Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 14

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 14बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 14

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

राहुल घरात आला, आई शेतात होती ती येऊन बसली, सोनल ने पाणी दिलं दोघांना

" चहा ठेऊ का राहुल ",.... सोनल

" नको मी निघतो आता घरी जातो",..... राहुल घरी गेला
.....

" भेटले का रमेश दादा ला, जास्त लागला आहे का त्यांना, ",...... आई

"आई थोडं पायाला लागला आहे" ,...... सोनल

"या संतोष मुळे अजून किती लोकांना त्रास होणार आहे काय माहिती",...... आई

" हो ना काही काही लोक किती खराब असतात, त्रासदायक ",....... सोनल

"नुसती कंप्लेन केली तरी एवढा चिडला तो, किती बदला घेतो तो ",....... आई

" हो आई आणि काही कमी जास्त लागल असत म्हणजे काय केल असत ",........ सोनल

"बोलले का काही ते बदमाश ",...... आई

" नाही ग त्यांना काही माहिती नाही कोणी सुपारी दिली ते , सोडल त्यांना, आणि तिकडे संतोष त्याच्या मित्रांना ही सोडल ",...... सोनल

" का त्यांच्या विरुद्ध काही नव्हते का पुरावे ",...... आई

" नाही सापडले पुरावे आणि कोणी पुढारी आहेत त्यांनी फोन केला होता म्हणे ",..... सोनल

"मग बरोबर आहे, असे लोकांना असा सपोर्ट असतोच",...... आई

" आई अजून एक आनंदाची बातमी आहे, राहुल ने त्याच्या आई बाबांना आमच्या विषयी सगळं सांगितलं आणि ते एक दोन दिवसात आपल्याकडे येणार आहेत, मला असं वाटत आहे की ते बहुतेक उद्या येतील पुढची बोलणी करायला ",........ सोनल

" सोनल आपल्याला घर आवरावे लागेल थोड",...... आई

" हो आई मी करते सुरुवात आवरायला ",...... सोनल

" थोडं खाऊन घे आधी आणि मग कामाला लाग मी पण माझं हे शेताचे काम संपून येतेस मदतीला",...... आई

" स्वयंपाक झाला आहे का ",...... सोनल

" हो झाला आहे आपण आवरून घेऊ आणि मग बसू जेवायला",...... आई

" हो चालेल",...... सोनल

आई परत कामाला गेली, सोनल ने घर आवरायला सुरुवात केली, ती खूप खुश होती अगदी मनासारखं होत आहे, राहुल आहे तसा छान, अगदी प्रेमळ, माझ नशीब चांगल की राहुल माझ्या आयुष्यात आला, आधी मला अजिबात आवडला नव्हता तो, आता मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही, वागायला किती चांगला आहे तो, आई बाबांशी वैभव दादा शी किती व्यवस्थित वागतो, किती प्रेम करतो तो माझ्यावर, किती काळजी घेतो, आज अगदी मी एकटी नको यायला म्हणून तिकडे घ्यायला आला मला, सोनल अतिशय आनंदात सगळ आवरत होती,

आई आत आली,.......

"आई अग राहुल च्या घरचे येतील तेव्हा साडी नेसावी लागेल का मला",....... सोनल

"हो जर काही सुपारी वगैरे फोडायची असली तर नेस",...... आई

"पण एखादी चांगली साडी नाही ग मला, आता जमेल का आणायला आपल्याला",....... सोनल

तस आईने नवीन साडी कपाटातून काढून दिली,...... "तुझी आहे ही साडी घे, आणि ब्लाऊज ही शिवून आणला आहे मी ",...

"अग किती छान आहे साडी, कधी आणली, आणि ब्लाऊज ही रेडी, कस काय आई? तू ग्रेट आहेस ",....... सोनल

" अग निशा च्या बरोबर तुला ही आणली साडी नेकलेस सेट ही",....... आई

"कुठे आहे नेकलेस मग",...... सोनल

"हा बघ आवडला का ",....... आई

" इतके दिवस का नाही दाखवला",....... सोनल

" आता तुझ्या चेहेऱ्यावर किती आनंद आहे आणि आज आनंदाची बातमी मिळाली ना, त्या साठी थांबली होती मी, आज मी खूप खुश आहे, माझ्या दोघ मुलांच लग्न जमतय, म्हणजे वैभव ची लग्नाची तारीख धरायची आहे, त्या नंतर तुझी तारीख फिक्स करू ",....... आई

" आई अग आम्ही शिकणार आहे अजून पुढे राहुल ही मी ही ",...... सोनल

" चालेल, पण ते संतोष च बघा तुम्ही सगळे, मग ठरव काय ते, तुम्ही जस ठरवाल तस, छान शिकून मोठी हो बाळ",...... आई

सोनल ने आई ला मिठी मारली....

बाबा आले बाहेरून, बातमी ऐकुन त्यांना खूप आनंद झाला,...." काही आणायच आहे का बाहेरून? सांग घेवून येवू,ते लोक येतील तर धावपळ नको व्हायला ",.......

आई लिस्ट तयार करत होती, दोन तीन साड्या ही लागतील, मिठाई लागेल

सोनलने दादाला फोन करुन आनंदाची बातमी दिली दिवसभर सोनल आणी आईची साफसफाई सुरू होती, दुपारून जेवायला म्हणून वैभव दादा घरी आला, तेवढ्या वेळात आई-बाबा जाऊन लागतय तेवढं सामान घेऊन आले,

वैभव दादाच्या फोन वर निशा वहिनी चा फोन आला, दादाने वाहिनीला आनंदाची बातमी दिली, वैभव दादाने फोन सोनल कडे दिला

" वहिनी अगं तसा काही कार्यक्रम ठरला तर तुलाही यावा लागेल, काय काय तयारी करू ते ही सांग वहिनी ",.... सोनल

" हो येईल ना मी सोनल ताई, पण मला सांग काय नाव आहे भाऊजींच, कुठे भेटले होते तुम्ही, मला तुमची लव्ह स्टोरी पूर्ण ऐकायची आहे, केव्हा सांगणार, तरच मी तुला त्या दिवशी मदत करेन",.... निशा वहिनी

"काहीही काय ग वहिनी",....... सोनल लाजत होती

" असं चालणार नाही ताई आणि सगळच सांगावं लागेल",........ बऱ्याच वेळा सोनल आणि निशा वहिनी बोलत होत्या
.......

सोनल च दिवसभर मनच लागत नव्हतं, कसे असतील राहुलच्या घरचे? रमेश दादा तर खूपच चांगला आहे, वहिनी खूप छान आहे असं नेहमी राहुल सांगतो, त्याचे आई बाबा कसे असतील? माझं नंतर तिकडे सगळ्यांशी पटेल का? तसं न पटायला काय झालं आपल, पण तरी धडधडतय,

प्रिया, मीनल घरी आल्या भेटायला, सोनल ला खूप आनंद झाला,

"काय मॅडम चेहेरा एकदम खुलला आहे, आम्हाला समजली आनंदाची बातमी ",...... प्रिया

"हो ना, छान झाल ग प्रिया, उद्या बहुतेक राहुलच्या घरचे इकडे येणार आहेत, राहुल ने घरी सांगितल आमच्या बद्दल, त्यांच्या होकार आहे, तू उद्या येशील का इकडे माझ्या मदतीला, रिना मीनल तुम्ही ही या ",...... सोनल

"हो येईल ना मी, काही हरकत नाही, खूप छान ग, लग्न जमवून ठेव, पण आपल्याला सोबत अजुन पुढे शिकायचा आहे लक्ष्यात आहे ना ",....... प्रिया

" हो लक्ष्यात आहे, आणि मी आणि राहुल जे उद्देश डोळ्या समोर आहे ते पूर्ण करणार आहोत, अग पर्वा तू घरी गेल्यावर संतोष चा धमकी चा फोन आला होता, मग आम्ही त्याची पोलिस कंप्लेंन केली ",...... सोनल

" हो का बापरे, संतोष काही ऐकत नाही, बर झाल तक्रार केली त्याची, काय म्हणत होता तो ",...... प्रिया

" तू माझी आहेस, एकदा सांगून समजत नाही का, अस मूर्खासारख बडबड करत होता तो, आणि त्या संतोष ने रमेश दादा वर हल्ला केला",...... सोनल ,

"बापरे, राहुल चा भाऊ ना, काय अस करतो संतोष, कोणाला घाबरत नाही का तो, मग लागला आहे का त्यांना खूप",.... प्रिया

" हो बरच लागल आहे आता हे सगळे प्रकार झाल्यानंतर असं वाटत आहे की लवकरात लवकर लग्न ठरवुन ठेवू",....... सोनल ,

" ही एक वेगळीच कटकट आहे तुझ्या मागे, हो बरोबर आहे ठरवून ठेव लग्न ",..... प्रिया

" हो ना",.... सोनल

" आणि जरी लग्न झाल तरी तू या गावत असशील, आपल्याला सोबत जाता येईल कॉलेज ला ",...... प्रिया

" पण तेवढ्यात तुझ लग्न होवुन गेल तर ",...... सोनल

आता प्रिया लाजत होती, आनंदी वातावरण झाल होत सगळ
...........

संध्याकाळी रमेश दादा घरी आला, तो चहा घेत होता, राहुल त्यांच्या रूम मध्ये गेला,....." दादा वहिनी तुम्ही विचारा ना आई बाबांना उद्या जायचंय का सोनल कडे? कारण त्यांच्याकडे जायचं असेल तर त्यांना कळवावे लागेल, असं अचानक जाणं शक्य नाही",......

"ठीक आहे मी बोलतो आई-बाबांशी",...... रमेश दादा पुढे जाऊन बसला

"आई-बाबा मग जायचं आहे का उद्या आपल्याला सोनल कडे? मला उद्या वेळ आहे, नंतर जमणार नाही",....... रमेश दादा

" हो चालेल जाऊ उद्या पण थोडं सामान घ्यावे लागेल, सोनल साठी साडी वगैरे ",........ आई

"ठीक आहे, तू आणि बाबा जातात का? मी घेऊन येऊ, काय लागतंय ते लिस्ट करून घ्या ",...... रमेश दादा

" तुम्ही दोघं जा ",.... आई

जरा वेळाने रमेश दादा आणि वहिनी जाऊन सामान घेऊन आले,....... "उद्या निघू आपण अकरा वाजेपर्यंत तसं राहुल तु कळवुन दे सोनल च्या घरी, आणी बाबा तुम्ही पण बोलून घ्या सोनालीच्या बाबांशी",..

" ठीक आहे",..... राहुल

रात्री आलाच राहुल चा फोन,...... "आम्ही येत आहोत उद्या अकरा वाजेपर्यंत तुमच्याकडे",..... , राहुल ने फोन त्याच्या बाबांकडे दिला, ते सोनलच्या बाबांशी बोलले,

" ठीक आहे मग उद्या भेटू आपण",..... बाबा
......

रात्रीच जेवण झाल, संतोष वर बाबा लक्ष ठेवून होते, प्रशांत आला संतोष ला बोलवायला, तस बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या, संतोष ने डोळ्याने खुणावले त्याला, प्रशांत बाहेर जावुन उभा राहीला

"आई मी येतो अर्ध्या तासात",...... संतोष

"संतोष इकडे ये,कुठे चालला आहेस? हे बघ झाल ते झाल, आम्ही काही बोललो नाही तुला, आता नीट वागत चल, तू कुठे जाणार नाहीस, मी सांगतो ते ऐक आता ",...... बाबा

तस संतोष ने आक्कांन कडे बघितल

"इकडे तिकडे बघू नकोस संतोष, मला फार राग आला आहे ह",...... बाबा

"अहो मी काय म्हणते",...... आक्का

"तू काही बोलू नको, गप्प बस तू, तूच या पोराला डोक्यावर बसुन ठेवल आहे, आता मी बोलतो तेच होईल इथे, किती लोकांपुढे हात जोडायचे मी तुमच्या साठी, जरा दुकानात शेतात लक्ष दे म्हणा त्या पेक्षा",....... बाबा आज खूप चिडले होते

संतोष आत घरात गेला, त्याने प्रशांत ला मेसेज पाठवला येतो जरा वेळात, आत्ता बाबा ओरडत आहेत, ते जरा झोपले की येतो मी

" ठीक आहे, लवकर ये, थोडं महत्त्वाचं काम होतं",..... प्रशांत

" काय झालं आहे? काही प्रॉब्लेम तर नाही ना ",...... संतोष

"भेटून बोलू मी थांबतो दहा पंधरा मिनिट",..... प्रशांत

पाच मिनिटांनी संतोष गुपचूप बाहेर आला, आक्का होत्या बसलेल्या,

"आई मी जाऊन येऊ का पटकन अर्ध्या तासात, प्रशांत थांबलाय बाहेर ",....... संतोष ,

" तुझे बाबा चिडले आहेत, सगळा राग माझ्यावर निघेल उगीच",.... आई

" का चिडतील पण ते, हे बघ मी काहीही चुकीच ठरवत नाहीये, पण मला माझ्या मित्रांना भेटावसं वाटतं की नाही, आता मला तुम्ही कुठे जाऊ देणार नाही का"?,....... संतोष

"तस नाही पण काळजी वाटते त्यांना तुझी, बरोबर बोलता आहेत ते, जा पण ये लवकर तू बघितलं ना तुझे बाबा चिडले आहेत, आता बाबा झोपलेले नसतील, मी सांगते त्यांना तू बाहेर गेला आहेस असं, मला त्यांच्याशी खोटं बोलता येणार नाही",....... आई

" अग नको सांगू आई, बाबा चिडले तर",..... संतोष

" तर मग नको जाऊस बाहेर ",..... आई

" अस काय, ठीक आहे मी येतो दहा मिनिटात ",..... संतोष

संतोष बाहेर गेला, तसे बाबा बाहेर आले,

" मी बोललो होतो ना त्याला बाहेर नको जाऊस, तरी तो गेला का बाहेर? मी सांगितलं होतं ना तुला की त्याला आडव, या पुढे मी तुम्हाला काहीही बोलणार नाही, काय करायचं ते करा ",.... बाबा

" तो मला सांगून गेला आहे, येईल दहा मिनिटात तो, भेटायचं असेल त्याला मित्राला",..... आई

" ठीक आहे, तुम्हा दोघांना सांगून काही उपयोग नाही, जे करायचं ते करा, शेवटी ज्याचा हात तुटेल त्याच्याच गळ्यात पडेल ",........ बाबा रागाने आज झोपायला निघून गेले
...........

संतोष बाहेर आला, बाहेर प्रशांत उभा होता

"बोल रे प्रशांत काय झालं आहे",.... संतोष

" त्या लोकांना बाकीचे पैसे द्यायचे आहेत, लक्ष्यात आहे ना ",..... प्रशांत

" हो, मी तुला दिले होते ना त्या दिवशी दहा हजार रुपये, आहेत ना ते ",...... संतोष

" हो त्यातले दोन हजार रुपये खर्च झाले अजून दोन हजार रुपये लागतील",...... प्रशांत

" ठीक आहे आता नाहीत माझ्याकडे, मी देतो तुला उद्या, घरी आई बाबा खूप चिडले आहेत, आता सुद्धा ते मला बाहेर येऊ देत नव्हते, कसातरी आलो आहे दहा मिनिट, लगेच पैसे मिळण शक्य नाही, तरी उद्या आईशी गोड बोलून थोडे पैसे घेतो मी",......संतोष

" पैसे ची व्यवस्था करावी लागेल, ते लोक डेंजर आहेत ह, येतील ते आपला पत्ता काढत, त्या आधी पैसे दिलेले बरे ",....... प्रशांत

" हो मी करतो काही तरी ",...... संतोष

" पुढचा प्लॅन रेडी आहे आपला, त्या साठी भरपूर पैसे लागतील, ते आहेत का रेडी तुझे ",..... प्रशांत

" साधारण किती लागतील ",..... संतोष

"पन्नास एक हजार तरी रेडी ठेव",..... प्रशांत

"एवढे लागतील का ",...... संतोष

"हो त्या पेक्षा जास्त लागु शकतात, रिस्क जास्त आहे ",..... प्रशांत

" कसे काय अॅडजेस्ट होतील एवढे",..... संतोष

" जे काही करायचं ते लवकर कर, फार थोडा वेळ आहे आपल्या कडे, नाही तर तिकडे त्या सोनल च लग्न होवुन जाईल ",...... प्रशांत

" काय बोलतोस तू प्रशांत, प्लीज या पुढे माझ्या समोर तरी अस बोलू नकोस", ..... संतोष चिडला होता

" I am sorry Yaar पण मी फक्त तुला परिस्तिथी ची जाणीव करून दिली, नाही बोलणार या पुढे ",...... प्रशांत

संतोष घरी आला, आक्का पुढे बसलेल्या होत्या, बाबा टीव्ही बघत होते, संतोष खरच पंधरा मिनिटात घरी आला बघून ते शांत होते

संतोष रूम मध्ये आला, त्याच्या पाकिटात फक्त चारशे रुपये होते, आई ला उद्या पैसे मागावे लागतील , पण आपल्याला जास्त पैसे हवे आहेत, काय करता येईल, एवढे पैसे अरेंज करण साधी गोष्ट नाहिये, काय कराव, उद्या दोन हजाराची व्यवस्था करू नंतर पुढच्या पुढे बघता येईल, पण काहीही झाल तरी मला सोनल हवी आहे,
.............


बघु पुढच्या भागात काय होतय ते..... होईल का पैशाची व्यवस्था संतोष ची, की सोनल राहुल च लग्न जमेल, काय होईल??.........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now