त्याचा पहिला प्रश्न.

" ना...नाही सहज."   जितेंद्र कसबस म्हणाला.

" जित्या काय झालय? असा का?"

" असा का ? नी काय म्हणालास, काय झालं? इतकं सगळं झालं नी हे तु मला विचारतोयस!  मी विचारायला हवं तुला हे ! तुला काय झालंय? असं असं का वागतोस? काय करायला चाललेला तू! स्वतःला संपवून सगळे प्रश्न सुटणार होते वाटतं तुझे! या अशा वागण्याला माघार घेणं, प्रोब्लेमपासुन पळून जाणं म्हणतात जे तू कधी करत नाहीस मग आता काय झालंय?"  तो तावातावाने बोलत सुटला.

" जितू, Calm down मघाशी आत्या न मम्माने पण हे बोलून झालंय....."   तो म्हणाला तसा जितेंद्र अजूनच चिडला.

" हे हे तुला इतक साध वाटतं का बोलायला! आणि त्या बोलणार नाही तर काय, आमची काय हालत झाली होती आमचं आम्हालाच ठाऊक! कोण समजतोस विक्रम तू, न्यायाधीश कोर्टाचा का एखाद्या साम्राज्याचा सम्राट का परमेश्वर जे सगळं तुझं तूच ठरवतोस!"

" जित्या I'm not God नी मी नाहीय सम्राट कोणा राज्याचा पण हो माझ्या आयुष्याचा न्यायाधीश मी आहे. आय एम जड्ज अॉफ माय लाइफ!"  तो नेहमीच्या स्वरात बोलला तसा जितेंद्र खांदे उडवत हसला.

" वा! छानय! क्या बात!  या तुझ्या असल्या वागण्याने वहिनींना सुद्धा त्रास....."   जितेंद्र म्हणाला तस त्याचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला, 

" Wait... त्यांचा विषय नको! मी काही त्यांच्यासाठी केलेलं नाहीये. एखाद्या मुलीसाठी जीव द्यायला माझा जीव काय वरती आलेला नाही! मी माझ्या चुकांसाठी मला दिलेली शिक्षा होती ती! तसही कायद्याने शिक्षा झालीच असती because it was crime."

" हुश्श, हात टेकले यार तुझ्यापुढं!"  त्याला काही समजावण्यात अर्थ नाही या आविर्भावात  जितेंद्र उठला.

" जित्या  तू......"

" असो,  मला काही सांगू नकोस तू! टेक रेस्ट."  इतकं बोलून जितेंद्र दरवाजा उघडून बाहेर गेला.  त्याला मात्र आपण शुद्धीवरती आल्या पासून जितेंद्र कोणत्या विचारात आहे हे मात्र लक्षात आलं नाही.
................................................ 

             नताशाने घराची बेल वाजवली. एकदा,दोनदा, तीनदा. दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत ती ठणाठणा डोअर बेल वाजवतच राहिली.

" अरे कुणाचा जीव चाल्लाय?"  राजेशने तिरीमिरीत दरवाजा उघडला. समोर नताशाला पाहून चेहरा हसरा ठेवत त्याने दोन्ही हात पुढे केले.

" नताशा Come ये ये."

मिठीत घेण्यासाठी पुढे केलेले त्याचे हात तिने झटकले नि ती तरातरा आत हॉलमध्ये आली.

" राजेश ये सब क्या है ?"  तिने आत आल्या आल्या चिडक्या सुरात म्हटलं.

" क्या है मतलब?  काय....."  त्याने आपल्याला काहीच समजलं नाही अशा आविर्भावात विचारलं.

" यही सब कुछ.... उस विक्रम ने सुसाईड करने की कोशिश की।"

" हा......ते होय!  हे त्याच्या करतुतीचे परिणाम आहेत!" तो बेफिकीरपणे म्हणाला.

" तेची करतुत का तुम्हारी ?"

" म......म्हणजे व्हॉट डू यु मिन ? काय,  मी सांगितलं का त्याला हे असलं काही करायला."  तो तिची नजर चुकवीत म्हणाला.

" राजेश तुमने मुझसे झूठ क्यो कहा। उसने ये किया, वो किया, वो कितना घटिया इन्सान है, शादी के बाद भी उसने अनघा की जिंदगी बरबाद की वगैरा वगैरा......"

"काय, हे तुला कोणी काय सांगितलं!"  त्याने चाचरत विचारलं.

" उससे तुम्हे क्या। ये सब तुमने झूठ कहा था ना?"  तिने त्याला हाताला धरून तिच्यासमोर वळवलं.

" अरे काय मघा पासून विक्रम विक्रम नी काय ऐकायचय तुला ? बोललो मी खोटं त्यात काय एवढं?"

" राजेश तुम्हारी वजह से मैंने अनघासे झूठ कहा था। वो मेरे और उसके फोटोज भी झुठे थे। तुमने झूठ बोलकर उससे फसाया और मुझे भी उस झुठ का हिस्सा बनाया।"

"अरे क्या तुम्हारी वजह से..... तेच तेच मघापासून नी काय हे विचारायला तू  इथं आलीस का! तुला बरं त्याचा पुळका."

"राजेश त्याचा काय संमध....."

" आणि तू कोण समजते ग स्वतःला! सत्यवचनी वगैरे. तुमच्यासारख्या बायकांना ही फिलोसोफी शोभत नाही नताशा."

" राजेश "

" आवाज खाली, माझ्या घरात उभीयस तू. तुमच्या सारख्या बायकांची जागा आमच्या सारख्यांच्या घरात नसते.. कोण कुठली ग तू मला शहाणपणा शिकवते. आपण कुठल्या चिखलातून आलो आहोत ना ते माणसाने लक्षात ठेवावं."

" राजेश बहुत हुआ ये सब।  तुम जैसे अमीर, खुदको शरीफ कहने वाले लोगों से हम बेहत्तर है।  तुम जैसा बकवास इन्सान मैने आज तक नही देखा। ठीक है, मैं भी नताशा हूँ याद रखना।" 

ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली नी दारातून बाहेर पडली.

" जा काय करायचं ते कर. बाहेर जाऊन बोंबा मारल्यास ना तरी कुणी विचारायचं नाही तुला!"  राजेश दारातुन जाणार्‍या तिला मोठ्याने म्हणाला आणि छद्मीपणे हसला.

क्रमशः

124 गुरुवार रात्री

🎭 Series Post

View all