Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 13

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 13
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 13

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

रमेश दादा पोलीस स्टेशनला आला, हल्लेखोर लॉक अप मध्ये होते, तो त्यांना भेटायला जात होता तेवढ्यात संतोषच्या गावचे इन्स्पेक्टर आले ,

" मला वाटलं तुम्हाला जमतंय की नाही आज यायला कारण संतोष आणि त्याचे मित्र सुद्धा लॉक अप मध्ये असतील ना तिकडे ",...... रमेश दादा

"कसलं काय सोडलं सुद्धा त्यांना सकाळी ",..... इंस्पेक्टर

"कसं काय? काय झालं? झाली का चौकशी पूर्ण", ?....... रमेश दादा

"नाही हो एक तर आधीच त्यांच्याविरुद्ध काहीही पुरावे नव्हते आणि संतोष अन ते बड प्रस्त, पुढारी अण्णा आहेत ना, त्यांनी फोन केला आणि वरून प्रेशर आल त्यांच्या सुटकेसाठी, माझा नाईलाज झाला, मी तरी बराच प्रयत्न केला, शेवटी असं ठरलं की जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा त्या मुलांना पोलिस स्टेशनला बोलवून घेऊ",...... इंस्पेक्टर

" ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही तरी बरंच सहकार्य केलं असं थोडं फार घडायचं, चला आत जाऊ ",......... रमेश दादा

" पण असे मुल नंतर पुढे जावून मोठे गुन्हे करतात, त्यांना पाठीशी घालायला नको ",........ इंस्पेक्टर

" हो, पण काय करणार काही इलाज नाही",........ रमेश दादा

रमेश दादा इन्स्पेक्टर सोबत लॉकअप मध्ये गेले, तीघे बदमाश खाली बसलेले होते ते उठून उभे राहिले

" हे आहेत ते तीन लोक ",.... रमेश दादा

"ओळखीचे वाटत नाहीत, या आधी कोणता गुन्हा केला असेल अस वाटत नाही यांनी, कोणत्या गावचे तुम्ही, इकडे येवून हे उद्योग करतात का, बोलत नाही ना ते काही, ठीक आहे या मधल्या ला घ्या, बरोबर डोक्यावर गोळी मारा",.... इंस्पेक्टर

तसे तिघे तिघे बदमाश रडायला लागले, पाया पडायला लागले ,.......

" आम्हाला सोडा, आम्हाला माहिती नाही काहीच कोणी सुपारी दिली ते , आम्ही फोनवर सुपारी घेतो, आवाज ओळखीचा नाही, नंतर काही आठवलं तर आम्ही सांगू तुम्हाला, आम्हाला कामाचे अर्धे पैसे मिळाले आहेत अजून पैसे घ्यायचे आहेत, जर ते लोक पैसे द्यायला आले तर मी त्यांचा फोटो घेऊन घेईल, याचा मी तुम्हाला वचन देतो, आम्ही पूर्ण सहकार्य करू ",......गुंड

रमेश दादा आणि इन्स्पेक्टर बाहेर येऊन बसले,

" वाटतय की खरच या तीन लोकांना काहीही माहिती नाही, ही सुपारी कोणी दिली होती हे शोधाव लागेल, भुरटे चोर वाटत आहेत हे, सोडून देऊ का त्यांना"?,........ रमेश दादा

" हो सोडून द्या त्यांना आणि त्यांच्या मागे कोणीतरी पाळतीवर ठेवा ते कुठे जात आहे काय करत आहे कारण ते अर्धे पैसे बाकी आहेत अस म्हणता आहेत म्हणजे हे लोक पैसे घ्यायला जातील तेव्हा आपल्याला बरोबर कळेल कोण आहेत सुपारी देणारे",....... इंस्पेक्टर

" ठीक आहे ",.... रमेश दादा

"मी निघतो आता , खूप काम आहेत तिकडे ",...... इंस्पेक्टर
..............

सोनल च्या बाबांना थोडं काम होतं बाबा बाहेर गेले, आई घरात आवरत होती ......

" वैभव दादा तू येतोस का माझ्यासोबत रमेश दादा ला बघायला",....... सोनल

" हो चालेल, जाऊ आपण ",..... वैभव दादा

आईने चहा नाश्ता दिला

" संतोष आणि त्याचे मित्र बघितल का कसे वागता आहेत, तुम्ही दोघ ही सावध रहा",...... आई

"हो ना रमेश दादा एवढे इंस्पेक्टर आहेत तरी त्यांना सोडल नाही त्या संतोष ने, किती डेंजर आहे तो",....... सोनल

" कोणी घाबरू नका, फक्त सावध रहा",...... वैभव दादा

वैभवने रमेश ला फोन करून बघितल,...... "कुठे आहात तुम्ही, आम्ही येतो तुम्हाला भेटायला ",....

" मी आता पोलीस स्टेशनला आहे",..... रमेश दादा

"तुम्हाला सोनल ला भेटायचं होतं",... वैभव दादा

" या तुम्ही पोलीस स्टेशनला तुमची ती संतोष ची केस कच्ची पक्की काय करायचे ते ठरवून घेऊन आणि आपली भेट ही होईल ",........ रमेश दादा

सोनल ने राहुल ला फोन केला,......" मी रमेश दादा ला भेटायला जात आहे, तू पण येतो आहेस का तिकडे",...

" ठीक आहे येतो मी म्हणजे मग वैभव दादा ऑफिसला जाईल आणि आपण दोघ घरी येऊ, तुलाही सोबत होईल आणि मला तुझ्याशी बोलायच आहे थोडसं ",....... राहुल

सोनल आणि वैभव दादा बाहेर निघाले, अविनाश बाहेर उभा होता टपरी वर, त्याला सोनल कडे लक्ष द्यायच काम दिल होत संतोष ने, पैसे ही मिळत होते त्याला या कामाचे, तसा अविनाश ने संतोषला फोन केला,...." सोनल आणि वैभव आत्ताच मोटरसायकलवर कुठेतरी गेले ",..

" कुठे गेले ते ",..... संतोष

"ते माहिती नाही",...... अविनाश

"त्यांच्या मागे जा आणि कुठे जातात ते सांग",..... संतोष

" ठीक आहे",....... अविनाश त्यांच्या पाळतीवर होता

सोनल आणि वैभव दादा पोलीस स्टेशनला पोहचले, अविनाश थोडं अंतर ठेवून बघत होता, त्याने संतोषला कळवलं,..... "वैभव आणि सोनल पोलीस स्टेशनला आले आहेत",..

"कशाकरता ",..... संतोष

" माहिती नाही बहुतेक त्यांनी तुझ्यावर कम्प्लेंट केली होती ना, त्यासंदर्भात आले असतील",...... अविनाश

"थांब मी येतो तिकडे",........... संतोष ,

"नको संतोष नको येवू इकडे, तुमच्या गावचे पोलीस इन्स्पेक्टर मला आत्ताच बाहेर जाताना दिसले, ते इथेच आहेत उगीच गडबड होईल",........ अविनाश

" ते कश्याला आले तिकडे, अरे हो बहुतेक ज्यांनी हल्ला केला त्या लोकांना भेटायला आले असतिल, ते लोक काही बोलणार तर नाही ना ",....... संतोष ला टेंशन आल होत

संतोष ने प्रशांत ला फोन केला,......" ते लोक काही बोलणार नाही ना आपल्या बद्दल, आज इंस्पेक्टर तिकडे गेले आहेत सोनल च्या गावाला, आता अविनाश ने बघितल त्यांना तिकडे, मला टेंशन आल आहे ",....

" काही काळजी करू नकोस संतोष, सगळ सेट आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, हल्लेखोरांना नाही माहिती आपल्या बद्दल ",....... प्रशांत
.............

घरात संतोष आजारी असल्यास सारखा पडून होता, आक्का काळजीने आसपास होत्या, थोड्या वेळाने संतोष उठून बसला तेव्हा आक्कांना बरं वाटलं, आक्कांनी त्याला चहा दिला,

" हे बघ संतोष मी काय म्हणते आहे तुझे बाबा म्हणतात ते बरोबर आहे, आपण बघून ना दुसरे स्थळ, त्या सोनलला काय सोन्याचे पाणी लागल आहे का? कशाला तू तिच्यासाठी मारपीट करतो, धमक्यांचे फोन करतो, हे असे योग्य नाही, तुला काही करता काही झालं तर आम्ही काय करणार, काल घरी पोलीस आले, तुला धरून नेलं, या आधी या घरी कधीही पोलीस आले नव्हते, तुझे बाबा बघितलं ना किती सभ्य आहेत, नको करूस असं, आताही सारखा तुझ्या मित्राचा फोन येतो आहे, त्याचा फोन आला की तु लगेच तयार होतो आणि बाहेर जातो, काय ठरतंय तुमच, काही उद्योग करू नको, या वेळी बाबा सोडायला येणार नाही तुला, मी आधीच सांगून ठेवते, असं करू नको स्वतःकडे लक्ष दे ",..... आक्का समजावत होत्या

" नाही आई मी काही केल नाही ",...... संतोष

" गप्प बस एकदम तुला काय वाटल मला काहीच माहित नाही का ",........ आक्का

संतोष चुपचाप सगळे ऐकत होता, त्याला कळून चुकलं की आईला माहिती आहे की आपण हल्ला केला आहे, आता जरा आईपासून पण सावध राहावे लागेल, घरातून काहीही बोलायच नाही
...............

वैभव दादा आणि सोनल आत पोलिस स्टेशन मध्ये गेले, रमेश दादा आत काम करत बसलेला होता तो या दोघांना बघुन उठून उभा राहिला, तसं वैभव दादा पटकन पुढे गेला

"तुम्ही बसा प्लीज रमेश दादा उठू नका",...... वैभव

सोनल पुढे गेली जाऊन खुर्चीवर बसली, रमेश दादा सोनल कडे बघत होता ,...... "रमेश दादा आय एम सॉरी माझ्यामुळेच तुमच्यावर असा हल्ला झाला",..

"काहीही काय बोलते सोनल, काही प्रॉब्लेम नाही, आणि हे वाईट प्रवृत्तीचे लोक अशीच असतात तू एवढं टेन्शन घेऊ नकोस, यावरून समजल आपल्याला की आपला शत्रू काय करू शकतो, मला आता सगळं समजलं आहे, हे त्या संतोषच कारस्थान आहे , तरीही मला वाईट वाटत आहे त्या विरुध्द पुरावे नाहीत",.... रमेश दादा

" रमेश दादा तुम्ही काहीही काळजी करू नका, सापडेल बरोबर पुरावा",...... वैभव

" सोनल आता तू आणि वैभव दादा तुम्ही सगळ्यांनी सावध राहा ",..... रमेश दादा

ते सगळे बोलत असतानाच राहुल तिथे आला

" अरे वा आज येथे सगळे जमले आहे का एकत्र, तुझीच कमी होती राहुल ये ",..... रमेश दादा

तसा राहुल हसला... " नाही दादा ते वैभव दादा ऑफिसला जातील मग सोनल एकटीच राहिला तर तिला घरापर्यंत सोडायला मी आलो आहे",..

" हो बरोबर आहे महत्त्वाचं काम आहे हे" ,..... सगळे हसत होते रमेश दादांनी सगळ्यांसाठी चहा मागवला

" काय करायचं कंप्लेंनच, संतोष काही सुधारणार नाही, त्याला तुम्ही तिकडे विचारायला गेले तर अजून त्याने हल्ला केला तुमच्या वर, वाईट वाटतय आम्हाला ",...... वैभव दादा

" काही हरकत नाही वैभव तुम्ही काळजी करू नका, मला असं वाटत आहे की कंप्लेन तशीच राहू देऊन नंतर बघू काय करायचं ते आहे",....... रमेश दादा

" तिकडे संतोषने ते काही कबूल झाले का ",...... राहुल

" नाही त्यांची सुटकाही झाली आत्ता ते इन्स्पेक्टर ते सांगत होते, हे मोठे लोक वरून प्रेशर आणतात ",....... रमेश दादा

" असू द्या, काही हरकत नाही, देव बघतो आहे, होईल काहीतरी, पण आपण सावध राहू या",....... वैभव दादा

" चला मी निघतो ऑफिसला मला उशीर होत आहे",....... वैभव दादा

" ठीक आहे राहुल तू सोनल ला घरी सोड आणि हे बघ राहुल उगीच इकडे तिकडे फिरत बसू नका कारण संतोष आणि त्याचे मित्र सगळ्या गावात पसरलेले आहेत त्यांना एवढ्यात निरोप गेला असेल की तुम्ही दोघे पोलीस स्टेशनला आलेले आहात",.... रमेश दादा

"हो आम्ही लगेच घरी जातो तुम्ही काळजी करू नका",...... राहुल

"तू गाडी आणली आहे का राहुल नाही तर पोलिसांची जीप पाठवतो",...... रमेश दादा

"नाही, मी आणली आहे स्कूटर, जातो आम्ही नीट ",..... राहुल

वैभव दादा सोनल राहुल सगळे निघाले

" नीट जा ग घरी सोनल आणि घरी गेल्यावर फोन कर",..... वैभव

" ठीक आहे दादा",...... सोनल

वैभव दादा ऑफिस ला निघून गेला

सोनल आणि राहुल गाडी जवळ उभे होते

अविनाश ने लगेच संतोषला फोन केला,......" आत्ताच वैभव ऑफिसला गेला आणि सोनल आणि राहुल आता घरी जात आहेत",...

"तो राहुल ही आला आहे का तिकडे, कशाला आता? , का गेले होते ते पोलीस स्टेशनला",...... संतोष चिडला होता

" माहिती नाही, जवळ नाही जाऊ शकत ऐकायला, काही तरी बोलता आहेत ते ",...... अविनाश
.....

राहुल सोनल बोलत उभे होते......

" रमेश दादा ला फार लागल आहे का",..... सोनल

" थोड लागलय पायाला ",...... राहुल

" तुला माहिती आहे का सोनल रमेश दादा नी आपल्याविषयी माझ्या आई-बाबांना सगळं सांगितलं आपल्या विषयी आणि त्यांचा होकार आहे ",...... राहुल

सोनल ला खूप आनंद झाला,..... "काय बोलतोस तु, कधी काल सांगितल का ",..

" हो काल वैभव दादा समोर सांगितलं, आई विचारत होती दादाला की हा तुझा मित्र आहे का? तेव्हा रमेश दादा ने सांगितलं की नाही तो सोनल चा भाऊ आहे मग दादाने आपल्या बद्दल सगळ सांगितलं, मी पण पुढे बोललो, एक मोठ टेंशन कमी झाल ",..... राहुल खुश होता

" हो ना, पुढे काय करायच आहे मग आपलं ",...... सोनल

" मी एक-दोन दिवसात आई बाबांना घेऊन येतो तुमच्याकडे, लग्न ठरवून टाकू, साखरपुडा करून घेऊ आणि पुढे ठरल्याप्रमाणे एका वर्षाने लग्न करू, चालेल ना तुला हा प्लॅन",........ राहुल

" हो चालेल काही हरकत नाही" ,...... सोनल लाजली होती, राहुल तिच्या कडे बघत होता, दोघ खुश होते

" रमेश दादा वर हल्ला झाला त्याच मला खूपच वाईट वाटत आहे, मला शंभर टक्के खात्री आहे की हा हल्ला संतोषच्या मित्रांनीच केलेला आहे, तो जो प्रशांत आहे ना तो खूप आगाऊ आहे तो संतोषला सगळे सल्ले देतो, तोच मूळ सूत्र धार आहे ",...... सोनल

"हो पण आता त्यांच्याविरुद्ध काही पुरावे सापडले नाही ना, आता काहीच करता येणार नाही आणि ते श्रीमंत लोक आहेत, अशी अटक केली की असे बाहेर निघतात",...... राहुल

" हो ना किती खराब वागतात ते, त्या आक्का आत्या त्याला सपोर्ट करतात, ते बाबा चांगले आहेत पण त्या बाबांचे ते दोघं जणं ऐकत नाही ",...... सोनल

" ते त्यांची काही का करेना पण ते आपल्याला कशाला त्रास देत आहेत, एवढा इन्स्पेक्टर आहे माझा भाऊ तरी ते घाबरले नाहीत तर ते आपल्याला तर काहीही करू शकतात, आपण दोघांनी सावध राहायला हवं ",...... राहुल

" हो ना बापरे ",...... सोनल

" आपण दोघांनी दर एक दोन तासाला एकमेकाला मेसेज करायचा आणि महत्वाचे नंबर पाठ करून ठेव सोनल",..... राहुल

" तू हे मला सगळं का सांगतो आहेस राहुल? काही धोका आहे का"?,....... सोनल

" पुढे काहीही सांगता येत नाही सोनल, तू घाबरू नकोस पण आपण सावध असलेलं बरं आणि तू अजिबातच एकटी बाहेर राहणार नाही, कुठे जायचं असेल तर मला सांगायचं आपण एकदा लग्न ठरवून साखरपुडा करून घेऊन मग काही टेन्शन नाही ",........ राहुल

राहुलने सोनलला घरी सोडलं,

........

बघुया पुढच्या भागात काय होत ते, वाचकांचे खूप आभार........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now