Jan 19, 2021
नारीवादी

बंधमुक्त माया - भाग 1

Read Later
बंधमुक्त माया - भाग 1

बाळाचा टाहो ऐकला आणि तिचे कान तृप्त झाले. डॉक्टर म्हणाले” मुलगी झाली आहे , अभिनंदन ”!!!! 

बाळाचे रडणे ऐकताच तिला आईची आठवण आली आणि नकळतच तिचं मन भूतकाळात हरवलं...

ऋचा.. तिच्या बाबांची धाकटी मुलगी.. तीन मुली आणि एक लहान मुलगा आणि आई बाबा .. असं त्यांचं कुटुंब. तिथे बाबा पोलीस मध्ये आणि आई गृहिणी. बाबा पार करत होते तिचे. त्यांच्या मते स्त्रियांनी फक्त घरापुरते शिकलं म्हणजे बस झालं. म्हणूनच तीनही मुलींना त्यांनी फक्त जेमतेमच शिकवायचा विचार केला होता. तिचं जग म्हणजे आई , बाबा , भाऊ आणि ताई. बाबांचा खूप जीव होता तिच्यावर. अगदी लाडकी होती ती बाबांची. ती फार हुशार होती अभ्यासात. म्हणूनच तिच्या इच्छेनुसार इंजीनियरिंग केल्यावर मुंबई मध्ये नोकरी करण्याची परवानगी तिला बाबा मुळेच मिळाली होती. बाबांचा खूप विश्वास होता तिच्यावर ...

आणि ती मुंबईला आली. तिच्या छोट्याशा गावातून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शहरात... स्वतःच्या हिमतीवर... दिवस फार छान पुढे जात होते. दिवसभर ऑफिस आणि मग घरी फोनाफोनी... ट्रेनिंग संपवुन जेव्हा प्रोजेक्ट मिळालं, तेव्हा खर्‍या अर्थाने काम सुरू झालं...

नवीन प्रोजेक्टमध्ये मध्ये खूप छान मित्र-मैत्रिणी होत्या.. सगळ्यांचा फार सुंदर ग्रुप तयार झाला होता... ऋचा टेस्टिंग मध्ये होती.. मोठं प्रोजेक्ट असल्यामुळे टीम पण खूप होत्या... सीनियर एम्प्लॉईज पण होते. मुळातच या प्रोजेक्टमध्ये नवीन लोकांना जास्त घेतल्यामुळे अगदी कॉलेजचा माहोल होता प्रोजेक्टमध्ये. अशाच दुसर्‍या एका टीम मध्ये होता वेद. दिसायला छान होता. पण टिपिकल मराठी मुलगा.. स्वभावाने फार छान..

अशातच एकदा ऋचा आणि वेद च्या टीम ला मिळून एक काम दिले गेले. आणि आतापर्यंत हाय-हॅलो पर्यंत असलेले ते दोघेजण दिवसातून बराच वेळ एकत्र काम करू लागले.. टारगेट फिनिश करण्यासाठी पूर्ण टीम एक्स्ट्रा काम करावे लागायचे. आणि अगदी शेवटच्या बसने सगळे घरी जायचे. वेद आणि ऋचा एकाच एरिया मध्ये राहत होते. सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा घरी दोघे एकत्र जाऊ लागले. लंच , स्नॅक्स, चहा , डिनर , काम, प्रवास.. अशा प्रत्येक वेळी ते दोघे एकत्र असू लागले.. सतत एकत्र असल्याने कुठेतरी ऋचाला वेद आपलासा वाटू लागला. आवडू लागला . वेदला सुद्धा ऋचा आवडली होती. पण त्याला यातच बरं वाटायचं की ही माझ्याबरोबर असल्याने माझा भाव वाढते सगळ्यांसमोर. त्याला त्याचं प्रेम समजतच नव्हतं. पण हळूहळू तो तिच्यात गुंतत चालला होता. ऋचा आवर्जून स्वतः जेवण बनवून आणायची त्याच्यासाठी. ती घेत असलेली काळजी त्याला फार आवडू लागली होती. शेवटी दोघांनी एकमेकांसाठीच आपलं प्रेम कबूल केलं.

वेद च्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता या गोष्टीला. पण ऋचा ला ठाऊक होतं की बाबांना हे नाही आवडणार. त्यामुळे दोघांनी थोडे दिवस घरी सांगू नये असा विचार केला. त्याच दरम्यान वेदला त्याच्या टीम कडून ऑन साईटला पाठवायची ऑफर आली. आता हीच वेळ आहे घरी सगळे सांगायची असं वाटून दोघांनी घरी सांगून टाकलं. वेद च्या घरच्यांना मुलगी आवडली आणि ऋचा च्या घरी? तिथे बाबा अजिबात तयार झाले नाहीत. आई, दोन्ही ताई, छोटा भाऊ यांना मात्र आवडला होता मुलगा शिकलेला आहे , कमावता आहे , घरचे चांगले आहेत , मग अजून काय हवंय ? तरीही बाबांना , तिने फक्त मला न विचारता लग्न ठरवलं हे अजिबात पटले नाही. तिच्या दोन्ही बहिणींची लग्न देखील बाबांच्या निवडीने झाली होती. आणि आता ही ऋचा , असं कसं वागू शकते ? सगळे लोक काय बोलतील? यासाठी पाठवले का मुलीला मुंबईला? बाबांना सगळा विचार करून करून वेद चा आणि ऋचा चा अजूनच राग येऊ लागला. मग ऋचा ने ही निक्षून घरी सांगितलं, की लग्न करेल तर फक्त आणि फक्त वेद बरोबर.. अजून कुणाशीही नाही. आणि मुंबईला परत निघून आली.

तिकडे वेद ला ऑनसाईट ला जावं लागलं. ऋचा ने ही प्रोजेक्ट बदलून घेऊन दुसरीकडे अप्लाय केलं. आणि तिला दुसरीकडे ऑन साईट ला जायला मिळाले. भारतात राहिलो तर काहीतरी करून बाबा आपले लग्न दुसर्‍याशी लावतील असं ऋचा ला वाटत होतं. त्यामुळे काही दिवस सगळ्यांपासून दूर राहू या असं त्यांनी ठरवल.

क्रमशः