Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 15

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 15


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 15

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........


सोनल च्या घरी आज सकाळ पासून आवरा सावर सुरू होती, सोनल खूप उत्साहात होती, घर आवरून रेडी होत, बाबांनी नाश्ता मिठाई ची ऑर्डर दिली होती, ती गाडी आली होती बाहेर, ते सामान उतरवून घेत होते

आईने बाजूच्या काकूंच्या मदतीने स्वैपाकाला सुरुवात केली होती, तेवढ्यात शेतातल्या मावशी आल्या,.... "थांबायच होत ना ताई मी येत होते , द्या मी करते तुम्ही बाकीच आवरा" ,

बाबा दोन दा तरी दुकानात जाऊन राहिलेल सामान घेवून आले होते, वैभव दादा ही आवरण्यात बिझी होता, आज ऑफिसला तो उशिराने जाणार होता, त्याने निशा वहिनी ला फोन केला,....... "निघाले का तुम्ही लोक" ,

"हो निघतोच आता, आई बाबा मी येतोय" ,...... निशा

"या लवकर",...... वैभव दादा खूप खुश होता

सोनल खोलीत तयार होत होती, प्रिया, मीनल, रिना तिथे बसुन गप्पा मारत होत्या , हास्य विनोद होत होते, मैत्रिणी सोनल ला चिडवत होत्या, सोनल ला काही सुचत नव्हत, एक वेगळीच धड धड होत होती, तरी मी ओळखते राहुल ला जर अनोळखी मुलाशी लग्न ठरलं असत तर काय करणार होती मी, वेळ ही पटापट जात नाही आज, आताशी दहा वाजले, आज सकाळ पासून राहुल शी बोललो नाही आपण, तो कोणता ड्रेस घालणार आहे काय माहिती, माझ तर आवरलं आहे सगळं

आई मुलींसाठी चिवडा चहा घेवून आली

"अहो काकू तुम्ही कशाला आणला फराळ, आम्हाला सांगायच ना" ,...... प्रिया ने उठून चहा मैत्रिणींना दिला,
.............

तिकडे राहुल कडे आवरायची घाई उडाली होती, राहुल ने सकाळ पासून तीन चार ड्रेस बदलले होते, खूप nervous होता तो ,...... "वहिनी नीट सांगा ना कोणता ड्रेस चांगला आहे, कोणीतरी मदत करा प्लीज ",......

"राहुल भाऊजी चांगले दिसता आहात तुम्ही, चला आता, नाहीतरी इथे संध्याकाळ होईल, आता एवढी तयारी तर लग्नाच्या दिवशी कस आवरेल तुमच ",..... आई वहिनी हसत होत्या

आई वहिनी जे सामान घ्यायच ते बाजूला काढत होत्या, रमेश दादा सोनल कडे परस्पर येणार होता, राहुल आई बाबा वहिनी कार न जाणार होते
.......

सोनल च्या घर जवळ जरा गडबड वाटते आहे, दोन तीन गाड्या बाहेर आहेत, काही प्रोग्राम आहे का? कोणाला विचाराव?....... अविनाश तसाच बाजूला उभा राहिला, काही माहिती समजली तर संतोष ला सांगितल असत

एक बाई बाहेर आल्या, त्या बहुतेक त्यांच्या कडे शेतावर कामाला असतिल, त्यांना असेल माहिती , काय गडबड आहे आज, अविनाश पुढे झाला ......

"ताई... वैभव दादा येणार की नाही ऑफिस ला? माझ काम होत त्यांच्या कडे",...... अविनाश

"आज बहुतेक त्यांना उशीर होईल, सोनल ला बघायला पाहुणे येणार आहेत, पण ते आहेत आता घरी, तुम्ही भेटून घ्या वाटल तर आता त्यांना ",....... ताई

"हो का, अरे वा, कोणत्या गावचे आहेत पाहुणे ",.... अविनाश

" इथले गावातले, इन्स्पेक्टर साहेब त्यांचा भाऊ ",....... ताई

हो का...... छान

अविनाशने संतोष ला फोन केला, संतोष घरी होता,

" बोल रे अविनाश, तिकडे काही गडबड ",....... संतोष

" अरे संतोष तू चिडू नकोस पण आज इकडे बहुतेक राहुल आणि सोनल च लग्न जमतय",........ अविनाश

" काय... तुला कस समजल? , तू कुठे आहेस, मी येवू का तिकडे",...... संतोष चिडला होता

"नको थांब मला आता एका बाईने सांगितल, मी करतो आहे अजून चौकशी ",....... अविनाश

"कोण बाई" ...... संतोष

" त्यांच्या शेतावरची असेल कोणी ",...... अविनाश

" ठीक आहे मी बघतो काय करता येईल ते ",....... संतोष

संतोष ने प्रशांत ला फोन लावला त्याला सगळ सांगितल

"लग्न ठरत आहे ना अजून तर दुसरं काही नाही ना बघता येईल काय करायचं ते, तू एवढ टेन्शन घेऊ नको संतोष ",....... प्रशांत

" अरे म्हणजे मग तू असा कसा बोलतोस प्रशांत, आता काय करायचं आता आपण",..... संतोष

"आता आपण काहीच करायचं नाही, शांत राहा जरा",..... प्रशांत

" तुझा काय प्लॅन आहे प्रशांत",..... संतोष

" सांगतो भेटून पण तू गप्प रहा जरा, घाबरून जाऊ नकोस, पैशाची व्यवस्था झाली का, आज आधी ते दोन हजार रुपये तरी मला देऊन टाक, ते लोक मागायला आले तर अडचण होईल",....... प्रशांत

" नाही, एवढे पैसे जमवायला वेळ लागतोच, मी करतो काहीतरी",....... संतोष

" आपण भेटू थोड्या वेळाने, तेव्हा बोलतो ",...... प्रशांत

"ठीक आहे ",..... संतोष तोंड उतरवून खुर्चीत बसलेला होता

" काय झालं संतोष",...... आक्का

" आई खूप बोर झाल घरात, काहीतरी छान करावस वाटतय मला, पुढे शिकायच होत, कॉम्प्युटर चा क्लास लावायचा आहे, लावू का मी ",...... संतोष

" हो लाव ना",..... आक्का खुश होत्या, चला संतोष काही तरी चांगला विचार करतो आहे

"मी येतो आज चौकशी करून ",..... संतोष

" ठीक आहे, आता कुठे चालला तू",...... आक्का

"आपल्या दुकानावर जावून येतो, बाजारात बाबा असतिल ना तिथे मी जावून बसतो, त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर जातील ते ",..... संतोष

" ठीक आहे लवकर ये, तुझ्या आवडीचा स्वैपाक करते आहे मी आज ",...... आक्का खुश होत्या

संतोष दुकानात गेला, दोन तीन गडी काम करत होते, बाबा आश्चर्यचकित झाले,

" बाबा तुम्हाला बाहेर जायच असेल तर जा, मी आहे इथे, मी थांबतो ",....... संतोष

" ठीक आहे मला एक दोन काम आहेत येतो की एका तासात ",...... बाबांनी तिजोरी लॉक केली आणि चावी घेवून गेले ते सोबत, संतोष सगळीकडे लक्ष देवून होता,

बाबा गेले तसे संतोष ने पूर्ण दुकान फिरून बघितल, धान्य इतर सामान भरपूर भरल होत, गिर्‍हाईक खूप होत, दहा मिनीटात भरपूर गल्ला जमला, संतोष ने विक्रीत झालेले तीन हजार रुपये स्वतःजवळ ठेवले, त्या नंतर ही भरपूर गिर्‍हाईक आले

बाबा आले बाहेरून, संतोष ने उरलेले पैसे त्यांना दिले, बाबा खुश होते, बाबांना तीन हजार रुपये त्यात कमी आहे हे समजलं नाही, आणि समजणारही नव्हत, दुकानात एवढा माल होता.. धान्य होतं अजून दहा हजाराची विक्री झाली तरी थोडसुद्धा सामान संपणार नव्हतं

संतोष ने थोडा विश्वास संपादित केला, बाबांना संतोष मध्ये थोडी सुधारणा झाल्या सारखी वाटत होती, संतोष बराच वेळ दुकानात बसुन होता, खूप मदत केली त्याने, दुपारी जेवायला घरी गेला
......

सोनल च्या घरी बाहेर गाडी थांबली, निशा वहिनी तिच्या आई-बाबांसोबत आली होती, आज पहिल्यांदाच निशा वहिनी घरी येत होती, निशा वहिनीने आल्यावर आई बाबांच्या पाया पडल्या, ती सोनल ला भेटली, सोनलने तिची मित्र मैत्रिणींशी ओळख करून दिली, दादा खुश होता तो बाहेर बसून निशाच्या बाबांशी गप्पा मारत होता,

निशा आली किचनमध्ये, ..... "काही करायचं बाकी आहे का आई? मी करते",..

"नाही ग झालेला आहे, तू सोनलच बघ" ,...... आई

निशा वहिनी खूप आवडली मैत्रिणींना लगेच सगळ्यां मध्ये मिक्स झाली ती

बाहेर राहुल त्याचे आई बाबा रमेश दादा वहिनी आले, सगळे बाहेर आले, त्यांना घरात घेवून आले, सोनल च्या बाबानी सगळ्यांची ओळख करून दिली, राहुल च्या आई वहिनी आत आल्या तस सोनल जावून दोघींना भेटली,

राहुल ची वहिनी खूप छान होती, दोघींच लगेच जमल, घरात गडबड सुरू होती, सगळे पुढे येवून बसले, सोनल ला बाहेर बोलावल निशा वहिनी आणि मैत्रीण सोबत सोनल बाहेर आली, सगळे सोनल कडे बघत बसले,

अतिशय सुंदर दिसत होती आज सोनल, निळी साडी चापून चोपून नेसलेली होती , कानात झुमके, मॅचिंग बांगड्या सोबत राहुल ने दिलेल्या बांगड्या मिक्स केल्या होत्या, लांब केसांची छान वेणी घातली होती , केसात गजरा, साधी सुंदर हुशार अशी सोनल खूप आत्मविश्वासाने सगळी कडे वावरत होती,

राहुला काही सुचत नव्हतं, तो तिच्या कडे बघत राहिला, आज किती सुंदर दिसते आहे सोनल, किती छान झाल आई बाबा हो बोलले ते , आता माझा रिजल्ट लागेल, मग मी पुढच्या परीक्षांची तयारी करेल, मला सोनल ला काहीही झाल तरी एकत्र रहायच आहे, खूप सुखी ठेवायच आहे, सोनल तुला होत असलेला त्रास मला माहिती आहे मी तुझी कधीच साथ सोडणार नाही, मी तुला याप्रसंगी वचन देतो,

रमेश दादा ने सुरुवात केली,.... "आपल्याला माहितीच आहे राहुल आणि सोनल ने एकमेकांना पसंत केल आहे,
आता पुढे काय करू या",...... रमेश दादा वैभव दादा कडे बघत होता

"आता आपण लग्न ठरवून घेऊ, सुपारी फोडून घेऊ, वाटलं तर साखरपुडाही करून घेऊ, नंतर हे दोघं ठरवतील त्याप्रमाणे लग्नाची तयारी करू, सगळे काय म्हणता आहेत",....... वैभव दादा

दोघी साईड च्या आई-बाबांनी होकार दिला, हो चालेल सगळीकडे आनंदी आनंद झाला,

राहुल सोनल खूप आनंदी होते,

" आता आज सुपारी फोडून लग्न फिक्स करू, पुढच्या आठवड्यात साखरपुडा करू आहेत, थोडे दिवस आहेत मध्ये काय वाटतय ",........ सोनल चे बाबा

" हो चालेल, आम्हाला ही थोडी तयारी करायची आहे",..... राहुल चे बाबा

सगळ्यांनी होकार दिला

सगळ ठरल अस जाहीर केल, लग्न फिक्स झाल, वैभव दादाने सगळ्यांना पेढे वाटले,

सोनल राहुल खूप खुश होते राहुल ने इशार्याने विचारल सोनल ला ठीक आहे ना, चालेल ना जे ठरल ते, तिने संमती दिली, दोघांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता,

आई वहिनी ने सगळ्यांना हळदी कुंकू दिल, सोनल राहुल ने उठून सगळ्यांच्या पाया पडल्या,

आत जेवणाची तयारी होत होती, निशा वहिनी राहुल ची वहिनी सगळ्याच मदत करत होत्या, लगेच पंगत बसली, सगळ्यांचे जेवण झाले,

छान गप्पा सुरू होत्या......

" चला मला निघावं लागेल थोड काम आहे, दोन तीन महत्त्वाच्या केसेस आहेत ",....... रमेश दादा

"आम्ही ही निघतो आता",........ राहुल चे आई बाबा वहिनी निघाले, सगळे बाहेर पर्यंत सोडायला आले, सोनल येवून सगळ्यांना भेटली, ते घरी गेले

राहुल ने सगळ्यांचा निरोप घेतला, तो सोनल कडे बघत होता, निशा वहिनी राहुलच्या वहिनीशी बोलत होती दोघींनी सोनल ला बोलवलं

" राहुल भाऊजी बोलून घ्या सोनल शी",...... तसे सगळे हसायला लागले

"मी करतो नंतर तुला फोन सोनल",...... राहुल च्या घरचे निघाले

"चांगले आहेत ना स्वभावाने सगळे",....... बाबा

"हो लगेच मिळून मिसळून गेले आपल्यात, आता पुढे साखरपुड्याची तयारी करावी लागेल",...... आई

निशा वहिनी तिच्या घरचे ही निघाले,........

"खूप छान झाला प्रोग्राम, पुढच्या साखरपुडा च्या तयारी साठी काही आणायचं असेल तर मला सांगा आई ",...... निशा

"हो आपण बोलू फोन वर, तू लवकर ये साखरपुड्याच्या वेळी, तुम्ही ही लवकर या निशा चे आई बाबा ",...... आई

"हो हो आम्ही येवू लवकर",....... निशा

सोनल येवून निशा ला भेटली,

"सोनल ताई आपण बोलू फोन वर, तुमची स्टोरी ऐकायची आहे मला",....... निशा

दोघी छान हसल्या

वैभव दादा निशा वहिनी बराच वेळ बोलत होते

"बरं झालं तू आलीस कार्यक्रमाला, सगळं सांभाळून घेतलं, मला खूप छान वाटत आहे" ,........ वैभव दादा

" आपली सोनल आहेस येवढी छान मलाही खूप छान वाटलं इकडे येऊन, पुढच्या कार्यक्रमाला लवकर येईन मी ",....... निशा वहिनी

" हो चालेल घरी पोचले की कळव",..... वैभव

" हो नक्की ",...... निशा वहिनी तिचे आई-बाबा घरी गेले

सोनल आई बाबा वैभव दादा आत आले...... सगळे खूप खुश होते,........


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now